सूचना

Users can now migrate Google Podcasts subscriptions to YouTube Music or to another app that supports OPML import. Learn more here

शोध टिपा आणि परिणाम हे तुमच्या Google वरील शोधाशी कसे संबंधित असतात ते जाणून घ्या

“या परिणामाविषयी” या पॅनलच्या “तुमचा शोध आणि हा परिणाम” या विभागामध्ये तुम्ही Google वरील तुमच्या शोधासाठीच्या टिपा पाहू शकता. या विभागामध्ये तुमचा शोध आणि परिणाम यांमधील काही संबंध सूचीबद्ध केले आहेत.

एखाद्या परिणामाविषयी शोधाशी संबंधित माहिती पहा

  1. Google वर शोधण्यास सुरुवात करा.
  2. शोध परिणामासाठीच्या URL नंतर, आणखी निवडा.
  3. या परिणामाविषयी” या पॅनलमध्ये, “तुमचा शोध आणि हा परिणाम" वर स्क्रोल करा.
टीप: “तुमचा शोध आणि हा परिणाम” या विभागामध्ये Search संबंधित टिपा पाहण्यासाठी, अधोरेखित केलेल्या संज्ञांवर कर्सर फिरवा किंवा टॅप करा.

तुम्हाला मिळू शकेल अशी शोधाशी संबंधित माहिती आणि टिपा

“या परिणामाविषयी” या पॅनलमधील “तुमचा शोध आणि हा परिणाम” या विभागामध्ये तुमचा शोध, तुमची शोध सेटिंग्ज व एखादा परिणाम यांदरम्यान पुढीलपैकी एक किंवा त्याहून अधिक संबंध सूचीबद्ध केलेले असू शकतात.

शोध संज्ञा आणि संबंधित संज्ञा

उपयोगी परिणाम शोधण्यासाठी Google Search वापरते त्या घटकांपैकी शोध संज्ञा आणि कीवर्ड हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत.

साधारणतः, Google Search हे तुमच्या शोधामधील प्रत्येक शब्दाशी जुळणारा आशय शोधण्याचा प्रयत्न करते. पण, कधीकधी सर्वात उपयुक्त परिणामांमध्ये तुमच्या सर्व शोध संज्ञांसाठीच्या अचूक जुळण्या नसतात.

उदाहरणार्थ, कल्पना करा, की तुम्हाला एखादा कोट शोधायचा आहे, पण त्याचे नेमके शब्द आठवत नाहीत. योग्य कोट असलेल्या परिणामांपेक्षा तुमच्या समान प्रकारच्या संज्ञांशी अचूकपणे जुळणारे शोध परिणाम कमी उपयुक्त असतात. यामुळे Google Search हे तुम्ही एंटर केलेल्या संज्ञांपैकी फक्त काही संज्ञा असलेल्या परिणामांचा समावेश करू शकते.

इतर बाबतींमध्ये, अतिशय सुसंगत असलेल्या परिणामामध्ये तुमच्या नेमक्या संज्ञा कदाचित नसतील, पण त्यामध्ये संबंधित संज्ञा असतात. उदाहरणार्थ, jogging shoes साठीचा शोध हा असे परिणाम सूचीबद्ध करू शकतो, ज्यांमध्ये “jogging” चा समावेश नाही, पण “running” या संबंधित शब्दाचा समावेश आहे.

शोध संज्ञा कशा वापरल्या आहेत, हे “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग यांसारखी विधाने वापरून हायलाइट करतो: 

  • परिणामामध्ये या शोध संज्ञा दिसतात.
  • तुमच्या शोधाशी संबंधित संज्ञा या परिणामामध्ये दिसतात.
  • या परिणामामध्ये तुमच्या शोध संज्ञांशी संबंधित इमेज आहेत.
टीप: संज्ञेच्या जुळणीबाबत आणखी पर्यायांसाठी, प्रगत शोध वापरून पहा. कोट आणि वजा चिन्ह यांसारख्या शोध ऑपरेटरविषयी अधिक माहितीसाठी, वेब शोध कसे सुधारित करावेत हे जाणून घ्या.

संबंधित लिंक

सुसंगत असलेले शोध परिणाम मिळवण्याचा मार्ग म्हणून Google Search हे तपासते, की आशय हा वेबवरील इतर आशयाशी कसा लिंक होतो.  पेजवरील शब्दांच्या जुळण्यांसोबतच, Search हे पेजकडे निर्देश करणाऱ्या लिंकमधील मजकूर वापरते.  उदाहरणार्थ, अनेक लोक The Keyword ला "the google blog" असे म्हणतात.  तुम्ही the google blog शोधल्यास, तुम्हाला सर्वात वरती The Keyword दिसेल, कारण इतर वेबसाइट त्याच्याशी लिंक करताना त्याचे तसेच वर्णन करतात.

तुमचा शोध आणि परिणाम या गोष्टी वेब लिंकमुळे संबंधित असल्यास, “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग ते हायलाइट करतो: 

  • तुमच्या शोध संज्ञा असलेल्या इतर वेबसाइट या परिणामाशी लिंक होतात.
टीप: तुम्हाला एखाद्या साइटचे नाव आठवत नसल्यास, इतर लोक तिचे वर्णन जसे करतील तसे शोधून पहा.

वेबसाइट

तुमच्या शोधाशी सुसंगत असलेले पेज मिळवण्यासाठी, Google Search हे विशिष्ट वेबसाइटशी संबंधित शोध संज्ञा शोधते.  

विशिष्ट वेबसाइट शोधण्यासाठी तुमच्या शोध संज्ञा वापरल्या गेल्यास, तेव्हा “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग ते हायलाइट करतो: 

  • <domain.com> ही वेबसाइट तुमच्या शोध संज्ञांपैकी एक किंवा त्याहून अधिक शोध संज्ञांशी जुळते.
टीप: एखाद्या विशिष्ट वेबसाइटवरील परिणाम मिळवण्यासाठी, साइट किंवा डोमेनच्या आधी site: असे एंटर करा. उदाहरणार्थ, site:youtube.com किंवा परिणामांमधून एखादी वेबसाइट वगळायची असल्यास, वजा चिन्ह जोडा, जसे की -site:youtube.com. तुमचे वेब शोध कसे सुधारित करावेत याविषयी अधिक जाणून घ्या.

स्थान: शहर किंवा राज्य

काही शोध उपयुक्त ठरण्यासाठी स्थानिक माहिती किंवा परिणाम आवश्यक असतात. तुम्ही तुमचे स्थान शेअर केल्यास, तुमच्या अनुषंगाने स्थानिकरीत्या सुसंगत असलेले परिणाम शोधण्याकरिता Google Search ते वापरते किंवा तुमच्या साधारण भागाचा अंदाज लावते. तुमचे स्थान आणि Google Search याविषयी जाणून घ्या.

परिणाम एखाद्या शहराच्या किंवा राज्याच्या अनुषंगाने सुसंगत असल्यास, “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग ते हायलाइट करतो: 

  • हा परिणाम <location> जवळील शोधांशी सुसंगत आहे.

टीप: विशिष्ट स्थानावरील परिणाम मिळवण्यासाठी, तुमच्या शोधामध्ये ठिकाणाची नावे जोडा, जसे की car dealerships ऐवजी car dealerships fort lauderdale

देश/प्रदेश आणि भाषा

सहसा, उपयुक्त परिणाम हे Search सेटिंग्जमधील तुमच्या भाषेशी आणि प्रदेशाशी जुळतात. परंतु, कधीकधी Search हे इतर भाषांमधील किंवा प्रदेशांमधील उपयुक्त परिणाम ओळखू शकते. येथे दोनेक उदाहरणे दिली आहेत:

  • तुमची भाषा इंग्रजीवर सेट केलेली असल्यास, पण तुम्ही चीनीमध्ये शोधल्यास, सर्वात सुसंगत असलेले परिणाम चीनीमध्ये लिहिलेले असू शकतात.
  • तुम्ही यूएसमध्ये असून india news शोधल्यास, सर्वात सुसंगत असलेले परिणाम म्हणजे भारतातील आशय असू शकतो.  

“तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग परिणामाची भाषा आणि प्रदेश हायलाइट करतो:

  • हा परिणाम <language> मध्ये आहे.
  • हा परिणाम <language> मध्ये नसला, तरीही सुसंगत आहे असे वाटते.
  • हा परिणाम <region> येथील शोधांशी सुसंगत आहे असे वाटते.
  • हा परिणाम <region> सोबतच, अनेक प्रदेशांमधील शोधांशी सुसंगत आहे असे वाटते.
  • हा परिणाम सामान्यतः <region> बाहेरील शोधांसाठी दिसत असला, तरीही या शोधाशी सुसंगत आहे असे वाटते.

टीप: इतर भाषांमधील परिणाम मिळवायचे असल्यास, प्रगत शोध वापरून पहा. तुम्ही Search सेटिंग्ज येथे तुमची भाषा आणि प्रदेशदेखील बदलू शकता. तुमची भाषा कशी बदलावी ते जाणून घ्या आणि वेगळ्या देशासाठी परिणाम शोधा.

प्रकाशन तारीख

ट्रेंडिंग असलेला किंवा अलीकडील माहिती असलेला विषय तुम्ही शोधता, तेव्हा सर्वात सुसंगत असलेले आणि अलीकडे अपडेट अथवा प्रकाशित केलेले परिणाम पुरवण्यासाठी Google Search हे प्रकाशन तारीख वापरू शकते.

एखादा परिणाम अलीकडे प्रकाशित केला गेला असल्यास, “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग ते हायलाइट करतो: 

  • हा परिणाम अलीकडेच प्रकाशित केला गेला होता.
टीप: विशिष्ट कालावधीमध्ये प्रकाशित केलेले परिणाम शोधण्यासाठी, प्रगत शोध किंवा शोध साधने मधील फिल्टर वापरून पहा. फिल्टर वापरून शोध परिणाम मर्यादित कसे करावेत हे जाणून घ्या

आशयाचा प्रकार

काही शोधांच्या बाबतीत, इमेज, व्हिडिओ, नकाशे आणि आशयाचे इतर विशिष्ट प्रकार फायद्याचे ठरतात.  

एखादा आशयाचा प्रकार उपयुक्त असल्यास, “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग ते हायलाइट करतो, जसे की: 

  • तुमच्या शोधाच्या अनुषंगाने व्हिडिओ उपयुक्त असू शकतात.
  • नकाशा आणि संपर्क माहिती यांसारखी स्थानिक माहिती ही या शोधाच्या अनुषंगाने उपयुक्त असू शकते.
  • नोकरीचे पद आणि स्थान यांसोबतच, नोकरीच्या सूची तुमच्या शोधाच्या अनुषंगाने उपयुक्त असू शकतात.
टीप: इमेज किंवा व्हिडिओ यांप्रमाणे विशिष्ट प्रकारचा आशय शोधण्यासाठी, त्या शब्दांचा तुमच्या शोधामध्ये समावेश करा. फिल्टर वापरून शोध परिणाम मर्यादित कसे करावेत हे जाणून घ्या.

भडक परिणाम

Google Search हे तुमच्या शोधाशी सर्वात सुसंगत असलेले परिणाम देते. तुम्ही सुरक्षितशोध बंद केले असल्यास, परिणामांमध्ये भडक आशयाचा समावेश असू शकतो.

एखादा परिणाम भडक असल्यास, “तुमचा शोध आणि हा परिणाम” हा विभाग ते हायलाइट करतो: 

  • सुरक्षितशोध बंद आहे, त्यामुळे सुसंगत भडक परिणाम दाखवले जाऊ शकतात.
टीप: तुम्हाला तुमच्या शोध परिणामांमध्ये भडक आशय नको असल्यास, सुरक्षितशोध सुरू करा. सुरक्षितशोध याविषयी अधिक जाणून घ्या.

शोध आणि परिणाम यांमधील संबंध अस्पष्ट का वाटू शकतात

कधीकधी, “तुमचा शोध आणि हा परिणाम” या विभागामधील विधाने कदाचित योग्य वाटणार नाहीत. यामागील कारणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो: 

  • वेब पेज वारंवार बदलतात. शोध आणि परिणाम यांमधील संबंध हे या आशयाला दिलेल्या Google Search च्या शेवटच्या भेटीवर आधारित असतात व त्या भेटीनंतर पेज बदललेले असू शकते.  
  • Search ला वेब पेजची भाषा अचूकपणे निर्धारित करता आली नाही, विशेषतः त्यामध्ये एकाहून अधिक भाषा असल्यास.
  • संबंधित शब्द हा खरेतर तुमच्या शोधाच्या विशिष्ट संदर्भामध्ये संबंधित नाही.

“या परिणामाविषयी” वर फीडबॅक द्या

कोणती गोष्ट उपयुक्त आहे हे तुम्ही आम्हाला सांगू शकता किंवा समस्या नोंदवू शकता. यामुळे आम्हाला सर्वांसाठी Google Search मध्ये सुधारणा करण्यात मदत होते.

“या परिणामाविषयी” या पॅनलच्या तळाशी, या माहितीविषयी फीडबॅक पाठवा निवडा.

संबंधित स्रोत 

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2661267000900588765
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
100334
false
false