गेमर आयडी तयार करणे किंवा बदलणे

Google Play Games च्या मोबाइल अ‍ॅप वरील काही गेममध्ये तुम्ही गेमरचे नाव वापरून साइन इन करून ते खेळू शकता. गेमरचे नाव म्हणजे तुमच्या Google खाते शी लिंक केलेले युनिक वापरकर्ता नाव आहे.

तुमचा गेमर आयडी वापरून गेममध्ये साइन इन केल्याने, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • लीडरबोर्डमध्ये सहभागी होणे
  • झकास कामगिरी मिळवणे
  • तुमचा गेम आपोआप सेव्ह करणे
  • सर्व Android फोन आणि टॅबलेटवर गेम खेळणे
  • मोबाइल, टॅबलेट आणि Android TV गेमवर मल्टिप्लेअर मोडमार्फत इतरांसोबत खेळणे

गेममध्ये Play Games साठी साइन-इन बटण असल्यास, तुम्ही त्या गेमसोबत तुमचा गेमर आयडी वापरू शकता.

गेमर आयडी तयार करा किंवा बदला

Android फोन किंवा टॅबलेटवर

तुम्ही Play Games वर एखाद्या गेममध्ये किंवा खुद्द Play Games अ‍ॅपमध्ये साइन इन केल्यावर, तुम्हाला गेमर आयडी तयार करण्यास सांगितले जाईल.

  1. तुम्हाला सूचना दिसल्यावर, पुढील वर टॅप करा.
  2. तुम्हाला डीफॉल्ट गेमर आयडी आणि प्रोफाइल फोटो दिसेल.
    • गेमर आयडी बदलण्यासाठी, त्यावर टाइप करा.
    • फोटो बदलण्यासाठी, संपादित करा Edit वर टॅप करा.
  3. तुम्हाला ठेवायची असलेली सेटिंग्ज निवडा.
  4. तयार करा वर टॅप करा.

Android TV वर

तुम्ही Android TV मध्ये साइन इन करता तेव्हा, तुम्हाला गेमर आयडी तयार करण्यास सांगितले जाईल.

  1. तुम्हाला डीफॉल्ट प्रोफाइल फोटो दिसेल. बदलण्यासाठी, दुसरी इमेज निवडा.
  2. पुढील निवडा.
  3. डीफॉल्ट गेमर आयडीवर टाइप करा आणि त्यानंतर पुढील निवडा.
  4. तुमची सेटिंग्ज कंफर्म करा.
  5. पूर्ण करा वर क्लिक करा.

तुमची सेटिंग्ज बदलण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही कोणते खाते वापरत आहात ते तपासा

Android फोन किंवा टॅबलेटवर

  1. तुमच्या Android फोन किंवा टॅबलेटवर, Play Games Play Games उघडा.
  2. तळाशी, प्रोफाइल वर टॅप करा.
  3. तुमच्या गेमर आयडीखाली, तुम्ही कोणते खाते वापरत आहात ते तुम्हाला दिसेल.

Android TV वर

  1. तुमच्‍या डिव्‍हाइसच्‍या सेटिंग्ज मेनूमध्ये जा
  2. "वैयक्तिक" या अंतर्गत, तुमचे खाते निवडा.
  3. खाती स्विच करण्यासाठी, खाते काढून टाका निवडा.
  4. दुसरे खाते जोडण्याच्या पायर्‍या फॉलो करा. Android TV वर तुमचे खाते बदलण्याबद्दल जाणून घ्या.

Tip: अयोग्य गेमर आयडीची तक्रार कशी करायची ते जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
9657049409961867431
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
84680
false
false