प्रतिवादाला प्रतिसाद देणे

आशय हा कॉपीराइट काढून टाकण्याची विनंती यामुळे काढून टाकला जातो, तेव्हा तो आशय अपलोड करणारी व्यक्ती किंवा अधिकृत प्रतिनिधी कॉपीराइट प्रतिवाद सबमिट करू शकतो. कथित चुकीमुळे किंवा चुकीच्या ओळखीमुळे काढून टाकलेला आशय रिस्टोअर करण्याची ही कायदेशीर विनंती आहे.

प्रतिसाद देण्यासाठी प्रतिवाद दावाकाराला (ज्याने काढून टाकण्याची मूळ विनंती सबमिट केली आहे) पाठवले जातात, जर:

  • सर्व कायदेशीर आवश्यकता यांची पूर्तता केली असेल
  • अपलोड करणाऱ्या व्यक्तीने आशय वापरण्याचा त्यांचा हक्क स्पष्टपणे नमूद केला असेल
विचाराधीन असलेला आशय YouTube वर रिस्टोअर केला जाण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कायदेशीर कारवाईच्या पुराव्यासह उत्तर देण्याकरिता दावाकारांकडे १० यूएस व्यवसाय दिवस असतात.

कायदेशीर कारवाईचे पुरावे मिळवणे

दावाकारांनी प्रतिवादाला प्रतिसाद देण्यासाठी, पुढीलपैकी एक कायदेशीर कारवाई केल्याचा पुरावा समाविष्ट करणे आवश्यक आहे:

  • कथित उल्लंघन करणारी अ‍ॅक्टिव्हिटी रोखण्यासाठी अपलोड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयीन आदेशाची मागणी करणारी कारवाई (फक्त नुकसानभरपाईचा दावा नाही).
  • लागू असेल तिथे, यूएस कॉपीराइट ऑफिसच्या कॉपीराइट क्लेम्स बोर्ड (CCB) कडे अपलोड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध केलेला कॉपीराइट उल्लंघनाचा दावा.

दावाकाराच्या कृती किंवा दाव्यामध्ये अपलोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि विचाराधीन असलेला विशिष्ट आशय नमूद केला पाहिजे, जसे की YouTube व्हिडिओ च्या URLs. स्वीकारल्या जाणाऱ्या पुराव्यामध्ये पुढीलपैकी एकाच्या कॉपीचा समावेश असू शकतो:

  • खटला
  • न्यायालयीन आदेश
  • CCB दावा
  • CCB ने केलेले उल्लंघनाचे निर्धारण

कॉपीराइटच्या प्रकरणांचे पुनरावलोकन करणे ज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे, अशा न्यायालयांमध्ये खटले दाखल केले गेले पाहिजेत. युनायटेड स्टेट्समध्ये दाखल केलेल्या खटल्यांसाठी, आम्ही फक्त यूएसच्या फेडरल न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या दाव्यांचा स्वीकार करू शकतो.

खोटी माहिती सबमिट करू नका. कपटपूर्ण दस्तऐवज सबमिट करणे यासारखी गोष्ट करून आमच्या प्रक्रियांचा गैरवापर केल्यामुळे, तुमचे खाते निलंबित केले जाऊ शकते किंवा इतर कायदेशीर परिणाम होऊ शकतात.

ईमेलद्वारे प्रतिसाद देणे

प्रतिवादाला प्रतिसाद देण्यासाठी:

  1. वर वर्णन केल्याप्रमाणे कायदेशीर कारवाईच्या पुराव्याची कॉपी मिळवा.
    • Google Drive च्या लिंक यांसारख्या क्लाउडवर स्‍टोअर केलेल्या फाइलच्या लिंक स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत.
  2. YouTube वरून पाठवलेल्या प्रतिवादासंबंधित ईमेलवर जा.
    • काढून टाकण्याची मूळ विनंती सबमिट करण्यासाठी वापरल्या गेलेल्या ईमेल अ‍ॅड्रेसवर प्रतिवाद पाठवले जातात. 
  3. पुराव्याच्या कॉपीसह ईमेलला थेट उत्तर द्या.
    • तुमचे उत्तर हे नवीन ईमेल म्हणून YouTube ला पाठवू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रतिवादाला प्रतिसाद देण्यासाठी माझ्याकडे किती वेळ आहे?
कायदेशीर कारवाईच्या आवश्यक पुराव्यासह प्रतिवादासंबंधित ईमेलला उत्तर देण्यासाठी दावाकारांकडे १० यूएस व्यवसाय दिवस असतात.
मी कायदेशीर कारवाईचा पुरावा सबमिट केल्यानंतर काय होईल?
कायदेशीर कारवाई केली जात असताना विचाराधीन असलेला आशय YouTube वर रिस्टोअर केला जाणार नाही. तसेच, कायदेशीर कारवाई केली जात असताना कॉपीराइट उल्लंघनाचा दावा आणि प्रतिवाद या गोष्टींचे निराकरण झाले नाही असे मानले जाते.
तुम्ही प्रतिवादाला प्रतिसाद न दिल्यास काय होईल?
दावाकाराने प्रतिवादाला प्रतिसाद न दिल्यास किंवा पुरावा पुरेसा नसल्यास अथवा गहाळ असल्यास, विचाराधीन असलेला आशय YouTube वर रिस्टोअर केला जाऊ शकतो.

अधिक माहिती

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17621209512829261686
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
59
false
false