तुमचा Google डेटा कसा डाउनलोड करायचा

महत्त्वाचे: तुम्ही तुमचा Google डेटा डाउनलोड केल्यास, ते Google च्या सर्व्हरवरून तो हटवणार नाही. तुमचे खाते कसे हटवायचे किंवा तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कशी हटवायची याबद्दल जाणून घ्या. 

तुम्ही वापरता त्या Google उत्पादनांसाठी तुमचा डेटा तुम्ही एक्सपोर्ट आणि डाउनलोड करू शकता, उदाहरणार्थ:

  • ईमेल
  • दस्तऐवज
  • Calendar
  • Photos
  • YouTube व्हिडिओ (टीप: तुम्हाला तुमचे काही YouTube व्हिडिओ सापडत नसल्यास, तुमच्याकडे ब्रँड खाते आहे का ते तपासा. तुमच्याकडे ब्रँड खाते असल्यास, तुम्हाला खाती स्विच करणे याची आवश्यकता असू शकते.)
  • नोंदणी आणि खाते अ‍ॅक्टिव्हिटी

तुमचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी किंवा तुमचा डेटा दुसऱ्या सेवेमध्ये वापरण्यासाठी, तुम्ही संग्रहण तयार करू शकता.

महत्त्वाचे: कृती धोकादायक आहेत असे मानले गेल्यास, तुमच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी त्या प्रलंबित केल्या जातील किंवा उपलब्ध केल्या जाणार नाहीत.

पहिली पायरी: तुमच्या डाउनलोड केलेल्या संग्रहणामध्ये समाविष्ट करण्यासाठी डेटा निवडा

  1. तुमच्या Google खाते मध्‍ये लॉग इन करा.
  2. Google Takeout पेजवर जा. तुम्ही जी Google उत्पादने वापरता आणि ज्यांमध्ये तुमचा डेटा आहे अशी उत्पादने आपोआप निवडली जातात.
    • तुम्हाला उत्पादनामधील डेटा डाउनलोड करायचा नसल्यास, त्याच्या बाजूच्या बॉक्समधील चौकटीतली खूण काढून टाका.
    • तुम्हाला उत्पादनामधील तुमच्या डेटापैकी फक्त काही डेटा डाउनलोड करायचा असल्यास, तुमच्याकडे सर्व डेटाचा समावेश केला आहे List यासारखे बटण निवडण्याचा पर्याय असू शकतो. त्यानंतर, तुम्हाला समाविष्ट करायच्या नसलेल्या डेटाच्या बाजूच्या बॉक्समधील चौकटीतली खूण तुम्ही काढून टाकू शकता.
  3. पुढील पायरी निवडा.
महत्त्वाचे: तुम्ही डाउनलोडची विनंती करता तेव्हा आणि संग्रहण तयार केले जाते तेव्हा या दरम्यान तुमच्या डेटामध्ये केलेल्या बदलांचा फाइलमध्ये कदाचित समावेश केलेला नसेल. कोणत्या गोष्टींचा कदाचित समावेश केलेला नाही याबद्दल अधिक जाणून घ्या.

दुसरी पायरी: तुमच्या संग्रहणाचा फॉरमॅट कस्टमाइझ करा

डिलिव्हरीची पद्धत**

डाउनलोड लिंक ही ईमेलवरून पाठवा

आम्ही तुम्हाला तुमचे Google डेटा संग्रहण डाउनलोड करण्यासाठी एक लिंक ईमेल करू.

  1. "डिलिव्हरी पद्धत" यासाठी, डाउनलोड करण्याची लिंक ईमेलवरून पाठवा निवडा.
  2. एक्सपोर्ट तयार करा निवडा.
  3. मिळालेल्या ईमेलमध्ये, संग्रहण डाउनलोड करा निवडा.
  4. तुमचा Google डेटा डाउनलोड करण्यासाठी, स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
Drive वर जोडा

आम्ही तुमचे संग्रहण Google Drive वर जोडू आणि तुम्हाला त्याच्या स्थानाची लिंक ईमेल करू. तुमचा डेटा हा तुमचे स्टोरेज यामध्ये मोजला जाईल.

  1. "डिलिव्हरी पद्धत" साठी Drive वर जोडा निवडा.
  2. एक्सपोर्ट तयार करा निवडा.
  3. मिळालेल्या ईमेलमध्ये, Drive वर पाहा निवडा. तुम्हाला उत्पादनानुसार तुमचा डेटा व्यवस्थापित केलेले फोल्डर दिसेल.
  4. तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, स्क्रीनच्या सर्वात वरती, डाउनलोड करा Download निवडा.
Dropbox मध्ये जोडा

आम्ही Dropbox वर तुमचे संग्रहण अपलोड करू आणि त्याच्या स्थानाची लिंक तुम्हाला ईमेल करू.

  1. "डिलिव्हरीची पद्धत" यासाठी, Dropbox वर जोडा निवडा.
  2. खाती लिंक करा आणि एक्सपोर्ट तयार करा निवडा.
  3. तुम्हाला Dropbox वर निर्देशित केले जाईल. सूचित केले गेल्यास, तुमच्या Dropbox खात्यामध्ये साइन इन करा.
  4. Google वरून तुमचा डेटा डाउनलोड करा हा पर्याय तुमच्या Dropbox फोल्डरमध्ये त्याची स्वतःची "अ‍ॅप्स" हे फोल्डर अ‍ॅक्सेस करू शकतो का असे विचारणाऱ्या Dropbox विंडोमध्ये, अनुमती द्या निवडा.
  5. तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी, तुम्ही हे Dropbox फोल्डर कोणासोबतही शेअर करत नसल्याची खात्री करा.
  6. मिळालेल्या ईमेलमध्ये, Dropbox वर पाहा निवडा. तुम्हाला तुमचे संग्रहण असलेल्या Dropbox फोल्डरवर नेले जाईल.
  7. तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, Dropbox ची फाइल डाउनलोड करण्याची प्रक्रिया फॉलो करा.

टिपा

  • तुम्ही या पायऱ्या फॉलो केल्यानंतर, Google वरून तुमचा डेटा डाउनलोड करा हा पर्याय तुमच्या Dropbox च्या सुरक्षा सेटिंग्जमध्ये लिंक केलेले अ‍ॅप म्हणून दिसेल. तुम्ही Google ला लिंक केलेले अ‍ॅप म्हणून कधीही काढून टाकू शकता. (तुम्ही भविष्यामध्ये Dropbox वर डेटा एक्सपोर्ट केल्यास, तुम्हाला Google ला पुन्हा अ‍ॅक्सेस द्यावा लागेल.)
  • तुमचे संग्रहण Dropbox वर एक्सपोर्ट केले गेल्यानंतर, Google त्यासाठी जबाबदार असणार नाही. तुमच्या संग्रहणाचा Dropbox सेवा अटी यामध्ये समावेश असेल.
Microsoft OneDrive वर जोडा

आम्ही Microsoft OneDrive वर तुमचे संग्रहण अपलोड करू आणि त्याच्या स्थानाची लिंक तुम्हाला ईमेल करू.

  1. "डिलिव्हरीची पद्धत" साठी OneDrive वर जोडा निवडा.
  2. खाती लिंक करा आणि एक्सपोर्ट तयार करा निवडा.
  3. तुम्हाला Microsoft वर निर्देशित केले जाईल. सूचित केले गेल्यास, तुमच्या Microsoft खात्यामध्ये साइन इन करा.
  4. Google वरून तुमचा डेटा डाउनलोड करा हा पर्याय तुमची माहिती अ‍ॅक्सेस करू शकतो का असे विचारणाऱ्या Microsoft विंडोमध्ये, होय निवडा.
  5. तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी, तुम्ही हे OneDrive फोल्डर कोणासोबतही शेअर करत नसल्याची खात्री करा.
  6. मिळालेल्या ईमेलमध्ये, OneDrive वर पाहा निवडा. तुम्हाला तुमचे संग्रहण असलेल्या OneDrive फोल्डरवर नेले जाईल.
  7. तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, OneDrive ची फाइल डाउनलोड करण्याची प्रक्रिया फॉलो करा.

टिपा

  • तुम्ही या पायऱ्या फॉलो केल्यानंतर, तुमच्या Microsoft OneDrive च्या सुरक्षा आणि गोपनीयता सेटिंग्जमध्ये Google वरून तुमचा डेटा डाउनलोड करा हा पर्याय तुमची काही माहिती अ‍ॅक्सेस करू शकणारे अ‍ॅप या स्वरूपात दिसेल. तुम्ही Google चा अ‍ॅक्सेस कधीही काढून टाकू शकता. (तुम्ही भविष्यामध्ये OneDrive वर डेटा एक्सपोर्ट केल्यास, तुम्हाला Google ला पुन्हा अ‍ॅक्सेस द्यावा लागेल.)
  • तुमचे संग्रहण Microsoft OneDrive वर एक्सपोर्ट केले गेल्यानंतर, Google त्यासाठी जबाबदार असणार नाही. तुमच्या संग्रहणाचा Microsoft सेवा करारनामा यामध्ये समावेश असेल.
Box वर जोडा

आम्ही Box वर तुमचे संग्रहण अपलोड करू आणि त्याच्या स्थानाची लिंक तुम्हाला ईमेल करू.

  1. "डिलिव्हरीची पद्धत" यासाठी Box वर जोडा निवडा.
  2. खाती लिंक करा आणि एक्सपोर्ट तयार करा निवडा.
  3. तुम्हाला Box वर निर्देशित केले जाईल. सूचित केले गेल्यास, तुमच्या Box खात्यामध्ये साइन इन करा.
  4. Google वरून तुमचा डेटा डाउनलोड करा हा पर्याय तुमची माहिती अ‍ॅक्सेस करू शकतो का असे विचारणाऱ्या Box विंडोमध्ये Box ला अ‍ॅक्सेस द्या निवडा.
  5. तुमचा डेटा खाजगी ठेवण्यासाठी, तुम्ही हे Box फोल्डर कोणासोबतही शेअर करत नसल्याची खात्री करा. तुम्ही एखाद्या एंटरप्राइझ खात्यावर एक्सपोर्ट करत असल्यास, कोणतीही शेअरिंग लिंक तयार केली नसेल तरीदेखील, ॲडमिन तुमचा डेटा पाहू शकेल.
  6. मिळालेल्या ईमेलमध्ये, Box वर पाहा निवडा. तुम्हाला तुमचे संग्रहण असलेल्या Box फोल्डरवर नेले जाईल.
  7. तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, Box ची फाइल डाउनलोड करण्याची प्रक्रिया फॉलो करा.

टिपा

  • तुम्ही या पायऱ्या फॉलो केल्यानंतर, Google वरून तुमचा डेटा डाउनलोड करा हा पर्याय तुमची कनेक्ट केलेली अ‍ॅप्स यांमध्ये तुमच्या काही माहितीचा अ‍ॅक्सेस करू शकणारे अ‍ॅप म्हणून दिसेल. तुम्ही Google चा अ‍ॅक्सेस कधीही काढून टाकू शकता. (तुम्ही भविष्यामध्ये Box वर डेटा एक्सपोर्ट केल्यास, तुम्हाला Google ला पुन्हा अ‍ॅक्सेस द्यावा लागेल.)
  • तुमच्या Box खात्याचा कमाल फाइल अपलोड आकार लहान असल्यास, तुम्ही निवडलेला कमाल संग्रहण आकार कमी होईल. तुमच्या संग्रहणामधील तुमच्या Box खात्याच्या कमाल फाइल अपलोड आकारापेक्षा मोठ्या असलेल्या फाइल Box वर एक्सपोर्ट केल्या जाणार नाहीत.
  • तुमचे संग्रहण Box वर एक्सपोर्ट केले गेल्यानंतर, Google त्यासाठी जबाबदार असणार नाही. तुमच्या संग्रहणाचा Box गोपनीयता धोरण यामध्ये समावेश असेल.

एक्सपोर्ट प्रकार

एका वेळेचे संग्रहण

तुमच्या निवडक डेटाचे एकच संग्रहण तयार करा.

टीप: तुम्ही प्रगत संरक्षण प्रोग्राम मध्ये नोंदणी केली असल्यास, भविष्यामध्ये तुमचे संग्रहण दोन दिवसांसाठी शेड्युल केले जाईल.

शेड्युल केलेली एक्सपोर्ट

तुमच्या निवडक डेटाचे एक वर्षासाठी दर दोन महिन्यांनी आपोआप संग्रहण तयार करा. पहिले संग्रहण त्वरित तयार केले जाईल.

टीप: तुम्ही प्रगत संरक्षण प्रोग्राम मध्ये नोंदणी केली असल्यास, शेड्युल केलेली एक्सपोर्ट उपलब्ध नाहीत.

फाइल प्रकार

झिप फाइल

या फाइल जवळजवळ कोणत्याही कॉंप्युटरवर उघडल्या जाऊ शकतात.

Tgz फाइल

या फाइल Windows वर उघडण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त सॉफ्टवेअरची आवश्यकता असू शकते.

संग्रहणाचा आकार

तुम्हाला तयार करायच्या असलेल्या संग्रहणाचा कमाल आकार निवडा. तुम्ही डाउनलोड करत असलेला डेटा या आकारापेक्षा मोठा असल्यास, एकाहून अधिक संग्रहणे तयार केली जातील.

तिसरी पायरी: तुमचे Google डेटा संग्रहण मिळवा

तुमचे संग्रहण हे यांपैकी एक पर्याय वापरून तयार केले जाते तेव्हा, आम्ही तुम्हाला त्याच्या स्थानाची लिंक ईमेल करू. तुमच्या खात्यामध्ये किती माहिती आहे त्यानुसार, या प्रकियेसाठी काही मिनिटे ते काही दिवस लागू शकतात. बहुतांश लोकांना ते ज्या दिवशी विनंती करतात त्याच दिवशी त्यांच्या संग्रहणाची लिंक मिळते.

टीप: तुम्ही प्रगत संरक्षण प्रोग्राम मध्ये नोंदणी केली असल्यास, भविष्यामध्ये तुमचे संग्रहण दोन दिवसांसाठी शेड्युल केले जाईल.

तुम्ही हटवलेला डेटा

तुम्ही डेटा हटवता तेव्हा, आम्ही तो तुमच्या खात्यामधून सुरक्षितरीत्या आणि पूर्णपणे काढून टाकण्यासाठी Google चे गोपनीयता धोरण यामध्ये वर्णन केलेली प्रक्रिया फॉलो करतो. सर्वप्रथम, व्ह्यूमधून हटवलेली अ‍ॅक्टिव्हिटी त्वरित काढून टाकली जाते आणि यापुढे तुमचा Google अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी वापरली जात नाही. त्यानंतर, आम्ही आमच्या स्टोरेज सिस्टमवरून डेटा सुरक्षितरीत्या आणि पूर्णपणे हटवण्यासाठी तयार केलेली प्रक्रिया सुरू करतो.

माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील आयटम, फोटो किंवा दस्तऐवज यांसारख्या हटवण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असलेल्या डेटाचा तुमच्या संग्रहणामध्ये समावेश केलेला नाही.

महत्त्वाचे: तुम्ही शोधत असलेली माहिती ही टूल वापरून उपलब्ध नसल्यास, आमचे गोपनीयता मदत केंद्र याला भेट द्या, जिथे आम्ही कोणती माहिती गोळा करतो, आम्ही ती का गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती अपडेट करणे, व्यवस्थापित करणे, एक्सपोर्ट करणे व हटवणे हे कसे करू शकता हे जाणून घेऊ शकाल. आमच्या स्टोरेज सिस्टीममधून माहिती हटवली गेली असल्यास, ती रिकव्हर होण्याची शक्यता नाही.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

आमचे गोपनीयता मदत केंद्र पहा, जिथे आम्ही कोणती माहिती गोळा करतो, आम्ही ती का गोळा करतो आणि तुम्ही तुमची माहिती अपडेट करणे, व्यवस्थापित करणे, एक्सपोर्ट करणे व हटवणे हे कसे करू शकता हे जाणून घेऊ शकाल.

If the info you are looking for is not available via the tools mentioned above, submit a data access request and specify:

  • The categories of personal info you're seeking;
  • The products or services to which the data relates;
  • Any approximate dates when you think the data may have been collected by Google.

You’ll need to sign in to your Google Account to complete the form.

Important: You can also call our toll-free number, 855-548-2777. Our representatives can answer many of your questions and help you fill out the form to ensure we are providing information to the account owner.

मी माझा एक्सपोर्ट केलेला टेकआउट डेटा कसा शोधू?

तुमची डेटा एक्सपोर्ट विनंती पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमचा डेटा असलेल्या फोल्डरची लिंक असलेली ईमेल सूचना मिळेल.

तुम्ही "ईमेलद्वारे डाउनलोड लिंक पाठवा" निवडल्यास, तुम्हाला तुमचा डेटा डाउनलोड करण्यासाठी, Google टेकआउट मधील तुमचा डेटा असलेल्या फोल्डरवर रीडिरेक्‍ट केले जाईल.

अन्यथा, तुम्ही निवडलेल्या क्लाउड डेस्टिनेशनमधील (Drive, Dropbox, Box, OneDrive) तुमचा डेटा असलेल्या फोल्डरशी ते तुम्हाला लिंक करेल.

मी माझ्या डेटासाठी कोणता फॉरमॅट निवडायला हवा?
तुम्ही कोणता फॉरमॅट निवडायला हवा हा निर्णय सेवा, डेटाचा प्रकार आणि तो वापरण्यामागचा तुमचा उद्देश या गोष्टींवर अवलंबून असतो. आम्हाला वाटत असलेले सर्वात उपयुक्त आणि पोर्टेबल प्रकार आम्ही निवडले आहेत. उदाहरणार्थ, आम्ही vCard म्हणून संपर्क एक्सपोर्ट करतो, जो ईमेल पुरवठादारांसाठी खूप सामान्य फॉरमॅट आहे. आम्ही तुमच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनेकदा अतिरिक्त पर्यायदेखील देऊ.
मला माझा डेटा डाउनलोड करता न आल्यास काय होईल?
तुम्ही तुमचा डेटा डाउनलोड करू शकत नसल्यास, एक्सपोर्ट करण्यासाठी उत्पादन फाइल कमी प्रमाणात निवडून पहा आणि/किंवा उत्पादनातील ड्रॉपडाउन पर्यायांमधून संग्रहण डेटाच्या लहान आकाराची विनंती करा. याव्यतिरिक्त, Box किंवा स्टोरेज सारख्या तृतीय पक्षाच्या स्टोरेज साइटवर डेटा एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा.
मला विशिष्ट फाइल फॉरमॅट उघडता न आल्यास काय होईल?
HTML फाइल कोणत्याही साधारण ब्राउझरमध्ये उघडल्या जाऊ शकतात; CSV आणि JSON फाइल TextEdit सॉफ्टवेअर, औद्योगिक मानक इनबॉक्स किंवा ICS ची विशिष्ट सेवा यामध्ये उघडल्या जाऊ शकतात.
मला पूर्ण डेटा एक्सपोर्ट करण्याच्या ऐवजी डेटा एक्सपोर्ट करताना कालावधी निवडता येईल का?
सध्या, आम्ही विशिष्ट टाइम फ्रेमसाठी डेटा एक्सपोर्ट करण्याला सपोर्ट करत नाही.
मी माझा डेटा कुठे स्टोअर करू?

तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित आणि त्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असलेल्या कोणत्याही ठिकाणी स्टोअर करू शकता. बऱ्याच वेळा, तो थेट तुमच्या काँप्युटरवर डाउनलोड करणे सर्वात सोपे असते.

तुम्ही सार्वजनिक कॉंप्युटर वापरत असल्यास, फक्त तुम्ही एकटेच वापरकर्ता आहात अशा Google Drive किंवा पर्यायी स्टोरेज जागेवर तो स्टोअर करा.

टीप: तुम्ही Google Drive वापरत असल्यास आणि तुमचे Google खाते हटवण्याचा विचार करत असल्यास, तुमचे खाते हटवण्यापूर्वी तुम्हाला तुमचे संग्रहण वेगळ्या स्टोरेज जागेवर हलवावे लागेल.

मी माझा एक्सपोर्ट केलेला टेकआउट डेटा तृतीय पक्ष ॲप किंवा वेबसाइटसह कसा शेअर करू?

तुम्‍ही तुमच्‍या डिव्‍हाइसमध्‍ये तुमचा डेटा डाउनलोड केला असल्‍यास, तुम्‍ही तो तृतीय पक्षाचा अ‍ॅक्सेस पॉइंट वापरून थेट तृतीय पक्ष ॲप किंवा वेबसाइटवर शेअर करू शकता.  हा अ‍ॅक्सेस पॉइंट विविध स्वरूपात आढळू शकतो, जसे की ईमेल अ‍ॅड्रेस किंवा तृतीय पक्ष ॲप अथवा वेबसाइटची कस्टम बिल्ट अपलोड कार्यक्षमता जेथे तुम्ही थेट डेटा अपलोड करू शकता.

Drive, Box, OneDrive किंवा Dropbox यांसारख्या क्लाउड स्टोरेज डेस्टिनेशनवर तुम्ही तुमचा डेटा जोडल्यास, तुम्ही क्लाउड पुरवठादाराकडून तुमचा डेटा थेट तृतीय पक्ष ॲप अथवा वेबसाइटवर शेअर करू शकता.  अनेक बाबतींमध्ये, क्लाउड पुरवठादाराद्वारे सपोर्ट असलेल्या ईमेलमार्फत तुमचा डेटा थेट क्लाउड पुरवठादाराकडून तृतीय पक्षाशी शेअर करणे याचा यात समावेश असेल.

काही बाबतींमध्ये, तृतीय पक्ष ॲप किंवा वेबसाइट थेट क्लाउड स्टोरेजच्या डेस्टिनेशनशी इंटिग्रेट केली जाऊ शकते आणि क्लाउड डेस्टिनेशनवरील तुमचा डेटा रीड करण्यासाठी थेट तृतीय पक्ष अ‍ॅक्सेस देण्याची तुम्हाला अनुमती देऊ शकते.

माझे संग्रहण एकाहून अधिक फाइलमध्ये का विभागले गेले आहे?

तुम्ही निवडलेल्या आकाराच्या मर्यादेपेक्षा मोठी असणारी संग्रहणे एकाहून अधिक फाइलमध्ये विभागली जातात.

तुमचे संग्रहण विभागले जाण्याची शक्यता कमी करण्यासाठी, तुम्ही ५०GB ची आकार मर्यादा निवडू शकता.

टीप: tgz संग्रहण अनपॅक करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर आवश्यक असू शकते. लक्षात ठेवा की, या प्रकारच्या फाइलच्या नावांमध्ये युनिकोड वर्ण असू शकत नाहीत.
माझी संग्रहणे एक्सपायर का होतात?

तुमचे संग्रहण साधारण सात दिवसांमध्ये एक्सपायर होईल. त्यानंतर, तुम्हाला तुमची सर्वात अप-टू-डेट माहिती वापरून नवीन संग्रहण तयार करावे लागेल.

संग्रहण एक्सपायर झाले याचा अर्थ तुमचा डेटा एक्सपायर झाला असा होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही Google सेवांमध्ये कोणताही बदल अनुभवणार नाही.

टीप: आम्ही प्रत्येक संग्रहण फक्त पाच वेळा डाउनलोड करण्याची अनुमती देतो त्यानंतर, कृपया दुसऱ्या संग्रहणाची विनंती करा.

मी माझे संग्रहण डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असताना मला माझा पासवर्ड पुन्हा का एंटर करावा लागतो?

तुमच्या डेटाची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे, तुमचा डेटा डाउनलोड करणारी तुम्ही एकमेव व्यक्ती असल्याची आम्हाला खात्री करायची आहे.

ते करण्यासाठी, तुम्ही अलीकडे तुमचा Google खाते पासवर्ड एंटर केला नसल्यास, आम्ही तुम्हाला तो पुन्हा एंटर करण्यास सांगतो. आम्ही समजू शकतो की, हे त्रासदायक असू शकते पण तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी अतिरिक्त पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

टीप: तुमच्या खात्यामध्ये २-टप्पी पडताळणी सुरू केली असल्यास, तुम्हाला अतिरिक्त पडताळणी पायरी पूर्ण करण्यासाठीदेखील सांगितले जाऊ शकते.

माझे संग्रहण का काम करत नाही?

तुमच्या संग्रहणामध्ये काही समस्या आल्यास किंवा तुम्ही ते तयार करू शकत नसल्यास, दुसरे एखादे संग्रहण तयार करून पहा. यामुळे बऱ्याचदा समस्येचे निराकरण होते.

याव्यतिरिक्त, एका वेळी एक उत्पादन किंवा सेवा निवडून डेटा कमी प्रमाणात डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मोठ्या प्रमाणात डेटा डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असल्यास, ही पद्धत परिणामकारक ठरू शकते.

Takeout वरून डाउनलोड केलेल्या फाइल कशा उघडायच्या
Takeout वरून एक्सपोर्ट केलेला डेटा मोबाइल डिव्हाइसऐवजी डेस्कटॉप कॉंप्युटरवरून डाउनलोड करण्याची आणि पाहण्याची आम्ही शिफारस करतो. तुमच्या संग्रहणामध्ये archive_browser.html नावाची फाइल असेल, ज्यामध्ये फाइल फॉरमॅट, फाइल कशी उघडावी आणि डेटा कसा पाहावा याविषयीची अतिरिक्त माहिती असेल.
माझ्या संग्रहणामध्ये अलीकडील काही बदलांचा समावेश का केलेला नाही?

तुम्ही डाउनलोडची विनंती करता तेव्हा आणि संग्रहण तयार केले जाते तेव्हा या दरम्यान तुमच्या डेटामध्ये केलेल्या बदलांचा फाइलमध्ये कदाचित समावेश केलेला नसेल. ही काही उदाहरणे आहेत:

  • Drive फाइल शेअर करण्याचा प्रकार किंवा परवानग्या यांमधील बदल
  • Drive फाइलवरील निराकरण केलेल्या टिप्पण्या
  • हटवलेले किंवा जोडलेले फोटो अथवा अल्बम
मी माझा मेल एक्सपोर्ट करत असल्यास, माझी Gmail लेबल कशी सेव्ह करू?

तुम्ही Gmail वरून तुमचा मेल एक्सपोर्ट करता तेव्हा, प्रत्येक मेसेजची लेबल ही विशिष्ट X-Gmail-Labels हेडरमध्ये सेव्ह केली जातात. हे हेडर आता कोणताही मेल क्लायंट ओळखत नसला तरीदेखील, बहुतेक मेल क्लायंट एक्स्टेंशन लिहिण्याची अनुमती देतात जे या डेटाचा वापर करू शकतात.

मला माझे काही YouTube व्हिडिओ का दिसत नाहीत?

तुम्हाला तुमचे काही YouTube व्हिडिओ डाउनलोड करता येत नसल्यास, तुमचे YouTube चॅनल ब्रँड खाते शी लिंक केलेले आहे का ते तपासा. ते लिंक केले असल्यास, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

  • तुम्ही ब्रँड खाते शी संबंधित असलेल्या Google खाते मध्ये साइन इन केले असल्याची खात्री करा.
  • तुम्ही YouTube वर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वापरलेल्या ब्रँड खाते वर स्विच करणे हे करा.

टीप: तुमच्याकडे एकाहून अधिक ब्रँड खाते असल्यास, तुम्ही तुमची इतर ब्रँड खाती यावरून व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या या पायऱ्या पुन्हा फॉलो करू शकता.

मी माझ्या शाळा किंवा ऑफिसच्या खात्यातून डेटा का डाउनलोड करू शकत नाही?

वापरकर्ते वेगवेगळ्या उत्पादनांमधून डेटा डाउनलोड करू शकतील का हे Google Workspace अ‍ॅडमिनिस्ट्रेटर व्यवस्थापित करू शकतात. तुमचा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर कोण आहे ते शोधा.

माझे अ‍ॅप टेकआउट यूझर इंटरफेस कस्टमाइझ करू शकते का?

टेकआउट यूजर इंटरफेस पॅरामीटरना सपोर्ट करते, त्यामुळे अ‍ॅप्स यूजर इंटरफेस कस्टमाइझ करू शकतात. उदाहरणार्थ, अ‍ॅप्स विशिष्ट उत्पादने, क्लाउड एक्सपोर्टचे गंतव्यस्थान आणि शेड्युल केलेल्या टेकआउटची वारंवारता निवडू शकतात.

सर्व तीन पॅरामीटर वापरणाऱ्या URL साठी फॉरमॅटचे उदाहरण येथे आहे:

https://takeout.google.com/settings/takeout/custom/google_account,my_activity,fit,youtube?dest=drive&frequency=2_months

टीप: या उदाहरणावर काम सुरू आहे आणि वेळोवेळी अपडेट केले जाऊ शकते. समावेश करण्यासाठी अ‍ॅप्लिकेशन किंवा इतर उत्पादनांकरिता संभाव्य मूल्ये ही “data-id” असे शीर्षक असलेल्या CSS विशेषते(तां) मध्ये रेंडर केलेल्या HTML च्या स्रोतामध्ये आढळू शकतात. उदाहरणार्थ, "dest" या पॅरामीटरसाठीच्या संभाव्य मूल्यांमध्ये "box", "dropbox", "drive", "onedrive" यांचा समावेश आहे.  "frequency" या पॅरामीटरसाठीच्या संभाव्य मूल्यांमध्ये "2_months" चा समावेश आहे

तुमच्या खात्यासाठी एक्सपोर्ट करता येणारा डेटा असलेल्या उत्पादनांच्या data-id प्रॉपर्टीचे मूल्य ओळखण्याकरिता: 


महत्त्वाचे: या सूचना Chrome सह वापरण्यासाठी आहेत. तुम्ही दुसरा ब्राउझर वापरत असल्यास, प्रक्रिया वेगळी असू शकते.

  1. कॉंप्युटरवर, takeout.google.com ला भेट द्या.
  2. Takeout वेब पेजवर राइट-क्लिक करा आणि "स्रोत पेज" पहा निवडा. यामुळे तुम्हाला पेज तयार करणारा HTML कोड पाहता येईल. 
  3. “data-id” प्रॉपर्टी ओळखण्यासाठी शोध कमांड (Windows वर Control + F किंवा Mac वर Command + F) वापरा. 
  4. शोध परिणाम पहा.  सुसंबद्ध मूल्ये “data-id=” नंतर दिसतात. उदाहरणार्थ: data-id="blogger"

Google ने तृतीय पक्ष ॲप्लिकेशनच्या डेटाच्या वापरासाठी, डेव्हलपरकरिता प्रगत वैशिष्ट्यांचा (Data Portability API) नवीन संचदेखील रिलीझ केला आहे. तुम्हाला सर्व उपलब्ध दस्तऐवज https://developers.google.com/data-portability इथे मिळू शकतात.

Google उत्पादनावरून डेटा डाउनलोड करण्याशी संबंधित सामान्य प्रश्न

मी माझे YouTube व्हिडिओ डाउनलोड करत असताना कोणता फॉरमॅट वापरला जातो?

व्हिडिओ त्यांच्या मूळ फॉरमॅटमध्ये किंवा H264 व्हिडिओ आणि AAC ऑडिओसह MP4 फाइल म्हणून डाउनलोड केले जातात.

मी Google गट याचा सदस्य आहे. मी गटातून मेसेज आणि सदस्य माहिती कशी डाउनलोड करू शकतो?

फक्त मालक गटाचे मेसेज आणि सदस्यत्व डाउनलोड करू शकतात.

तुम्ही सदस्य किंवा व्यवस्थापक असल्यास, तुम्हाला हवी असलेली माहिती मालकाला डाउनलोड करण्यास आणि ती तुमच्यासोबत शेअर करण्यास सांगा किंवा मेसेज तुमच्या ईमेलमध्ये मिळत असल्यास, तुम्ही तुमच्या ईमेल संग्रहणामधून तुमच्या मेसेजचा इतिहास डाउनलोड करू शकता.

Gmail वरून पूर्ण इनबॉक्स एक्सपोर्ट करण्याऐवजी मला ईमेल टाइमफ्रेमनुसार डाउनलोड करता येईल का?
दुर्दैवाने सध्या, आम्ही टाइमफ्रेम एक्सपोर्टला सपोर्ट देत नाही.
मी Google Workspace अ‍ॅडमिनिस्ट्रेटर आहे. मी माझ्या संस्थेचा डेटा कसा एक्सपोर्ट करू?

तुम्ही ईमेल, कॅलेंडर, दस्तऐवज आणि साइट यांसह तुमच्या संस्थेचा डेटा डाउनलोड किंवा स्थलांतरित करू शकता. तुमच्या संस्थेचा Google Workspace डेटा एक्सपोर्ट करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

**या सूचीमध्ये Google चे नसलेले सेवा पुरवठादार आहेत. तुम्ही Google चा नसलेला सेवा पुरवठादार हा पर्याय निवडल्यावर:

१. तुम्ही Google ला तुमच्यावतीने या सेवा पुरवठादाराला फाइल ट्रान्सफर करण्याची अनुमती देता.

२. या सेवा पुरवठादारावर फाइल अपलोड केल्यानंतर, Google हे फाइलसाठी जबाबदार असणार नाही. एक्सपोर्टमधील आशयावर सेवा पुरवठादाराच्या अटी लागू होतात.

टीप: काय शेअर केले आहे ते समजून घेण्यासाठी, स्वतः डेटाचे पुनरावलोकन करा.

आम्हाला फीडबॅक पाठवणे

तुमचा Google डेटा डाउनलोड करण्याच्या तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कळवा. तुमचा फीडबॅक शेअर करून, तुम्ही Google ला तुमच्यासाठी आणि इतर लोकांसाठी या उत्पादनामध्ये सुधारणा करण्यात मदत करता.

true
Google खाते मध्ये स्वागत आहे!

तुमच्याकडे नवीन Google खाते आहे असे आम्हाला आढळले आहे! तुमची Google खाते चेकलिस्ट वापरून तुमच्या अनुभवामध्ये सुधारणा कशी करावी हे जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11928935892277608456
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false