अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करणे

तुमच्या कॉंप्युटरवर, तुम्ही Google Calendar मध्ये अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करू शकता.

महत्त्वाचे: तुम्ही वैयक्तिक खात्यासह Calendar वापरत असल्यास, एकच बुकिंग पेज तयार करू शकता आणि कोणत्याही शुल्काशिवाय अमर्यादित अपॉइंटमेंट स्वीकारू शकता. अधिक प्रीमियम वैशिष्ट्यांसाठी Google Workspace किंवा Google One सदस्यत्वे आवश्यक आहेत. अपॉइंटमेंट शेड्यूलसाठी असलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करणे

अपॉइंटमेंट शेड्युल तयार करा

पायरी १: तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल सेट करणे

महत्त्वाचे: दुय्यम कॅलेंडरवर अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करण्यासाठी किंवा अपॉइंटमेंट शेड्यूलमध्ये को-होस्ट जोडण्यासाठी, तुमच्याकडे पात्र Google Workspace सदस्यत्व असणे आवश्यक आहे. अपॉइंटमेंट शेड्यूलसाठी असलेल्या प्रीमियम वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

  1. कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, तयार करा जोडा वर क्लिक करा.
  3. अपॉइंटमेंट शेड्यूल वर क्लिक करा.
  4. शीर्षक एंटर करा.
    • तुमच्या बुकिंग पेजची लिंक असलेल्या कोणालाही शीर्षक दृश्यमान असते.
    • तुमच्या कॅलेंडरवर शेड्यूल आणि येणाऱ्या बुकिंगसाठी शीर्षक दिसते.
  5. अपॉइंटमेंटचा कालावधी सेट करण्यासाठी, डाउन ॲरो Dropdown वर क्लिक करा.
    • अपॉइंटमेंट किमान ५ मिनिटांच्या असणे आवश्यक आहे.
  6. तुमच्या अपॉइंटमेंटसाठी तारीख, वेळ आणि टाइम झोन सेट करा.
    • तुम्ही एक वेळची अपॉइंटमेंट किंवा आवर्ती शेड्यूल सेट करू शकता.
    • टीप: एका दिवसासाठी वेळेचे एकाहून अधिक स्लॉट जोडण्यासाठी, या दिवसामध्ये आणखी एक कालावधी जोडा वर क्लिक करा.
  7. तुमच्या अपॉइंटमेंटच्या उपलब्धतेसाठी सेटिंग्ज निवडा, जसे की तुमचा शेड्युल करण्याचा कालावधी किंवा तुम्ही उपलब्ध नसलेले दिवस. तुमची उपलब्धता कस्टमाइझ करण्याबाबत जाणून घ्या.
  8. तुम्हाला ज्यामध्ये तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल जोडायचे आहे, ते प्राथमिक किंवा दुय्यम कॅलेंडर निवडा.
    • टिपा:

      • तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल तयार केल्यावर, ते वेगळ्या प्राथमिक किंवा दुय्यम कॅलेंडरवर असावे, यासाठी तुम्ही ते संपादित करू शकत नाही.

      • प्राथमिक किंवा दुय्यम कॅलेंडर संपादित करण्याची परवानगी असलेली कोणतीही व्यक्ती वेळापत्रकात बदल करू शकते आणि येणारी बुकिंग पाहू शकते. ॲक्सेससंबंधित परवानग्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

  9. पर्यायी: "कॅलेंडर" या अंतर्गत, प्राथमिक किंवा दुय्यम कॅलेंडरवर तयार केलेल्या किंवा स्वीकारलेल्या इव्हेंटशी संबंधित विसंगती टाळण्यासाठी उपलब्धतेसाठी कॅलेंडर तपासा निवडा. त्यानंतर, तुम्ही तयार केलेल्या किंवा स्वीकारलेल्या कोणत्याही इव्हेंटदरम्यान बुक करण्यायोग्य वेळा उपलब्ध नको आहेत, अशी सर्व कॅलेंडर निवडा.
    • महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य बंद केलेले असतानाही बुकिंग पेजवरील प्रत्येक अपॉइंटमेंट स्लॉट फक्त एकदाच बुक केला जाऊ शकतो.
  10. अपॉइंटमेंटमध्ये को-होस्ट जोडण्यासाठी, को-होस्टची नावे किंवा त्यांचे ईमेल ॲड्रेस एंटर करा.
    • टीप: तुम्ही एकाच संस्थेमध्ये कमाल २० को-होस्ट जोडू शकता. Google Groups हे को-होस्ट म्हणून वापरले जाऊ शकत नाही.

  11. पुढील वर क्लिक करा.

पायरी २: तुमचे बुकिंग पेज सेट करणे

महत्त्वाचे:

  • ईमेल पडताळणी फक्त पात्र Google Workspace प्लॅनसाठी उपलब्ध आहे.
  • पात्र Google Workspace आणि Google One प्लॅनसाठी, तुम्ही प्रत्येक अपॉइंटमेंट आधी कमाल ५ रिमाइंडर पाठवू शकता.
  • अपॉइंटमेंटसाठी पेमेंट स्वीकारण्यासाठी Stripe खात्याची आवश्यकता आहे. पेमेंट कसे स्वीकारावे याबद्दल जाणून घ्या.
  1. तुमच्या बुकिंग पेजच्या फोटो आणि नावाचे पुनरावलोकन करा.
  2. अपॉइंटमेंटसाठी स्थान आणि कॉंफरन्सचे पर्याय निवडा:
    • Google Meet व्हिडिओ कॉंफरन्सिंग
    • प्रत्यक्ष मीटिंग
    • फोन कॉल
    • कोणतेही नाही / नंतर नमूद केले जाईल
  3. तुमच्या सेवेचे स्पष्टीकरण देणारे वर्णन जोडा.
    • वर्णन तुमच्या बुकिंग पेजवर आणि कंफर्मेशन ईमेलमध्ये दिसते.
  4. फॉर्म भरण्यासाठी तुमच्या उपस्थित होणाऱ्यांकरिता फील्ड जोडा.
    • उपस्थित होणाऱ्यांनी त्यांचे नाव आणि आडनाव व ईमेल ॲड्रेस देणे आवश्यक आहे.
    • आणखी फील्ड जोडण्यासाठी:
      1. आयटम जोडा वर क्लिक करा.
      2. फोन नंबर किंवा कस्टम आयटम वर क्लिक करा.
      3. या फील्ड आवश्यक आहेत की पर्यायी आहेत हे निवडा.
    • बॉटना रोखण्यासाठी, ईमेल पडताळणी आवश्यक करा वर क्लिक करा.
  5. पर्यायी: अपॉइंटमेंट पेमेंट सुरू करा.
    1. Google Calendar शी Stripe खाते कनेक्ट करा.
    2. "बुकिंग करताना पेमेंट आवश्यक करा" च्या पुढील चौकटीमध्ये खूण करा.
    3. रक्कम आणि चलन एंटर करा.
    4. तुमचे रद्द करण्यासंबंधित धोरण जोडा.
  6. तुमच्या ईमेलसाठी कंफर्मेशन ईमेल आणि रिमाइंडर सेट करा.
    • तुम्ही कमाल ५ रिमाइंडर पाठवू शकता.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा.

टीप:

  • आठवड्याच्या दृश्यामध्ये किंवा कोणत्याही दिवसाच्या दृश्यामध्ये, तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर कधीही क्लिक करता, तेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करू शकता अथवा त्यामध्ये उपलब्धता जोडू शकता. दिसणाऱ्या विंडोमध्ये अपॉइंटमेंट शेड्यूल वर क्लिक करा.

तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल संपादित करा

तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट शेड्युलवरील ठरावीक फील्ड संपादित करू शकता.
तुमचा फोटो आणि नाव बदला
तुमचा फोटो आणि नाव तुमच्या बुकिंग पेजवर कसे दिसते हे तुम्ही बदलू शकता. तुमचे अपॉइंटमेंट बुकिंग पेज कसे कस्टमाइझ करायचे ते जाणून घ्या.
अपॉइंटमेंटचे स्थान सेट करा
तुम्ही अपॉइंटमेंटच्या ठिकाणाबद्दल अतिथींना कळवू शकता.
  1. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, पुढील वर क्लिक करा.
  3. मीटिंगचे स्थान सेट करण्यासाठी, “स्थान आणि कॉंफरन्सिंग” या अंतर्गत, स्थान निवडा Dropdown वर क्लिक करा.
  4. स्थान पर्याय निवडा:
    • Google Meet व्हिडिओ कॉंफरन्सिंग
    • प्रत्यक्ष मीटिंग
    • फोन कॉल
    • कोणतेही नाही / नंतर नमूद केले जाईल
  5. तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे, सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: तृतीय पक्ष व्हिडिओ कॉलिंग सेवा वापरण्यासाठी, कोणतेही नाही / नंतर नमूद केले जाईल वर क्लिक करा. एखाद्या व्यक्तीने अपॉइंटमेंट बुक केल्यानंतर, व्हिडिओ मीटिंगची माहिती जोडण्यासाठी इव्‍हेंट संपादित करा. Google Workspace Marketplace अ‍ॅड-ऑन इंस्टॉल करणे हे करण्याची शिफारस केली जाते.
वर्णन जोडा
तुम्ही इव्हेंटच्या वर्णनामध्ये तुमच्या सेवेबद्दल किंवा इव्हेंटबद्दल अधिक तपशील एंटर करू शकता.
  1. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, पुढील वर क्लिक करा.
  3. "वर्णन" या अंतर्गत, तुमच्या सेवेबद्दल किंवा इव्हेंटबद्दल तपशील एंटर करा.
  4. तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे, सेव्ह करा वर क्लिक करा.
टीप: वर्णने तुमच्या बुकिंग पेजवर, कंफर्मेशन ईमेल आणि Google Calendar वरील इव्‍हेंटच्या वर्णनांमध्ये दिसतात.
बुकिंग फॉर्म संपादित करा
बुकिंग फॉर्म भरण्यासाठी, तुम्ही तुमच्या उपस्थित होणाऱ्यांकरिता फील्ड जोडू शकता.
महत्त्वाचे: तुमच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करत असलेल्या लोकांनी बुकिंग फॉर्ममध्ये त्यांची नावे आणि ईमेल अ‍ॅड्रेस एंटर करणे आवश्यक आहे.
  1. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, पुढील वर क्लिक करा.
  3. बुकिंग फॉर्म डाउन अ‍ॅरो आणि त्यानंतर आयटम जोडा आणि त्यानंतर फोन नंबर Dropdown वर क्लिक करा.
  4. फील्ड निवडा:
    • फोन नंबर: उपस्थित होणाऱ्याला फोन नंबर द्यायला सांगा.
    • कस्टम आयटम: टेक्स्ट बॉक्समध्ये, उपस्थित होणाऱ्याने उत्तर द्यावे असे तुम्हाला वाटत असलेली सूचना एंटर करा.
  5. पर्यायी: उत्तर आवश्यक करण्यासाठी, "आवश्यक आहे" याच्या बाजूच्या बॉक्समध्ये खूण करा.
  6. फॉर्म सेव्ह करण्यासाठी, आयटम जोडा वर क्लिक करा.
  7. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे, सेव्ह करा वर क्लिक करा.
रिमाइंडर ईमेल संपादित करा

उपस्थित होणाऱ्याला रिमाइंडर ईमेल कधी मिळावा यासाठी तुम्‍ही वेळ सेट करू शकता.

  1. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, पुढील वर क्लिक करा.
  3. बुकिंग कंफर्मेशन आणि रिमाइंडर डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  4. “ईमेल रिमाइंडर” च्या खाली, डाउन अ‍ॅरो Dropdown वर क्लिक करा.
  5. उपस्थित होणाऱ्याला ईमेल रिमाइंडर कधी मिळावा ते निवडा.
  6. रिमाइंडरची वेळ सेव्ह करण्यासाठी, पूर्ण झाले वर क्लिक करा.
  7. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल सेव्ह करण्यासाठी, तळाशी उजवीकडे, सेव्ह करा वर क्लिक करा.
टिपा:
  • तुम्ही कमाल ५ रिमाइंडर पाठवू शकता.
  • तुम्ही रिमाइंडर ईमेलमधील मजकूर संपादित करू शकत नाही.
रिमाइंडर ईमेल बंद करणे
  1. तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल उघडा.
  2. तळाशी उजवीकडे, पुढील वर क्लिक करा.
  3. बुकिंग कंफर्मेशन आणि रिमाइंडर डाउन अ‍ॅरो वर क्लिक करा.
  4. "ईमेल रिमाइंडर" च्या बाजूच्या चौकटीतली खूण काढा.
तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल लपवणे

Google Calendar वेबवर तुमची अपॉइंटमेंट शेड्यूल दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी:

  1. सर्वात वरती, सेटिंग्ज शेजारील, “दृश्य स्विचर” ड्रॉपडाउन मेनूवर क्लिक करा.
  2. अपॉइंटमेंट शेड्यूल दाखवा वर क्लिक करा.

टिपा:

  • अपॉइंटमेंट शेड्यूल लपवलेले असल्यास, बुक केलेल्या अपॉइंटमेंट अजूनही तुमच्या कॅलेंडरवर दाखवल्या जातात.
  • अपॉइंटमेंट शेड्यूल लपवली असल्यास आणि तुम्ही नवीन शेड्यूल तयार केल्यास किंवा अस्तित्वात असलेल्या अपॉइंटमेंट शेड्यूलमध्ये वेळ जोडल्यास, सेटिंग पुन्हा अपॉइंटमेंट शेड्यूल दाखवेल.
  • अपॉइंटमेंट शेड्यूल ही मोबाइल अ‍ॅपवर नेहमी दृश्यमान असतात.

तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल तुमच्या कॅलेंडरसह कसे सिंक होते

तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल Google Calendar सोबत आपोआप सिंक होते.
  • तुमचे अपॉइंटमेंट शेड्युल आणि बुक केलेल्या अपॉइंटमेंट तुमच्या कॅलेंडरवर आपोआप दिसतील.
  • तुम्ही "उपलब्धतेसाठी कॅलेंडर तपासा" निवडता, तेव्हा Google Calendar हे शेड्यूलसंबंधित विसंगती टाळते. Google Calendar मधील इव्‍हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही “होय” किंवा “कदाचित” हे उत्तर दिल्यास, तुमच्या बुकिंग पेजवर तो कालावधी मोकळा दिसणार नाही. इतर इव्‍हेंटसोबत होणारी विसंगती टाळण्यासाठी तुमच्या बुकिंग पेजवरील उपलब्धता आपोआप अपडेट होते. तुम्ही पात्र असलेल्या Google Workspace किंवा Google One प्लॅनचे सदस्यत्व घेतल्यास, तुमची निवडलेली कॅलेंडर संघर्षांसाठी तपासली जातात. अपॉइंटमेंट शेड्यूलसंबंधित विसंगती कशी टाळावी हे जाणून घ्या.

तुमच्या अपॉइंटमेंट शेड्युलची दृश्यमानता कशी काम करते

  • अपॉइंटमेंट शेड्यूल तयार केले जाणारे कॅलेंडर संपादित करण्याची परवानगी असलेली कोणतीही व्यक्ती शेड्यूलमध्ये बदल करू शकते आणि येणारी बुकिंग पाहू शकते.
  • तुमच्या बुकिंग पेजची लिंक असलेली कोणतीही व्यक्ती तुम्ही उपलब्ध असलेल्या वेळा पाहू शकते.
  • तुम्ही तुमचे बुकिंग पेज शेअर केल्यास, पण तुमचे कॅलेंडर शेअर न केल्यास, इतर लोक तुमच्या कॅलेंडरवरील इव्हेंट पाहू शकत नाहीत.
  • "व्ह्यू स्विचर" या मेनूच्या अंतर्गत, तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल दाखवू किंवा लपवू शकता. अपॉइंटमेंट शेड्यूल लपवले असल्यास आणि तुम्ही नवीन शेड्यूल तयार केल्यास किंवा सद्य अपॉइंटमेंट शेड्यूलमध्ये वेळ जोडल्यास, लपवलेली अपॉइंटमेंट शेड्यूल पुन्हा दिसतील.
  • तुमच्या बुकिंग पेजवर, तुम्ही "उपलब्धतेसाठी कॅलेंडर तपासा" हे बंद केल्यास, बुकिंग पेजद्वारे स्वीकारलेल्या मागील बुकिंगचा अपवाद वगळता अपॉइंटमेंटच्या इतर सर्व वेळा मोकळ्या दिसतात. तुम्ही अपॉइंटमेंट नसलेला इव्हेंट स्वीकारला असला, तरीही हे लागू होते.
    • महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य बंद केलेले असतानाही बुकिंग पेजवरील प्रत्येक अपॉइंटमेंट स्लॉट फक्त एकदाच बुक केला जाऊ शकतो.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10265743947796718119
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false