तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट Gallery अ‍ॅपला Google Photos अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती देणे

तुम्ही Google Photos ला तुमच्या डिव्हाइसची डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती दिल्यास:

  • तुम्ही ईमेल अ‍ॅड्रेस आणि Photos चे ऑटो बॅकअप स्टेटस यासारखी खाते माहिती गॅलरी अ‍ॅपसह शेअर करण्यासाठी Photos ला परवानगी देता.
  • Google Photos वर बॅकअप घेतलेले सर्व फोटो तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमध्ये अ‍ॅक्सेस करू शकता.

हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:

  • डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅक्सेसला सपोर्ट करणारे डिव्हाइस. सपोर्ट असलेले निर्माते:
    • Xiaomi
    • Oppo, OnePlus किंवा Realme
  • Google Photos अ‍ॅप ची नवीनतम आवृत्ती.
  • Android 11 किंवा त्यावरील आवृत्ती.

तुम्ही Photos किंवा तुमच्या डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप उघडता, तेव्हा गॅलरी अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला पॉप-अप विनंती मिळू शकते.

  1. Google Photos मधील वापरकर्ता डेटासाठी तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस व्यवस्थापित करण्याकरिता, अनुमती देऊ नका किंवा अनुमती द्या वर टॅप करा.
  2. अ‍ॅक्सेस नंतर व्यवस्थापित करण्यासाठी, तुम्ही Photos सेटिंग्ज किंवा तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपची सेटिंग्ज तपासू शकता.

डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरीचा अ‍ॅक्सेस बंद करणे

डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरीचा अ‍ॅक्सेस बंद करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  4. Photos सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर अ‍ॅप्स आणि डिव्हाइस आणि त्यानंतर Google Photos अ‍ॅक्सेस वर टॅप करा.
  5. डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपच्या नावावर टॅप करा.
  6. ॲक्सेस काढून टाका निवडा.

डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरीचा अ‍ॅक्सेस सुरू करणे

महत्त्वाचे: Google Photos मधील वापरकर्ता डेटासाठी तुमच्या डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप पुन्हा अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती देण्याकरिता, तुम्ही डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप वापरणे आवश्यक आहे. तुमच्या डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप म्हणजे Google Photos चे “क्लाउड-सिंक” किंवा “क्लाउड-बॅकअप” असू शकते.

तुम्ही Photos अ‍ॅप डेटा साफ केल्यास, Photos अनइंस्टॉल केल्यास, तुमचे डिव्हाइस रीसेट केल्यास किंवा नवीन डिव्हाइस घेतल्यास, तुम्ही गॅलरी अ‍ॅक्सेसला पुन्हा अनुमती देणे आवश्यक आहे. डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरीचा अ‍ॅक्सेस सुरू करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप उघडा.
  2. सेटिंग्ज वर जा.
  3. डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपसह डेटा शेअर करण्यासाठी Google Photos ला परवानगी देण्याकरिता, स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

Google Photos हे तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरीसह कसे इंटिग्रेट करते हे जाणून घ्या

कनेक्ट केलेल्या खात्यासह फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घेणे

Photos बॅकअप सुरू केलेला असतो, तेव्हा Photos हे तुमच्या गॅलरी अ‍ॅपमधील फोटोचा बॅकअप घेते. तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपशी कनेक्ट केलेले खाते म्हणजेच तुमचे Photos बॅकअप खाते आहे. कनेक्ट केलेले खाते बदलण्यासाठी, तुम्ही Photos बॅकअप खाते बदलणे आवश्यक आहे:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. सर्वात वरती, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  4. Photos सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर बॅकअप वर टॅप करा.
  5. "खाते आणि स्टोरेज" या अंतर्गत, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  6. तुम्हाला ज्यावर बॅकअप घ्यायचा आहे ते Google खाते निवडा.

Photos बॅकअप बंद असतो, तेव्हा तुम्ही गॅलरी अ‍ॅक्सेस सुरू करताना तुमचे कनेक्ट केलेले Google खाते हे अ‍ॅक्टिव्ह Photos खाते असते. कनेक्ट केलेले खाते बदलण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. सर्वात वरती, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  4. Photos सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर अ‍ॅप्स आणि डिव्हाइस आणि त्यानंतर Google Photos अ‍ॅक्सेस वर टॅप करा.
  5. तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपच्या नावावर टॅप करा.
  6. तुमच्या कनेक्ट केलेल्या Google खाते वर टॅप करा.
  7. तुम्हाला कनेक्ट केलेले खाते म्हणून वापरायचे असलेले Google खाते निवडा.

फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप कसा घ्यावा हे जाणून घ्या.

फोटो किंवा व्हिडिओ हटवणे अथवा रिस्टोअर करणे

तुम्ही photos.google.com किंवा दुसऱ्या डिव्हाइसवरून वरून फोटो हटवता अथवा रिस्टोअर करता, तेव्हा ते मूळ डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपसह कदाचित सिंक होणार नाहीत. याचे निराकरण करण्यासाठी, Photos अ‍ॅपवर जा आणि सिंक होत नसण्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. सर्वात वरती, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  4. सिंक न झालेल्या बदलांचे पुनरावलोकन करा.
  5. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
फोटो संपादित करणे

तुम्ही photos.google.com किंवा दुसऱ्या डिव्हाइसवर फोटो संपादित केल्यास, बदल कदाचित मूळ डिव्हाइसवर सिंक होणार नाहीत. याचे निराकरण करण्यासाठी, Photos अ‍ॅपवर जा आणि सिंक होत नसण्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. सर्वात वरती, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे वर टॅप करा.
  4. सिंक न झालेल्या बदलांचे पुनरावलोकन करा.
  5. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.

तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमध्ये फोटो संपादित करता, तेव्हा Photos हे जुनी क्लाउड कॉपी ठेवू शकते. पोर्ट्रेटसारख्या विशिष्ट प्रकारच्या फोटोसाठी, डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप हे तुमची संपादने आधीच्या फोटोवर ओव्हरराइट करून सेव्ह करू शकते.

तुमचे फोटो कसे संपादित करावे हे जाणून घ्या.

आयटम लपवलेल्या अल्बममध्ये हलवणे

एखादा बॅकअप घेतलेला फोटो तुम्ही खाजगी किंवा लपवलेल्या अल्बममध्ये हलवल्यास, गॅलरी अ‍ॅप हे फाइलच्या सर्व स्थानिक प्रती हटवते. यामुळे Photos मधील क्लाउड प्रतदेखील काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो.

Google खाते मधून क्लाउड प्रत हटवता येत नसल्यास, तुम्हाला डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपकडून मेसेज मिळतो. तुमच्या Google खाते मधून फोटो मॅन्युअली हटवण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. तुमच्या Google खाते मध्ये साइन इन करा.
  3. तुम्हाला ट्रॅशमध्ये हलवायच्या असलेल्या फोटोला किंवा व्हिडिओला स्‍पर्श करून धरून ठेवा.
    • टीप: तुम्ही एकाहून अधिक आयटम निवडू शकता.
  4. हटवा हटवा आणि त्यानंतर ट्रॅशमध्ये हलवा वर टॅप करा.

टीप: तुम्ही Google Photos मध्ये बॅकअप घेतलेला फोटो किंवा व्हिडिओ हटवल्यास, तो ६० दिवस तुमच्या ट्रॅशमध्ये राहतो. तुमचा ट्रॅश रिकामा कसा करावा हे जाणून घ्या.

तुमच्या डिव्हाइसवरील डुप्लिकेट फाइल

तुमच्या डिव्हाइसवर एकाच फोटोच्या एकाहून अधिक प्रती असतात, तेव्हा तुमच्या डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप हे फोटो टॅबमध्ये सर्व स्थानिक प्रती दाखवते. Photos अ‍ॅप हे फक्त एक प्रत दाखवते.

तुम्ही Photos अ‍ॅपमधील फोटो हटवता, तेव्हा Photos हे तुमच्या डिव्हाइसवरून सर्व स्थानिक प्रती काढून टाकण्याची परवानगी विचारते. तुम्ही डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमधून फोटो हटवल्यास, त्यामुळे फक्त निवडलेली स्थानिक आणि क्लाउड फाइल हटवली जाऊ शकते आणि इतर प्रती तशाच राहू शकतात.

फोटो आणि व्हिडिओ कसे हटवावे हे जाणून घ्या.

तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमधील अल्बमची नावे बदलणे

महत्त्वाचे: तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमधील अल्बम आणि तुमच्या Photos अ‍ॅपमधील अल्बम एकसमान नाहीत.

तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमधील अल्बमचे नाव बदलल्यास आणि तुम्हाला तो अल्बम Photos अ‍ॅपमध्ये सापडत नसल्यास, तुम्हाला तुमच्या डिव्हाइस फोल्डरमध्ये आधीच्या नावाचा अल्बम आढळू शकतो.

Google Photos हटवणे किंवा Google Photos अ‍ॅप डेटा साफ करणे

तुम्ही Google Photos हटवल्यास किंवा Google Photos अ‍ॅप डेटा साफ केल्यास, तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपला यापुढे Google Photos अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस नसेल. photos.google.com अथवा दुसऱ्या डिव्हाइसवर फोटो संपादित करणे, हटवणे किंवा रिस्टोअर करणे यांमुळे उद्भवणाऱ्या सिंक न होण्याशी संबंधित समस्यांचे तुम्ही यापूर्वी निराकरण केलेले नसल्यास, तुम्ही Google Photos अ‍ॅप डेटा साफ केल्यानंतर Photos हे मूळ डिव्हाइस फाइल पुन्हा अपलोड करू शकते.

तुमचे स्टोरेज कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घ्या.

तुमच्या फोटोशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे

गहाळ झालेले फोटो शोधणे
  1. हरवलेले फोटो आणि व्हिडिओ शोधणे.
  2. तुमच्या डिव्हाइसच्या डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅपमधून Google Photos वर तुमचे फोटो ट्रान्सफर करताना हरवले आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्या गॅलरी अ‍ॅपच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
  3. तुमच्या डिव्हाइसचे डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅप आणि Photos अ‍ॅप अजूनही कनेक्ट केले असल्याची खात्री करा. डीफॉल्ट गॅलरी अ‍ॅक्सेस सुरू किंवा बंद कसा करावा हे जाणून घ्या.
  4. बॅकअप सुरू आहे की नाही हे तपासा. तुमचे बॅकअप खातेदेखील तपासा. फोटो आणि व्हिडिओ बॅकअप करण्याविषयी अधिक जाणून घ्या.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5320971997351369425
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false