तुमचे YouTube चॅनल सुरक्षित करणे

तुमचे YouTube चॅनल हॅक, हायजॅक केले जाण्यापासून किंवा धोक्यात येण्यापासून रोखण्यासाठी, काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे:
  1. मालवेअरसाठी स्कॅन करणे
  2. २ टप्पी पडताळणीसाठी पासकी वापरणे
  3. खाते रिकव्हरी प्लॅन तयार करणे

 
तुम्ही चॅनल मालक असल्यास, तुमच्या चॅनलचा अ‍ॅक्सेस असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीसोबत हा लेख आणि या YouTube निर्माणकर्ता सुरक्षितता सूचना व स्रोत शेअर करण्याची आम्ही शिफारस करतो. सुरक्षेसंबंधी पर्सनलाइझ केलेल्या आणखी शिफारशींसाठी, तुम्ही तुमच्या सुरक्षा तपासणी पेजला भेट देऊ शकता.

१. मालवेअरसाठी स्कॅन करणे

मालवेअर म्हणजे असे सॉफ्टवेअर आहे, जे तुमच्या खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवू शकते, तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर पाळत ठेवू शकते, तुमच्या फाइल हटवू शकते आणि तुमच्या ऑनलाइन अ‍ॅक्सेसमध्ये बदल करू शकते. ते सामान्यतः पासवर्डने संरक्षित आणि .scr किंवा .exe फाइलने संपणाऱ्या झिप केलेल्या फाइलच्या रूपाने तुमच्या डिव्हाइसमधून शिरते.

मालवेअर पुढील गोष्टींमधून येऊ शकते:

  • संशयास्पद लिंक: स्पॅम किंवा फसवे प्रायोजकत्व अथवा ब्रँड डील ईमेलमधील लिंकवर क्लिक करणे
  • संसर्ग झालेली डाउनलोड: विश्वासार्ह नसलेल्या स्रोताकडील प्रोग्राम डाउनलोड करणे
  • फसवी सॉफ्टवेअर अपडेट: मालवेअरचा समावेश असलेली फसवी सॉफ्टवेअर अपडेट इंस्टॉल करणे

आम्ही शिफारस करतो

वर्धित सुरक्षित ब्राउझिंग सुरू करा

वर्धित सुरक्षित ब्राउझिंग हे मालवेअरसाठी डाउनलोड आपोआप स्कॅन करत आहे

वर्धित सुरक्षित ब्राउझिंग याबद्दल अधिक माहिती

अ‍ँटिव्हायरस सॉफ्टवेअर काही एन्क्रिप्ट केलेल्या फाइल स्कॅन करू शकत नसल्यामुळे, वर्धित सुरक्षित ब्राउझिंग हेदेखील सुरू करण्याची आम्ही शिफारस करतो, जेणेकरून Google Chrome वरून डाउनलोड केलेल्या सर्व फाइल मालवेअरसाठी स्कॅन केल्या जातील.

Google Chrome वापरत असताना तुम्हाला सर्व Google उत्पादनांवर सुरक्षित ठेवण्यासाठी वर्धित सुरक्षित ब्राउझिंग हे रीअल-टाइम सुरक्षा स्कॅनिंग पुरवते.

२. २ टप्पी पडताळणीसाठी पासकी वापरणे

चोरलेले पासवर्ड हे खाती धोक्यात येण्याचे सर्वात सामान्य मार्ग आहेत. तुम्ही क्लिष्ट पासवर्ड तयार केल्यावर, २ टप्पी पडताळणी (2SV किंवा २ टप्पी पडताळणी म्हणूनदेखील ओळखली जाणारी) सुरू करू शकता, ज्यामुळे सुरक्षेच्या दुसऱ्या स्तरासाठी दुसरी पडताळणी पायरी जोडली जाते.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पडताळणी पायऱ्यांमधून निवडू शकता, प्रत्येक पायरीवर सुरक्षेच्या वेगवेगळ्या पातळ्या आहेत:

  • पासकी: फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा फोन स्क्रीन लॉक यांसारखी डिव्हाइस पडताळणी. पासकी या फिशिंगविरुद्ध सर्वात मजबूत संरक्षण पुरवतात.
  • सिक्युरिटी की: फिशिंगविरुद्ध मजबूत संरक्षण पुरवणारे प्रत्यक्ष पडताळणी डिव्हाइस.
  • Google प्रॉम्प्ट: एसएमएस पडताळणी कोडहून अधिक सुरक्षित असलेले फोन नोटिफिकेशन.
  • Google Authenticator: ऑफलाइन काम करणारे आणि एक वेळ पडताळणी कोड जनरेट करणारे ॲप.
  • फोनद्वारे पडताळणीसाठीचे कोड: पडताळणी कोडचा एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे पाठवला जाणारा कमी सुरक्षित प्रकार.
  • बॅकअप कोड: पडताळणी कोडचा डाउनलोड आणि प्रिंट केला जाणारा कमी सुरक्षित प्रकार.

आम्ही शिफारस करतो

फिशिंग यासारख्या धोक्यांविरुद्ध सर्वात मजबूत संरक्षणासाठी, २ टप्पी पडताळणी कोड सेट करा आणि तुमची दुसरी पडताळणी पद्धत म्हणून पासकी निवडा.

पासकी वापरून २ टप्पी पडताळणी सेट करणे

टीप: तुम्ही पासकी तयार केल्यावर, तुमच्या Google खाते मध्ये, त्याचप्रमाणे काही तृतीय पक्ष अ‍ॅप्स किंवा सेवांमध्ये सहजपणे साइन इन करण्यासाठी आणि तुम्ही संवेदनशील बदल करता, तेव्हा ते तुम्हीच असल्याची पडताळणी करणे हे करण्यासाठी ती वापरू शकता.

३. खाते रिकव्हरी प्लॅन तयार करणे

तुम्ही कधीही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करू शकत नसल्यास, तुम्हाला त्यामध्ये परत जाता येईल याची खात्री करण्यासाठी, तुम्ही तुमचा फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस यांसारखे रिकव्हरी पर्याय जोडू शकता.

रिकव्हरी पर्याय पुढील गोष्टी करण्यासाठी वापरले जाऊ शकतात:

  • एखाद्या व्यक्तीला तुमच्या परवानगीशिवाय तुमचे खाते वापरण्यापासून ब्लॉक करणे
  • तुमच्या खात्यामध्ये संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी आढळल्यास, त्याबद्दल तुम्हाला सूचित करणे
  • तुम्ही कधीही बाहेर लॉक झाल्यास किंवा तुमचा पासवर्ड विसरल्यास, तुमचे खाते रिकव्हर करणे

तुमचे खाते सुरक्षित ठेवण्यासाठी रिकव्हरी पर्याय कसे वापरले जाऊ शकतात याबद्दल अधिक जाणून घ्या.

आम्ही शिफारस करतो

तुमच्या खात्यामध्ये तुमचा फोन नंबर आणि ईमेल अ‍ॅड्रेस यांसारखे रिकव्हरी पर्याय जोडा, जेणेकरून तुम्हाला कधीही गरज असल्यास, तुमचे खाते झटपट रिकव्‍हर करता येईल.

खाते रिकव्हरी पर्याय जोडा

तुमचे YouTube चॅनल हॅक केले गेले आहे असे तुम्हाला वाटते का? हॅक केलेले चॅनल रिकव्‍हर करणे.
तुम्ही तुमच्या Google खाते चा अ‍ॅक्सेस गमवला आहे का? तुमचे Google खाते रिस्टोअर करणे.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

10084373034506999456
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
false
false
false
false