Chrome वरून तुमच्या टीव्हीवर कास्ट करणे

तुम्ही तुमच्या PC आणि Chromecast डिव्हाइससह तुमच्या टीव्हीवर Chrome टॅब किंवा तुमची स्क्रीन दाखवू शकता.

तुम्ही बराचसा वेब आशय कास्ट करू शकता. Silverlight, QuickTime आणि VLC यांसारखे काही प्लग-इन काम करणार नाहीत.

तुमच्या टीव्हीवर Chrome दाखवण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टी आवश्यक आहेत:

Chrome वरून टॅब कास्ट करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेव्ह आणि शेअर करा आणि त्यानंतर कास्ट करा… निवडा.
  3. तुम्हाला वापरायचा असलेला कास्ट रिसीव्हर निवडा.
    • डिव्हाइस आधीच वापरले जात असल्यास, सध्याचा आशय बदलला जातो.
  4. कास्ट करणे थांबवण्यासाठी, अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, कास्ट करा आणि त्यानंतर कास्ट करणे थांबवा निवडा.

टीप: Google Cast ला सपोर्ट करणाऱ्या साइटवर, थेट मीडिया प्लेअरवरून कास्ट करणे हे करा.

तुम्हाला Chrome मध्ये काय दिसेल

  • तुम्ही एखादा टॅब टीव्हीवर कास्ट करता, तेव्हा टॅबवर डिस्प्ले आयकन Display दिसतो.
  • अ‍ॅक्टिव्ह कास्ट सेशन सुरू असते, तेव्हा ”एक्स्टेंशन” च्या बाजूला अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे कनेक्ट केलेले कास्ट याचा आयकन दिसतो.

Chrome मध्ये शॉर्टकट वापरण्यासाठी, कास्ट बटण जोडणे हे करा.

टीप: तुम्ही कास्ट करता ते व्हिडिओ किंवा इमेज तुमच्या कॉंप्युटर आणि टीव्हीवर दिसतात, पण आवाज फक्त तुमच्या टीव्हीवर प्ले होतो. इतर टॅब आणि ॲप्सचे आवाज अजूनही तुमच्या कॉंप्युटरवर प्ले होतात.

तुमची कॉंप्युटर स्क्रीन कास्ट करणे

Mac, Windows किंवा Chromebook वर Chrome वापरून तुम्ही तुमची संपूर्ण कॉंप्युटर स्क्रीन दाखवू शकता.

टीप: तुम्ही तुमची स्क्रीन कास्ट करता, तेव्हा ऑडिओ तुमच्या कॉंप्युटरवर प्ले होऊ शकतो. त्याऐवजी ऑडिओ तुमच्या टीव्हीवर प्ले करण्यासाठी, टॅब कास्ट करा.

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतरसेव्ह आणि शेअर करा आणि त्यानंतर कास्ट करा… निवडा.
  3. स्रोत आणि त्यानंतर स्क्रीन कास्ट करा निवडा.
  4. तुम्हाला तुमची स्क्रीन कास्ट करायची आहे ते डिव्हाइस निवडा.

तुमच्या कॉंप्युटरवरून संगीत आणि व्हिडिओ कास्ट करणे

  1. तुमच्या काँप्युटरवर Chrome उघडा.
  2. तुम्हाला कास्ट करायची असलेली फाइल Chrome टॅबमध्ये उघडा.
  3. फाइल ही Chrome टॅबमध्ये ड्रॅग करून ड्रॉप करा किंवा कीबोर्ड शॉर्टकट वापरा:
    • Windows: Ctrl + O
    • Mac: command + O
  4. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतरसेव्ह आणि शेअर करा आणि त्यानंतर कास्ट करा… निवडा.
  5. तुम्हाला ज्या डिव्हाइसवर कास्ट करायचे आहे ते निवडा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16539711736122170864
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false