सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुम्ही व्यवस्थापित करत असलेली खाती, डिव्हाइस आणि नेटवर्कसाठी सुरक्षितशोध लॉक करणे

तुम्ही खाती, डिव्हाइस किंवा नेटवर्क व्यवस्थापित केल्यास, सुरक्षितशोध तुम्हाला Google शोध परिणामांमधून लैंगिकदृष्ट्या भडक आशय फिल्टर करण्यात मदत करू शकते. तुम्हाला सुरक्षितशोध सुरू ठेवायचे असल्यास आणि वापरकर्त्यांना सेटिंग बदलण्यापासून रोखायचे असल्यास, तुम्ही सुरक्षितशोध लॉक करू शकता.

महत्त्वाचे: हा लेख, इतरांसाठी सुरक्षितशोध सेटिंग्ज व्यवस्थापित करणाऱ्या लोकांसाठी आहे. तुमच्या वैयक्तिक खात्यासाठी सुरक्षितशोध सेटिंग्ज बदलण्यासाठी, सुरक्षितशोध वापरून भडक परिणाम फिल्टर किंवा ब्लर करणे यासाठी पायऱ्या फॉलो करा.

तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी सुरक्षितशोध लॉक करू शकता

  • तुम्ही पालक किंवा शाळा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून व्यवस्थापित करत असलेली खाती
  • तुम्ही Chromebook, Windows, Mac आणि Linux यांच्या समावेशासह व्यवस्थापित करत असलेली डिव्हाइस
  • तुम्ही शाळा, ऑफिस किंवा घरी व्यवस्थापित करत असलेली नेटवर्क

तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या डिव्हाइससाठी सुरक्षितशोध लॉक करा

तुम्ही Family Link वापरून तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसचे पर्यवेक्षण करत असल्यास
तुम्ही लहान मुलाच्या Google कुटुंब गट यामध्ये पालक असल्यास, तुमच्या लहान मुलाच्या खात्यासाठी सुरक्षितशोध सुरू ठेवू शकता. शोध आणि तुमच्या लहान मुलाच्या Google खाते विषयी अधिक जाणून घ्या.
तुम्ही Google Workspace for Education द्वारे डिव्हाइस व्यवस्थापित करत असल्यास

तुम्ही Google Workspace for Education चे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर असल्यास, वयानुसार Google सेवांमधील अ‍ॅक्सेस नियंत्रित कसा करावा ते जाणून घ्या.

तुम्ही Chromebook व्यवस्थापित करत असल्यास
तुम्ही Google ॲडमिन कन्सोलवरून Chrome धोरणे व्यवस्थापित करणारे ॲडमिन असल्यास, तुम्ही डिव्हाइस पातळीवर सुरक्षितशोध प्राधान्ये सेट करू शकता. वापरकर्ते किंवा ब्राउझरसाठी Chrome धोरणे कशी सेट करायची ते जाणून घ्या.
तुम्ही Mac, Windows किंवा Linux डिव्हाइस व्यवस्थापित करत असल्यास

PC किंवा Macbook यांसारख्या तुम्ही व्यवस्थापित करत असलेल्या दुसर्‍या डिव्हाइसवर तुम्हाला सुरक्षितशोध लॉक करायचे असल्यास, तुम्ही forcesafesearch.google.com वर Google मॅप करू शकता.

तुमच्याकडे टेक्निकल बॅकग्राउंड असल्यास, या पर्यायाची शिफारस केली जाते.

Google डोमेनना forcesafesearch.google.com वर मॅप करा

ही पद्धत HTTPS द्वारे सुरक्षित कनेक्शनची परवानगी देताना तुमच्या नेटवर्कवरील सर्व वापरकर्त्यांना Google Search वर सुरक्षितशोध वापरण्याची सक्ती करण्यास सुरक्षितशोध VIP चा फायदा देते. सुरक्षितशोध VIP मधील VIP म्हणजे Virtual IP हा एक आयपी अ‍ॅड्रेस आहे जो अनेक Google सर्व्हरवर अंतर्गत राउट केला जाऊ शकतो. आम्ही पुढील गोष्टींच्या समावेशासह या VIP वर आम्हाला मिळालेल्या सर्व विनंत्यांसाठी सुरक्षितशोध परिणाम देऊ:

  • Google Search
  • इमेज शोध
  • व्हिडिओ शोध

हे तुमच्या डिव्हाइसवरील सर्व ब्राउझरवर काम करते आणि डिव्हाइसवरील अ‍ॅडमिनिस्ट्रेटर असलेले वापरकर्ते हा बदल पहिल्यासारखा करू शकतात. हा बदल करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा:

Windows मध्ये

तुमची होस्ट फाइल उघडा

  1. Windows मध्ये, Windows की वर क्लिक करा.
  2. नोटपॅड एंटर करा.
  3. नोटपॅड आणि त्यानंतर अ‍ॅडमिनिस्ट्रेटर म्हणून रन करा वर राइट क्लिक करा.
    • तुम्हाला बदल करायचे आहेत का असे Windows विचारेल, तेव्हा होय वर क्लिक करा.
  4. नोटपॅडमध्ये तुमच्या होस्टची फाइल उघडा.
    • बर्‍याच Windows इन्स्टॉलेशनमध्ये, हे C:\Windows\System32\drivers\etc\hosts येथे असते

तुमची होस्ट फाइल सेव्ह करणे

  1. "कमांड प्रॉम्प्ट" उघडण्यासाठी, सुरू करा मेनूवर क्लिक करा.
  2. cmd एंटर करा.
  3. एंटर प्रेस करा.
  4. ping forcesafesearch.google.com ही कमांड एंटर करा.
    • आयपी अ‍ॅड्रेसची नोंद घ्या.
    • उदाहरणार्थ, आयपी अ‍ॅड्रेस असा दिसेल: 216.239.38.120.
  5. तुम्हाला मिळालेल्या आयपी अ‍ॅड्रेससह होस्ट फाइलच्या शेवटी एंट्री तयार करा. उदाहरणार्थ: 216.239.38.120 www.google.com #forcesafesearch.
    • तुमचे वापरकर्ते वापरू शकणार्‍या कोणत्याही अन्य Google देश किंवा प्रदेश डोमेनसाठी ही ओळ कॉपी करा, जसे की www.google.co.uk.
  6. होस्ट फाइल सेव्ह करा.

सुरक्षितशोध फिल्टर करणे सुरू आहे याची खात्री करण्यासाठी, google.com/safesearch वर जा. सुरक्षितशोध फिल्टर करणे हे बाय डीफॉल्ट सुरू आहे का ते तपासा आणि ते बंद केले जाऊ शकत नाही.

टीप: तुमच्या काँम्प्युटरवर Windows एखाद्या वेगळ्या ठिकाणी इंस्टॉल केले गेले असल्यास, कमांड प्रॉम्प्टवर पुढील कमांड एंटर करून तुम्ही होस्ट फाइल शोधू शकता: cd /d %systemroot%\system32\drivers\etc.

MacOS वर
  1. टर्मिनल उघडा.
  2. ping forcesafesearch.google.com ही कमांड एंटर करा.
    • आयपी अ‍ॅड्रेसची नोंद घ्या.
    • उदाहरणार्थ, आयपी अ‍ॅड्रेस असा दिसेल: 216.239.38.120.
  3. sudo nano /private/etc/hosts ही कमांड एंटर करा.
  4. तुम्हाला मिळालेल्या आयपी ॲड्रेससह होस्ट फाइलच्या शेवटी एंट्री तयार करा. उदाहरणार्थ: 216.239.38.120 www.google.com #forcesafesearch.
    • तुमचे वापरकर्ते वापरू शकणार्‍या कोणत्याही अन्य Google देश किंवा प्रदेश डोमेनसाठी ही ओळ कॉपी करा, जसे की www.google.co.uk.
  5. होस्ट फाइल सेव्ह करा.

सुरक्षितशोध फिल्टर करणे सुरू आहे याची खात्री करण्यासाठी, google.com वर जा. सुरक्षितशोध फिल्टर करणे हे बाय डीफॉल्ट सुरू आहे का ते तपासा आणि ते बंद केले जाऊ शकत नाही.

Linux वर
  1. टर्मिनल उघडा.
  2. ping forcesafesearch.google.com ही कमांड एंटर करा.

    • आयपी अ‍ॅड्रेसची नोंद घ्या.
    • उदाहरणार्थ, आयपी अ‍ॅड्रेस असा दिसेल: 216.239.38.120.
  3. sudo nano /etc/hosts ही कमांड एंटर करा.
  4. तुम्हाला मिळालेल्या आयपी ॲड्रेससह होस्ट फाइलच्या शेवटी एंट्री तयार करा. उदाहरणार्थ: 216.239.38.120 www.google.com #forcesafesearch.
    • तुमचे वापरकर्ते वापरू शकणार्‍या कोणत्याही अन्य Google देश किंवा प्रदेश डोमेनसाठी ही ओळ कॉपी करा, जसे की www.google.co.uk.
  5. होस्ट फाइल सेव्ह करा.

सुरक्षितशोध फिल्टर करणे सुरू आहे याची खात्री करण्यासाठी, google.com वर जा. सुरक्षितशोध फिल्टर करणे हे बाय डीफॉल्ट सुरू आहे का ते तपासा आणि ते बंद केले जाऊ शकत नाही.

शाळा, ऑफिस किंवा होम नेटवर्कसाठी सुरक्षितशोध लॉक करणे

तुम्ही शाळा, ऑफिस किंवा होम नेटवर्क व्यवस्थापित करत असल्यास, तुमचे नेटवर्क वापरणाऱ्या सर्व ब्राउझर आणि डिव्हाइससाठी सुरक्षितशोध फिल्टर करण्याची सक्ती करू शकता. हे सुरक्षितशोध व्हर्च्युअल आयपी ॲड्रेसला तुम्ही कॉंफिगरेशनमध्ये समाविष्ट केलेल्या सर्व Google डोमेनवर लागू करते आणि हे ब्राउझर पातळीवर पहिल्यासारखे केले जाऊ शकत नाही.

तुमच्या नेटवर्कसाठी सुरक्षितशोध फिल्टर करणे सुरू ठेवण्याची सक्ती करण्याकरिता:

  • तुम्हाला तुमचे DNS कॉंफिगरेशन अपडेट करावे लागेल.
  • www.google.com (आणि तुमचे वापरकर्ते वापरू शकतील असे इतर Google देश किंवा प्रदेश डोमेन) साठी forcesafesearch.google.com करिता DNS एंट्री CNAME म्हणून सेट करा.

लैंगिकदृष्ट्या भडक आशयाची तक्रार करणे

तुम्ही सुरक्षितशोध सुरू केले असल्यास आणि तुम्हाला भडक आशय सापडल्यास, तुम्ही आशयाची तक्रार करणे हे करू शकता.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
477798304933782724
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false