सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वरून इमेज काढा

तुम्हाला Google शोध परिणामांमधून फोटो हटवायचा असल्यास, तुम्हाला सहसा ती इमेज ज्या साइटवर आहे त्या साइटच्या मालकाशी संपर्क साधावा लागतो.

महत्त्वाचे: Google च्या शोध परिणामांमध्ये दिसणार्‍या बहुतेक इमेज या Google च्या मालकीच्या नसलेल्या वेबसाइटवरील असतात, त्यामुळे आम्ही या इमेज वेबवरून काढून टाकू शकत नाही. यामुळेच इमेज काढून टाकण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम साइटच्या मालकाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

Google शोध परिणामांमधून इमेज कशी काढून टाकावी

आम्ही समजतो, की तुम्हाला शोध परिणामांमधून ठरावीक इमेज शक्य तितक्या लवकर काढून टाकायच्या आहेत. मात्र, शोध परिणामांमधून इमेज काढून टाकण्याच्या प्रक्रियेला काही वेळ लागू शकतो.

इमेज काढून टाकण्यासाठी साइटच्या मालकाशी संपर्क साधा

साइटच्या मालकाशी संपर्क साधण्यासाठी येथे काही मार्ग दिले आहेत:

  • आमच्याशी संपर्क साधा लिंक: साइट मालकासाठी "आमच्याशी संपर्क साधा" लिंक किंवा ईमेल अ‍ॅड्रेस शोधा. ही माहिती बरेचदा साइटच्या होम पेजवर असते.
  • Whois वापरून संपर्क माहिती शोधा: Google वापरून तुम्ही साइट मालकासाठी Whois (who is?) शोधू शकता. google.com वर जा आणि whois www.example.com शोधा. साइटच्या मालकाशी संपर्क साधण्यासाठी ईमेल अ‍ॅड्रेस बरेचदा "नोंदणीकर्ता ईमेल" किंवा "अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह संपर्क" या अंतर्गत सापडू शकतो.
  • साइटच्या होस्टिंग कंपनीशी संपर्क साधा: Whois शोध परिणामांमध्ये सहसा वेबसाइट कोण होस्ट करते याबद्दल माहिती समाविष्ट असते. तुम्ही साइटच्या मालकाशी संपर्क साधू शकत नसल्यास, साइटच्या होस्टिंग कंपनीशी संपर्क साधून पहा.

टीप: तुम्ही साइटच्या मालकाशी संपर्क न साधण्याचे ठरवल्यास किंवा साइटवरून इमेज काढून टाकू शकत नसल्यास, शोध परिणामांमधून Google हे इमेज काढून टाकू शकते याची इतर उदाहरणे पहा.

साइटवरून इमेज काढून टाकण्यासाठी टिपा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेली इमेज काढून टाका

Facebook आणि Twitter यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेली इमेज Google Search परिणामांमधून काढून टाकण्यासाठी, तुम्ही सर्वप्रथम प्लॅटफॉर्मवरून इमेज काढून टाकणे आवश्यक आहे.

  • तुमच्याकडे इमेज अपलोड केलेल्या खात्याचा ॲक्सेस असल्यास, प्लॅटफॉर्मवरून इमेज काढून टाका.
  • तुमच्याकडे त्या खात्याचा ॲक्सेस नसल्यास, इमेज काढून टाकण्यात मदत मिळवण्यासाठी कृपया सोशल मीडिया कंपनीशी संपर्क साधा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मदत केंद्र पहा

बऱ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे त्यांच्या इमेज काढून टाकण्याच्या धोरणांसाठी आणि प्रक्रियांसाठी मदत स्रोत आहेत. 

  1. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मदत केंद्र पहा. येथे काही लोकप्रिय प्लॅटफॉर्मची मदत केंद्रे दिली आहेत:
  2. तुमच्या स्थितीनुसार कीवर्ड शोधा. उदाहरणार्थ:
    • "फोटो काढून टाका"
    • "फोटोची तक्रार करा" किंवा "फोटो काढून टाका"
    • “तोतयेगिरी” किंवा “बनावट खाती”
    • “इमेज काढून टाकण्यासंबंधित धोरणे”
तुमच्या स्वतःच्या साइटवरून इमेज काढून टाका

इमेज तुमच्या साइटवर असल्यास, तुमच्या साइटवरून Google शोध परिणामांमधील आशय ब्लॉक करणे हे कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुम्ही Google उत्पादनावर अपलोड केलेली इमेज काढून टाका

तुम्ही तुमच्या अल्बम संग्रहण किंवा Google Photos मधून Google उत्पादनामध्ये अपलोड केलेला फोटो काढून टाकू शकता. तुम्ही तुमच्या अल्बम संग्रहण मधून फोटो हटवता तेव्हा, Blogger, Hangouts आणि Google Photos यांसारख्या Google उत्पादनांमधून तो फोटो काढून टाकला जातो.

  1. तुमच्या अल्बम संग्रहण वर जा.
  2. तुम्हाला हटवायचा असलेला फोटो उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर फोटो हटवा हटवा निवडा.
  4. तुम्हाला "फोटो हटवा" न आढळल्यास, तुमचे फोटो हटवण्यासाठी Google Photos मध्ये व्यवस्थापित करा निवडा.

तुमचे फोटो Google Photos मधून कसे हटवावेत याबद्दल जाणून घ्या.

Google ला शोध परिणामांमधून कालबाह्य/हटवलेली इमेज रीफ्रेश करण्यास सांगणे

साइटच्या मालकाने त्यांच्या साइटवरून इमेज काढून टाकल्यानंतर, आमच्या नियमित अपडेट करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अखेरीस इमेज Google Search मधून काढून टाकली जाईल. तुम्ही Google Search मधूनदेखील इमेज काढून टाकण्याची विनंती करू शकता.

Google Search मधून हटवलेली इमेज काढून टाकण्याची विनंती

पहिला भाग: इमेजच्या लिंकचा ॲड्रेस कॉपी करा

  1. तुम्हाला हटवायची असलेली इमेज images.google.com येथे शोधा.
  2. शोध परिणामांमध्ये, इमेज थंबनेलवर राइट क्लिक करा आणि लिंक ॲड्रेस कॉपी करा निवडा.
    • टीप: वेगवेगळ्या ब्राउझरवर लिंक स्थान कॉपी करण्यासाठी वेगवेगळी नावे असू शकतात.

दुसरा भाग: Google शोध परिणामांमधून काढून टाकण्याची विनंती करा

  1. खाली काढून टाकण्याची विनंती करा वर क्लिक करा.
    काढून टाकण्याची विनंती करा
  2. नवीन विनंती आणि त्यानंतर इमेज वर क्लिक करा.
  3. इमेजविषयक शोध परिणामांमधील "लिंक अ‍ॅड्रेस कॉपी करा" ही URL एंटर करा निवडा.
  4. “शोध परिणाम URL” बॉक्समध्ये, लिंक अ‍ॅड्रेस पेस्ट करा.
  5. सबमिट करा वर क्लिक करा.

तुम्ही तुमच्या विनंतीची स्थिती कालबाह्य आशय काढून टाकणे या पेजवर पाहू शकता.

Google ला शोध परिणामांमधून ठरावीक इमेज काढून टाकण्यास सांगा

आम्ही समजू शकतो, की तुमच्या स्वतःच्या विशिष्ट इमेज किंवा तुमची माहिती शोधणे त्रासदायक असू शकते.

काही ठरावीक बाबतींत, Google हे Google Search मधून इमेजच्या लिंक काढून टाकू शकते. यामुळे ती इमेज ज्या साइटवरून लिंक केली होती त्या साइटवरून ती काढून टाकली जात नाही.

Google शोध परिणामांमधून अशा इमेज आणि व्हिडिओ काढून टाकण्याच्या विनंतीसंबंधित प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी, तुमच्या समस्येनुसार खालील पायऱ्या फॉलो करा.

आर्थिक, वैद्यकीय किंवा राष्ट्रीय आयडीबद्दल संवेदनशील माहिती असलेली इमेज काढून टाका

आम्ही एखाद्या व्यक्तीला ओळख चोरी किंवा फसवणुकीचा धोका दर्शवणारी फक्त यासारखी वर्गीकृत केलेली माहिती काढून टाकू शकतो.

आवश्यकता

आम्ही आशय काढून टाकणे विचारात घेण्यासाठी, तो खालील माहितीच्या प्रकारांशी संबंधित असणे आवश्यक आहे:

  • यू.एस. सोशल सिक्युरिटी नंबर, अर्जेंटीन सिंगल टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर, ब्राझील कादास्त्रो दे पेसोस फिजिका, कोरिया रहिवासी नोंदणी क्रमांक, चीन रहिवासी ओळख कार्ड इत्यादींसारखे गोपनीय सरकारी ओळख (आयडी) क्रमांक.
  • बँक खाते क्रमांक
  • क्रेडिट कार्ड क्रमांक
  • हस्तलिखित स्वाक्षरीच्या इमेज
  • आयडीसंबंधित दस्तऐवजांच्या इमेज
  • वैद्यकीय माहिती यांसारखे अत्यंत वैयक्तिक, प्रतिबंधित आणि अधिकृत रेकॉर्ड
  • वैयक्तिक संपर्क माहिती (पत्ता, फोन नंबर आणि ईमेल अ‍ॅड्रेस)
  • गोपनीय लॉगिन क्रेडेंशियल

Google Search मधून इमेज काढून टाकण्याची विनंती करा

इमेज वरील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, तुम्ही किंवा अधिकृत प्रतिनिधी Google शोध परिणामांमधून इमेज काढून टाकण्याची विनंती करू शकता. विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

फॉर्म भरा

विनासंमती लैंगिकदृष्ट्या भडक किंवा खाजगी वैयक्तिक इमेज अथवा "रिव्हेंज पॉर्न" काढून टाका

आम्ही संमतीशिवाय शेअर केलेल्या खाजगी किंवा लैंगिकदृष्ट्या भडक इमेज आणि व्हिडिओ (हे "रिव्हेंज पॉर्न" म्हणूनदेखील ओळखले जाते) काढून टाकू शकतो.

महत्त्वाचे: लहान मुलांविषयी लैंगिक अत्याचार करणार्‍या इमेजरीची तक्रार करण्यासाठी, बाल लैंगिक गैरवर्तन आशयाची तक्रार करण्यासाठी पायऱ्या फॉलो करा.

आवश्यकता

आम्ही आशय काढून टाकणे विचारात घेण्यासाठी, त्याने पुढील आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे:

  1. इमेजरीमध्ये तुम्ही (किंवा तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेली व्यक्ती) नग्न, लैंगिक कृतीमध्ये किंवा जवळीक साधलेल्या अवस्थेत आहात.
  2. तुम्ही (किंवा तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या व्यक्तीने) इमेजरी किंवा या कृतीला संमती दिली नाही आणि ती सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्यात आली अथवा तुमच्या संमतीशिवाय इमेजरी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली.
  3. तुम्हाला सध्या या आशयासाठी ऑनलाइन किंवा इतरत्र पैसे दिले जात नाहीत.

Google Search मधून इमेज काढून टाकण्याची विनंती करा

इमेज वरील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, तुम्ही किंवा अधिकृत प्रतिनिधी Google शोध परिणामांमधून इमेज काढून टाकण्याची विनंती करू शकता. विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

टीप: आम्ही इमेज काढून टाकावी असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्या इमेजचे स्क्रीनशॉट देणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला लैंगिकदृष्ट्या भडक भाग अस्पष्ट करण्यासाठी स्क्रीनशॉट संपादित करण्याकरिता प्रोत्साहित करतो, पण कृपया आम्ही इमेज अजूनही ओळखू शकू याची खात्री करा.

फॉर्म भरा

आम्ही आमच्या पुनरावलोकनामध्ये काय समाविष्ट करतो

आशय हटवला जावा की नाही हे ठरवताना आम्ही लोकांचे त्यामधील स्वारस्य आणि बातमीचे महत्त्व या गोष्टी लक्षात घेतो.

  • बहुतांश बाबतींमध्ये, अशा प्रकारच्या इमेज आणि त्यांसोबत असलेल्या आशयामध्ये लोकांना अजिबात स्वारस्य नसते.
  • काही बाबतींमध्ये, लोकांच्या प्रचंड स्वारस्यामुळे आम्हाला तक्रार केलेला आशय काढून टाकता येऊ शकत नाही.
  • इतर बाबतींमध्ये, आमच्या परिणामांमध्ये उपलब्ध राहण्यासाठी लोकांचे स्वारस्य असलेल्या इमेजसोबत माहिती दिली जाऊ शकते, पण संदर्भाशिवाय असलेल्या इमेजची उदाहरणे काढून टाकली जाऊ शकतात.
अनैच्छिक बनावट पोर्नोग्राफी काढून टाका

इमेज किंवा व्हिडिओ खालील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, आम्ही Google शोध परिणामांमधून अनैच्छिक बनावट पोर्नोग्राफी काढून टाकू शकतो.

आवश्यकता

आम्ही आशय काढून टाकण्याचा विचार करण्यासाठी, त्याने या सर्व आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे:

  1. इमेजरीमधील तुमचे चित्रण ओळखता येण्यासारखे आहे.
  2. संबंधित इमेजरी बनावट आहे आणि ती तुमचे खोटेपणाने नग्न किंवा लैंगिकदृष्ट्या भडक स्थितीमध्ये चित्रण करते.
  3. इमेजरी तुमच्या संमतीशिवाय वितरित केली गेली.

Google Search मधून इमेज काढून टाकण्याची विनंती करा

इमेज वरील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, तुम्ही किंवा अधिकृत प्रतिनिधी Google शोध परिणामांमधून इमेज काढून टाकण्याची विनंती करू शकता. विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

टीप: आम्ही इमेज काढून टाकावी असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्या इमेजचे स्क्रीनशॉट देणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला लैंगिकदृष्ट्या भडक भाग अस्पष्ट करण्यासाठी स्क्रीनशॉट संपादित करण्याकरिता प्रोत्साहित करतो, पण कृपया आम्ही इमेज अजूनही ओळखू शकू याची खात्री करा.

फॉर्म भरा

शोषणकारक गोष्टी काढून टाकण्याच्या पद्धती असलेल्या साइटवरील वैयक्तिक इमेज काढून टाका

साइट किंवा इतर एजन्सी ही आशय काढून टाकण्यासाठी तुम्ही थेट त्यांना पैसे द्यावेत अशी मागणी करत असल्यास, विनंती केल्यावर, काही परिस्थितींमध्ये, आम्ही Google शोध परिणामांमधून अशा आशयाच्या लिंक काढू टाकू शकतो.

आवश्यकता

आम्ही आशय काढून टाकण्याचा विचार करण्यासाठी, त्याने या सर्व आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे:

  1. सबमिट केलेल्या URL मध्ये तुम्ही आशयाचा विषय आहात.
  2. वेबसाइट ही व्यवसाय परीक्षण साइट नाही.
  3. वेबसाइटवर आशय काढून टाकण्याच्या पद्धती आहेत, ज्यामध्ये आशय काढून टाकण्यासाठी, साइट किंवा इतर एजन्सीना पैसे भरणे आवश्यक आहे.

Google Search मधून इमेज काढून टाकण्याची विनंती करा

इमेज वरील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, तुम्ही किंवा अधिकृत प्रतिनिधी Google शोध परिणामांमधून इमेज काढून टाकण्याची विनंती करू शकता. विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

टीप: आम्ही इमेज काढून टाकावी असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्या इमेजचे स्क्रीनशॉट देणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला लैंगिकदृष्ट्या भडक भाग अस्पष्ट करण्यासाठी स्क्रीनशॉट संपादित करण्याकरिता प्रोत्साहित करतो, पण कृपया आम्ही इमेज अजूनही ओळखू शकू याची खात्री करा.

फॉर्म भरा

अल्पवयीन मुलाची (१८ वर्षांच्या आतील कोणीही) इमेज काढून टाका

अनिवार्य लोकहित किंवा बातमीमूल्य असणार्‍या गोष्टी वगळता, Google हे १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीच्या किंवा त्यांच्या पालकाच्या अथवा कायदेशीर पालकाच्या विनंतीवरून १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीच्या इमेज शोध परिणामांमधून काढून टाकते. म्हणजेच या इमेज टॅबमध्ये किंवा Google Search मधील कोणत्याही वैशिष्ट्यामध्ये थंबनेल म्हणून दिसणार नाहीत. Google शोध परिणामांमधून अशा प्रकारचा आशय काढून टाकण्याच्या विनंत्यांवरील प्रक्रियेदरम्यान तुम्हाला सपोर्ट देणे हा या लेखाचा उद्देश आहे.

महत्त्वाचे: तुमची विनंती ही अल्पवयीन मुलाची भडक इमेज काढून टाकण्याची असल्यास, लहान मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या आशयाची तक्रार करणे हे करा.

आवश्यकता

तुमची काढून टाकण्याची विनंती विचारात घेण्यासाठी, तिने पुढील आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • सबमिट केलेल्या URLs इमेज URLs आहेत. वेब URLs (मजकूर आणि इमेज दोन्ही असलेली पेज) या धोरणानुसार काढून टाकण्यासाठी पात्र नाहीत.
  • इमेजमध्ये १८ वर्षांखालील किंवा १८ वर्षापूर्वी निधन झालेल्या व्यक्तीचा समावेश आहे.
  • तुम्ही इमेजमधील व्यक्ती किंवा अधिकृत प्रतिनिधी आहात, जसे की पालक.
  • इमेज ही सोशल मीडिया खाते किंवा तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या वेब पेजवरील नाही.
टीप: या काढून टाकण्याच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी, Google शोध परिणामांमधून अल्पवयीन मुलाच्या इमेज काढून टाकणे यावर जा.

Google Search मधून इमेज काढून टाकण्याची विनंती करा

इमेज वरील आवश्यकता पूर्ण करत असल्यास, तुम्ही किंवा अधिकृत प्रतिनिधी Google शोध परिणामांमधून इमेज काढून टाकण्याची विनंती करू शकता. विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

महत्त्वाचे: आम्ही फक्त तुम्ही किंवा तुमच्या अधिकृत प्रतिनिधीने फॉर्ममध्ये सबमिट केलेल्या URLs चे पुनरावलोकन करतो.

फॉर्म भरा

कायदेशीर कारणांसाठी इमेज काढून टाका

आम्ही लागू असलेल्या कायद्यांतर्गत Google च्या सेवांमधील आशय काढून टाकतो.

बौद्धिक संपदेशी संबंधित समस्या

कॉपीराइट उल्लंघन, ट्रेडमार्क उल्लंघन आणि बनावट यांसारख्या बौद्धिक संपदा उल्लंघनामुळे Google Search वरून इमेज काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

फॉर्म भरा

इतर कायदेशीर कारणे

आम्ही इतर कायदेशीर कारणांसाठी Google Search वरील इमेज काढून टाकू शकतो, विशेषतः पुढील गोष्टींशी संबंधित विनंत्या:

  • न्यायालयीन आदेश, यामध्ये न्यायालय हे निश्चित करते, की विशिष्ट आशय बेकायदेशीर आहे.
  • FOSTA-SESTA किंवा कॅलिफोर्नियामधील निवड रद्द करणे / कॅलिफोर्नियामधील सेफ ॲट होम प्रोग्राम.
  • बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित आशय म्हणजे अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिकदृष्ट्या भडक असलेले वर्तन दाखवणारा व्हिज्युअल स्वरूपातील आशय आहे.

वर नमूद केलेल्या कायदेशीर कारणांमुळे Google Search मधून इमेज काढून टाकण्याची विनंती करण्यासाठी, खालील बटणावर क्लिक करा.

फॉर्म भरा

संबंधित स्रोत 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18315542571707151925
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false