माझे फोटो चुकीच्या पद्धतीने दिसत आहेत

तुमच्या Android डिव्हाइसवरील फोटो photos.google.com वर योग्यप्रकारे दिसत नसल्यास, समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.

तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी

तुमचा फोटो वेब आणि Android डिव्हाइस या दोन्हीवर चुकीच्या पद्धतीने दिसत असल्यास, तो Files by Google वापरून उघडण्याचा प्रयत्न करा. Files ॲपमध्ये फाइल चुकीच्या पद्धतीने दिसत असल्यास, ती कदाचित कॅमेरा ॲपद्वारे चुकीच्या पद्धतीने सेव्ह केलेली असू शकते. अशा बाबतीमध्ये Google Photos हे मूळ फाइल रिकव्हर करू शकत नाही.

Files ॲपमध्ये तुमचा फोटो योग्यप्रकारे दिसत असल्यास, तुम्ही मूळ कॉपी शोधण्यासाठी, बॅकअप घेतलेली कॉपी हटवण्याकरिता आणि फोटो Google Photos वर अपलोड करण्यासाठी खालील ट्रबलशूटिंग पायऱ्या फॉलो करू शकता.

पायरी १: हा तोच फोटो असल्याचे कंफर्म करणे

तुमच्या Android डिव्हाइसवर:

  1. Google Photos ॲप उघडा.
  2. फोटो निवडा.
  3. "तपशील" विभाग शोधण्यासाठी, स्क्रीनच्या तळापासून वर स्वाइप करा.
  4. फोटोच्या फाइल नावाची नोंद करा.

तुमच्या कॉंप्युटरवर:

  1. photos.google.com वर जा.
  2. फोटो निवडा.
  3. उजवीकडे, "तपशील" अंतर्गत, फोटोचे फाइल नाव शोधा.
  4. फाइलच्या नावाची नोंद करा.
  5. ते तुमच्या Android डिव्हाइसवरील नावाशी तंतोतंत जुळत असल्याचे कंफर्म करा.

पायरी २: संपादने रिव्हर्ट करणे

फोटो संपादित केला असल्यास, तो मूळ वर रिव्हर्ट केला जाणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. फोटो निवडा.
  3. तळाशी, संपादित करा Edit वर टॅप करा.
  4. रिव्हर्ट करा आणि त्यानंतर सेव्ह करा वर टॅप करा.
  • तुम्हाला "रिव्हर्ट करा" दिसत नसल्यास, फोटो कधीही संपादित केला गेला नाही किंवा संपादने आधीच रिव्हर्ट केली गेली आहेत.

पायरी ३: बॅकअप कॉपी सेव्ह करणे

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos अ‍ॅप उघडा.
  2. फोटो निवडा.
  3. तळाशी, शेअर करा वर टॅप करा.
  4. "ॲप्सवर शेअर करा" अंतर्गत, आणखी आणखी वर टॅप करा.
  5. तुमचे ईमेल ॲप निवडा.
  6. फोटो स्वतःला ईमेल करा.
  7. तुमच्या काँप्युटरवर ईमेल उघडा.
  8. फोटो डाउनलोड करा.

पायरी ४: तुमच्या काँप्युटरवरील फोटो हटवणे

महत्त्वाचे: तुम्ही photos.google.com वरून फोटो हटवण्यापूर्वी तुमच्या ईमेलवरून तुमच्या कॉंप्युटरवर बॅकअप कॉपी डाउनलोड केल्याची खात्री करा.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. फोटो निवडा.
  3. सर्वात वर, हटवा हटवा आणि त्यानंतर ट्रॅशमध्ये हलवा वर क्लिक करा.
  4. सर्वात वर, मागे जा Back आणि त्यानंतर ट्रॅश हटवा वर क्लिक करा.
  5. तुम्ही नुकताच हटवलेला फोटो निवडा.
  6. फोटो कायमचा हटवण्यासाठी, सर्वात वर, हटवा वर क्लिक करा.

पायरी ५: फोटो पुन्हा अपलोड करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, photos.google.com वर जा.
  2. हटवलेला फोटो आता दिसत नसल्याचे कंफर्म करा.
  3. सर्वात वर, अपलोड करा  आणि त्यानंतर काँप्युटर निवडा.
  4. तुम्ही यापूर्वी डाउनलोड केलेली बॅकअप कॉपी आणि त्यानंतर उघडा निवडा.
  5. काही मिनिटे प्रतीक्षा करा. 
  6. तुमच्या Android डिव्हाइसवर, Photos ॲप रीस्टार्ट करा.
  7. फोटो योग्यप्रकारे दिसत असल्याचे कंफर्म करा.

संबंधित स्रोत

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1731373730168636683
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
105394
false
false