सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google Go अ‍ॅपवरून वेब पेज, इमेज आणि बरेच काही शोधा

तुम्ही Google Go अ‍ॅपवरून वेब पेज, इमेज आणि बरेच काही शोधू शकता. Google Go विविध डिव्हाइसवर आणि इंटरनेट कनेक्शनवर झटपट काम करते.
Android Go डिव्हाइसवर Google Go हे डीफॉल्ट शोध अ‍ॅप आहे.

तुमच्याकडे नवीनतम अ‍ॅप आवृत्ती आहे का ते तपासा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Goअ‍ॅप Google Go वर जा.
  2. अपडेट करा वर टॅप करा. "इंस्टॉल केले" दिसत असल्यास, तुमच्याकडे आधीच नवीनतम आवृत्ती आहे.

 

वेब पेज, इमेज, GIF आणि बरेच काही शोधा

 

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. शोध, इमेज, किंवा GIF यांसारख्या वर्गवारीवर टॅप करा.
  3. काहीतरी शोधा, त्यानंतर Go वर टॅप करा.

 

तुमचा आवाज वापरून शोधा

 

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. शोध बारवरून, मायक्रोफोन वर टॅप करा.
  3. तुमचा शोध बोला.

होम पेजवरून व्हॉइस शोध करण्यासाठी, व्हॉइस शोध वर टॅप करा.

लेन्स Go सोबत वाचा, ऐका आणि शोधा

Google Go च्या लेन्स Go वैशिष्ट्यासोबत, लिखित शब्द भाषांतरित करण्यासाठी, ते तुमच्या मूळ भाषेत मोठ्याने वाचण्यासाठी आणि त्यासारखे वाक्यांश वेबवर शोधण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवरील कॅमेरा वापरू शकता.

फोटोमधील मजकुराचे भाषांतर करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. शोध बारच्या उजवीकडे किंवा “टॉप अ‍ॅप्स” विभागात, Lens  वर टॅप करा.
  3. तुम्हाला समजून घ्यायच्या असलेल्या शब्दांचा फोटो घ्या.
  4. Lens ने इमेजवर प्रक्रिया केल्यावर, Translate वर टॅप करा.

Translate Go मध्ये तुमच्या पसंतीच्या भाषेला डीफॉल्ट करते.
टीप: सर्वात वर उजवीकडे, तुम्ही आणखी आणि त्यानंतर भाषांतराची भाषा बदला वर टॅप केल्यास, तुम्ही तुमची भाषांतराची भाषा बदलू शकता.

इमेजमधील मजकूर ऐका

एकदा Lens Go ने इमेजच्या मजकुराचा अर्थ लावल्यावर, तुम्ही तो मोठ्याने वाचून घेऊ शकता.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. शोध बारच्या उजवीकडे किंवा “टॉप अ‍ॅप्स” विभागात, Lens  वर टॅप करा.
  3. तुम्हाला ऐकायच्या असलेल्या शब्दांचा एखादा फोटो घ्या.
  4. लेन्सने इमेजवर प्रक्रिया केल्यावर, तळाशी, ऐका वर टॅप करा.
टीप: तुम्ही भाषांतरे ऐकूदेखील शकता.

तुमच्या आसपासच्या वस्तूंबद्दल माहिती शोधा

Lens Go ने इमेजच्या मजकुराचा अर्थ लावल्यावर, तुम्हाला तो मजकूर इंटरनेट शोध करता येईल. 

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. शोध बारच्या उजवीकडे किंवा "टॉप अ‍ॅप्स" विभागामध्ये, Lens  वर टॅप करा.
  3. तुम्हाला शोधायच्या असलेल्या शब्दांचा फोटो घ्या.
  4. लेन्सने एखाद्या इमेजवर प्रक्रिया केल्यावर, तळाशी, Search वर टॅप करा.
टीप: तुम्ही भाषांतरासोबतदेखील शोध करू शकता.

तुमच्या स्वारस्यांबद्दल अपडेट शोधा

तुमचे आवडते टीव्ही शो किंवा क्रीडा टीमसारख्या तुमच्या स्वारस्यांविषयी तुम्ही अपडेट मिळवू शकता.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात वर, Discover वर टॅप करा किंवा होम स्क्रीनपासून उजवीकडे स्वाइप करा.

 

इतर शोध सेटिंग्ज बदला

 

अ‍ॅप्स आणि साइट जोडा किंवा हटवा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. अ‍ॅप किंवा साइट जोडा, काढून टाका किंवा पुन्हा क्रमाने लावा:
    • जोडा
      1. "अ‍ॅप्स" अंतर्गत जोडा वर टॅप करा.
      2. तुमचे आवडते अ‍ॅप शोधा त्यानंतर त्याला स्पर्श करा आणि धरून ठेवा. अ‍ॅप तुमच्या होम स्क्रीनवर जोडले जाईल.
    • काढून टाका
      1. तुम्हाला काढून टाकायचे असलेले अ‍ॅप होम स्क्रीनवर शोधा.
      2. अ‍ॅप आयकन आणि त्यानंतर काढून टाका वर टॅप करा आणि धरून ठेवा.

आणखी साइट आणि अ‍ॅप्स शोधण्यासाठी, होम स्क्रीनपासून डावीकडे स्वाइप करा आणि "सर्व अ‍ॅप्स" पेजच्या सर्वात वरती वर्गवारीवर टॅप करा.

शोध परिणाम दुसर्‍या भाषेत मिळवा

दुसर्‍या भाषेत शोधण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिली एखादी नवीन भाषा जोडावी लागेल.

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Go अ‍ॅप Google Go उघडा .
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. “भाषा” मध्ये, Search साठी दुसरी भाषा निवडा वर टॅप करा.
  4. भाषा निवडा.
  5. काहीतरी शोधा, त्यानंतर Go वर टॅप करा.
  6. शोध बारच्या वर, तुम्हाला ज्या भाषेत परिणाम मिळवायचे आहेत तिच्यावर टॅप करा.

तुमची Google Go सेटिंग्ज व्यवस्थापित करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. अपडेट करण्यासाठी सेटिंग निवडा:
    • वॉलपेपर: तुमचा वॉलपेपर कस्टमाइझ करा.
    • भाषा: अ‍ॅपची भाषा बदला किंवा Search साठी दुसरी भाषा जोडा.
    • डेटा: प्राथमिक वेब पेज दाखवण्यासाठी लाइट मोड वापरा आणि डेटाची बचत करा.
    • खाते: वेगळ्या Google खाते वर स्विच करा, तुमचा शोध इतिहास आणि इतर Google खाते अ‍ॅक्टिव्हिटी व्यवस्थापित करा.
    • सूचना: तुम्ही ऑफलाइन शोधत असल्यास आणि तुम्हाला वाय-फायशी कनेक्ट करण्यात समस्या असल्यास, वेब पेज लोड झाल्यावर किंवा शोध परिणाम तयार झाल्यावर सूचना मिळवा.
    • सुरक्षितशोध: भडक शोध परिणाम फिल्टर करा.

तुमची वेब आणि अ‍ॅप अॅक्टिव्हिटी हटवा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर Google Go अ‍ॅप Google Go उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. “खाते” या अंतर्गत, माझी अ‍ॅक्टिव्हिटी वर टॅप करा.
  4. तुमच्या इतिहासाच्या वरती, हटवा डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर आतापर्यंतचा हटवा वर टॅप करा.

तुमचा शोध इतिहास व्यवस्थापित करणे आणि हटवणे हे कसे करायचे ते जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
731397960919765250
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false