अलीकडे हटवलेले फोटो आणि व्हिडिओ रिस्टोअर करणे

अजूनही तुमच्या ट्रॅशमध्ये असलेले अलीकडे हटवलेले फोटो आणि व्हिडिओ तुम्ही रिस्टोअर करू शकता. कायमचे हटवलेले आयटम रिस्टोअर केले जाऊ शकत नाहीत.

बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ ६० दिवस तुमच्या ट्रॅशमध्ये राहतील. बॅक अप न घेतलेले फोटो आणि व्हिडिओ ३० दिवस तुमच्या ट्रॅशमध्ये राहतील. तुम्हाला फोटो आणि व्‍हिडिओ सापडत नसल्‍यास, तुमचा ट्रॅश तपासा. बॅकअप घेणे कसे सुरू करायचे ते जाणून घ्या.

तुमचे संग्रहण तपासा

तुमचा सापडत नसलेला आयटम तुम्ही संग्रहित केला असल्‍यास, तुम्‍ही तो संग्रहणातून काढू शकता म्‍हणजे तो तुमच्‍या Google Photos लायब्ररीमध्ये दिसेल.

तुमचे संग्रहण कसे तपासायचे आणि आयटम संग्रहणातून कसे काढायचे ते जाणून घ्या.

तुमचा ट्रॅश तपासा

तुमचा सापडत नसलेला फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या ट्रॅशमध्ये असल्यास तुम्ही तो रिस्टोअर करू शकता.

तुमचा सापडत नसलेला फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या ट्रॅशमध्ये नसल्यास तो कायमचा हटवलेला असू शकतो. हटवलेले फोटो आणि व्हिडिओविषयी अधिक जाणून घ्या.

फोटो आणि व्हिडिओ रिस्टोअर करणे

महत्त्वाचे: फोटो आणि व्हिडिओ हे अजूनही तुमच्या ट्रॅशमध्ये असतील, तरच तुम्ही ते रिस्टोअर करू शकता.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तळाशी, लायब्ररीआणि त्यानंतर ट्रॅश हटवावर टॅप करा.
  3. तुम्हाला रिस्टोअर करायच्या असलेल्या फोटो किंवा व्हिडिओला स्‍पर्श करून धरून ठेवा.
    • फोटो किंवा व्हिडिओ तुमच्या ट्रॅशमध्ये नसल्यास तो कायमचा हटवलेला असू शकतो.
  4. तळाशी, रिस्टोअर करा वर टॅप करा. तुमचा फोटो किंवा व्हिडिओ पुढील ठिकाणी पुन्हा दिसेल:
    • तो असलेले अल्बम
    • Google Photos लायब्ररी
    • फोनचे गॅलरी अ‍ॅप

हटवलेले सगळे फोटो आणि व्हिडिओ रिस्टोअर केले जाऊ शकत नाही

महत्त्वाचे:

हटवलेला फोटो किंवा व्हिडिओ ट्रॅशमध्ये नसल्यास, तुम्ही तो रिस्टोअर करू शकत नाही. पुढील कारणांमुळे तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ रिस्टोअर करता येणार नाही:

  • फोटो आणि व्हिडिओचा बॅक अप घेतलेला नव्हता आणि:
    • Android 11 आणि त्यावरील आवृत्तीच्या डिव्हाइसवर तुम्ही तो ३० पेक्षा जास्त दिवसांपूर्वी ट्रॅशमध्ये हलवला.
    • तुम्ही तो तुमच्या डिव्हाइसच्या गॅलरी अ‍ॅपमधून कायमचा हटवला.
  • तुम्ही ६० पेक्षा जास्त दिवसांपूर्वी फोटो किंवा व्हिडिओचा बॅक अप घेतला आणि तो ट्रॅशमध्ये हलवला.
  • तुम्ही तो ट्रॅशमध्ये हलवल्यानंतर तुमचा ट्रॅश रिकामा केला.
  • तुम्ही तो तुमच्या ट्रॅशमधून कायमचा हटवला.
Google Photos तुमच्या आयटमचा कसा आणि कधी बॅकअप घेते यासाठी तुमची बॅक अप सेटिंग्ज महत्त्वाची आहेत. भविष्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ शोधण्यासाठी व रिकव्‍हर करण्यासाठी बॅकअप सुरू करा. तुमची बॅकअप सेटिंग्ज कशी तपासावी ते जाणून घ्या

तरीही फोटो किंवा व्हिडिओ सापडत नाहीत का?

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4261870062171753008
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false