इतर खात्यांमधील ईमेल तपासा

तुमच्याकडे एकाहून अधिक ईमेल खाती असल्यास, तुम्ही ती Gmail मध्ये तपासू शकता. दुसरे ईमेल खाते Gmail ॲपमध्ये कसे जोडावे ते जाणून घ्या.

महत्त्वपूर्ण: तुमचे इतर ईमेल खाते सुरक्षित कनेक्शन सपोर्ट करत नसल्यास, तुम्ही कनेक्ट करू शकणार नाही.

सर्व मेसेज मिळवा 

तुम्ही दुसर्‍या ईमेल खात्यामधून दोन्ही जुने आणि नवीन मेसेज इंपोर्ट करू शकता. 

टीप: तुम्ही तुमच्या इतर खात्यामधून फक्त मेसेज हलवू शकता, फोल्डर किंवा लेबले नाही.

पायरी १: तुमच्या इतर खात्यामधील सेटिंग्ज बदला

Yahoo, Outlook, किंवा इतर ईमेल सेवा

तुमच्या इतर खात्याला POP अ‍ॅक्सेस असल्याची खात्री करा. त्यानंतर, तुमची Gmail सेटिंग्ज बदला.

दुसरे Gmail खाते

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्हाला ज्यावरून इंपोर्ट करायचे आहे त्या Gmail खात्यामध्ये साइन इन करा.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  3. फॉरवर्ड करणे आणि POP/IMAP टॅबवर क्लिक करा.
  4. "POP डाउनलोड" विभागामध्ये, सर्व मेलसाठी POP सुरू करा निवडा.
  5. शिफारस केलेले: "POP वापरून मेसेज अ‍ॅक्सेस केला जातो" च्या शेजारी, Gmail ची प्रत इनबॉक्समध्ये ठेवा निवडा.
  6. तळाशी, बदल सेव्ह करा वर ‍क्लिक करा.

पायरी २: तुमची Gmail सेटिंग्ज बदला

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्हाला ज्यावर इंपोर्ट करायचे आहे त्या Gmail खात्यामध्ये साइन इन करा.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  3. खाती आणि इंपोर्ट टॅबवर क्लिक करा.
  4. "इतर खात्यांमधून आलेले ईमेल तपासा" विभागामध्ये एखादे ईमेल खाते जोडा वर क्लिक करा.
  5. इतर खात्याचा ईमेल अ‍ॅड्रेस टाइप करा, नंतर पुढे वर क्लिक करा.
  6. निवडा आणि पुढे वर क्लिक करा.
  7. तुमचा पासवर्ड टाइप करा.
  8. शिफारस केलेले: खाली पर्यायांच्या पुढील चौकटींमध्ये खूण करा:
    • "मेल पुन्हा मिळवताना एखादे नेहमी सुरक्षित कनेक्शन (SSL) वापरा"
    • "येणाऱ्या मेसेजला लेबल करा"
    • इतर चौकटींवर खूण करू नका.
  9. खाते जोडा वर क्लिक करा.

"सर्व्हरने POP3 अ‍ॅक्सेस नाकारला"

  • तुम्ही २-टप्पी पडताळणी वापरत असल्यास: नवीन अ‍ॅप पासवर्ड एंटर करा.
  • तुम्ही ऑफिस किंवा शाळेचे खाते वापरत असल्यास: "POP सर्व्हर" विभागामध्ये, mail.domain.com एंटर करा, नंतर पोर्ट ११० निवडा.
  • तुम्ही ऑफिस किंवा शाळेच्या खात्यासह Google MX रेकॉर्ड वापरत असल्यास: "POP सर्व्हर" विभागामध्ये, pop.gmail.com एंटर करा, नंतर पोर्ट ९९५ निवडा.
  • तुम्ही तरीही साइन इन करू शकत नसल्यास, कमी सुरक्षित अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस सुरू करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमचा सुरक्षितता कोड किंवा अस्पष्ट मजकूर देखील बंद करण्याची आवश्यकता असू शकते.

इतर एररसाठी, मेल आनयनकर्ता संबंधित समस्यांचे ट्रबलशूट कसे करावे ते जाणून घ्या.

मला एक वेगळी एरर येत आहे

एरर तपशील दाखवा वर क्लिक करा, त्यानंतर खालील पायऱ्या फॉलो करा:

  • POP बंद असल्यास, तुमच्या इतर ईमेल खात्याच्या सेटिंग्ज पेजवर जा आणि POP सुरू करण्याचा मार्ग शोधा.
  • POP उपलब्ध नसल्यास, तुमचा ईमेल पुरवठादार कदाचित POP ला सपोर्ट करत नाही. त्याऐवजी, जुने मेसेज इंपोर्ट करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा, त्यानंतर नवीन ईमेल ऑटो-फॉरवर्ड करा.

इतर एररसाठी, मेल आनयनकर्ता संबंधित समस्यांचे ट्रबलशूट कसे करावे ते जाणून घ्या.

फक्त जुने मेसेज मिळवा

तुम्ही नुकतेच Gmail वर स्विच केले असल्यास, तुम्ही तुमचे जुन्या ईमेल तुमच्या इतर खात्यामधून ट्रान्सफर करू शकता.

महत्त्वपूर्ण: तुम्ही ऑफिस किंवा शाळेसाठी Gmail वापरत असल्यास आणि मेल इंपोर्ट करण्याचा पर्याय दिसत नसल्यास, तुमच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हे वैशिष्ट्य बंद केले असेल.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Gmail उघडा.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  3. खाती आणि इंपोर्ट किंवा खाती टॅबवर क्लिक करा.
  4. दुसऱ्या विभागामध्ये, मेल आणि संपर्क इंपोर्ट करा वर क्लिक करा.
  5. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
  6. इंपोर्ट सुरू करा वर क्लिक करा.

तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या नवीन Gmail ॲड्रेसबद्दल सांगण्यासाठी वेळ देण्याकरिता, तुमच्या दुसर्‍या खात्यावर पाठवलेले मेसेज आम्ही ३० दिवसांसाठी फॉरवर्ड करू. तुमचा नवीन Gmail अ‍ॅड्रेस आम्ही ६० दिवस किंवा तुम्ही रिमाइंडर हटवेपर्यंत डिस्प्ले करू.

ईमेल इंपोर्ट करणे थांबवा

  1. तुमच्या काँप्युटरवर, तुम्ही ज्यावर इंपोर्ट करत आहात ते Gmail खाते उघडा.
  2. वर उजवीकडे, सेटिंग्ज सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  3. खाती आणि इंपोर्ट टॅबवर क्लिक करा.
  4. "इतर खात्यांमधील मेल तपासा" विभागामध्ये तुम्हाला ज्या खात्यातून ईमेल मिळवणे थांबवायचे आहे त्या खात्याच्या शेजारी हटवा वर क्लिक करा.

टीप: तुम्हाला तरीही ईमेल येत असल्यास, तुमच्या इतर खात्यावर ऑटोमॅटिक फॉरवर्ड करणे सेट झाले आहे का ते तपासा, त्यानंतर तुमच्या इतर खात्यामध्ये ते कसे बंद करावे हे शोधा. तुम्हाला आधीपासून इंपोर्ट केलेले ईमेल हटवायचे असल्यास, ते कसे हटवायचे ते जाणून घ्या. 

फक्त नवीन मेसेज फॉरवर्ड करा

दुसऱ्या Gmail ॲड्रेसवरून: ऑटोमॅटिक फॉरवर्ड करणे सेट करा.

Yahoo, Outlook किंवा इतर ईमेल सेवेवरून: त्या सेवेवरून आपोआप ईमेल फॉरवर्ड कसे करावे हे शोधा.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
443713472124508791
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
17
false
false