तुम्ही खरेदी केलेल्या ब्लू-रे किंवा डीव्हीडी चित्रपटाची डिजिटल प्रत रिडीम करणे

तुम्ही ब्लू-रे किंवा डीव्हीडीवरील चित्रपट खरेदी करता तेव्हा, चित्रपटाची डिजिटल प्रत रिडीम करण्यासाठी पात्र ठरू शकता. डिजिटल प्रतीसाठी कोणतेही शुल्क देण्याची गरज नसल्यामुळे तुम्हाला पेमेंट पद्धत जोडण्याची आवश्यकता नाही.

काही उत्पादने आणि वैशिष्ट्ये सर्व देशांमध्ये उपलब्ध नाहीत. तुमच्या देशामध्ये काय उपलब्ध आहे त्याबद्दल अधिक जाणून घ्या.

पहिली पायरी: Google खाते मध्ये साइन इन करा किंवा एखादे तयार करा

महत्त्वाचे: तुम्हाला ज्यामध्ये तुमच्या चित्रपटाची डिजिटल प्रत जोडायची आहे त्या Google खाते मध्ये साइन इन करा. तुम्ही डिजिटल प्रत रिडीम केल्यावर, ती दुसर्‍या खात्यावर ट्रान्सफर करू शकत नाही.
  1. Android फोनवर, Google Play Store अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायचे असलेले खाते निवडा.

दुसरी पायरी: तुमच्या चित्रपटाचा Google Play कोड मिळवण्यासाठी प्रचारात्मक कोड वापरा

तुम्ही फक्त डीव्हीडी किंवा ब्लू-रेमध्ये खरेदी केलेल्या चित्रपटाची डिजिटल प्रत मिळवू शकता. डिजिटल प्रतदेखील तुमच्या डीव्हीडी किंवा ब्लू-रे प्रतीच्या गुणवत्तेशी जुळेल, त्यामुळे तुम्ही SD गुणवत्तेतील डीव्हीडी खरेदी केल्यास, तुमची डिजिटल प्रतदेखील SD मध्ये असेल.

महत्त्वाचे: तुम्ही तुमचा प्रचारात्मक कोड फक्त तुमची डीव्हीडी किंवा ब्लू-रे खरेदी केलेल्या देशामध्ये रिडीम करू शकता. तुम्ही प्रवास करत असल्यास आणि डिजिटल प्रतीसह डीव्हीडी किंवा ब्लू-रे खरेदी केल्यास, तो देश सोडण्यापूर्वी डिजिटल प्रत रिडीम करण्याची खात्री करा.

तुमची डिजिटल प्रत रिडीम करण्यासंबंधी सूचनांसाठी डीव्हीडी किंवा ब्लू-रे चित्रपट पहा. तुम्हाला प्रचारात्मक कोड मिळाला असल्यास, खालील पायर्‍या फॉलो करा: 

  1. तुम्हाला तुमचा चित्रपट कुठे मिळाला आहे त्यानुसार, त्यांची रिडेंप्शन साइट उघडा. वेगळ्या भागीदारांसाठी, रिडेंप्शन साइट तपासा.
  2. वेबसाइटवर, तुम्हाला तुमच्या डीव्हीडी किंवा ब्लू-रे सोबत मिळालेला तुमचा प्रचारात्मक कोड एंटर करा.
  3. तळाशी, तुम्हाला परिणाम दिसेल: Google Play कोड xxxxxx.
  4. Google Play Store वर रिडीम करण्यासाठी कोड कॉपी करा.

तिसरी पायरी: Google Play वर तुमचा चित्रपट मिळवा

  1. Google Play अ‍ॅप Google Play उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, प्रोफाइल आयकनवर टॅप करा.
  3. पेमेंट आणि सदस्यत्वे आणि त्यानंतर भेटवस्तू कोड रिडीम करा वर टॅप करा.
  4. कोड एंटर करा.
  5. रिडीम करा वर टॅप करा.

टीप: तुम्ही प्रचारात्मक कोड फक्त एकदा रिडीम करू शकता.

चौथी पायरी: तुमचा चित्रपट पहा

तुमचा चित्रपट तुमच्या Google Play लायब्ररीमध्ये जोडला गेल्यानंतर, तुम्हाला तो विविध मार्गांनी पाहता येईल. तुम्ही तुमचे चित्रपट आणि शो कुठे पाहू शकता ते जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या ब्लू-रे किंवा डीव्हीडीची डिजिटल प्रत रिडीम करू शकत नसताना येणार्‍या समस्यांचे निराकरण करणे

तुमचा प्रचारात्मक कोड Google Play कोडसाठी रिडीम करण्याचा प्रयत्न करत असताना तुम्हाला समस्या आल्यास, साहाय्यासाठी योग्य त्या भागीदाराशी संपर्क साधा.

भागीदार सपोर्टसंबंधी माहिती
Disney

युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा: https://redeemdigitalmovie.com/
जपान: http://www.digitalcopyplus.jp/help/

HBO

युनायटेड स्टेट्स: http://www.hbodigitalhd.com/

20th Century Fox https://www.foxmovies.com/
Paramount http://www.paramountdigitalcopy.com/support
Universal https://www.uphe.com/contact-support
Sony Pictures https://redeem.sonypictures.com/
Warner Bros. https://digitalredeem.warnerbros.com/
Lions Gate https://movieredeem.com/
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1039031275549168163
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false