Google वर हॉटेल शोधा

Google वरील हॉटेल शोध हे तुम्हाला तुमच्या प्रवासासाठी निवासस्थाने शोधण्यात, त्यांची तुलना करण्यात आणि ती बुक करण्यात मदत करते. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या गरजा आणि प्राधान्यांशी जुळणारी हॉटेल शोधणे. तुम्ही किंमत, स्थान, वापरकर्ता रेटिंग आणि हॉटेलचा दर्जा यांसारख्या पॅरामीटरनुसार फिल्टर करू शकता.
  • फोटो, वापरकर्ता परीक्षणे, सुविधांचे तपशील आणि स्थान माहितीद्वारे हॉटेल व आसपासच्या परिसराविषयी जाणून घेणे.
  • तुमच्या राहण्याच्या किंमतींची तुलना करणे किंवा आमच्या बुकिंग भागीदारांपैकी एका भागीदाराद्वारे रूम बुक करणे.

तुमचे Google वरील हॉटेल शोध सुरू करा

Google वरील हॉटेल शोध हे सुरू करण्याचे तुमच्याकडे दोन मार्ग आहेत: 

  • google.com/travel/hotels वर जा आणि तुमच्या शोध संज्ञा व प्रवासाच्या तारखा एंटर करा. तुम्हाला फक्त माहिती हवी असल्यास, तुम्ही लोकप्रिय गंतव्यस्थानांपैकी कोणतेही एक ठिकाण निवडूदेखील शकता.
  • google.com वर सुरुवात करा. तुम्हाला जेथे भेट द्यायची आहे त्या शहर किंवा प्रदेश "यामधील हॉटेल" शोधा आणि "पाळीव प्राण्यांसाठी अनुकूल" किंवा "डाउनटाउन जवळ" यांसारख्या आवश्यकता जोडा. शोध परिणामांमध्ये, तुम्हाला हॉटेल शोध युनिट सापडेल, यामध्ये साधारणपणे नकाशासह चार हॉटेलची सूची असते. Google वर शोधणे तुम्हाला पुढे सुरू ठेवायचे असल्यास, युनिटवर क्लिक करा.

Google हॉटेल कशी रँक करते

महत्त्वाचे: हॉटेल ही शोध परिणामांमध्ये दिसण्यासाठी Google ला पैसे देत नाहीत, तसेच त्यांच्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी ते पैसे देऊ शकत नाहीत. 

तुम्ही तुमच्‍या शोध संज्ञा एंटर केल्‍यावर, तुम्‍हाला हॉटेल परिणामांची सूची आणि त्यासंबंधीचे परिणाम दाखवणारा नकाशा दिसतो. मोबाइलवर तुम्हाला यांपैकी एखादा दिसू शकतो. बाय डीफॉल्ट, हे परिणाम उपयुक्ततेनुसार क्रमाने लावले जातात. तुमच्या शोध संज्ञा आणि हॉटेलच्या विविध पैलूंसह, उपयुक्ततेनुसार रँकिंगमध्ये डझनभर घटकांचा विचार केला जातो, जसे की:

  • स्थान
  • किंमत
  • वापरकर्ता रेटिंग आणि परीक्षणे

तुमची ब्राउझिंग अ‍ॅक्टिव्हिटी आणि Google वरील अलीकडील शोधांवर आधारित तुमचे परिणाम पर्सनलाइझ केले जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्यास, पर्सनलायझेशनदेखील तुमच्या मागील बुकिंगवर आधारित असू शकते. तुमच्या परिणामांमध्ये पर्सनलायझेशन दाखवण्यासाठी मेसेज समाविष्ट असू शकतात, उदाहरणार्थ "तुम्ही अलीकडे हे हॉटेल शोधले आहे." तुम्हाला कोणते परिणाम मिळावेत ते नियंत्रित करण्याकरिता, तुमच्या पुढील गोष्टी कशा अ‍ॅडजस्ट करायच्या ते जाणून घ्या:

तुम्हाला परिणामांच्या सर्वात वरती एक किंवा अधिक सशुल्क जाहिराती मिळू शकतात, त्यांना "जाहिरात" बॅज आणि जाहिरातदाराच्या नावासोबत दाखवल्या जातात. या जाहिराती एखाद्या लिलावाद्वारे निवडल्या आणि रँक केल्या जातात, ज्यामध्ये Google हे लिलाव व जाहिरातीची गुणवत्ता विचारात घेते. या जाहिराती तुमच्या शोध क्वेरीशी संबंधित असतात, तेव्हाच दिसतात आणि त्यांचा शोध परिणामांवर कोणताही परिणाम होत नाही. हॉटेलच्या जाहिरातींविषयी अधिक जाणून घ्या.

तुमचा हॉटेलशी संबंधित शोध मर्यादित करा

प्रत्येक हॉटेलच्या परिणामामध्ये तुम्हाला त्या हॉटेलचा स्नॅपशॉट मिळतो. तुमच्या तारखांनुसार बुकिंग करण्यासाठी तुम्हाला सरासरी वापरकर्ता रेटिंग, मुख्य सुविधा आणि आमच्या भागीदारांकडून सर्वात कमी किंमत यांसारखी माहिती मिळू शकते. आम्ही तुम्हाला “डील” किंवा “सर्वोत्तम डील” हा बॅज दाखवून त्या भागातील एकाच प्रकारच्या हॉटेलच्या भाड्यांच्या तुलनेत किंमत किफायतशीर आहे का ते सांगतो. आम्ही डील कशी ओळखतो याविषयी अधिक जाणून घ्या

"पर्यावरणाला अनुकूल असल्याचे प्रमाणित" या हिरव्या बॅजद्वारे मान्यताप्राप्त संस्थांच्या मानकांची पूर्तता करणारी सस्टेनेबिलिटी पद्धती पुरवणारी हॉटेलदेखील तुम्ही ओळखू शकता. हॉटेलमधील सस्टेनेबिलिटीविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही जे शोधत आहात त्याचे नेमके परिणाम शोधण्यात तुम्हाला मदत व्हावी, यासाठी तुम्ही पेजच्या सर्वात वरती फिल्टर आणि क्रमाने लावणे या पर्यायांसह परिणाम अ‍ॅडजस्ट करू शकता. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता: 

  • तुमच्या तारखा किंवा तुमच्या गटातील लोकांची संख्या अ‍ॅडजस्ट करणे.
  • तुमचे परिणाम सर्वात कमी किमतीनुसार किंवा सर्वोच्च वापरकर्ता रेटिंगनुसार क्रमाने लावणे.
  • किंमत, वापरकर्ता रेटिंग, हॉटेलचा दर्जा आणि सुविधा यांसारख्या पॅरामीटरनुसार तुमचे परिणाम फिल्टर करणे.
  • हॉटेल कुठे आहेत ती शोधण्यासाठी नकाशा वापरणे किंवा विशिष्ट स्थानानुसार तुमचे शोध परिणाम अ‍ॅडजस्ट करणे.

टीप: उपलब्ध असेल तेथे, तुम्ही त्याऐवजी सुट्टीसाठी रेंटलदेखील शोधू शकता.

विशिष्ट हॉटेलविषयी अधिक जाणून घ्या

विशिष्ट हॉटेलविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, हॉटेलच्या “प्लेसशीट” किंवा तपशील असलेल्या पेजवर जाण्याकरिता सूचीवर कुठेही क्लिक करा. उपलब्ध असेल तेथे, Google भागीदारांकडून तुमच्या तारखांसाठीच्या किमतींची सूची मिळवण्याकरिता, तुम्ही किमती पहा वर क्लिकदेखील करू शकता.

प्लेसशीटच्या "अवलोकन" टॅबवर, तुम्हाला हॉटेलची संपर्क माहिती, त्याच्या वेबसाइटची लिंक आणि चालकांसाठीचे दिशानिर्देश मिळू शकतात. तुम्हाला हॉटेलचे स्थान, वापरकर्ता परीक्षणे, फोटो आणि सुविधांबद्दलचे स्नॅपशॉटदेखील मिळू शकतात. अधिक माहितीसाठी, पेजच्या सर्वात वरती असलेल्या संबंधित टॅबवर जा किंवा पुरवलेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला Google च्या हॉटेल, ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सी आणि मेटासर्च भागीदारांद्वारे हॉटेल रूम बुक करण्याच्या लिंकदेखील मिळू शकतात.

हॉटेलच्या किमती

हॉटेलचे मालक, ऑनलाइन प्रवास संस्था, मेटासर्च इंजिन आणि इतर प्रवास पुरवठादार यांसारख्या Google भागीदारांद्वारे हॉटेलच्या किमती पुरवल्या जातात. भागीदार हे Google सोबत किमती कशा शेअर करतात याबद्दल अधिक जाणून घ्या.

आमचे भागीदार हे आमचे किमतीच्या अचूकतेसंबंधित धोरण याला सहमती दर्शवतात. या धोरणानुसार, त्यांनी Google ला पाठवलेल्या किमतींमध्ये कर आणि शुल्काचा समावेश असणे व त्यांच्या बुकिंग पेजवर तुम्ही भरणाऱ्या एकूण किमतीशी त्या जुळणे आवश्यक आहे. भागीदार Google वर दाखवत असलेल्या किमतीच तुम्ही देत असल्याची खात्री करण्यासाठी, आम्ही अचूकतेच्या अनुषंगाने नियमितपणे किमती तपासतो. तथापि, हॉटेलच्या किमती झटपट बदलू शकतात, त्यामुळे तुम्ही आमच्या एखाद्या भागीदाराकडे बुक करण्याचे निवडल्यास, तुमच्या रूमची अंतिम किंमत काळजीपूर्वक तपासा.

आमचे भागीदार देऊ करत असलेल्या किमती काहीवेळा पुढील घटकांनुसार बदलू शकतात:

  • तुमच्या डिव्हाइसचा प्रकार, उदाहरणार्थ मोबाइल किंवा कॉंप्युटर
  • तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले आहे की नाही.
  • तुम्ही एखाद्या प्रेक्षक सूची चा भाग आहात का

“कस्टमाइझ केलेल्या” किमतींच्या बाजूला ॲस्टेरिस्कची (*) खूण असणे.

काहीवेळा तुम्हाला सरासरी किमती दाखवल्याचे दिसू शकते. Google हे पुढील ९० दिवसांच्या उपलब्धतेदरम्यान असलेला मीडियन दर मिळवून प्रत्येक मालमत्तेसाठी प्रति रात्रीच्या सरासरी किमतींची गणना करते.

हॉटेलच्या किमतींचे प्रदर्शित केलेले चलन बदला

चलन सिलेक्टर शोधण्यासाठी, परिणामांच्या सूचीच्या तळाशी स्क्रोल करा. निवडलेली चलने सर्व भागीदार साइटवर कदाचित उपलब्ध नसतील.

हॉटेल बुकिंग लिंक

तुमच्या प्रवासाच्या तारखांच्या खाली, तुम्हाला आमच्या हॉटेल भागीदारांकडील तुमच्या शोधाशी संबंधित बुकिंग लिंक मिळू शकतात. या लिंक तुमच्या सद्य शोध संज्ञांवर आधारित असतात आणि तुम्ही Google खाते मध्ये साइन इन केले आहे की नाही यावर आधारित असू शकतात.

हॉटेल भागीदार कोणत्याही शुल्काशिवाय किंवा शुल्क आकारून बुकिंग लिंक तयार करू शकतात. सशुल्क लिंकवर नेहमी "जाहिराती" असा बॅज असतो. विनामूल्य बुकिंग लिंक रँक करण्यासाठी Google विविध प्रकारचे घटक वापरते, ज्यांमध्ये ग्राहकाने दिलेले प्राधान्य, लँडिंग पेजवरील अनुभव आणि Google ला पुरवलेल्या किमतींची यापूर्वीची अचूकता या गोष्टींचा समावेश असतो. विनामूल्य बुकिंग लिंकविषयी अधिक जाणून घ्या.

सशुल्क बुकिंग लिंक किंवा हॉटेलच्या जाहिराती यांना नेहमी "जाहिराती" या बॅजचे स्पष्ट लेबल लावलेले असते आणि त्या "वैशिष्ट्यीकृत पर्याय" म्हणून सूचीबद्ध केलेल्या असतात. Google या जाहिरातींना जाहिरात लिलावानुसार रँक करते. हे रॅंकिंग बोली आणि जाहिरातीची गुणवत्ता यांच्या कॉंबिनेशनवर आधारित असते. यामध्ये सुसंबद्धता, किमतीची अचूकता आणि रेफरल/लँडिंग पेजवरील अनुभव यांसारख्या घटकांचा विचार केला जातो. तुम्ही एखाद्या हॉटेलच्या जाहिरातीवर क्लिक केल्यास किंवा काही परिस्थितींमध्ये बुकिंग पूर्ण केल्यास, Google ला त्याचा मोबदला मिळू शकतो. हॉटेलच्या जाहिरातींविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही बुकिंग लिंकवर क्लिक केल्यास, तुमचे बुकिंग पूर्ण करण्यासाठी भागीदार वेबसाइटवर जाता. बदल, रद्द करणे किंवा परताव्यांच्या विनंत्यांसह ग्राहक सेवेशी संबंधित प्रश्न बुकिंग भागीदाराकडे निर्देशित केले गेले पाहिजेत.

हॉटेलची डील

तुम्हाला हॉटेल शोधण्यात मदत करण्यासाठी, आम्ही हॉटेलच्या नावापुढे “डील” किंवा “सर्वोत्तम डील” या बॅजसह किफायतशीर किमती हायलाइट करतो. डील दोन प्रकारची असतात:

  • अशी हॉटेल ज्यांचे भाडे त्यांच्या सामान्य दरापेक्षा कमी किंवा जवळपासच्या तशाच प्रकारच्या हॉटेलच्या दरांपेक्षा कमी आहे. 
    • हॉटेल किफायतशीर आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी, Google त्या भागातील तशाच प्रकारच्या हॉटेलकरिता "किमतीचे गुणोत्तर" ठरवते. आम्ही त्या हॉटेलच्या मागील वर्षातील सरासरी किमतीची सध्याच्या सरासरी किमतीशी तुलना करतो. ही तुलना ऋतू, प्रमुख कार्यक्रम किंवा सुट्ट्यांचा अंदाज घेण्यात मदत करते. 
    • त्यानंतर आम्ही विशिष्ट हॉटेलसाठी त्याप्रमाणेच गणना करतो आणि विशिष्ट हॉटेलच्या किमतीच्या गुणोत्तराची जवळपासच्या तशाच प्रकारच्या हॉटेलशी तुलना करतो. विशिष्ट हॉटेलचे गुणोत्तर हे त्याच्याशी मिळत्या जुळत्या हॉटेलच्या तुलनेत किमान १५% कमी असल्यास, आम्ही त्याला “डील” असे लेबल देतो. ते किमान २५% कमी असल्यास, आम्ही त्याला "सर्वोत्तम डील" असे लेबल देतो. 
  • अशी हॉटेल, ज्यांचा भागीदार त्या हॉटेलच्या सध्याच्या बाजारभावावर विशेष सूट देतो. बचत केलेली रक्कम टक्केवारी म्हणून दर्शवली जाते.
हॉटेलचा दर्जा

तुम्हाला निवासस्थानाच्या पर्यायांची तुलना करण्यात मदत व्हावी, यासाठी Google हे उपलब्ध असेल तेथे, स्थानिक अधिकाऱ्यांनी हॉटेलला दिलेले दर्जासंबंधीचे अधिकृत रेटिंग प्रदर्शित करते किंवा हॉटेलला दर्जासंबंधीचे रेटिंग देते. प्रत्येक हॉटेलला एक ते पाच तारे यांदरम्यान रेटिंग मिळते. 

आमच्याकडे अधिकृत रेटिंग नसते, तेव्हा Google विविध स्रोतांकडून डेटा गोळा करते. स्रोतांमध्ये तृतीय पक्ष भागीदार, थेट संशोधन, हॉटेल मालकांचा फीडबॅक आणि मशीन-लर्निंग अनुमान या गोष्टी समाविष्ट आहेत, ज्या किंमत, स्थान, रूमचा आकार व सुविधा यांसारख्या हॉटेलमधील विशेषतांचे परीक्षण आणि मूल्यांकन करतात. २-स्टार हॉटेलमध्ये साधारण रूम आणि माफक किमती असू शकतात, तर ४-स्टार हॉटेलमध्ये उच्च दर्जाची सजावट, खास मदनीस व शाही सुविधा असू शकतात. 

हॉटेलचे दर्जासंबंधीचे रेटिंग दिसत नसल्यास, त्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृत रेटिंग मिळाले नसेल किंवा Google ने अद्याप त्याचे मूल्यांकन केले नसेल. हॉटेलच्या दर्जाशी संबंधित फीडबॅक देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

वापरकर्त्याची परीक्षणे

Google हे Google Search आणि Maps वर साइन इन केलेल्या वापरकर्त्यांकडून परीक्षणे गोळा करते. आम्ही स्पॅम आणि अनुचित भाषा काढून टाकण्यासाठी ऑटोमेटेड सिस्टीम वापरतो. आम्हाला बनावट वाटणारे किंवा Google ची परीक्षण धोरणे यांचे पालन न करणारे कोणतेही परीक्षण आम्ही काढून टाकू शकतो. परीक्षण प्रकाशित केल्यानंतर, ते लिहिणारी व्यक्तीच त्यामध्ये बदल करू शकते किंवा ते अपडेट करू शकते. Google हे परीक्षण केलेले राहण्याचे ठिकाण प्रदर्शित करेपर्यंतच परीक्षण दिसू शकते.

आम्ही विश्वसनीय तृतीय पक्ष परीक्षण पुरवठादारांकडील परीक्षणांची सेवादेखील देतो. Google हे पुरवठादाराच्या स्पॅम किंवा अनुचित भाषेसाठी कोणतेही अतिरिक्त फिल्टरिंग करत नाही अथवा आम्ही या परीक्षणांची पडताळणी करत नाही.

अनेक हॉटेल परीक्षणाचा सारांश प्रदर्शित करतात, तो तुम्हाला Google वापरकर्त्यांनी हॉटेलला दिलेल्या ५ ताऱ्यांपैकी सरासरी रेटिंग दाखवतो. हॉटेलसाठी तृतीय पक्षाची परीक्षणे उपलब्ध असली, तरीही या सारांशामध्ये तृतीय पक्ष परीक्षणे समाविष्ट नसतात. आम्ही विशिष्ट विषयांसाठीदेखील सारांश प्रदर्शित करू शकतो, जसे की रूम, सेवा, स्थान आणि प्रवाशांच्या प्रकारानुसार रेटिंग. TrustYou ही तृतीय पक्ष कंपनी हे सारांश पुरवते.

हॉटेलमधील सुविधा

तुम्हाला हॉटेल शोधण्यात मदत करण्यासाठी Google हे प्रत्येक हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या वाय-फाय किंवा स्विमिंग पूल यांसारख्या सेवा आणि सुविधा दाखवते. ही माहिती तुम्हाला निवासस्थानाच्या पर्यायांची तुलना करून तुमचे शोध परिणाम मर्यादित करण्यात मदत करू शकते.

Google विविध स्रोतांकडून हॉटेलच्या सुविधांची माहिती गोळा करते. या स्रोतांमध्ये हॉटेलचे मालक आणि त्यांच्या वेबसाइट, तृतीय पक्ष भागीदार, थेट संशोधन व वापरकर्त्यांचा फीडबॅक या गोष्टी समाविष्ट असतात.

तुम्हाला एखादी अयोग्य सुविधा आढळल्यास, आमच्याशी संपर्क साधा.

सस्टेनेबिलिटीशी संबंधित वैशिष्ट्ये

लागू असेल तेथे, Google हे हॉटेल सस्टेनेबिलिटी पद्धती आणि पर्यावरणाला अनुकूल असल्याच्या प्रमाणपत्राविषयीची माहिती प्रदर्शित करू शकते. हॉटेलमधील सस्टेनेबिलिटीविषयी अधिक जाणून घ्या.

हॉटेल रूम

तुम्हाला हॉटेल शोधण्यात मदत करण्यासाठी, Google प्रत्येक हॉटेलमधील रूमची माहिती दाखवू शकते, जसे की कमाल अतिथी संख्या किंवा बेडचा प्रकार. ही माहिती तुम्हाला निवासस्थानाच्या पर्यायांची तुलना करून तुमचे शोध परिणाम मर्यादित करण्यात मदत करू शकते.

Google विविध स्रोतांकडून हॉटेलच्या रूमची माहिती गोळा करते. या स्रोतांमध्ये हॉटेलचे मालक आणि त्यांच्या वेबसाइट, तृतीय पक्ष भागीदार, थेट संशोधन व वापरकर्त्यांचा फीडबॅक या गोष्टी समाविष्ट असतात.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12317322889120263715
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
254
false
false