सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीसोबत Search कसे काम करते

तुम्ही Google वर शोधता तेव्हा, तुम्हाला आणखी उपयुक्त अनुभव देण्यात आम्हाला मदत करण्यासाठी कधीकधी तुमच्या मागील शोधांचा आणि इतर माहितीचा समावेश केला जातो.

उदाहरणार्थ, तुम्ही चॉकलेट केकविषयी शोधल्यास आणि त्यानंतर पुन्हा “कसे तयार करावे” असे शोधल्यास, तुम्ही “चॉकलेट फ्रॉस्टिंग कसे तयार करावे” हे शोधत आहात असे Google ने पूर्वानुमान लावण्याची शक्यता जास्त असेल. ही पूर्वानुमाने तुम्हाला आणखी चांगले परिणाम देण्यासाठी आणि तुम्ही जेथे सोडले होते तेथून पुन्‍हा सुरू करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या मागील शोधांवर आधारित आहेत.

तुम्हाला कार्यक्रम, पाहण्यासारखे चित्रपट आणि शो, तुमच्या Discover फीडमधील वेब पेज व आणखी बऱ्याच गोष्टींसाठी पर्सनलाइझ केलेल्या शिफारशीदेखील मिळू शकतात. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल नुसार, या शिफारशी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेल्या यांसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित असतात:

  • Google वरील तुमचा शोध इतिहास
  • तुम्ही क्लिक केलेले Search वरील परिणाम किंवा जाहिराती
  • तुम्ही लाइक किंवा डिसलाइक केलेला Discover आशय
शोध परिणाम कसे काम करतात

तुमच्या बहुतांश शोधांसाठी, त्याच स्थानावरून तीच क्वेरी शोधणाऱ्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मिळतील तेच परिणाम तुम्हाला मिळतील.

तुम्ही तुमच्या Google खाते मध्ये साइन इन केले असेल तेव्हा, Google Search मधील काही वैशिष्ट्ये ही पर्सनलाइझ केलेला आशय दाखवू शकतात. येथे काही उदाहरणे दिली आहेत:

हा पर्सनलाइझ केलेला आशय तुमच्या वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी वर आधारित असू शकतो, ज्यामध्ये तुमच्या शोध इतिहासाचा समावेश आहे. तुम्ही अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल मध्ये वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी कधीही बंद करू शकता.

यांपैकी काही वैशिष्ट्ये तुम्ही साइन आउट केले असतानादेखील काम करतील जसे की, तुमच्या अलीकडील शोधांसंबंधित ऑटोकंप्लीट पूर्वानुमाने. ऑटोकंप्लीट पूर्वानुमाने कशी काम करतात हे जाणून घ्या.

Google तुमच्या डेटाचे संरक्षण कसे करते
  • स्पॅम, मालवेअर, व्हायरस आणि हॅकर यांसारखे धोके शोधण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी, तुमच्या Google खाते मध्ये बिल्ट-इन सुरक्षा असते.
  • उद्योगातील आघाडीचे एंक्रिप्शन वापरून, तुमची अ‍ॅक्टिव्हिटी सुरक्षितपणे स्टोअर केली जाते.
  • प्रत्येक Google खाते ची स्वतःची अ‍ॅक्टिव्हिटी असते. तुमच्याकडे एकाहून अधिक Google खाती असल्यास, प्रत्येक खात्यामधील अ‍ॅक्टिव्हिटी वेगळी ठेवली जाते.
  • आम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही विकत नाही.
  • कीवर्ड आणि इतर निकषांवर जाहिरातदार बोली लावतात तेव्हा, वापरकर्ते कोण आहेत हे उघड न करता Google हे वापरकर्त्यांना जाहिराती दाखवते. तुम्ही एंटर केलेली शोध संज्ञा आणि तुमची स्वारस्ये यांसारख्या तुमच्याविषयीच्या काही गोष्टी Google ला माहीत असण्यावर हे अवलंबून असले तरीही, जाहिरातदाराला फक्त त्याच्या लक्ष्यीकरण निकषाची पूर्तता झाल्याचे कळते, पण ती पूर्तता कोणत्या वापरकर्त्यांनी केली ते कळत नाही.

🔍

तुमचा शोध इतिहास कसा नियंत्रित करावा

तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला शोध इतिहास नियंत्रित आणि व्यवस्थापित करा

तुम्ही Google वर वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केलेली असताना शोधता तेव्हा, Google हे तुमचा शोध इतिहास यासारखी ॲक्टिव्हिटी तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करते. तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला शोध इतिहास नियंत्रित आणि व्यवस्थापित करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुमच्या शोध इतिहासाचा काही भाग किंवा संपूर्ण शोध इतिहास मॅन्युअली हटवणे
  • तुमचा शोध इतिहास हा ३ किंवा १८ महिने यांसारख्या ठरावीक कालावधीनंतर आपोआप हटवणे
  • तुमचा शोध इतिहास सेव्ह करणे थांबवणे
  • तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल वापरून तुमच्या Google खाते मध्ये कोणता डेटा सेव्ह केला जातो हे निवडणे

तुमचा शोध इतिहास कसा नियंत्रित आणि व्यवस्थापित करावा हे जाणून घ्या.

तुमच्या डिव्हाइसवर सेव्ह केलेला शोध इतिहास व्यवस्थापित करा

तुमचा शोध इतिहास तुमच्या डिव्हाइसवरदेखील सेव्ह केला जाऊ शकतो. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकते:

  • तुमच्या ब्राउझरने स्टोअर केलेला इतिहास
  • तुमच्या Google खाते मधून साइन आउट केले असताना सेव्ह केलेले Google ॲपमधील शोध
  • Google शोध बारमधील अलीकडील अ‍ॅक्टिव्हिटी
  • Google ॲपमधील अलीकडील शोध क्वेरी

तुमचा शोध इतिहास कसा नियंत्रित आणि व्यवस्थापित करावा हे जाणून घ्या.

टीप: तुम्ही Chrome आणि Google अ‍ॅप मध्ये गुप्त मोडमध्येदेखील शोधू शकता किंवा इतर ब्राउझरवर खाजगी ब्राउझिंग मोड वापरू शकता. Chrome चा गुप्त मोड तुमचे ब्राउझिंग कसे खाजगी ठेवतो हे जाणून घ्या.

तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केलेला तुमचा शोध इतिहास डाउनलोड करा

तुम्ही तुमचा Google डेटा डाउनलोड करणे हेदेखील कधीही करू शकता, ज्यामध्ये तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटी डेटाचा भाग म्हणून तुमच्या शोध इतिहासाचादेखील समावेश आहे. तुमचा Google डेटा कसा डाउनलोड करावा हे जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8647641480691704662
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false