तुमचा YouTube शोध इतिहास पाहणे किंवा हटवणे

तुम्ही तुमचा YouTube शोध इतिहास माझी अ‍ॅक्टिव्हिटी पेज यावरून शोधू शकता. तेथून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमचा शोध इतिहास पाहणे
  • विशिष्ट व्हिडिओ मिळवण्यासाठी तुमचा शोध इतिहास शोधणे
  • तुमचा संपूर्ण शोध इतिहास साफ करणे
  • शोध सूचनांमधून वैयक्तिक शोध काढून टाकणे
  • तुमचा शोध इतिहास थांबवणे
टीप: तुम्ही याआधी YouTube वर पाहिलेल्या गोष्टी पाहण्यासाठी किंवा हटवण्यासाठी, माझी अ‍ॅक्टिव्हिटी पहा.

विचारात घेण्‍यासारख्या काही गोष्टी:

  • तुम्ही हटवलेल्या शोध एंट्रीचा यापुढे तुमच्या शिफारशींवर प्रभाव पडणार नाही.
  • तुमचा शोध इतिहास साफ केल्यानंतर, तुमचे मागील शोध यापुढे सर्च बॉक्समध्ये सूचना म्हणून दिसणार नाहीत.
  • तुमचा शोध इतिहास थांबवलेला असताना तुम्ही एंटर केलेले शोध तुमच्या शोध इतिहासामध्ये सेव्ह केले जाणार नाहीत.

तुमचे डिव्हाइस ऑफलाइन असताना तुम्ही तुमच्या पाहण्याच्या इतिहासामधून कोणतेही व्हिडिओ काढून टाकले असल्यास, ते बदल सिंक होण्यासाठी काही तास लागू शकतात.

वैयक्तिक शोध हटवणे

तुम्हाला हटवायच्या असलेल्या शोधाच्या बाजूला, माझी अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यानंतर वर जा, हटवा वर क्लिक करा.

तुमचा शोध इतिहास साफ करणे

माझी अ‍ॅक्टिव्हिटी आणि त्यानंतर वर जा …यानुसार अ‍ॅक्टिव्हिटी हटवा वर क्लिक कराआणि त्यानंतरतुम्हाला हटवायच्या असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीची टाइमफ्रेम निवडा आणि त्यानंतर पॉप-अपच्या तळाशी उजवीकडे हटवा वर क्लिक करा.

तुमचा शोध इतिहास थांबवणे

अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करणे  वर क्लिक करा, त्यानंतर बंद करण्यासाठी सुरू करा/बंद करा बटणावर क्लिक करा. शोध आणि पाहण्याचा इतिहास पुन्हा सुरू होईपर्यंत हा पर्याय तुम्ही जे पाहता व शोधता ते सेव्ह केले जाण्यापासून थांबवेल.

तुमचा शोध आणि पाहण्याचा इतिहास आपोआप हटवणे

तुम्ही ठरावीक कालावधीनंतर तुमचा YouTube शोध आणि पाहण्याचा इतिहास आपोआप हटवणे निवडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुमच्या Google खाते वर जा.
  2. सर्वात वर डावीकडील पॅनलवर, डेटा आणि गोपनीयता वर क्लिक करा.
  3. "इतिहास सेटिंग्ज" या अंतर्गत, YouTube इतिहास वर क्लिक करा.
  4. तुमची ऑटो-डिलीट अ‍ॅक्टिव्हिटी निवड सेव्ह करण्यासाठी, पॉप-अपच्या तळाशी उजवीकडे तुम्हाला हवी असलेली ऑटो-डिलीट टाइम-फ्रेम आणि त्यानंतर पुढील आणि त्यानंतर समजले वर क्लिक करा.

टीव्ही, गेम कन्सोल किंवा मीडिया स्ट्रीमिंग बॉक्स

तुमचा शोध इतिहास थांबवणे

  1. डावीकडील मेनूमधून, सेटिंग्ज  वर जा.
  2. शोध इतिहास थांबवा निवडा.
  3. शोध इतिहास थांबवा बटण निवडा.

तुमचा शोध इतिहास साफ करणे

  1. डावीकडील मेनूमधून, सेटिंग्ज वर जा.
  2. शोध इतिहास साफ करा निवडा.
  3. शोध इतिहास साफ करा बटण निवडा.

पाहण्याचा इतिहास, शिफारस केलेला आशय काढून टाकणे आणि तुमच्या शिफारशींमध्ये सुधारणा करणे यांविषयी आणखी माहितीसाठी आमचे इतर लेख पहा.

गुप्त मोड मध्ये शोधणे

तुम्ही गुप्त मोडमध्ये ब्राउझ केल्यास, तुमचा शोध इतिहास सेव्ह केला जाणार नाही. गुप्त मोड याबद्दल अधिक जाणून घ्‍या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14108272899160460278
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false