YouTube Kids साठी आशय धोरणे

YouTube Kids ॲप हे मुलांनी ऑनलाइन व्हिडिओद्वारे त्यांची स्वारस्ये एक्सप्लोर करण्यासाठीचे सुरक्षित आणि सोपे ठिकाण असेल अशा प्रकारे तयार केले आहे. हे स्वतंत्र ॲप म्हणजे YouTube ची फिल्टर केलेली आवृत्ती आहे आणि यावर YouTube अ‍ॅप व वेबसाइटच्या तुलनेत चॅनल आणि व्हिडिओचा छोटा संच उपलब्ध आहे. आम्ही वयानुसार योग्य, आमची गुणवत्ता तत्त्वे यांचे पालन करणारा आणि जगभरातील मुलांच्या विविध स्वारस्यांची पूर्तता करण्‍यासाठी पुरेसा वैविध्यपूर्ण असलेला आशय ओळखण्‍याकरिता काम करतो.

खाली आमची YouTube Kids धोरणे दिली आहेत, जी YouTube Kids चा भाग होण्यासाठी कोणत्या प्रकारचा आशय पात्र आहे याचे वर्णन करतात. YouTube Kids वर आशय दिसण्यासाठी त्याने या धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रकारचा आशय वगळण्यासाठी ही धोरणे तयार केली आहेत:

पालकांचा आणि बाल विकास, लहान मुलांचा मीडिया, डिजिटल शिक्षण व नागरिकत्व या विषयांमधील बाह्य तज्ञांचा फीडबॅक वापरून ही धोरणे तयार केली होती. आमच्या सर्वात कमी वयाच्या प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देण्यात मदत व्हावी, यासाठी या धोरणांच्या आधारे व्हिडिओ किंवा चॅनल YouTube Kids मधून वगळली जाऊ शकतात.

आशय सेटिंग्ज

ॲपमध्ये तीन आशय सेटिंग्ज उपलब्ध आहेत: बालवाडीतील मुलांसाठी, लहान मुलांसाठी आणि मोठ्या मुलांसाठी. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी YouTube Kids सेट करताना निवडलेल्या सेटिंगच्या आधारे त्यांना आशय दिसेल.

बालवाडीतील मुलांसाठी

चार वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना लक्षात घेऊन तयार केले आहे

लहान मुलांसाठी

५ ते ८ वर्षे या वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन तयार केले आहे

मोठ्या मुलांसाठी

९ ते १२ वर्षे या वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन तयार केले आहे

आशय धोरणे

प्रत्येक आशय सेटिंगसाठी कोणत्या प्रकारचा आशय पात्र आहे हे आमची धोरणे ठरवतात. तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी आशय सेटिंग निवडता, तेव्हा त्यांना त्या सेटिंगसाठी पात्र असलेला आशय दिसेल. त्यांना शोध किंवा शिफारस केलेले व्हिडिओ यांमध्ये काय दिसते यावर तुम्ही निवडलेल्या सेटिंगचा परिणाम होईल. तुम्ही निवडलेल्या सेटिंगच्या आधारे योग्य आशय ओळखण्यासाठी आमच्या ऑटोमेटेड सिस्टीम आणि मानवी परीक्षणकर्ते काम करतात. आमच्या सिस्टीम मुलांसाठी योग्य नसलेला आशय वगळण्याकरिता कठोर परिश्रम करतात, पण सर्व व्हिडिओचे मॅन्युअली पुनरावलोकन केले जात नाही. तुम्हाला आमच्याकडून राहिलेला काही अयोग्य आशय सापडल्यास, तुम्ही तो ब्लॉक करणे किंवा जलद पुनरावलोकनासाठी त्याची तक्रार करणे हे करू शकता.

बालवाडीतील मुलांसाठी हे आशय सेटिंग

चार वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना लक्षात घेऊन बालवाडीतील मुलांसाठी हे सेटिंग तयार केले होते. या आशय सेटिंगमध्ये कल्पकता, आनंदी अनुभव, शिक्षण आणि एक्सप्लोर करणे या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्या व्हिडिओचा समावेश आहे. लोकप्रिय व्हिडिओ वर्गवाऱ्यांमध्ये कला आणि हस्तकला, बालगीते, कार्टून, एकत्र वाचण्याच्या गोष्टी, सर्कल टाइम, खेळणी व खेळ आणि योग यांचा समावेश आहे.
काही व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

लैंगिक आशय: रोमँटिक नसलेल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करणे, जसे की हात धरणे किंवा गालाचे चुंबन घेणे. लैंगिक आणि लिंगाधारित ओळख या गोष्टींविषयी वयानुसार योग्य शैक्षणिक व्हिडिओ.

हिंसा: हिंसक आणि भीतीदायक नसलेले, रचलेले व अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ.

शस्त्रे: खेळणी, गेमिंग, ॲनिमेशनच्या संदर्भामध्ये (वॉटर गनसारखी) अवास्तव शस्त्रे दाखवणारे वयानुसार योग्य व्हिडिओ.

धोकादायक आशय: कोणत्याही प्रशिक्षणात्मक घटकांशिवाय कुशल व्यक्तींनी केलेले स्टंट दाखवणारे व्हिडिओ (उदाहरणार्थ, बास्केटबॉल खेळाडू ट्रिक करत आहेत). कला आणि हस्तकलेचे व्हिडिओ, ज्यांमध्ये वयानुसार योग्य उत्पादने किंवा रंग, डिंक अथवा कात्री यांसारखी साधने असतात.

भाषा: आक्षेपार्ह किंवा असभ्य भाषेचा वापर नसलेले व्हिडिओ.

संगीत व्हिडिओ: कोणत्याही लैंगिक थीम नसलेले वयानुसार योग्य संगीत व्हिडिओ.

लहान मुलांसाठी हे आशय सेटिंग

लहान मुलांसाठी हे आशय सेटिंग ५ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन तयार केले होते. या आशय सेटिंगमध्ये लहान मुलांच्या वाढत्या स्वारस्यांची पूर्तता करण्यासाठी आणखी विविध प्रकारच्या विषयांचा समावेश आहे. लोकप्रिय वर्गवाऱ्यांमध्ये गेमिंग, टॉप ४० गाण्यांची कव्हर, कुटुंब व्हीलॉगर, कार्टून, DIY, शिक्षण, गोष्टी कशा कराव्यात आणि अशा इतर वर्गवाऱ्यांचा समावेश आहे, ज्या सामान्यतः प्राथमिक शाळेतील मुलांना आकर्षित करतात. यामध्ये बालवाडीतील मुलांसाठी या आशय सेटिंगमधील सर्व आशयाचादेखील समावेश आहे.

काही व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

लैंगिक आशय: रोमँटिक थीम असलेले व्हिडिओ, ज्यांमध्ये प्रेम आणि आकर्षण थोडक्यात दाखवले जाते, जसे की ओठांचे पटकन चुंबन घेणे.

हिंसा: ऐतिहासिक घटनांशी संबंधित वयानुसार योग्य व्हिडिओ, जे शैक्षणिक आहेत, पण त्यांमध्ये घटनेच्या संदर्भात सौम्य हिंसा असू शकते. ग्राफिक नसलेली, स्लॅपस्टिक कार्टून स्वरूपातील हिंसा.

शस्त्रे: वास्तववादी शस्त्रे दाखवणारी (उदाहरणार्थ, सामुराईच्या तलवारीचे चित्र) ऐतिहासिक आणि क्लासिकल कलाकृती असलेले व्हिडिओ.

धोकादायक आशय: निरपराध स्वरूपातील आव्हाने आणि खोड्या किंवा ज्यांच्यामुळे हानी होण्याची शक्यता नाही असे स्टंट दाखवणारे व्हिडिओ. असे व्हिडिओ, ज्यांमध्ये मद्य किंवा तंबाखू केंद्रस्थानी दाखवलेले नाहीत. असे DIY व्हिडिओ, ज्यांमध्ये सुरक्षितता डिस्क्लेमरसह सहजरीत्या अ‍ॅक्सेस करता येणाऱ्या उत्पादनांचा आणि साधनांचा समावेश आहे.

भाषा: या लक्ष्यित वयोगटासाठी सौम्य आक्षेपार्ह भाषेचा क्वचित वापर असलेले व्हिडिओ, जसे की "अरे देवा” किंवा “खुळा.”

आहार, फिटनेस आणि सौंदर्य: कल्पक आणि कलात्मक अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित करणारी मेकअपची ट्यूटोरियल. सकस आहार आणि व्यायामाविषयी वयानुसार योग्य शैक्षणिक व्हिडिओ.

संवेदनशील विषय: चिंता आणि ADHD सारख्या बालपणातील सामान्य मानसिक आरोग्य विकारांवर चर्चा करणारे वयानुसार योग्य व्हिडिओ. या सेटिंगमधील व्हिडिओ हे मानसिक विकारामधून सावरण्याचे आणि बरे होण्याचे सकारात्मक मार्ग व त्यांसाठी मदत मागण्याचे महत्त्व या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.

संगीत व्हिडिओ: बॅकग्राउंडमध्ये मद्य किंवा तंबाखू दाखवणारे संगीत व्हिडिओ. लैंगिक नसलेल्या रोमँटिक थीम किंवा “वेडा” अथवा “मूर्ख” यांसारखी सौम्य स्वरूपातील आक्षेपार्ह भाषा असलेले गाण्याचे बोल.

मोठ्या मुलांसाठी हे आशय सेटिंग

मोठ्या मुलांसाठी हे आशय सेटिंग हे ९ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना लक्षात घेऊन तयार केले होते. हे सेटिंग मोठ्या मुलांसाठी आहे, जी कदाचित YouTube वरील फिल्टर केलेल्या अधिक मोठ्यांच्या आशयासाठी तयार असू शकतील. उदाहरणार्थ, ॲप हे संगीत, गेमिंग, व्हीलॉग, कॉमेडी आणि क्रीडाविषयक आशय दाखवेल, जो YouTube Kids च्या लहान मुलांसाठी आणि बालवाडीतील मुलांसाठी या आशय सेटिंग्जमधून वगळला आहे. यामध्ये लहान मुलांसाठी आणि बालवाडीतील मुलांसाठी या आशय सेटिंग्जमधील सर्व आशयाचादेखील समावेश आहे. हे सेटिंग प्रौढ आशय वगळण्याचा प्रयत्न करते, पण आम्ही सर्व आशयाचे मॅन्युअली परीक्षण करू शकत नसल्याने आणि ऑटोमेटेड सिस्टीम परिपूर्ण नसल्याने, आमच्याकडून काही व्हिडिओ राहू शकतात.

काही व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:

प्रौढांसाठी असलेला आशय: डेटिंग किंवा पहिले चुंबन यांसारखे, रोमान्स आणि आकर्षणाशी संबंधित लैंगिक नसलेले अनुभव दाखवणारे अथवा त्यांविषयी चर्चा करणारे व्हिडिओ. पौगंडावस्था आणि प्रजनन यांसारख्या लैंगिक शिक्षणाशी संबंधित विषयांवरील वयानुसार योग्य व्हिडिओ.

हिंसा: सध्याच्या घटनांशी संबंधित वयानुसार योग्य व्हिडिओ, जे शैक्षणिक आहेत, पण त्यांमध्ये घटनेच्या संदर्भात सौम्य हिंसा असू शकते. गेमिंग, टेलीव्हिजन शो आणि चित्रपटांमधील रचलेल्या व अ‍ॅनिमेटेड व्हिडिओमधील ग्राफिक स्वरूपात नसलेली हिंसा.

शस्त्रे: खेळण्यातील अवास्तव बंदुकी दाखवणारे व्हिडिओ. गेमिंग आणि अ‍ॅनिमेटेड आशयामधील वास्तववादी शस्त्रे.

धोकादायक आशय: (टीव्ही किंवा चित्रपट स्टुडिओसारख्या) व्यावसायिक वातावरणामध्ये केलेली धोकादायक कृत्ये, ज्यांमुळे हानी होऊ शकते. मद्य किंवा तंबाखूचा क्वचित उल्लेख अथवा वापर असलेले व्हिडिओ. सहजरीत्या ॲक्सेस करता येणाऱ्या उत्पादनांचा आणि साधनांचा किंवा X-acto चाकू किंवा करवत यांसारख्या धारदार वस्तूंच्या संक्षिप्त वापराचा समावेश असलेले DIY व्हिडिओ.

अनुचित भाषा: छळणूक न करण्याच्या संदर्भात "आई शप्पथ" किंवा "चायला" अशाप्रकारच्या सौम्य असभ्य भाषेचा क्वचित वापर असलेले व्हिडिओ.

आहार, फिटनेस आणि सौंदर्य: सौंदर्य उत्पादनाची परीक्षणे, वयानुसार योग्य मेक-अप ट्यूटोरियल आणि आरोग्य व स्वास्थ्याशी संबंधित शैक्षणिक आशय दाखवणारे व्हिडिओ.

संवेदनशील विषय: मानसिक आरोग्य, व्यसन, खाण्याशी संबंधित विकार आणि एखाद्या व्यक्तीला गमावल्यामुळे झालेले दुःख यांसारख्या संवेदनशील समस्यांवर चर्चा करणारे वयानुसार योग्य व्हिडिओ. या सेटिंगमधील व्हिडिओत ग्राफिक इमेज दाखवलेली नसते आणि हे मानसिक विकारामधून सावरण्याचे व बरे होण्याचे सकारात्मक मार्ग व त्यांसाठी मदत मागण्याचे महत्त्व या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात.

संगीत व्हिडिओ: अहेतूक नसलेल्या लैंगिक नृत्याचा आणि मद्य किंवा तंबाखूच्या क्वचित वापराचा समावेश असलेले संगीत व्हिडिओ. सौम्य स्वरूपातील असभ्य भाषा किंवा मद्य अथवा तंबाखूचे क्वचित उल्लेख असलेले गाण्याचे बोल.

व्यावसायिक घटक असलेला आशय

सशुल्क उत्पादन स्थान नियोजने किंवा जाहिराती असलेला आशय. आम्ही सशुल्क उत्पादन स्थान नियोजने किंवा जाहिराती यांचा समावेश असलेल्या व्हिडिओना YouTube Kids वर अनुमती देत नाही. निर्माणकर्त्याने त्याच्या व्हिडिओमध्ये सशुल्क उत्पादन स्थान नियोजन किंवा जाहिरात असल्याचे YouTube Studio द्वारे उघड केल्यावर, आम्ही YouTube Kids ॲपमधून व्हिडिओ काढून टाकणे हे करू.

अत्यधिक व्यावसायिक आशय. अत्यधिक व्यावसायिक किंवा प्रमोशनपर असलेल्या आशयाला YouTube Kids वर अनुमती नाही, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • निर्माणकर्त्यांनी किंवा ब्रँडनी अपलोड केलेल्या उत्पादनांच्या आणि सेवांच्या पारंपरिक जाहिराती.
  • दर्शकाला उत्पादन खरेदी करण्यास थेट प्रोत्साहन देणारा आशय.
  • उत्पादन पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित करणारे व्हिडिओ.
  • उत्पादनांचा जास्त प्रमाणात संग्रह किंवा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करणारे व्हिडिओ.

फसवा, खळबळजनक किंवा क्लिकबेट आशय

आम्ही फसव्या, खळबळजनक किंवा क्लिकबेट व्हिडिओना YouTube Kids वर अनुमती देत नाही. यामध्ये मुले व कुटुंबासाठीचा कमी गुणवत्तेचा आशय याचा समावेश आहे, जो मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फसवणूक, खळबळ आणि/किंवा फेरफार या गोष्टी वापरतो व विशेषतः पुढील गोष्टींच्या मदतीने क्लिक/व्ह्यू आकर्षित करतो:

  • दिशाभूल करणारी शीर्षके आणि थंबनेल
  • खळबळजनक शीर्षके आणि थंबनेल
  • शीर्षकांमध्ये कीवर्ड स्‍टफिंग (म्हणजे कीवर्डचा अत्यधिक वापर)
  • मुलांच्या अशा थीमचे मॅश-अप, ज्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
12847229149725920489
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false