माझ्या फोटोचा बॅकअप घेता आला नाही

तुमचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या Google खाते सह सिंक होत नसल्यास, तुमचे बॅकअपचे स्टेटस तपासा.

बॅकअप ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्या Google खाते वर आपोआप सेव्ह करणारी स्टोरेज सेवा आहे. तुम्ही तुमच्या खात्यामध्ये साइन इन केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवरून हे फोटो आणि व्हिडिओ अ‍ॅक्सेस करण्यायोग्य असतील. बॅकअप घेण्याच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचे बॅकअपचे स्टेटस तपासा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Photos ॲप उघडा.
  2. सर्वात वरती, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे यावर टॅप करा. खालील मेसेजपैकी एक मेसेज शोधा:
    • बॅकअप घेणे पूर्ण झाले: तुमच्याकडे बॅकअप घेण्यासाठी आणखी कोणतेही आयटम बाकी नाहीत.
    • बॅकअप घेणे बंद केले आहे: "बॅकअप घ्या" हे बंद केले आहे. बॅकअप घेणे सुरू करण्यासाठी, बॅकअप घेणे सुरू करा वर टॅप करा.
    • बॅकअप घेतला जात आहे: तुमच्या फोटो आणि व्हिडिओचा सध्या बॅकअप घेतला जात आहे. तुम्हाला बाकी असलेल्या आयटमची संख्यादेखील सापडेल.
    • बॅक अपची तयारी करत आहे किंवा बॅकअपसाठी तयार होत आहे: तुमचे फोटो आणि व्हिडिओ बॅकअपसाठी तयार होत आहेत.
    • कनेक्शनची प्रतीक्षा करत आहे किंवा वाय-फाय ची प्रतीक्षा करत आहे: Wi-Fi Off तुमची सेटिंग्ज बदला किंवा वाय-फाय अथवा मोबाइल नेटवर्कशी कनेक्ट करा.

तुमचा बॅकअप ट्रबलशूट करा

तुमची बॅकअप सेटिंग्ज तपासून पहा
  1. Google Photos ॲप उघडा.
  2. सर्वात वरती, तुमच्या खात्याचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे and then Photos सेटिंग्ज and then बॅकअप घ्या वर टॅप करा.
  3. "बॅकअप घ्या" हे सुरू असल्यास, तुम्हाला हे पर्याय दिसतील:
  • बॅकअप खाते: सूचीबद्ध केलेले खाते आणि तुम्हाला Google Photos अ‍ॅपमध्ये दिसत असलेले खाते हे एकच असल्याची खात्री करा. तुम्हाला Google Photos अ‍ॅपमध्ये कोणते खाते दिसत आहे हे पाहण्यासाठी, Google Photos चा मुख्य मेनू उघडा व सर्वात वरती तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस पहा.
  • डिव्हाइस फोल्डरचा बॅकअप घ्या: Google Chat आणि WhatsApp यांसारख्या इतर अ‍ॅप्समधून फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घेण्यासाठी टॅप करा व निवडा.
  • बॅकअपची गुणवत्ता: तुमच्या फोटो आणि व्हिडिओच्या बॅकअपची गुणवत्ता बदलण्यासाठी टॅप करा. तुमच्या बॅकअपची गुणवत्ता कशी बदलावी ते जाणून घ्या.
  • मोबाइल डेटा बॅकअप: तुम्हाला तुमचे मोबाइल नेटवर्क (फक्त वाय-वाय ऐवजी) वापरून तुमच्या फोटो किंवा व्हिडिओचा बॅकअप घ्यायचा आहे का ते निवडा. तुमच्या सेवा पुरवठादाराचे शुल्क लागू होऊ शकते.
टीप: तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये असताना तुम्हाला फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घ्यायचा असल्यास, "रोमिंग सुरू असताना बॅकअप घ्या" हे सुरू करा.
फाइलचा आकार किंवा प्रकार तपासा

फोटो किंवा व्हिडिओ आवश्यकता पूर्ण करू शकत नसल्याने तो अपलोड केला जाऊ शकत नाही:

  • फोटोची मर्यादा २०० MB किंवा २०० मेगापिक्सेलपेक्षा जास्त असू शकत नाही
  • व्हिडिओची मर्यादा १० GB पेक्षा जास्त असू शकत नाही
कोणत्या फोटोचा बॅकअप घेतला आहे ते तपासा
तुमचा बॅकअप प्रगतीपथावर असताना, किती फोटो बाकी आहेत ते आणि त्यांच्या थंबनेल तुम्हाला सर्वात वरती दिसतील.

कोणत्या फोटोचा बॅकअप घेतला गेला नाही ते पहा

  1. फोटो निवडा.
  2. फोटोचा बॅकअप घेतला नसल्यास, सर्वात वरती, तुम्हाला बॅकअप घ्या दिसेल.
टीप: तुमचे बॅकअप घेतलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ शोधण्यासाठी, तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा. तुम्हाला येथे दिसणाऱ्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घेतला गेला आहे.
तुमच्या डिव्हाइस फोल्डरचा बॅकअप घ्या

तुम्ही इतर अ‍ॅप्समधून डाउनलोड किंवा सेव्ह केलेले फोटो आणि व्हिडिओ यांचा बॅकअप घेऊ शकता.

  1. Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, लायब्ररी and then डिव्हाइसवरील Photos वर टॅप करा.
  3. तुम्हाला बॅकअप घ्यायच्या असलेल्या फोल्डरवर टॅप करा.
  4. सर्वात वरती, बॅकअप घ्या सुरू करा.
तुमचे डिव्हाइस चार्जरवर ठेवा
तुमची बॅटरी वाचवण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसची स्क्रीन बंद झाल्यावर किंवा स्क्रीन सेव्हर मोडमध्ये बॅकअप प्रक्रिया थांबू शकते. 
रिकाम्या फोटो आणि व्हिडिओ फाइल हटवा
महत्त्वाचे: तुमच्या Android डिव्हाइसमधून रिकाम्या फोटो आणि व्हिडिओ फाइल काढून टाकण्यासाठी, Files by Google अ‍ॅप डाउनलोड करा.
  1. Files by Google अ‍ॅप Files by Google उघडा.
  2. इमेज किंवा व्हिडिओ वर टॅप करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी More आणि त्यानंतर यानुसार क्रमाने लावा आणि त्यानंतर सर्वप्रथम सर्वात लहान वर टॅप करा.
  4. बाइट आकार ० असलेल्या फाइल निवडा.
  5. हटवा हटवा आणि त्यानंतर फाइल ट्रॅशमध्ये हलवा वर टॅप करा.
टीप: एकाहून अधिक फोटो किंवा व्हिडिओ फाइल निवडण्यासाठी, पहिल्या फाइलला स्‍पर्श करा आणि धरून ठेवा, त्यानंतर तुम्हाला हटवायच्या असलेल्या इतर फाइलवर टॅप करा.
तुम्हाला अजूनही समस्या असल्यास, Google Photos ला फीडबॅक पाठवा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1152205073322860148
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false