योगदान द्या हा टॅब वापरणे

ठिकाणे जोडणे, परीक्षणे लिहिणे, फोटो अपलोड करणे किंवा संपादन सुचवणे हे करण्यासाठी, तळाशी योगदान द्या Contribute वर टॅप करा.

तुम्ही रस्ता आणि ठिकाणांशी संबंधित सुधारणा सबमिट करणे, तुमची Maps प्रोफाइल व्यवस्थापित करणे आणि तुमच्या योगदानाला मिळालेले व्ह्यू आणि त्याचा परिणाम पाहणे हेदेखील करू शकता.

Google Maps मध्ये योगदान कसे द्यायचे याबद्दल अधिक जाणून घ्या.

योगदान द्या या टॅबवर आशय शोधण्यासाठी साइन इन करा. तुम्ही यापूर्वी कधीही Google Maps मध्ये योगदान दिले नसल्यास, सुरू करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.

योगदान देण्याच्या पद्धती

नकाशा संपादित करा

ठिकाणे, पत्ते किंवा रस्ते जोडा अथवा संपादने सुचवा. तुम्ही तुमचे स्थान संपादितदेखील करू शकता आणि तुमचे मत Maps वर पाठवू शकता.

  1. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, योगदान द्याContribute आणि त्यानंतर नकाशा संपादित करा Edit वर टॅप करा.
    • एखादा पर्याय निवडा.
  2. ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा.

संपादने कशी सुचवायची किंवा एखादे ठिकाण काढून टाकण्यासाठी ते कसे फ्लॅग करायचे ते जाणून घ्या.

नसलेले ठिकाण जोडा

  1. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, योगदान द्या Contribute आणि त्यानंतर ठिकाण जोडा Add place वर टॅप करा.
  2. नकाशामध्ये नसलेले ठिकाण जोडण्यासाठी सर्व संबंधित फील्ड भरा.

नकाशामध्ये नसलेले ठिकाण कसे जोडायचे ते जाणून घ्या.

परीक्षण लिहा

  1. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, योगदान द्या Contribute आणि त्यानंतर परीक्षण लिहा Write review वर टॅप करा.
  2. नकाशावरील एखादे ठिकाण निवडा.
  3. ठिकाणाला रेटिंग देण्यासाठी ताऱ्यांवर टॅप करा.
    • पर्यायी: तुम्ही परीक्षण लिहू शकता.

परीक्षणे कशी लिहायची आणि ठिकाणाची रेटिंग कशी जोडायची ते जाणून घ्या.

Google Maps मध्ये फोटो किंवा व्हिडिओ जोडा

  1. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, योगदान द्या Contribute आणि त्यानंतर फोटो जोडा Add 360 photos वर टॅप करा.
  2. तुम्हाला पोस्ट करायच्या असलेल्या फोटोवर टॅप करा. फोटो शेअर करण्यापूर्वी तुम्हाला Google Maps ला तुमचे फोटो अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती द्यावी लागेल.
  3. ठिकाण निवडा वर टॅप करा.
    • सुचवलेली ठिकाणे चुकीची असल्यास, दुसरीकडे कुठेतरी? वर टॅप करा
  4. पोस्ट करा वर टॅप करा.

तुमच्या फोटोवरील स्थानाच्या माहितीनुसार स्थाने सुचवली आहेत. अधिक माहितीसाठी, फोटो आणि व्हिडिओ कसे जोडायचे, काढून टाकायचे किंवा शेअर करायचे ते जाणून घ्या

आणखी योगदान द्या

वापरकर्ते डिश जोडू शकतात, सूची प्रकाशित करू शकतात आणि ठिकाणांना रेटिंग, परीक्षणे व फोटो जोडू शकतात.
  1. तुमच्या स्क्रीनच्या तळाशी, योगदान द्या Contribute आणि त्यानंतर आणखी योगदान द्या वर टॅप करा.
  2. तुम्ही भेट दिलेल्या किंवा माहिती शोधलेल्या ठिकाणांचे तुमचे अनुभव शेअर करण्यास सूचित केले जाईल.

तुमची Maps प्रोफाइल अ‍ॅक्सेस करा

तुमची Maps प्रोफाइल कशी संपादित करायची ते जाणून घ्या.

सुचवलेली परीक्षणे

तुम्ही याआधी स्थान इतिहास सुरू केले असल्यास, तुम्ही योगदान द्या या टॅबवर परीक्षण देण्यासाठी सुचवलेली ठिकाणे पाहू शकता.

तुमची मागील योगदाने शोधा

Google Maps मधील योगदान द्या या टॅबमध्ये तुमची योगदाने पाहा. तुम्ही तुमची योगदाने, परीक्षणाला मिळालेले एकूण व्ह्यू आणि तुमच्या पोस्टला मिळालेले एकूण फोटो व्ह्यू पाहू शकता.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13503612337095349032
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false