सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

Google वर तुम्हाला मिळणाऱ्या माहितीचे मूल्यांकन करा

ऑनलाइन भरपूर माहिती उपलब्ध असल्याने तुम्हाला आढळलेल्या माहितीचे मूल्यमापन करणे कठीण असू शकते. तुम्हाला ऑनलाइन आढळलेल्या आशयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही या टिपा वापरू शकता.

स्रोताबद्दल अधिक जाणून घ्या

तुम्ही ऑनलाइन माहिती शोधता, तेव्हा स्रोताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही Google चा वापर करू शकता. तुम्ही विचारात घेऊ शकता अशा काही गोष्टी:

  • स्रोत काय आहे
  • त्याला विषयाचे ज्ञान आहे का
  • तो ही माहिती का शेअर करत आहे

स्रोताचे मूल्यांकन कसे करायचे याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी या टिपा वापरा. 

स्रोताबद्दल इतर लोक काय म्हणतात ते जाणून घ्या

तुम्ही माहिती शोधत असताना, तुम्हाला अपरिचित असलेल्या किंवा अधिक जाणून घ्यायचे आहे अशा परिणामांचा स्रोत तपासा. तुम्ही "या परिणामाबद्दल" हे वापरू शकता किंवा -साइट शोध घेऊ शकता.

महत्त्वाचे: "या परिणामाबद्दल" हे फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

"या परिणामाबद्दल" यासारखी वौशिष्ट्ये ही तुम्हाला पुढील गोष्टींबाबत मदत करू शकतात:

  • उच्च गुणवत्तेचे ऑनलाइन विश्वकोश हे स्रोताबद्दल काय म्हणतात
  • स्रोत स्वतःचे वर्णन कसे करतो
  • इतर साइट या स्रोताबद्दल काय म्हणतात

“या परिणामाबद्दल” हे वापरून स्रोताबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही -साइट शोध देखील घेऊ शकता. हा शोध पर्याय तुमच्या शोध परिणामांमधून स्रोताच्या साइटवरील पेज काढून टाकतो. उदाहरणार्थ, इतर स्रोतांकडून जागतिक आरोग्य संघटना (WHO) बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटना (WHO) -साइट:who.int शोधा.

टीप: तुम्ही स्रोताबाबत शोध घेता, तेव्हा तुम्हाला नेहमीच अनेक परिणाम मिळतील असे नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो की स्रोत नवीन आहे, प्रसिद्ध नाही किंवा त्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही.

लेखक शोधा

आशयाच्या स्रोताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, लेखकाबाबत किंवा ते संलग्न असलेल्या संस्थेबाबत Google वर शोधा. त्यांनी आणखी काय लिहिले आहे किंवा इतर लोक त्यांच्याबद्दल काय म्हणतात याबद्दलची माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. तुमच्या शोधामध्ये तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • लेखक आणि संस्थेच्या विश्वासार्हतेचे किंवा कौशल्याचे मूल्यांकन करणे.
  • अधिक जाणून घेण्यासाठी आणि माहितीचे अतिरिक्त स्रोत शोधण्यासाठी ऑनलाइन विश्वकोश सारख्या उच्च गुणवत्तेच्या स्रोतांचा वापर करणे.
  • ते कोणत्या गोष्टी पोस्ट करतात हे समजून घेण्यासाठी सोशल मीडिया खाती पाहणे.
प्रकाशन तारखेवरून जाणून घ्या

उपलब्ध असल्यास, तुम्ही प्रकाशनाच्या तारखेच्या आधारावर आशयाच्या संबंधाचे मूल्यांकन करू शकता. तुम्ही विचारात घेऊ शकता अशा काही गोष्टी:

  • जुनी माहिती ही कालांतराने बदलणाऱ्या विषयांसाठी कदाचित तितकीशी संबंधित असणार नाही. 
  • वेबवर उपलब्ध असलेल्या माहितीची गुणवत्ता ही काळानुसार सुधारते. अलीकडील घटना आणि वैद्यकीय परिस्थिती व उपचारांसारख्या विषयांबद्दल विश्वसनीय माहिती प्रकाशित करण्यासाठी स्रोतांना वेळ लागू शकतो.

तुम्ही शोधता, तेव्हा Google काही परिणामांच्या पुढे अंदाजे अपडेट किंवा प्रकाशनाची तारीख दाखवू शकते. "या परिणामाबद्दल" वर, "या पेजबद्दल अधिक माहिती" लिंक ही साइट Google द्वारे पहिल्यांदा अनुक्रमित केल्याची तारीखदेखील पुरवते. संबंध आणि विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्यासाठी तुम्ही या तारखांचा वापर करू शकता.

स्रोतासंबंधित माहितीचे पॅनल पहा

काही परिणामांच्या पुढे, माहिती कुठून येते याबद्दल तपशील देणारी माहिती पॅनल आहेत.

  • काही विषयांवर, जसे की आरोग्याशी संबंधित विषय यांवर, तुम्हाला आशय कुठून आला आहे हे समजण्यात मदत करू शकणारी, स्रोताविषयी संदर्भ असलेली माहिती पॅनल आढळतील.
  • माहिती पॅनल ही आशयासाठी निधी कुठून येतो याचे स्पष्टीकरण देऊ शकतात, जसे की सरकारी किंवा सार्वजनिक निधी.

इमेजबद्दल अधिक जाणून घ्या

“इमेज बद्दल” विभागामध्ये पेजवरील इमेजबद्दलच्या माहितीचा समावेश असतो. हे “इमेज बद्दल पेज" च्या लिंकसह Google ने इमेज सर्वप्रथम कधी पाहिली ते दाखवते. इमेजबद्दल अधिक जाणून घ्या.

विषयाबद्दल इतर लोक काय म्हणतात ते पहा

तुम्ही स्रोताचे मूल्यांकन केल्यानंतर, माहिती किती विश्वासार्ह आहे हे ठरवण्यासाठी विषयाबद्दल इतर स्रोत काय म्हणतात याचेदेखील मूल्यांकन करू शकता. उदाहरणार्थ, काही साइट माहिती कॉपी करतात आणि ती स्वतः तपासत नाहीत, ज्यामुळे खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती शेअर होते. विषयाचे मूल्यांकन कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी या टिपा वापरा.

विषयाबद्दल इतर लोक काय म्हणतात ते जाणून घ्या

Search मध्ये अशी टूल आणि वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला एखाद्या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, "या परिणामाबद्दल" हे तुम्हाला पुढील गोष्टींबाबत मदत करू शकते:

  • विषयाबद्दल इतर स्रोत काय म्हणतात ते पाहणे
  • संबंधित बातम्यांचे कव्हरेज शोधणे

"या परिणामाबद्दल" हे वापरून विषयाबद्दल अधिक जाणून घ्या.

विषयाबद्दल इतर मार्गांनी माहिती शोधा

तुम्हाला हवी असलेली माहिती न मिळाल्यास, उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी विषय हा विविध प्रकारे शोधा. पुढील काही गोष्टी तुम्ही विचारात घेऊ शकता:

  • साधारण गोष्टींबद्दल शोधण्यास सुरुवात करून, त्यानंतर आणखी नेमक्या गोष्टींबद्दल शोधणे.
  • न्यूट्रल संज्ञा वापरणे. उदाहरणार्थ, मांजरी चांगल्या पाळीव प्राणी आहेत का याऐवजी मांजरींना पाळीव प्राणी म्हणून शोधणे.
  • प्रत्येक परिणामामध्ये तुमच्या कोणत्या शोध संज्ञा दिसल्या आहेत हे तपासण्यासाठी "या परिणामाबद्दल" हे वापरणे (उदाहरणार्थ, "मांजरी" आणि "चांगले" विरुद्ध "मांजरी" आणि "वाईट").
  • वेगवेगळ्या शोध संज्ञा वापरून पाहणे.
  • तुम्ही एखाद्या विषयाबद्दल एकाहून अधिक शोध घेऊन पाहिल्यास आणि अनेक संबंधित परिणाम न मिळाल्यास, विषय खूप नवीन असू शकतो किंवा त्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नसू शकते. कदाचित तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि नंतर पुन्हा शोधावे लागेल.
  • फक्त टॉप परिणाम नाही, तर अनेक स्रोतांचे परिणाम एक्सप्लोर करणे.
अलीकडील माहिती शोधण्यासाठी बातमी स्रोत पहा

विषयाबद्दल बातमी स्रोत काय म्हणतात ते शोधा. Google हे अधिकृत स्रोतांकडून वेळेवर मिळणाऱ्या बातम्यांच्या परिणामांना प्राधान्य देते, ज्यामुळे तुम्हाला उपयुक्त परिणाम अधिक जलद मिळण्यात मदत होऊ शकते. विषयाशी संबंधित माहितीची पडताळणी करण्यासाठी तुम्ही बातमी स्रोत वापरू शकता. या टिपा वापरून पहा:

  • विषयाशी संबंधित बातमीबाबतचे लेख शोधण्यासाठी तुम्हाला मदत करण्याकरिता, Google Search अंतर्गत शोध बारच्या खाली News पहा.
  • अतिरिक्त बातम्या आउटलेटमधून आशय आणि पार्श्वभूमी शोधण्यात मदत करण्यासाठी, Google News वर, पूर्ण कव्हरेज निवडा.
  • एखाद्या समस्येवर लेखकाचा दृष्टीकोन मांडणारे मत लेखदेखील तुम्हाला मिळू शकतात. लेख हा मत असल्यास अनेकदा "मत" लेबल असेल.
  • Google Search मधील “टॉप बातम्या” हा विभाग वापरा. Google ला शोध क्वेरी ही बातम्यांशी संबंधित असल्याचे आढळते, तेव्हा ते दाखवण्यासाठी संबंधित, दर्जेदार बातम्यांच्या आशयासोबत शोध जुळवते.
तथ्य तपासणी वापरा

काही विषयांसाठी स्वतंत्र संस्थांकडून तथ्य तपासणीशी संबंधित माहिती दाखवली जाते. Google उत्पादनांमध्ये, विषयाशी संबंधित तथ्य तपासणार्‍यांचे लेख असतील, तेव्हा तुम्हाला तथ्य तपासणी स्निपेट किंवा माहिती पॅनल आढळू शकतात. तुम्हाला विश्वासार्ह माहिती शोधण्यात मदत होण्यासाठी तुम्ही तथ्य तपासणाऱ्यांचा आशयदेखील शोधू शकता.

Google तथ्य तपासणी एक्स्प्लोरर बद्दल अधिक जाणून घ्या.

विषयासंबंधित माहितीची पॅनल पहा

काही Google उत्पादनांवर, तुम्हाला विषयाबद्दल अधिक स्पष्टीकरण देणारी माहिती पॅनल आढळू शकतात. माहिती पॅनलमध्ये पुढील गोष्टी दिसू शकतात:

  • अजूनही विकसित होत असलेले विषय.
  • स्वतंत्र संस्थांद्वारे तथ्य तपासणीच्या लिंक.
  • संदर्भ लेखांच्या लिंक.

या लेखातील माहितीबद्दल

या टिपा पुढील गोष्टींद्वारे प्रेरित आहेत:

  • स्टॅनफोर्ड हिस्ट्री एज्युकेशन ग्रुप यांनी तयार केलेला सिव्हिक ऑनलाइन रिझनिंग (COR) अभ्यासक्रम
  • माइक कौलफिल्ड यांनी विकसित केलेले SIFT फ्रेमवर्क
  • डॅना थॉमसन यांनी विकसित केलेले डिजिटल इमेज गाइड (DIG) फ्रेमवर्क

हे स्रोत, विश्वसनीय स्रोत कसे शोधायचे, चुकीची माहिती कशी शोधायची आणि तुम्हाला ऑनलाइन आढळलेल्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी किंवा ते नाकारण्यासाठी पुरावे कसे मिळवायचे यासंबंधित धोरणे पुरवतात. या पेजवरील मार्गदर्शन अधिक उपयुक्त करण्यासाठी Google संशोधन करणे आणि जगभरातील तज्ञांचा सल्ला घेणे पुढे सुरू ठेवते.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
17354022518473638000
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false