Google Maps मध्ये फोटो किंवा व्हिडिओ जोडणे, हटवणे अथवा शेअर करणे

Google Maps मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तुमचे आवडते फोटो व कमाल ३० सेकंदांचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी, त्यांना Google Maps मध्ये जोडा. तुम्ही त्यांना कधीही जोडू किंवा काढून टाकू शकता. तुम्ही पत्ते किंवा कोऑर्डिनेटमध्ये फोटो अथवा व्हिडिओ जोडू शकत नाही.

तुम्ही फोटो पोस्ट करता तेव्हा, इतर लोकदेखील पुढील गोष्टी शोधू शकतात:

टीप: तुम्ही स्थानिक मार्गदर्शक असल्यास, तुम्ही Google Maps वर फोटो आणि व्हिडिओ जोडता तेव्हा तुम्ही गुण मिळवणे हे करू शकता. उच्च गुणवत्तेची परीक्षणे आणि फोटो कसे द्यावेत हे जाणून घ्या.

Google Maps मध्ये फोटो किंवा व्हिडिओ जोडा

तुम्ही आवडीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ यांसारखा मीडिया जोडू शकताजसे की व्यवसाय किंवा उद्याने. तुम्ही या गोष्टींमध्ये मीडिया जोडू शकत नाही:

  • पत्ते
  • कोऑर्डिनेट
  • खाजगी निवास
  • भौगोलिक क्षेत्र

ठिकाणांच्या फोटो अपडेटबद्दल अधिक जाणून घ्या

टीप: गैरवापर करण्याच्या प्रयत्नांपासून संरक्षण करण्याकरिता, काही आवडत्या ठिकाणांसाठी पोस्ट करण्यासंबंधित तात्पुरते प्रतिबंध आहेत. पोस्ट करण्यासंबंधित प्रतिबंधांबद्दल अधिक जाणून घ्या.

"योगदान द्या" वरून फोटो किंवा व्हिडिओ जोडा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute वर टॅप करा.
  3. "योगदान द्या" टॅबच्या अंतर्गत, फोटो जोडा वर टॅप करा.
    • फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी: एक किंवा अधिक फोटो अथवा व्हिडिओवर टॅप करा.
    • फोटो किंवा व्हिडिओचे स्थान संपादित करण्यासाठी: ठिकाणाच्या नावावर टॅप करा, त्यानंतर वेगळे ठिकाण निवडा.
  4. पोस्ट करा वर टॅप करा.

टीप: Google Maps मध्ये फोटो किंवा व्हिडिओ जोडण्याविषयी सूचना मिळवण्यासाठी, तुम्ही Google Photos अ‍ॅप इंस्टॉल करून त्यावर बॅकअप आणि सिंकस्थान इतिहास सुरू केला आहे याची खात्री करा. सूचना काढून टाकण्यासाठी, Clear वर टॅप करा.

ठिकाणाच्या पेजवरून फोटो किंवा व्हिडिओ जोडा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Maps Maps उघडा.
  2. ठिकाणाचे पेज मिळवण्यासाठी, एक निवडा:
    • शोध फील्डमध्ये, ठिकाणाचे नाव एंटर करा.
    • नकाशावर, ठिकाणावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. तळाच्या मेनू बारमध्ये, डावीकडे खेचा.
  5. Photos आणि त्यानंतर फोटो जोडा वर टॅप करा.
  6. तुम्हाला काय करायचे आहे ते निवडा:
    • तुमच्या गॅलरीमधून फोटो किंवा व्हिडिओ निवडण्यासाठी, फोल्डर वर टॅप करा.
    • नवीन फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी, कॅमेरा वर टॅप करा.

Google Photos किंवा तुमच्या Gallery अ‍ॅपमधून फोटो अथवा व्हिडिओ जोडा

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Google Photos किंवा तुमचे Gallery अ‍ॅप उघडा.
  2. तुम्हाला जोडायच्या असलेल्या फोटो किंवा व्हिडिओवर टॅप करा.
  3. तळाशी, शेअर करा आणि त्यानंतर Maps वर जोडा वर टॅप करा.
  4. सर्वात वरती, ठिकाण निवडा वर टॅप करा.
  5. फोटो कुठे घेतला होता ते निवडा.
  6. सर्वात वरती उजवीकडे, पोस्ट करा वर टॅप करा.

Google Maps वर तुमचे फोटो किंवा व्हिडिओ शोधा

तुम्ही Google Maps वर काय शेअर केले आहे ते पाहण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर योगदाने पहा वर टॅप करा.

Google Maps अ‍ॅपमधील फोटो किंवा व्हिडिओ हटवा

तुम्ही Google Maps वरून हटवलेले फोटो हे Google Search वरूनदेखील आपोआप हटवले जातात.

फोटो किंवा व्हिडिओ हटवण्यासाठी:

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. योगदान द्या Contribute आणि त्यानंतर योगदाने पहा वर टॅप करा.
  3. तुम्हाला हटवायचा असलेला फोटो किंवा व्हिडिओ निवडा.
  4. सर्वात वरती उजवीकडे, काढून टाका काढा आणि त्यानंतर हटवा वर टॅप करा.

तुम्ही Google Maps वरून हटवलेले फोटो किंवा व्हिडिओ पुढील ठिकाणांवरून आपोआप हटवले जात नाहीत:

Business Profile मधून फोटो किंवा व्हिडिओ जोडा अथवा हटवा

तुम्ही व्यवसाय मालक असल्यास आणि तुमच्या व्यवसायाची पडताळणी केली असल्यास, तुमच्या व्यवसायाचा फोटो जोडणे किंवा फोटो हटवणे हे कसे करावे ते जाणून घ्या.

फोटो किंवा व्हिडिओ हे उपयुक्त अथवा उपयुक्त नाही म्हणून मार्क करा

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Google Maps ॲप Maps उघडा.
  2. एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
  3. तळाशी, ठिकाणाच्या नावावर किंवा पत्त्यावर टॅप करा.
  4. सर्वात वरती, Photos वर टॅप करा.
  5. पुढीलपैकी एक निवडा:
    • फोटो किंवा व्हिडिओ उपयुक्त म्हणून मार्क करण्यासाठी, उपयुक्त वर टॅप करा. लेखकाला सूचित केले जाऊ शकते, पण तुमचे नाव आणि माहिती शेअर केली जात नाही. उपयुक्त मतांची एकूण संख्या शेअर केली जात नाही.
    • फोटो किंवा व्हिडिओ उपयुक्त नाही म्हणून मार्क करण्यासाठी, उपयुक्त नाही वर टॅप करा. लेखकाला सूचित केले जात नाही आणि उपयुक्त नसलेल्या मतांची एकूण संख्या शेअर केली जात नाही.
टिपा:
  • तुमचे मत काढून टाकण्यासाठी, आयकनवर पुन्हा टॅप करा.
  • फोटो किंवा व्हिडिओ अनधिकृत असल्यास अथवा Google च्या धोरणाचे उल्लंघन करत असल्यास, तुम्ही त्याची तक्रार करू शकता.

 व्हिडिओ ऑटोप्ले सुरू किंवा बंद करणे

  1. प्रोफाइल आयकन खात्याचे वर्तुळाकार चिन्ह आणि त्यानंतर सेटिंग्ज Settings आणि त्यानंतर व्हिडिओ सेटिंग्ज यावर टॅप करा.
  2. ऑटोप्ले सुरू किंवा बंद करण्यासाठी, टॉगलवर टॅप करा.

Google Maps वर फोटो किंवा व्हिडिओची तक्रार करणे

महत्त्वाचे: धोरणाचे उल्लंघन करणाऱ्यांना Google Maps पासून दूर ठेवण्यासाठी, आम्ही वापरकर्ता आशय नियंत्रित करतो. आम्हाला आढळलेल्या सर्व उल्लंघनांचे पुनरावलोकन केले जाते आणि ती काढून टाकली जातात. Google Maps च्या वापरकर्त्याने जनरेट केलेल्या आशय धोरणाबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्हाला Google Maps वर काही अयोग्य किंवा चुकीचे आढळल्यास, तुम्ही आम्हाला ते कळवू शकता.

  1. एखादे ठिकाण शोधा किंवा ते नकाशावर टॅप करा.
  2. फोटो विभागावर स्क्रोल करा, त्यानंतर तुम्हाला ज्या फोटो किंवा व्हिडिओची तक्रार करायची आहे तो निवडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, तक्रार करा तक्रार नोंदवा वर टॅप करा.
  4. तुमच्या तक्रारीचे कारण निवडा किंवा लिहा.

Maps वापरकर्त्याने योगदान दिलेल्या आशयाशी संबंधित धोरण याबद्दल अधिक जाणून घ्या.

टीप: तुम्ही व्यवसाय मालक असल्यास, तुम्ही फोटो काढून टाकण्याची विनंती करू शकता. फोटो हटवण्यासंबंधित विनंत्यांबद्दल अधिक जाणून घ्या.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5827657601101059792
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
76697
false
false