सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वर प्रगत शोध घ्या

तुम्ही प्रगत शोध वापरून जटिल शोधांचे परिणाम मर्यादित करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही २४ तासांमध्ये अपडेट केल्या गेलेल्या जर्मन भाषेतील साइट किंवा कृष्ण धवल क्लिप आर्ट इमेज शोधू शकता.

टीप: Google सर्च बॉक्समध्ये, तुम्ही अवतरण चिन्हे, वजाबाकीची चिन्हे आणि साइट: यांसारखे शोध ऑपरेटर असलेले प्रगत शोध फिल्टर वापरू शकता. शोध ऑपरेटरसंबंधी अधिक जाणून घ्या.

तुमच्या होम स्क्रीनवर प्रगत शोध जोडा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Chrome ॲप Chrome उघडा.
  2. प्रगत शोध पेजवर जा:
  3. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर होम स्क्रीनवर जोडा आणि त्यानंतर जोडा वर टॅप करा.
  4. तुमच्या होम स्क्रीनवर आयकन ड्रॅग करा किंवा आपोआप जोडा वर टॅप करा.

प्रगत शोध क्वेरी फील्ड वापरा

महत्त्वाचे: शोध क्वेरी फील्ड ही प्रगत शोध यासंबंधित पेजनुसार बदलू शकतात.

प्रगत शोध मध्ये, तुम्ही तुमच्या परिणामांमध्ये समाविष्ट करायचे आहेत किंवा त्यांमधून काढून टाकायचे आहेत असे शब्द किंवा वाक्य निवडू शकता. तुम्ही पुढील गोष्टी निवडू शकता:

  • “हे सगळे शब्द”: तुम्ही एंटर केलेल्या सर्व शब्दांचा समावेश असलेले परिणाम.
  • “तंतोतंत जुळणारा शब्द किंवा वाक्य”: तुम्ही एंटर केलेल्यापैकी तंतोतंत जुळणाऱ्या एका शब्दाचा किंवा वाक्याचा समावेश असलेले परिणाम.
  • “यांपैकी कोणताही शब्द”: तुम्ही एंटर केलेल्यापैकी किमान एका शब्दाचा समावेश असलेले परिणाम.
  • “यांपैकी कोणताही शब्द नाही”: तुम्ही एंटर केलेल्यापैकी कोणत्याही शब्दाचा समावेश नसलेले परिणाम.
  • “यांदरम्यानची संख्या”: तुम्ही एंटर केलेल्या दोन संख्येदरम्यानच्या एखाद्या संख्येचा समावेश असलेले परिणाम.

प्रगत शोध करा

वेबपेज आणि फाइलसाठी
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, प्रगत शोध वर जा: google.com/advanced_search.
  2. पुढील गोष्टी करण्यासाठी “यासह पेज शोधा” च्या अंतर्गत, क्वेरी फील्ड निवडा:
    • तुमच्या परिणामांमध्ये अचूक शब्द किंवा शब्दांच्या सूचीचा समावेश करा.
    • तुमच्या परिणामांमधून शब्द काढून टाका.
  3. तुम्हाला तुमच्या परिणामांमध्ये समाविष्ट करायचे आहेत किंवा त्यांमधून काढून टाकायचे आहेत असे शब्द एंटर करा.
    • अवतरण चिन्हे किंवा वजाबाकीची चिन्हे यांसारखे शोध ऑपरेटर नसलेले शब्द जोडा.
  4. "त्यानंतर तुमचे परिणाम यानुसार मर्यादित करा" च्या अंतर्गत, तुम्हाला वापरायचे असलेले फिल्टर निवडा. 
    • तुम्ही एकापेक्षा अधिक फिल्टर जोडू शकता.
  5. प्रगत शोध वर टॅप करा.

हे फिल्टर वापरुन पाहा

  • भाषा: विशिष्ट भाषेमधील व्हिडिओ शोधा.
  • विभाग: एका विशिष्ट विभागात प्रकाशित झालेली पेज शोधा.
  • शेवटचे अपडेट: तुम्ही निवडलेल्या वेळेमध्ये अपडेट केलेली पेज शोधा.
  • साइट किंवा डोमेन: wikipedia.org सारखी एखादी साइट शोधा. किंवा तुमचे परिणाम .edu, .org किंवा .gov सारख्या डोमेनपुरते मर्यादित करा.
  • दिसणाऱ्या संज्ञा: पेजच्या विशिष्ट भागामध्ये जसे की, शीर्षक, मजकूर किंवा URL मध्ये तुमच्या शोध संज्ञा असतील अशी पेज शोधा.
  • सुरक्षितशोध: सुस्पष्ट परिणाम काढून टाका. सुरक्षितशोध याबाबत अधिक जाणून घ्या.
  • फाइल प्रकार: .pdf, .ps, .dwf, .kml, .kmz, .xls, .ppt, .doc, .rtf किंवा .swf सारख्या विशिष्ट फॉरमॅटमधील फाइल शोधा.
  • वापराचे हक्क: परवाना माहिती अटॅच केलेली पेज शोधा.
इमेजसाठी
महत्त्वाचे: इमेज कदाचित कॉपीराइटच्या अधीन असू शकतात. तुम्ही पुन्हा वापरू शकाल अशा इमेज कशा शोधायच्या ते जाणून घ्या..
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, इमेजशी संबंधित प्रगत शोध वर जा: google.com/advanced_image_search.
  2. पुढील गोष्टी करण्यासाठी “यासह इमेज शोधा” च्या अंतर्गत, क्वेरी फील्ड निवडा:
    • तुमच्या परिणामांमध्ये अचूक शब्द किंवा शब्दांच्या सूचीचा समावेश करा.
    • तुमच्या परिणामांमधून शब्द काढून टाका.
  3. तुम्हाला तुमच्या परिणामांमध्ये समाविष्ट करायचे आहेत किंवा त्यांमधून काढून टाकायचे आहेत असे शब्द एंटर करा.
    • अवतरण चिन्हे किंवा वजाबाकीची चिन्हे यांसारखे शोध ऑपरेटर नसलेले शब्द जोडा.
  4. "त्यानंतर तुमचे परिणाम यानुसार मर्यादित करा" च्या अंतर्गत, तुम्हाला वापरायची असलेली फिल्टर निवडा.
    • तुम्ही एकापेक्षा अधिक फिल्टर जोडू शकता.
  5. प्रगत शोध वर टॅप करा.

हे फिल्टर वापरुन पाहा

  • इमेजचा आकार: आकार किंवा मितीनुसार इमेज शोधा.
  • आस्पेक्ट रेशो: विशिष्ट आकार असलेल्या, जसे की उंच, चौकोनी, रुंद किंवा पॅनोरॅमिक इमेज शोधा.
  • इमेजमधील रंग: पूर्ण रंगीत, कृष्ण धवल किंवा पारदर्शक इमेज शोधा. किंवा विशिष्ट रंगाच्या इमेज शोधा.
  • इमेजचा प्रकार: फोटो, क्लिप आर्ट किंवा रेखाचित्रे यांसारखा विशिष्ट प्रकार शोधा. किंवा चेहरा अथवा ॲनिमेटेड इमेज शोधा.
  • विभाग: एका विशिष्ट विभागात प्रकाशित झालेल्या इमेज शोधा.
  • साइट किंवा डोमेन: sfmoma.org सारखी एखादी साइट शोधा. किंवा तुमचे परिणाम .edu, .org किंवा .gov सारख्या डोमेनपुरते मर्यादित करा.
  • सुरक्षितशोध: सुस्पष्ट परिणाम काढून टाका. सुरक्षितशोध याबाबत अधिक जाणून घ्या.
  • फाइल प्रकार: JPG, GIF, PNG, BMP, SVG, WEBP, ICO किंवा RAW सारख्या विशिष्ट फॉरमॅटमधील इमेज शोधा.
  • वापराचे हक्क: परवाना माहिती अटॅच केलेल्या इमेज शोधा. इमेजच्या वापराच्या हक्कांविषयी अधिक जाणून घ्या.
व्हिडिओंसाठी
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, व्हिडिओशी संबंधित प्रगत शोध वर जा: google.com/advanced_video_search.
  2. पुढील गोष्टी करण्यासाठी “यासह व्हिडिओ शोधा” च्या अंतर्गत, क्वेरी फील्ड निवडा:
    • तुमच्या परिणामांमध्ये अचूक शब्द किंवा शब्दांच्या सूचीचा समावेश करा.
    • तुमच्या परिणामांमधून शब्द काढून टाका.
  3. तुम्हाला तुमच्या परिणामांमध्ये समाविष्ट करायचे आहेत किंवा त्यांमधून काढून टाकायचे आहेत असे शब्द एंटर करा.
    • अवतरण चिन्हे किंवा वजाबाकीची चिन्हे यांसारखे शोध ऑपरेटर नसलेले शब्द जोडा.
  4. "त्यानंतर तुमचे परिणाम यानुसार मर्यादित करा" च्या अंतर्गत, तुम्हाला वापरायचे असलेले फिल्टर निवडा.
    • तुम्ही एकापेक्षा अधिक फिल्टर जोडू शकता.
  5. प्रगत शोध वर टॅप करा.

हे फिल्टर वापरुन पाहा

  • भाषा: विशिष्ट भाषेमधील व्हिडिओ शोधा.
  • कालावधी: ०-४ मिनिटे, ४-२० मिनिटे किंवा २० मिनिटांपेक्षा अधिक कालावधी असणारे व्हिडिओ शोधा.
  • पोस्ट केल्याची तारीख: ठरावीक कालावधीदरम्यान, जसे की मागील एक तास, दिवस, आठवडा, महिना किंवा वर्ष यांदरम्यान पोस्ट किंवा अपडेट केलेले व्हिडिओ शोधा.
  • गुणवत्ता: परिणाम HD व्हिडिओपुरते मर्यादित करा.
  • साइट किंवा डोमेन: youtube.com सारखी एखादी साइट शोधा. किंवा तुमचे परिणाम .edu, .org किंवा .gov सारख्या डोमेनपुरते मर्यादित ठेवा.
  • सबटायटल: सबटायटल असलेले व्हिडिओ शोधा.
  • सुरक्षितशोध: सुस्पष्ट परिणाम काढून टाका. सुरक्षितशोध याबाबत अधिक जाणून घ्या.
पुस्तकांसाठी
महत्त्वाचे: तुमच्या शोधामध्ये शोध संज्ञा, शीर्षक, लेखक, प्रकाशक, विषय, ISBN किंवा ISSN चा समावेश असणे आवश्यक आहे.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, पुस्तकाशी संबंधित प्रगत शोध वर जा: google.com/advanced_book_search.
  2. पुढील गोष्टी करण्यासाठी “परिणाम शोधा” च्या अंतर्गत, क्वेरी फील्ड निवडा:
    • तुमच्या परिणामांमध्ये अचूक शब्द किंवा शब्दांच्या सूचीचा समावेश करा.
    • तुमच्या परिणामांमधून शब्द काढून टाका.
  3. तुम्हाला तुमच्या परिणामांमध्ये समाविष्ट करायचे आहेत किंवा त्यांमधून काढून टाकायचे आहेत असे शब्द एंटर करा.
    • अवतरण चिन्हे किंवा वजाबाकीची चिन्हे यांसारखे शोध ऑपरेटर नसलेले शब्द जोडा.
  4. पुढील विभागामध्ये, तुम्हाला वापरायची असलेली फिल्टर निवडा.
  5. सर्वात वरती उजवीकडे, Google Search वर टॅप करा.

हे फिल्टर वापरुन पाहा

  • शोध: तुमच्या शोधामध्ये काय समाविष्‍ट करायचे ते निवडा, जसे की:
    • मर्यादित पूर्वावलोकन असलेली किंवा पूर्ण पाहता येणारी पुस्तके उपलब्ध आहेत.
    • फक्त पूर्ण पाहता येणारी पुस्तके उपलब्ध आहेत.
  • फक्त Google ई-पुस्तके आहेत.
  • आशय: परिणाम विशिष्ट प्रकारांपुरते मर्यादित ठेवा, जसे की पुस्तके, मासिके किंवा वर्तमानपत्रे.
  • भाषा:विशिष्ट भाषेमध्ये लिहिलेली पुस्तके शोधा.
  • शीर्षक: पुस्तकाचे शीर्षक एंटर करा.
  • लेखक: शिष्ट लेखकाने लिहिलेली पुस्तके शोधा.
  • प्रकाशक:परिणाम विशिष्ट प्रकाशकापुरते मर्यादित करा.
  • विषय: विशिष्ट विषयावरील पुस्तके शोधा.
  • प्रकाशनाची तारीख: परिणाम विशिष्ट तारखांदरम्यान प्रकाशित झालेल्या पुस्तकांपुरते मर्यादित करा.
  • ISBN: पुस्तकाच्या इंटरनॅशनल स्टॅंडर्ड बुक नंबर (ISBN) नुसार पुस्तक शोधा.
  • ISSN: सिरीअलच्या इंटरनॅशनल स्टॅंडर्ड सिरीअल नंबर (ISSN) नुसार सिरीअल शोधा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10949525430718632437
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false