सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमची Google अ‍ॅप सेटिंग्ज बदला

तुम्ही व्हॉइस शोध, जुने शोध, सुरक्षितशोध आणि सूचना या सेटिंग्जसह तुमची Google अ‍ॅपची इतर सेटिंग्ज बदलू शकता. काही Google अ‍ॅप सेटिंग्ज ही तुमच्या डिव्हाइसच्या गडद थीम यांसारख्या सेटिंग्जवर आधारित आहेत. 

सेटिंग्ज मेनू उघडा

  1. Google अ‍ॅप Google Search उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर Search शोध वर टॅप करा.
  3. सेटिंग शोधा.

तुम्ही बदलू शकत असलेली सेटिंग्ज

साधारण

या गोष्टी करण्यासाठी ही वैशिष्ट्ये सुरू करा:

  • Search कस्टमायझेशन: तुम्ही साइन आउट केलेले असताना Google ला तुमच्या शोधांवर आधारित आणखी उपयुक्त शिफारशी आणि परिणाम तुम्हाला देऊ द्या.
  • Discover: Google ॲपमध्ये तुमच्या स्वारस्यांशी संबंधित स्टोरी मिळवा.
  • डेटा सेव्हर: तुमच्या डेटाची बचत करण्यात मदत करण्यासाठी Discover यांसारखी काही वैशिष्ट्ये वारंवार रिफ्रेश होऊ देऊ नका.
  • ट्रेंडिंग शोधांसह ऑटोकंप्लीट करा: स्थानिक किंवा सध्याच्या शोधांसह शोध परिणाम आणखी जलद मिळवा.
  • ऑफलाइन शोधांचा नेहमी पुन्हा प्रयत्न करा: तुम्ही इंटरनेटशी कनेक्ट केलेले नसताना शोध सुरू करा. तुम्ही पुन्हा कनेक्ट केल्यावर, Google परिणाम मिळवेल आणि तुम्हाला सूचित करेल.
  • अ‍ॅपमध्ये वेबपेज उघडा: तुम्ही फीडमधील शोध परिणाम किंवा स्टोरी उघडता तेव्हा Google अ‍ॅपमध्ये रहा.
  • व्हिडिओ पूर्वावलोकन ऑटोप्ले करा: व्हिडिओ आवाजाशिवाय आपोआप प्ले करा.
  • टोपणनावे: तुमच्या संपर्कांना टोपणनावे जोडा जेणेकरून, तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला ते सहजरीत्या सापडतील.
  • स्क्रीनशॉट संपादित आणि शेअर करा: Google ॲप मधून बाहेर न पडता स्क्रीनशॉट संपादित व शेअर करा.
  • शोध विजेटमधील डूडल: डूडल कधीकधी तुमच्या Google अ‍ॅपच्या शोध बारमध्ये दिसतील. ती सुट्ट्या यांसारख्या विशिष्ट कार्यक्रमांसाठी तात्पुरती आहेत.
सूचना
  • सूचना: तुम्ही तुमची Google अ‍ॅप सूचना सेटिंग्ज बदलू शकता किंवा Google अ‍ॅप सूचना सुरू किंवा बंद करू शकता. तुमच्या Google सूचना कशा बदलाव्या याविषयी जाणून घ्या.
  • Google Assistant: प्रोअ‍ॅक्टिव्ह किंवा शिफारशींसारख्या Google Assistant सूचना सुरू किंवा बंद करा.
  • इतर: प्रवासासंबंधी सूचना, रिमाइंडर किंवा हवामानासंबंधी अपडेट यांसारख्या सूचना सुरू किंवा बंद करा.
भडक परिणाम लपवा
सुरक्षितशोध: तुमच्या शोध परिणामांमधून भडक आशय फिल्टर करा. सुरक्षितशोध याबाबत अधिक जाणून घ्या.
वैयक्तिक परिणाम

तुमच्या Google खाते मधील माहितीवर आधारित तुम्ही Search मध्ये वैयक्तिक परिणाम मिळवण्याचे निवडू शकता. Search मधील वैयक्तिक परिणामांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

Google Assistant
  • वैयक्तिक माहिती: तुमची ठिकाणे, पेमेंट पद्धत आणि हवामान प्राधान्ये सेट करा. तुमच्या Google खात्यातून रेस्टॉरंट, फ्लाइट आणि इतर आरक्षणे पाहण्यासाठी आरक्षणे वर टॅप करा.
  • Assistant:तुमची भाषा प्राधान्ये, दिनचर्या आणि ईमेल अपडेट्स सेट करा.
  • सेवा: तुमचा टीव्ही, स्पीकर किंवा स्ट्रीमिंग सेवा तुमच्या Google असिस्टंटशी कनेक्ट करा.
  • होम: तुमचे Google Home कनेक्ट करा.
Voice

व्हॉइस शोध आणि व्हॉइस कृती नियंत्रित करणारी सेटिंग्ज बदला.

  • भाषा: व्हॉइस शोध परिणाम तुमच्या व्हॉइस शोधाच्याच भाषेत मिळतात.
  • बोललेले परिणाम:तुम्हाला तुमच्या काही किंवा सर्व व्हॉइस शोधांना बोलून दिलेला प्रतिसाद ऐकायचा असल्यास, तुम्ही हे ठरवू शकता.
  • Ok Google: तुम्ही कोणत्या स्क्रीनमधून "Ok Google" म्हणू शकता ती स्क्रीन निवडा. Ok Google विषयी अधिक जाणून घ्या.
  • ब्लूटूथ हेडसेट: तुमचा ब्लूटूथ हेडसेट कनेक्ट केलेला असताना तुमचा आवाज वापरा.
भाषा आणि प्रदेश
  • भाषा शोधा: तुमच्या शोध परिणामांसाठी भाषा निवडा. हे सेटिंग तुम्हाला शोध परिणाम पाहण्यासाठी आणखी भाषा निवडू देते.
  • प्रदेश शोधा: तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुमचे परिणाम तुमच्या सद्य प्रदेशावर कस्टमाइझ केले जातात. तुम्ही इतर देशांचे निकाल पाहणे निवडू शकता.
खाते

Google अ‍ॅपमधून तुमचे Google खाते काढून टाका

महत्त्वाचे: तुम्ही तुमच्या डिव्हाइसमधून Google खाते काढून टाकता तेव्हा, ते खाते तुमच्या डिव्हाइसवरील सर्व Google अ‍ॅप्स आणि सेवांमधून काढून टाकले जाते.
  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google अ‍ॅप Google Search उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर या डिव्हाइसवरील खाती व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  3. Google खाते आणि त्यानंतर खाते काढून टाका वर टॅप करा.

तुमचे Google खाते हटवा

शोध विजेट

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य युरोपिअन इकॉनॉमिक एरिया (EEA) मध्ये १ मार्च २०२० रोजी किंवा त्यानंतर वितरित केलेल्या नवीन डिव्हाइसवर उपलब्ध आहे.

Google वर स्विच करा: तुमच्या होम स्क्रीन Search विजेटवरील डीफॉल्ट शोध इंजीन Google वर बदला.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
16792500983910513854
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false