तुमच्या फोटोमध्ये लोक, गोष्टी आणि ठिकाणांनुसार शोधा

कोणत्याही गोष्टीसाठी तुमचे फोटो शोधा. उदाहरणार्थ, तुम्ही हे शोधू शकता:

  • तुम्ही उपस्थित राहिलात ते मागच्या उन्हाळ्यातील लग्न
  • तुमचे जिवलग मित्र
  • पाळीव प्राणी
  • तुमचे आवडते शहर

महत्त्वाचे: काही वैशिष्ट्ये सर्व भौगोलिक प्रदेश, सर्व डोमेन किंवा सर्व खाते प्रकार यांमध्ये उपलब्ध नाही.

तुमचे फोटो शोधा

  1. तुमच्या कॉंप्युटरवर photos.google.com/search/search वर जा.
  2. वरील बॉक्समध्ये, तुम्हाला शोधायची असलेली गोष्ट एंटर करा, उदाहरणार्थ:
    • न्यूयॉर्क शहर
    • तुम्ही लोक किंवा पाळीव प्राणी लेबल केले असल्यास, नाव अथवा टोपणनाव.

व्यक्ती किंवा पाळीव प्राण्याचे फोटो शोधणे आणि नाव जोडणे

तुमचे फोटो अधिक सहजपणे शोधण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी, तुम्ही Google Photos ने गटबद्ध केलेल्या फोटोमध्ये दिसणाऱ्या लोकांना किंवा पाळीव प्राण्यांना लेबल लावू शकता.

महत्त्वाचे: हे वैशिष्ट्य सर्व भौगोलिक प्रदेश, सर्व डोमेन किंवा सर्व खाते प्रकार यांमध्ये उपलब्ध नाही.

पायरी १: व्यक्ती किंवा पाळीव प्राण्याचे फोटो शोधणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com/people वर जा.
  2. त्यांचे फोटो शोधण्यासाठी चेहऱ्यावर क्लिक करा.

तुम्हाला चेहऱ्यांच्या पंक्ती न दिसल्यास:

टीप: व्यक्तीला न शोधता तिचे फोटो शोधण्यासाठी, एक्सप्लोर करा आणि त्यानंतर लोक आणि पाळीव प्राणी वर क्लिक करा.

दुसरी पायरी: नाव जोडा

  1. फेस ग्रुपवर सर्वात वर, नाव जोडा वर क्लिक करा.
  2. नाव किंवा टोपणनाव एंटर करा.

तुम्ही सर्च बॉक्स वापरून ते नाव शोधू शकाल. तुम्ही ते फोटो शेअर केले असले, तरीही निवडलेली खाजगी फेस लेबल फक्त तुम्हीच पाहू शकता.

टीप: न शोधता फोटो शोधण्यासाठी, एक्सप्लोर करा वर क्लिक करा. सर्वात वरती, तुम्ही लोक, ठिकाणे किंवा गोष्टी यांसारख्या आयटमवर क्लिक करू शकता.

फेस ग्रुप बंद किंवा सुरू करणे

तुम्ही तुमच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या आधारे फोटो गटबद्ध करणे थांबवू शकता.

तुम्ही फेस ग्रुप बंद केल्यास, हे हटवाल:

  • तुमच्या खात्यामधील फेस ग्रुप
  • फेस ग्रुप तयार करण्यासाठी वापरलेले फेस मॉडेल
  • तुम्ही तयार केलेली फेस लेबल

Google Photos च्या फेस ग्रुप संबंधित स्टोरेज धोरणाबद्दल जाणून घ्या.

फेस ग्रुप बंद किंवा सुरू करण्यासाठी:

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com/settings वर जा.
  2. "एकसारखे चेहरे गटबद्ध करा" च्या बाजूला, अधिक दाखवा डाउन ॲरो वर क्लिक करा.
  3. फेस ग्रुप बंद किंवा सुरू करा.
    • फक्त पाळीव प्राण्यांच्या फोटोसाठी फेस ग्रुप बंद करण्याकरिता, लोकांसोबत पाळीव प्राणी दाखवा बंद करा.

प्रगत टिपा

लेबल बदला किंवा काढून टाका

तुम्ही तुमची फेस ग्रुप लेबल संपादित करू शकता किंवा काढून टाकू शकता.

  • लेबल बदलण्यासाठी: लोक फोल्डर आणि त्यानंतर आणखी आणि त्यानंतर नावाचे लेबल संपादित करा यावर टॅप करा.
  • लेबल काढून टाकण्यासाठी: लोक फोल्डर आणि त्यानंतर आणखी आणि त्यानंतर नावाचे लेबल काढून टाका यावर टॅप करा.
फेस ग्रुप एकत्रित करणे

एकच व्यक्ती एकापेक्षा जास्त ग्रुपिंगमध्ये असल्यास, तुम्ही ते मर्ज करू शकता.

  1. नाव किंवा टोपणनाव असलेल्या फेस ग्रुपपैकी एकाला लेबल लावा.
  2. सूचनांमधून निवडून एकच नाव किंवा टोपणनाव असलेल्या इतर फेस ग्रुपला लेबल लावा.
  3. तुम्ही मधले नाव किंवा टोपणनावाची पुष्टी केल्यावर, तुम्हाला फेस ग्रुप मर्ज करायचे आहे हे Google Photos विचारेल.

तुम्हाला दोन फेस ग्रुप मर्ज करण्याची सूचना मिळू शकते. ती एकच व्यक्ती असल्यास, होय वर क्लिक करा.

शोध पेजमधून फेस ग्रुप काढून टाकणे

तुम्हाला तुमच्या शोध पेजवर विशिष्ट फेस ग्रुप पाहायचा नसल्यास, तुम्ही तो काढून टाकू शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com/people वर जा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, चेहरे दाखवा आणि लपवा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला लपवायच्या असलेल्या चेहऱ्यावर क्लिक करा. चेहरा दाखवण्यासाठी, बॉक्सवर पुन्हा क्लिक करा.
  4. सर्वात वर उजवीकडे, पूर्ण झाले वर क्लिक करा.
गटामधून आयटम काढून टाका

तुम्हाला फोटो चुकीच्या गटामध्ये दिसल्यास, तुम्ही तो काढून शकता.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com/people वर जा.
  2. तुम्हाला फेस ग्रुपमधून काही काढून टाकायचे असल्यास त्यावर क्लिक करा.
  3. आणखी आणि त्यानंतर परिणाम काढून टाका यावर क्लिक करा.
  4. तुम्हाला जे फोटो किंवा व्हिडिओ गटामधून काढून टाकायचे आहेत ते निवडा.
  5. सर्वात वर, काढून टाका वर क्लिक करा.

टीप: तुम्हाला गटामधून आयटम काढून टाकायचा असल्यास, तो तुमच्या Google Photos लायब्ररीमधून फोटो किंवा व्हिडिओ काढून टाकला जाणार नाही.

फीचर फोटो बदला
  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com/people वर जा.
  2. फेस ग्रुपवर क्लिक करा.
  3. आणखी आणि त्यानंतर फीचर फोटो बदला यावर क्लिक करा.
  4. फोटोला फीचर केलेला फोटो बनवण्यासाठी तो निवडा.
फेस मॉडेलविषयी जाणून घ्या

फेस ग्रुप ३ पायर्‍यांमध्ये होते:

  1. आम्ही फोटोमध्ये कोणताही चेहरा आहे का ते डिटेक्ट करतो.
  2. फेस ग्रुप वैशिष्‍ट्य सुरू केलेले असल्यास, चेहऱ्यांच्या इमेजचे अंकांनुसार सादरीकरण करणारी फेस मॉडेल तयार करण्यासाठी, चेहऱ्यांच्या विविध इमेजमधील समानतेविषयी पूर्वानुमान लावण्यासाठी आणि या विविध इमेज त्याच चेहर्‍याच्या आहेत का याचा अंदाज लावण्यासाठी अल्गोरिदम वापरली जातात.
  3. एकाच व्यक्तीचे असण्याची शक्यता असलेले, खूप साम्य असणारे चेहरे असलेले फोटो फेस ग्रुपमध्ये एकत्र गटबद्ध केले जातात. फोटो चुकीच्या गटामध्ये असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही तो फेस ग्रुपमधून कधीही काढून टाकू शकता.

तुम्ही कोणत्याही फेस ग्रुपवर नावाचे किंवा टोपणनावाचे लेबलदेखील जोडू शकता.

फेस ग्रुप सुरू असताना, Google Photos हे इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर फोटोंचा समावेश विशिष्ट गटामध्ये करू शकते. यामध्ये एकाच वेळेच्या जवळपास घेतलेल्या फोटोचा आणि चेहरा दिसत नसताना सर्व फोटोमध्ये एकसारखे कपडे घातलेली व्यक्ती डिटेक्ट करण्याचा समावेश आहे.

फेस ग्रुप, फेस लेबल आणि शेअर करणे

  • बाय डीफॉल्ट, तुमच्या खात्यामधील फेस ग्रुप आणि लेबल फक्त तुम्हाला दृश्‍यमान आहेत.
  • तुम्ही फोटो शेअर करत असताना फेस ग्रुप शेअर केले जात नाहीत.
  • फेस लेबल प्रत्येक खात्यासाठी खाजगी असतात आणि ती खात्यांमध्ये शेअर केली जात नाहीत.
  • तुम्ही फेस ग्रुपला "मी" असे लेबल करणे निवडू शकता. यामुळे तुमच्या संपर्कांच्या Google Photos अ‍ॅप्सना फोटोमध्ये तुमचा चेहरा ओळखण्यात आणि तुमचे फोटो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी सूचना मिळवण्यास मदत होते. तुमच्या फेस ग्रुपला कसे लेबल करावे ते जाणून घ्या.

फेस ग्रुप सुरू असताना, आम्ही तुमच्या फोटोमध्ये दिसणार्‍या चेहऱ्यांची मॉडेल बनवावीत असे तुम्हाला वाटत असल्याचे तुम्ही आम्हाला कळवता. ही मॉडेल काही अधिकार क्षेत्रांमध्ये बायोमेट्रिक डेटा असल्याचे मानले जाऊ शकते.

तुमची फेस मॉडेल हटवण्यासाठी, फेस ग्रुप बंद करा. तुमची फेस मॉडेल, फेस ग्रुप आणि फेस लेबल ही तुम्ही हटवेपर्यंत किंवा तुमचे Google Photos खाते दोन वर्षांपेक्षा जास्त काळ इनॅक्टिव्ह असेपर्यंत, आम्ही स्टोअर करू व वापरू. Google Photos च्या फेस ग्रुप स्टोरेज धोरणाबद्दल जाणून घ्या.

तुमच्या फोटोमध्ये लेबल लावलेले लोक आणि पाळीव प्राणी काढून टाका, जोडा किंवा बदला
Google Photos मध्ये फोटो नसल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने एकत्रित केला असल्यास, तुम्ही फेस ग्रुपमध्ये फोटो बदलू, काढून टाकू किंवा जोडू शकता.
हे वैशिष्ट्य सर्व देशांमध्ये उपलब्ध नाही.

फोटो ज्या फेस ग्रुपचा आहे तो बदला

Google Photos चुकीच्या व्यक्तीला किंवा पाळीव प्राण्याला लेबल लावल्यावर तुम्ही फेस लेबल जोडू, काढून टाकू किंवा बदलू शकता.
  1. तुमच्‍या कॉंप्‍युटरवर, photos.google.com वर जा.
  2. फोटो निवडा.
  3. माहिती Info वर क्लिक करा.
  4. “लोक” वर क्लिक करा आणि संपादित करा Edit वर क्लिक करा.
  5. लेबल काढून टाका, जोडा किंवा बदला:
    • लेबल काढून टाकण्यासाठी: फेस लेबलवर, काढून टाका Remove वर क्लिक करा.
    • लेबल जोडण्यासाठी: “जोडण्यासाठी उपलब्ध” मध्ये, फेस लेबलवर Add जोडा वर क्लिक करा. त्यानंतर, फोटोमध्ये, जोडण्यासाठी लेबलवर क्लिक करा किंवा नवीन लेबल तयार करण्यासाठीAdd जोडा निवडा. 
    • लेबल बदलण्यासाठी:
      1. चेहरा लेबलवर, काढून टाका Remove वर क्लिक करा.
      2. फेस लेबलवर “जोडण्यासाठी उपलब्ध” मध्ये, जोडा Add वर क्लिक करा.
      3. जोडण्यासाठी फेस लेबल निवडा.
  6. पूर्ण झाले वर क्लिक करा.

संबंधित पेज

तुमचे फोटो सापडत नाही? फोटो शोधण्यात मदत मिळवा.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
11047486817271282151
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false