सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

पेमेंटसंबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

AdSense पेमेंटविषयी सर्वात वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहेत.

पेमेंटविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सर्वांचा विस्तार करा  सर्व कोलॅप्‍स करा मला पैसे कधी मिळतील?

AdSense पेमेंट चक्र मासिक आहे. तुम्ही पैसे मिळवण्याच्या पायऱ्या पूर्ण केल्या असल्यास, आम्ही महिन्याच्या २१ ते २६ तारखेदरम्यान पेमेंट जारी करू. या कालावधीदरम्यान, तुम्हाला तुमच्या "व्यवहार" पेजवर तुमचे पेमेंट प्रगतीपथावर आहे असे दर्शवणारा लाइन आयटम दिसेल. पेमेंट टाइमलाइन याविषयी अधिक जाणून घ्या.

EFT च्या बाबतीत, पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यावर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळण्यासाठी कृपया ४ ते १० दिवस द्या. वायर ट्रान्सफर तुमच्या बँक खात्यामध्ये पोहोचण्यासाठी कमाल १५ व्यवसाय दिवस लागू शकतात. अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही आमच्या EFT ट्रबलशूटर आणि वायर ट्रान्सफर ट्रबलशूटर लादेखील भेट देऊ शकता.

मला लवकर पैसे मिळू शकतात का?

नाही, आम्ही कोणत्याही कारणाने आमच्या सामान्य पेमेंट शेड्यूलच्या बाहेर पेमेंट जारी करू शकत नाही.

पर्यायी पेमेंट पद्धत उपलब्ध आहे का?

तुमच्या "पेमेंट पद्धत जोडा" पेजमध्ये एखादी पेमेंट पद्धत दाखवली नसल्यास, ती तुमच्या देशात उपलब्ध नाही. तुमच्या देशासाठी नवीन पेमेंट पद्धत उपलब्ध झाल्यास, आम्ही तुम्हाला कळवू.

माझ्या "व्यवहार" पेजमध्ये अनेक पेमेंट दिसत नाहीत. मला माझा पूर्ण व्यवहार इतिहास कसा पाहता येईल?

तुमच्या "व्यवहार" पेजचे डीफॉल्ट दृश्य तुमच्या खात्यामधील मागील तीन महिन्यांतील व्यवहार दाखवते. तुमचा संपूर्ण व्यवहार इतिहास पाहण्यासाठी, तारीख रेंज सिलेक्टरमध्ये आतापर्यंत निवडा.

माझे EFT पेमेंट हे बंद केलेल्या बँक खात्यामध्ये पाठवले गेले होते, मी काय करावे?

तुमची पेमेंट पद्धत EFT असल्यास आणि तुमचे पेमेंट नुकत्याच बंद केलेल्या खात्यावर जारी केले गेले असल्यास, काही दिवसांत पेमेंट आपोआप परत केले जाते आणि तुमची कमाई तुमच्या खात्यात परत क्रेडिट केली जाते.

तुमच्याकडे तुमच्या खात्यामध्ये पडताळणी केलेले नवीन बँक खाते असल्यास, तुमचे परत केलेले पेमेंट काही दिवसांत पुन्हा जारी केले जाईल. संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक आठवडा लागू शकतो.

माझ्या स्थानिक कुरिअर चेक डिलिव्हरीसाठी मला ट्रॅकिंग क्रमांक कधी मिळेल?

आम्ही चेक डिलिव्हरीसाठी ट्रॅकिंग नंबर देऊ करत नाही.

माझा चेक जुन्या पत्त्यावर पाठवला गेला होता. मला नवीन चेक कसा मिळू शकतो?
चेक पुन्हा जारी करण्याची विनंती करणे हे करण्यासाठी या सूचना फॉलो करा.
Western Union पेमेंटसाठी पाठवणाऱ्याचा पत्ता काय आहे?

तुम्हाला तुमच्या पेमेंट पावतीवर पाठवणाऱ्याचा पत्ता सापडू शकतो. वेस्टर्न युनियनकडून पैसे मिळवणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

मला वायर ट्रान्सफरने पैसे मिळवायचे असल्यास, माझ्या बँक खात्याची चाचणी ठेवीने पडताळणी करावी लागेल का?

नाही, तुम्ही वायर ट्रान्सफरसाठी तुमच्या खात्याची पडताळणी करणे आवश्यक नाही. वायर ट्रान्सफरने पैसे मिळवणे याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

माझी बँक ही माझ्या पेमेंट सेटिंग्जमधील पत्त्यापेक्षा वेगळ्या देशात स्थित असल्यास, मला बॅंक ट्रान्सफरने पैसे मिळवता येतील का?

नाही. तुमच्या पेमेंट सेटिंग्जमधील पत्ता ज्या देशातील आहे, त्याच देशात तुमची बँक (किंवा शाखा) स्थित असणे आवश्यक आहे. ती त्याच देशामध्ये स्थित नसल्यास, तुमच्या नवीन पेमेंट पद्धतीचे तपशील एंटर करताना तुमचा SWIFT कोड स्वीकारला जाणार नाही.

ईईएमध्ये स्थित असलेले व्यापारी: तुमच्या देशामध्ये SEPA (सिंगल युरो पेमेंट्स एरिया) हा पेमेंट पर्याय उपलब्ध असल्यास, तुम्ही त्यासाठी साइन अप करू शकता. SEPA द्वारे पेमेंट मिळवणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

मला माझे पेमेंटचे चलन बदलता येईल का?

दुर्दैवाने, तुमचे पेमेंट चलन बदलता येणे शक्य नाही.

मला माझी AdSense कमाई धर्मादाय संस्थेला देणगी म्हणून देता येते का?

सध्या, तुम्ही तुमची AdSense कमाई तुमच्या खात्यामधून थेट सेवाभावी संस्थेला देऊ शकत नाही. तथापि, तुम्हाला तुमची AdSense पेमेंट मिळाल्यावर तुम्ही तुमची कमाई हवी तशी वापरू शकता.

मैत्रीपूर्ण रिमाइंडर म्हणून आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो, की तुम्ही तुमची कमाई देणगी म्हणून देण्याचे निवडल्यास, धर्मादाय संस्थेला सर्व किंवा थोडी जाहिरात कमाई देणगी म्हणून दिली जाईल असे सांगणारा मजकूर तुमच्या साइटवर ठेवणे टाळा. याचे कारण असे आहे, की अशी भाषा जाहिरातींकडे अवाजवी लक्ष वेधू शकते आणि शेवटी कमाई कशी वापरली जाते याची आम्ही पडताळणी करू शकत नसल्यामुळे, अशा विधानांना आमची AdSense प्रोग्राम धोरणे परवानगी देत नाही.

मी माझा इन्व्हॉइस कुठे पाठवू?

तुम्ही VAT उद्देशांसाठी नोंदणी केलेले आयर्लंडमधील प्रकाशक असाल, तरच आम्हाला इन्व्हॉइस पाठवणे आवश्यक आहे. या बाबतीत, तुम्ही तुमचा इन्व्हॉइस AdSenseVAT@google.com वर ईमेलने पाठवायला हवा. कृपया आम्हाला हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये इन्व्हॉइस पाठवू नका.

Google AdSense अधिकृत पेमेंट दस्तऐवज पुरवते का?

होय, आम्ही तुमच्या प्रत्येक पेमेंटसाठी पेमेंट पावती पुरवतो. तुम्ही तुमच्या बँकला किंवा कर अ‍ॅडमिनिस्ट्रेशनला AdSense कडून पेमेंटचा पुरावा म्हणून पेमेंट पावत्या दाखवू शकता. पेमेंट पावत्या पाहण्यासाठी, पेमेंट त्यानंतर पेमेंट माहितीवर क्लिक करा. तुमच्या "व्यवहार" विभागावरील ऑटोमॅटिक पेमेंट लिंकवर क्लिक करा.

तुम्हाला तुमचा AdSense सोबतचा करारनामा दाखवायचा असल्यास, तुम्ही AdSense अटी आणि नियम प्रिंट करू शकता. तुम्ही AdSense साठी साइन अप केले, तेव्हा अटी आणि नियम स्वीकारले असून, तुम्ही (तुमचा व्यवसाय) व AdSense यांच्यामधील संवादासाठी हे कायदेशीर कारण म्हणून काम करते.

टीप: आम्ही कोणतेही प्रिंट केलेले, स्वाक्षरी केलेले किंवा शिक्का मारलेले दस्तऐवज पुरवू शकत नाही.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12656475519975665942
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false