हानिकारक किंवा धोकादायक आशयाशी संबंधित धोरण

१८ मार्च २०२४ पासून, प्रेक्षक डिस्क्लेमरच्या बाबतीत आणखी कठोर भूमिकेचा आणि दर्शवलेल्या कृत्यामधील संभाव्य हानीच्या जोखमीचे आणखी चांगल्या प्रकारे मूल्यांकन करण्यासाठी अपडेट केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्याकरिता आमचे हानिकारक व धोकादायक आशयाशी संबंधित धोरण अपडेट केले जाईल.
गंभीर शारीरिक इजा किंवा मृत्यूचा धोका असलेल्या धोकादायक अथवा बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीना प्रोत्साहन देणार्‍या आशयाला YouTube अनुमती देत नाही.
 
तुम्हाला या धोरणाचे उल्लंघन करणारा आशय आढळल्यास, त्याची तक्रार करणे हे करा. 

 

या लेखाच्या विशिष्ट विभागावर जा:

महत्त्वाचे: व्हिडिओ, व्हिडिओची वर्णने, टिप्पण्या, लाइव्ह स्ट्रीम आणि इतर कोणतेही YouTube उत्पादन किंवा वैशिष्ट्य यांना हे धोरण लागू होते. ही धोरणे तुमच्या आशयामधील बाह्य लिंक यांवरदेखील लागू होतात. यामध्ये क्लिक करता येणार्‍या URLs, वापरकर्त्यांना तोंडी सांगून व्हिडिओमधील इतर साइटवर निर्देशित करणे, त्याचप्रमाणे इतर स्वरूपांचा समावेश असू शकतो.

हानिकारक किंवा धोकादायक आशयाशी संबंधित धोरण

या धोरणामध्ये तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे

टीप: खालील सूची पूर्ण नाही. तुमचा आशय या धोरणाचे उल्लंघन करू शकतो असे तुम्हाला वाटत असल्यास, तो पोस्ट करू नका.
या आशयाला YouTube वर अनुमती नाही:

हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये, आव्हाने आणि खोड्या

  • अतिशय धोकादायक आव्हाने: शारीरिक इजा होण्याचा स्पष्ट धोका असलेली आव्हाने.
  • धोकादायक किंवा प्राणघातक खोड्या: अशा खोड्या, ज्यांमुळे पीडितांना स्पष्टपणे गंभीर शारीरिक धोका होण्याची भीती वाटते किंवा अल्पवयीन मुलांना गंभीर भावनिक त्रास होतो.
  • हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये: ज्यांमुळे तीव्र इजा किंवा मृत्यूचा गंभीर धोका असतो अशी प्रौढांनी केलेली कृत्ये.
  • धोकादायक अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणारी अल्पवयीन मुले: अल्पवयीन मुलांचे भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आणणारा आशय. अधिक माहितीसाठी, आमचे लहान मुलांशी संबंधित सुरक्षितता धोरण याचे पुनरावलोकन करा.

शस्त्रांशी संबंधित आशय

  • ठार करणे किंवा हानी पोहोचवणे यांच्याशी संबंधित सूचना: इतरांना ठार करणे किंवा जखमी करणे हा उद्देश असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी कशा कराव्यात हे दर्शकांना दाखवणाऱ्या अथवा सांगणाऱ्या सूचना.
  • स्फोटके: इतरांना ठार करणे किंवा जखमी करणे हा उद्देश असलेली स्फोटक डिव्हाइस किंवा संयुगे तयार करण्याच्या सूचना देणे.
  • बंदुका: अधिक माहितीसाठी, आमचे बंदुकांशी संबंधित धोरण याचे पुनरावलोकन करा.

डिजिटल सुरक्षेसंबंधी आशय

  • सूचनात्मक चोरी: प्रत्यक्ष वस्तू चोरण्याच्या किंवा काहीतरी विनामूल्य मिळवण्याच्या स्पष्ट उद्देशाने पोस्ट केलेले सूचनात्मक चोरीचे व्हिडिओ.
  • हॅकिंग: क्रेडेंशियल चोरणे, वैयक्तिक डेटाशी तडजोड करणे किंवा इतरांना गंभीर इजा पोहोचवणे या उद्देशाने कॉंप्युटर अथवा माहिती तंत्रज्ञान कसे वापरावे हे दाखवणे.
  • डिजिटल आशय किंवा सेवांसाठी पेमेंट बायपास करणे: सामान्यतः पेमेंट आवश्यक असलेला आशय, सॉफ्टवेअर किंवा सेवा यांचा अनधिकृत अ‍ॅक्सेस कसा मिळवावा हे दर्शकांना दाखवणारा आशय.
  • फिशिंग: दर्शकांची फसवणूक करून सार्वजनिक नसलेली वैयक्तिकरीत्या ओळखण्याची माहिती त्यांच्याकडून कशी मिळवावी यासाठीच्या सूचना मिळवण्याचा प्रयत्न करणारा किंवा देणारा आशय.
    • क्रिप्टोफिशिंग: फिशिंग कारस्थानाचा भाग म्हणून क्रिप्टोकरन्सी किंवा क्रिप्टोकरन्सीशी संबंधित वॉलेटच्या तपशिलांसाठी विनंत्या.

बेकायदेशीर किंवा विनियमित वस्तू अथवा सेवा

हानिकारक किंवा धोकादायक आशयाची उदाहरणे

YouTube वर अनुमती नसलेल्या हानिकारक किंवा धोकादायक आशयाची ही काही उदाहरणे आहेत. 

टीप: खालील सूची पूर्ण नाही.

अतिशय धोकादायक आव्हाने

  • गुदमरणे: ज्यामुळे श्वास रोखला जातो किंवा गुदमरल्यासारखे होऊ शकते अशी कोणतीही कृती. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • गुदमरणे, बुडणे किंवा फास लावणे यासंबंधित खेळ
    • खाण्यासाठी योग्य नसलेले पदार्थ खाणे
  • शस्त्रांचा गैरवापर: सुरक्षिततेची योग्य काळजी न घेता किंवा शारीरिक इजा करू शकेल अशा प्रकारे बंदुका अथवा सुरे यांसारखी शस्त्रे वापरणे. उदाहरणांमध्ये "नो लॅकिन" आव्हानाचा समावेश आहे.
  • हानिकारक पदार्थांचे सेवन करणे: ज्यांमुळे आजार किंवा विषबाधा होऊ शकते, असे खाण्यासाठी योग्य नसलेले पदार्थ अथवा रसायने खाणे, गिळणे किंवा शरीरामध्ये घालणे. उदाहरणांमध्ये कपडे धुण्याची पावडर खाण्याच्या आव्हानाचा समावेश आहे.
  • भाजणे, गोठणे आणि विजेचा धक्का: गंभीररीत्या भाजले जाण्याचा, गोठले जाण्याचा, हिमबाधा होण्याचा किंवा विजेच्या धक्का बसण्याचा धोका असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटी. उदाहरणांमध्ये फायर आव्हान आणि हॉट वॉटर आव्हान यांचा समावेश आहे.
  • अंगच्छेदन आणि मुका मार: उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • स्वतःचे अंगच्छेदन करणे
    • सामान्य आरोग्य पद्धतींपासून दूर राहणे
    • पडणे, सुळावर चढवणे, धडक, मुका मार किंवा चिरडणे

टीप: आम्ही शैक्षणिक किंवा माहितीपर संदर्भ असलेला आशय वयानुसार प्रतिबंधित करू शकतो.

धोकादायक किंवा प्राणघातक खोड्या

  • हेतुपुरस्सर शारीरिक इजा: खोड्यांच्या अजाण पीडितांना शारीरिक इजा पोहोचवणे. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • ठोसे मारून केलेले हल्ले
    • खाद्यपदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये रेचके मिसळणे
    • विजेचा धक्का देणाऱ्या खोड्या
  • एखाद्या व्यक्तीला तात्काळ धोका असल्याचे भासवणे: इतर लोकांना कोणतीही शारीरिक इजा झालेली नसली, तरीही ते खरोखर धोक्यात आहेत यावर विश्वास ठेवण्यास लावून फसवणे. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • शस्त्रे वापरून दिलेल्या धमक्या
    • बॉंब असल्याची भीती घालणे
    • दिशाभूल करणारे खोटे आणीबाणी कॉल किंवा ९११ ला केलेले फसवे कॉल
    • घरावरील फसवे हल्ले किंवा दरोडे
    • फसवे अपहरण
  • अल्पवयीन मुलांना/असुरक्षित व्यक्तींना भावनिक त्रास देणे: ज्यामुळे लहान मुलांना किंवा इतर असुरक्षित लोकांना भावनिक त्रास होऊ शकेल अथवा शारीरिक सुरक्षिततेला धोका असल्याची भीती वाटेल अशी कोणतीही खोडी. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • फसवा मृत्यू किंवा आत्महत्या
    • फसवी हिंसा
    • आई-वडील किंवा पालक हे लहान मुलाला सोडून जातील असे भासवणे
    • आई-वडील किंवा पालक हे लहान मुलाशी शाब्दिक गैरवर्तन करत असल्याचे किंवा त्यांची लाज काढत असल्याचे दाखवणे

टीप: प्रौढांचा समावेश असलेल्या आणि आमच्या धोरणांचे उल्लंघन करत नसलेल्या खोड्यांशी संबंधित आशयावर आम्ही वयोमर्यादा घालू शकतो.

हानिकारक किंवा धोकादायक कृत्ये

  • गंभीर हानी किंवा मृत्यूचा धोका पत्करणे: गंभीर शारीरिक इजा किंवा मृत्यूचा धोका पत्करणाऱ्या प्रौढ व्यक्ती दर्शवणारे वर्तन, विशेषतः एखादी पाहणारी व्यक्ती त्या धोकादायक कृत्याचे अनुकरण करत असेल अथवा आशय धोकादायक कृत्याला प्रोत्साहन देणारा किंवा त्याची प्रशंसा करणारा असेल. धोकादायक कृत्यांमध्ये श्वास रोखला जाणे किंवा विजेचा धक्का बसणे यांसारख्या वरील अत्यंत धोकादायक आव्हाने या अंतर्गत सूचीबद्ध केलेल्या वर्गवाऱ्यांमधील कोणत्याही कृत्यांचा समावेश आहे, पण त्यापुरतेच मर्यादित नाही.
    • अल्पवयीन मुलांची धोकादायक कृत्ये दाखवणाऱ्या आशयालादेखील आम्ही अनुमती देत नाही. यामध्ये पुढील गोष्टी करणारी अल्पवयीन मुले दाखवणाऱ्या आशयाचा समावेश आहे:
      • मद्य पिणे
      • व्हॅपोरायझर, ई-सिगारेट, तंबाखू किंवा मारुवाना वापरणे
      • फटाक्यांचा गैरवापर करणे
      • पर्यवेक्षणाशिवाय बंदुका वापरणे
  • अतिशय धोकादायक ड्रायव्हिंग: ड्रायव्हरला किंवा इतरांना गंभीर दुखापत किंवा मृत्यूचा स्पष्ट धोका उद्भवू शकेल अशा प्रकारे मोटर वाहन वापरणे. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • अतिवेगाने येणाऱ्या रहदारीमध्ये जाणूनबुजून वळणाऱ्या मोटरसायकलस्वाराचे सेल फोन फुटेज. “व्वा, ते धमाल होते!” असे म्हणून प्रतिक्रिया देणारा व्हॉइसओव्हर.
    • पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथाच्या बाजूने अतिवेगाने कार ड्राइव्ह करणे.

इजा करण्यासाठी सूचना

  • बाँब तयार करणे: इतरांना दुखापत करण्यासाठी किंवा ठार करण्यासाठी बाँब कसा तयार करावा हे दर्शकांना दाखवणे. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
    • पाइप बाँब
    • पॅकेज बाँब
    • स्फोटक व्हेस्ट
    • मोलोटोव्ह कॉकटेल
  • लहान मुलांचा समावेश असलेली हिंसा: लहान मुलांमधील कोणत्याही प्रत्यक्ष मारामाऱ्या किंवा हिंसा. अधिक माहितीसाठी, आमचे लहान मुलाच्या सुरक्षिततेशी संबंधित धोरण याचे पुनरावलोकन करा.

टीप: आम्ही माहितीपर किंवा शैक्षणिक संदर्भअसलेला आशय वयानुसार प्रतिबंधित करू शकतो.

वयानुसार प्रतिबंधित आशय

टीप: खालील सूची पूर्ण नाही.
काही वेळा आशय आमच्या धोरणांचे उल्लंघन करत नाही, पण तो १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या दर्शकांसाठी योग्य नसू शकतो.
धोकादायक कृत्य दर्शवणारा आशय पुढीलपैकी एक किंवा अधिक निकष पूर्ण करत असल्यास, आम्ही तो काढून टाकण्याऐवजी मर्यादित करू शकतो:
  • त्यामध्ये शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक संदर्भ आहे, जसे की कृत्याच्या धोक्यांबद्दल माहिती पुरवणे. उदाहरणार्थ, यामध्ये धोकादायक कृत्य केल्यामुळे होणाऱ्या इजांचे प्रकार स्पष्ट करणारा संदर्भ किंवा धोकादायक कृत्यामुळे जखमी होण्याबाबतच्या तुमच्या स्वतःच्या अनुभवाचे वर्णन करणे समाविष्ट असू शकते. कृत्य सुरक्षितपणे करण्यासाठी आणि इजा टाळण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी किंवा प्रशिक्षण यांचे प्रकार स्पष्ट करणारा संदर्भदेखील त्यामध्ये समाविष्ट असू शकतो. “हे घरी करून पाहू नका” असे म्हणणे हा पुरेसा संदर्भ नाही.
  • दाखवलेल्या कृत्यामुळे गंभीर इजेचा धोका उद्भवत नाही.
  • आशय हा दाखवलेले कृत्य प्रमोट करत नाही. प्रमोशनमध्ये कृत्याला कोणत्याही स्वरूपाचे प्रोत्साहन देणे किंवा त्याची प्रशंसा करणे अथवा कृत्य कसे पूर्ण करावे याबद्दल सूचना देणे समाविष्ट आहे.

वयानुसार प्रतिबंधित आशय आणि वयानुसार प्रतिबंधित व्हिडिओ पाहणेहे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

वयानुसार प्रतिबंधित आशयाची उदाहरणे

  • अत्यधिक खोटे रक्त किंवा भयानक खोट्या जखमांचा वापर करणाऱ्या प्रौढ व्यक्ती दाखवणारा खोड्यांशी संबंधित आशय.
  • आव्हानामुळे गंभीररीत्या जखमी झालेल्या लोकांच्या संख्येचे वर्णन करणाऱ्या समालोचनासह, धोकादायक आव्हानामध्ये सहभागी लोकांचे फुटेज दाखवणारा आशय.
  • फटाक्यांचा गैरवापर करणाऱ्या प्रौढ व्यक्ती दाखवणारा आशय.
  • प्रौढ व्यक्तींना इतर इच्छुक सहभागींवर किंवा स्वतःवर टेझर वापरताना दाखवणारा आशय.
  • प्रौढ पार्कुर खेळाडूला अत्यंत धोकादायक हौशी स्टंटच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना आणि हानीच्या धोक्याबद्दल टिप्पणी करताना दाखवणारा आशय.

शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक आशय

काही वेळा, या धोरणाचे इतर प्रकारे उल्लंघन करणाऱ्या आशयाला शैक्षणिक, माहितीपर, वैज्ञानिक किंवा कलात्मक (EDSA) संदर्भ असल्यास, तो YouTube वर राहू दिला जातो. YouTube हे EDSA आशयाचे मूल्यांकन कसे करते याबद्दल जाणून घ्या.

टीप: काही बाबतींत, EDSA आशय वयानुसार प्रतिबंधित असू शकतो. EDSA संदर्भ जोडलेला असला, तरीही YouTube वर ठरावीक आशयाला अनुमती नाही, जसे की अमली पदार्थ किंवा विनियमित औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय विकणे हे करणारा आशय.

EDSA आशयाची उदाहरणे

  • चोकिंग गेमच्या धोक्यांसंबंधी बातमी देणे योग्य असू शकेल, पण त्याच माहितीपटामधून संदर्भाला अनुसरून नसताना क्लिप पोस्ट करणे कदाचित योग्य ठरणार नाही.
  • एक व्यावसायिक स्टंट करणारी व्यक्ती धोकादायक मोटरसायकल जंप करताना दाखवणारा व्हिडिओ, जो दर्शकांना ऑनसाइट आणीबाणी वैद्यकीय कर्मचारी आणि संरक्षणात्मक उपकरणांचा वापर यांसारखी तयारी करताना घेतलेली सुरक्षिततेसंबंधी खबरदारी दाखवतो.
  • एका विशिष्ट समुदायामध्ये अमली पदार्थांच्या वापराचा परिणाम दाखवणारा माहितीपट, जो दर्शकांना अमली पदार्थांचा वापर दाखवत असताना, त्यांना अमली पदार्थ वापरण्यापासून परावृत्त करतो आणि ते कसे तयार करावे किंवा खरेदी करावे याबद्दल माहिती पुरवत नाही.
  • सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धती किंवा वाहन सुरक्षितता वैशिष्ट्यांबद्दल दर्शकांना शिक्षित करण्यासाठी, नियंत्रित वातावरणांमध्ये धोकादायक ड्रायव्हिंग अथवा वाहनांच्या धडका दाखवणारा व्हिडिओ.

आशयाने या धोरणाचे उल्लंघन केल्यास काय होते

तुमच्या आशयाने या धोरणाचे उल्लंघन केल्यास, आम्ही तो आशय काढून टाकू आणि त्याविषयी कळवण्यासाठी तुम्हाला ईमेल पाठवू. तुम्ही पोस्ट करता ती लिंक सुरक्षित असल्याची आम्हाला पडताळणी करता येत नसल्यास, आम्ही कदाचित ती लिंक काढून टाकू. लक्षात ठेवा, की व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओच्या मेटाडेटामध्ये पोस्ट केलेल्या, उल्लंघन करणाऱ्या URLs मुळे व्हिडिओ काढून टाकला जाऊ शकतो.

आमची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे यांचे तुम्ही पहिल्यांदाच उल्लंघन करत असल्यास, तुमच्या चॅनलकडून कोणताही दंड न घेता, तुम्हाला चेतावणी मिळण्याची शक्यता आहे. ९० दिवसांनंतर चेतावणी एक्स्पायर होऊ देण्यासाठी तुमच्याकडे धोरण प्रशिक्षण घेण्याची संधी असेल. चेतावणी जारी केल्यानंतर नव्हे, तर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ९० दिवसांचा कालावधी सुरू होतो. मात्र, त्या ९० दिवसांच्या कालावधीमध्ये त्याच धोरणाचे उल्लंघन केले गेल्यास, चेतावणी एक्स्पायर होणार नाही आणि तुमच्या चॅनलवर स्ट्राइक जारी केला जाईल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही वेगळ्या धोरणाचे उल्लंघन केल्यास, तुम्हाला आणखी एक चेतावणी मिळेल.

तुम्हाला ९० दिवसांच्या आत ३ स्ट्राइक मिळाल्यास, तुमचे चॅनल समाप्त केले जाईल. आमच्या स्ट्राइक सिस्टीमबद्दल अधिक जाणून घ्या.

समुदाय मार्गदर्शक तत्त्वे किंवा सेवा अटी यांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आम्ही तुमचे चॅनल अथवा खाते समाप्त करू शकतो. गंभीर गैरवर्तनाची एखादी घटना आढळल्यावर किंवा चॅनलने सातत्याने धोरणाचे हेतुपुरस्सर उल्लंघन केल्यावर आम्ही तुमचे चॅनल अथवा खाते समाप्त करू शकतो. आम्ही वारंवार उल्लंघन करणाऱ्यांना भविष्यामध्ये धोरणासंबंधित प्रशिक्षणे घेण्यापासून रोखू शकतो. चॅनल किंवा खाते समाप्ती याविषयी अधिक जाणून घ्या.

आमची उर्वरित समुदाय मार्गदर्शक तत्त्वे यांच्याशी स्वतःला परिचित करून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8175313687958201978
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false