YouTube भागीदार उपक्रम याचे अवलोकन आणि पात्रता

चाहते निधी आणि Shopping संबंधित वैशिष्ट्ये यांच्या लवकर अ‍ॅक्सेससह, आम्ही YouTube भागीदार उपक्रम (YPP) याचा आणखी निर्माणकर्त्यांपर्यंत विस्तार करत आहोत. विस्तारित YouTube भागीदार उपक्रम या देश/प्रदेश यांमधील पात्र निर्माणकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही यांपैकी एका देश/प्रदेश यामध्ये असल्यास, YPP मधील बदलांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, हा लेख पहा. 

तुम्ही उपलब्ध देश/प्रदेश यांपैकी एकामध्ये नसल्यास, तुमच्यासाठी YouTube भागीदार उपक्रम यामध्ये कोणतेही बदल नाहीत. 

विस्तारित YouTube भागीदार उपक्रम याच्या अ‍ॅक्सेससाठी तुमची पात्रता तपासणे हे करा. तुम्ही अद्याप पात्र नसल्यास, YouTube Studio च्या कमाई करा या विभागामध्ये सूचना मिळवणे हे निवडा. आम्ही विस्तारित YPP उपक्रम तुमच्यापर्यंत रोल केल्यावर आणि तुम्ही पात्रता मर्यादा गाठल्यावर तुम्हाला ईमेल पाठवू. 
 

YouTube भागीदार उपक्रम (YPP) हा निर्माणकर्त्यांना YouTube च्या स्रोतांचा आणि कमाईसंबंधी वैशिष्ट्यांचा अधिक मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्सेस देतो आणि आमच्या निर्माणकर्ता सपोर्ट टीमचा अ‍ॅक्सेस देतो. त्यामुळे तुमच्या आशयावर दाखवल्या जाणार्‍या जाहिरातींवरून केलेल्या कमाईची वाटणीदेखील करता येते. या लेखामध्ये वैशिष्ट्ये, पात्रता निकष आणि अर्जाचे तपशील यांबद्दल अधिक जाणून घ्या.

YouTube वरून कमाई करणे याचा परिचय

तुम्हाला YPP मध्ये अर्ज करायचा आहे, पण आधी प्रेक्षक तयार करण्यात मदत हवी आहे का? आमच्या तुमचा चाहतावर्ग निर्माण करण्यासाठी टिपा आणि YouTube भागीदार उपक्रम यासाठी टिपा पहा.

सामील होण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे

  1. YouTube चॅनल कमाई धोरणे यांचे पालन करणे.
    1. तुम्हाला YouTube वर कमाई करू देणारी धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचा हा संग्रह आहे व तुम्ही YouTube सोबतचा भागीदारीचा करार स्वीकारल्यावर त्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
  2. जेथे YouTube भागीदार उपक्रम उपलब्ध आहे त्या देश/प्रदेशामध्ये राहत असणे.
  3. तुमच्या चॅनलवर अ‍ॅक्टिव्ह समुदाय मार्गदर्शक तत्त्वे स्‍ट्राइक नसणे.
  4. तुमच्या Google खाते साठी २ टप्पी पडताळणी सुरू केली असल्याची खात्री करणे.
  5. YouTube वर प्रगत वैशिष्ट्ये यांचा अ‍ॅक्सेस असणे.
  6. तुमच्या चॅनलशी एक अ‍ॅक्टिव्ह YouTube साठी AdSense खाते लिंक केलेले ठेवा किंवा ते आधीच तुमच्याकडे नसल्यास, YouTube Studio मध्ये सेट करा (YouTube Studio मध्ये फक्त नवीन YouTube साठी AdSense खाते तयार करा – अधिक जाणून घ्या).

तुम्ही कसे पात्र ठरू शकता

सामील होण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे हे समजल्यावर, शॉर्ट किंवा दीर्घ स्वरूपातील व्हिडिओ वापरून तुमचे चॅनल YPP साठी पात्र ठरू शकते. तुम्ही पात्र असल्यावर आम्ही तुम्हाला सूचित करायला हवे असल्यास, YouTube Studio च्या कमाई करा भागामध्ये मी पात्र असल्यावर मला सूचित करा वर क्लिक करा. खालीलपैकी कोणत्याही पात्रता मर्यादेची पूर्तता केल्यावर तुम्हाला ईमेल मिळेल.

१. मागील १२ महिन्यांत ४००० वैध सार्वजनिक पाहण्याच्या तासांसह १००० सदस्य मिळवणे किंवा
२. मागील ९० दिवसांमध्ये एक कोटी वैध सार्वजनिक शॉर्ट व्ह्यूसह १००० सदस्य मिळवणे.

लक्षात ठेवा, की Shorts फीड मध्ये शॉर्ट व्ह्यू मधील कोणत्याही सार्वजनिक पाहण्याच्या तासांची गणना ४००० सार्वजनिक पाहण्याच्या तासांच्या मर्यादेमध्ये होणार नाही.

पात्रता मर्यादांबाबत अधिक माहिती

तुमचे चॅनल आमची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांची पूर्तता करते का याबद्दल अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यात या मर्यादा आम्हाला मदत करतात. तुम्ही अर्ज केल्यावर, तुमचे चॅनल आमची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांची पूर्तता करते का हे तपासण्यासाठी, तुमचे चॅनल साधारण पुनरावलोकन प्रक्रियेमधून जाईल. ते आमची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांची पूर्तता करत असल्यास, आम्ही तुमचे चॅनल YPP मध्ये स्वीकारू. लक्षात ठेवा, की YPP मधील चॅनल काळानुसार आमची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांची पूर्तता करणे सुरू ठेवत असल्याची खात्री करण्यासाठी, आम्ही ती सातत्याने तपासतो.

अर्ज कुठे करावा

✨ नवीन✨ YouTube भागीदार उपक्रम याच्या वैशिष्ट्यांचा लवकर अ‍ॅक्सेस

तुम्हाला जे हवे ते मिळाल्यावर आणि तुमचे चॅनल अर्ज करण्यासाठी पात्र असल्यावर, डेस्कटॉप काँप्युटरवरून किंवा मोबाइल डिव्हाइसवरून YPP साठी साइन अप करा:

  1. YouTube मध्ये साइन इन करा
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो आणि त्यानंतर YouTube Studio वर क्लिक करा
  3. डावीकडील मेनूमध्ये, कमाई करा वर क्लिक करा
  4. सुरुवात करण्यासाठी आता अर्ज करा निवडा
  5. मूलभूत अटींचे पुनरावलोकन करण्यासाठी, सुरू करा आणि स्वीकारा वर क्लिक करा
  6. YouTube साठी AdSense खाते सेट करण्यासाठी किंवा एखादे अ‍ॅक्टिव्ह असलेले सद्य खाते लिंक करण्यासाठी सुरू करा वर क्लिक करा

पूर्ण झाल्यावर, पुनरावलोकन करून घ्या या पायरीमध्ये तुम्हाला प्रगतीपथावर आहे असे दिसेल, ज्याचा अर्थ, आम्हाला तुमचा अर्ज मिळाला आहे!

आम्ही तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन कसे करतो

तुम्ही YPP अटी स्वीकारल्यावर आणि अ‍ॅक्टिव्ह YouTube साठी AdSense खाते लिंक केल्यावर, तुमचे चॅनल आपोआप पुनरावलोकनाच्या रांगेत लावले जाईल. तुमचे चॅनल आमच्या धोरणांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याची खात्री करण्यासाठी, आमच्या ऑटोमेटेड सिस्टीम आणि मानवी परीक्षणकर्ते तुमच्या चॅनलचे एकंदर पुनरावलोकन करतील. तुमच्या अर्जाचे स्टेटस पाहण्यासाठी, YouTube Studio च्या कमाई करा विभागामध्ये कधीही पुन्हा तपासा.

तुमच्या चॅनलचे पुनरावलोकन केले गेल्यावर, आम्ही निर्णयासह तुमच्याशी संपर्क साधू (सामान्यतः सुमारे एका महिन्यात). 

लक्षात ठेवा, की अर्जांचे नेहमीपेक्षा जास्त प्रमाण, सिस्टीमसंबंधी समस्या किंवा स्रोतांच्या मर्यादा यांमुळे उशीर होणे शक्य आहे. YPP साठीचे सर्व अर्ज आम्हाला ज्या क्रमाने मिळतात त्यांनुसार हाताळले जातात. काही वेळा, विशेषतः अनेक परीक्षणकर्ते तुमच्या चॅनलच्या YPP साठी योग्यतेबद्दल असहमत होतात, तेव्हा चॅनलना एकाहून अधिक पुनरावलोकनांची आवश्यकता असते. यामुळे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कालावधीमध्ये वाढ होते.

तुमचा पहिला अर्ज यशस्वी झाला नसल्यास, काळजी करू नका - तुम्ही २१ दिवसांच्या आत त्या निर्णयावर आवाहन करू शकता किंवा मूळ आशय अपलोड करत राहू शकता, जेणेकरून तुम्हाला ३० दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा अर्ज करता येईल. हा तुमचा नाकारला गेलेला पहिला अर्ज नसल्यास किंवा तुम्ही याआधी पुन्हा अर्ज केला असल्यास, तुम्हाला ९० दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा प्रयत्न करता येईल. तुमच्या चॅनलचा लक्षणीय भाग सध्या आमच्या धोरणांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नाही असे आमच्या परीक्षणकर्त्यांना आढळले असल्याची शक्यता असल्यामुळे, पुन्हा अर्ज करण्यापूर्वी तुमच्या चॅनलच्या एकंदर आशयाच्या आधारावर त्यांचे नक्की पुनरावलोकन करा व तुमचे चॅनल अ‍ॅडजस्ट करा. पुढच्या वेळी तुमचा अर्ज अधिक प्रभावी करण्यासाठी, तुम्हाला उचलता येणारी पावले यांबद्दल अधिक जाणून घ्या.

कमाई करणे आणि पैसे मिळवणे हे कसे करावे ते निवडा

तुम्ही YPP मध्ये आल्यावर, वॉच पेज जाहिराती, Shorts फीड जाहिराती, सदस्यत्वे, Supers, खरेदी, आणि बर्‍याच गोष्टींसह YouTube Studio मध्ये सुरुवात करा. कमाईशी संबंधित वैशिष्‍ट्ये सुरू करण्यासाठी, तुम्हाला संबंधित मॉड्यूलच्या अटींचे पुनरावलोकन करावे लागेल आणि त्या स्वीकाराव्या लागतील. येथे मॉड्यूल आणि त्यांचे प्रकार यांविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्हाला कमाई कशी करायची आहे ते निवडल्यानंतर, जाहिरात प्राधान्ये व्यवस्थापित करणे, तुमच्या अपलोडसाठी कमाई सुरू करणे आणि बरेच काही करता येईल. YPP मध्ये नुकतेच सामील झालेल्या निर्माणकर्त्यांकडून आम्हाला वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची (FAQ) सूची येथे दिली आहे.

पैसे मिळवणे

YouTube भागीदार म्हणून तुमच्या कमाईच्या अधिक सोप्या आकलनासाठी, आमच्या मदत केंद्र ला भेट द्या, YouTube साठी AdSense (YPP मधील निर्माणकर्त्यांना पैसे मिळवू देणारा प्रोग्राम) याबद्दल सर्व काही जाणून घ्या आणि पेमेंटसंबंधी सामान्य समस्या ट्रबलशूट करा.

पैसे मिळवत राहण्यासाठी ॲक्टिव्ह राहणे

YouTube भागीदार उपक्रम वाढत राहणे सुरू असताना, चॅनलची सुदृढ, सक्रिय व्यवस्था कायम ठेवणे महत्त्वाचे असते. सक्रिय आणि समुदायाशी समरस असलेल्या निर्माणकर्त्यांवर आमचा सपोर्ट केंद्रित करण्यासाठी, सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ व्हिडिओ अपलोड न केलेल्या किंवा समुदाय टॅबवर पोस्ट न केलेल्या सर्व चॅनलवर आम्ही कमाई बंद करू शकतो.

अर्ज करणे आणि बर्‍याच गोष्टींबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

मी उपक्रम मर्यादेची पूर्तता न केल्यास काय होते?

तुम्ही अद्याप आवश्यकतांची पूर्तता करत नसल्यास, मूळ आशय तयार करणे आणि तुमचे प्रेक्षक तयार करणे यांसाठी काम करत रहा. येथे काही स्रोत आहेत, जे तुम्हाला तुमचे चॅनल वाढवण्यात मदत करू शकतात:

  • YouTube मदत फोरम मध्ये इतर YouTube वापरकर्त्यांकडून निराकरणे जाणून घ्या.
  • निर्माणकर्ता टिपा हबमध्ये तुमचे चॅनल कसे वाढवावे आणि तयार करावे याबाबत झटपट आणि सोप्या टिपा डिस्कव्हर करा .
  • जाणून घेण्यासाठी, वाढ करण्यासाठी आणि उपक्रम, स्रोत व इव्हेंटशी जोडलेले राहण्यासाठी, youtube.com/creators वर जा.
  • YouTube मदत टीमचे ट्यूटोरियल, ट्रबलशूटिंग आणि टिपा यासंबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी, आमचे YouTube मदत चॅनल आणि YouTube निर्माणकर्ते चॅनल पहा.

तुमच्या चॅनलवर अ‍ॅक्टिव्ह समुदाय मार्गदर्शक तत्त्वे स्‍ट्राइक असल्यास, तुमचे स्ट्राइक एक्स्पायर झाल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही तुमचे समुदाय मार्गदर्शक तत्त्वे स्‍ट्राइक काढून टाकले जाण्यासाठी यशस्वीपणे आवाहन करणे हे केल्यानंतरदेखील अर्ज करू शकता. समुदाय मार्गदर्शक तत्त्वे स्‍ट्राइक मिळवताना उपक्रमाचे सध्याचे सदस्य काढून टाकले जाणार नाहीत.

“वैध सार्वजनिक पाहण्याचे तास” आणि "वैध सार्वजनिक शॉर्ट व्ह्यू" म्हणजे काय?

वैध सार्वजनिक पाहण्याचे तास

वैध सार्वजनिक पाहण्याच्या तासामध्ये कशाची गणना केली जाते:

  • तुम्ही सार्वजनिक म्हणून सेट केलेल्या दीर्घ स्वरूपातील व्हिडिओमधून मिळवलेले पाहण्याचे तास

पुढील प्रकारच्या व्हिडिओमधून मिळवलेल्या पाहण्याच्या तासांची गणना YPP मर्यादांमध्ये केली जात नाही:

  • खाजगी व्हिडिओ
  • सूचीमध्ये नसलेले व्हिडिओ
  • हटवलेले व्हिडिओ
  • जाहिरात मोहिमा
  • YouTube Shorts
  • सूचीमध्ये नसलेले, हटवलेले किंवा VOD (व्हिडिओ ऑन डिमांड) मध्ये रूपांतरित न केलेले लाइव्ह स्ट्रीम

वैध सार्वजनिक शॉर्ट व्ह्यू

वैध सार्वजनिक शॉर्ट व्ह्यूमध्ये कशाची गणना केली जाते:

  • Shorts फीडमध्ये दिसणार्‍या, तुम्ही सार्वजनिक म्हणून सेट केलेल्या शॉर्ट चे व्ह्यू
लक्षात ठेवा, की Shorts फीड मध्ये शॉर्ट व्ह्यू मधील कोणत्याही सार्वजनिक पाहण्याच्या तासांची गणना ४००० सार्वजनिक पाहण्याच्या तासांच्या मर्यादेमध्ये होत नाही. आम्ही पेमेंटची गणना कशी करतो यासंबंधात शॉर्ट व्ह्यू पात्रतेबद्दल अधिक माहितीसाठी, आमची YouTube शॉर्ट कमाई धोरणे पहा.

मी मर्यादेची पूर्तता केल्यास, मला YPP मध्ये आपोआप घेतले जाते का?

नाही. मर्यादेची पूर्तता करणारे प्रत्येक चॅनल साधारण पुनरावलोकन प्रक्रियेमधून जाईल. तुमचे चॅनल आमची YouTube चॅनल कमाई धोरणे यांची पूर्तता करते का हे तपासण्यासाठी, आमची टीम तुमच्या चॅनलचे एकंदर पुनरावलोकन करेल. अर्ज करण्यासाठी, तुमच्या चॅनलमध्ये कोणतेही अ‍ॅक्टिव्ह समुदाय मार्गदर्शक तत्त्वे स्‍ट्राइक असू नयेत. आमची धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करणारी चॅनल कमाई करू शकतात.

मी अर्ज केल्यानंतर माझ्या गणना मर्यादेच्या खाली आल्यास काय होते?

तुम्ही आमच्या वैध सार्वजनिक पाहण्याच्या तासांची आणि सदस्य मर्यादेची पूर्तता केल्यावर, आम्ही तुमचे चॅनल पुनरावलोकनासाठी पाठवू. त्यामुळे पुनरावलोकनाची प्रतीक्षा करत असताना तुमच्या सदस्यांच्या किंवा पाहण्याच्या तासांच्या गणना मर्यादेच्या खाली आल्यास, फरक पडत नाही. तुम्ही मर्यादेची पूर्तता केली असेल आणि YPP साठी अर्ज केला असेल, तरीही आम्ही YPP योग्यतेसाठी तुमच्या चॅनलचे पुनरावलोकन करू. लक्षात घ्या, की चॅनलचे पुनरावलोकन केले जाण्यापूर्वी त्याने YPP साइनअपसंबंधित सर्व पायऱ्या पूर्ण करणे आवश्यक आहे (यांमध्ये सध्या करारनाम्यावर स्वाक्षरी करणे आणि YouTube साठी AdSense खाते संलग्न करणे या गोष्टींचा समावेश आहे).

एखादे चॅनल इनॅक्टिव्ह असल्यास आणि त्याने ६ महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ समुदाय पोस्ट अपलोड अथवा पोस्ट केल्या नसल्यास, त्याची कमाई काढून टाकण्याचा हक्क YouTube राखून ठेवते.

चॅनलनी कोणतीही YouTube चॅनल कमाई धोरणे यांचे उल्लंघन केल्यावर, ते कमाई गमावतील. त्यांचे पाहण्याचे तास आणि सदस्यसंख्या लक्षात न घेता ही कमाई गमवली जाईल.

मी आता YPP मध्ये नाही (किंवा मी उपक्रमामध्ये कधीही नव्हतो/नव्हते) आणि मला माझ्या व्हिडिओवर जाहिराती दिसत आहेत. मी त्या जाहिरातींमधून कमाई करत आहे का?

YouTube हे प्लॅटफॉर्मवरील सर्व आशयावर जाहिराती दाखवू शकते. तुम्ही यापूर्वी YPP चे सदस्य राहिला असल्यास (आणि सध्या उपक्रमामध्ये नसल्यास), तुम्हाला तरीही तुमच्या आशयावर जाहिराती दाखवल्या जात असल्याचे दिसू शकतात. या बाबतीत, तुम्हाला कमाईचा वाटा मिळणार नाही.

तुम्ही भविष्यात पुन्हा YPP मध्ये सामील झाल्यास, तुम्हाला पुन्हा सामील झाल्यानंतर तुमच्या आशयावर दाखवल्या जाणार्‍या जाहिरातींवरून केल्या जाणार्‍या कमाईचा वाटा मिळू शकतो. त्या बाबतीत, YPP साठी पुन्हा अर्ज करताना, तुमचे चॅनल या पेजवर वर्णन केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करत असल्याची खात्री करा.

 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12309468804610848862
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false