तुम्ही घरी काम किंवा ब्राउझ करताना Chrome चा पुरेपूर वापर करू शकता. तुम्ही दुसरा कॉंप्युटर अॅक्सेस करण्यासाठी, वेब पेजचे भाषांतर करण्यासाठी आणि वापरकर्ता प्रोफाइलदरम्यान स्विच करण्यासाठी Chrome वापरू शकता. तुम्हाला सुरुवात करण्यात मदत करण्यासाठी हे काही स्रोत आहेत:
मूलभूत गोष्टी जाणून घ्या
- Google Chrome डाउनलोड आणि इंस्टॉल करा: ब्राउझ करण्यासाठी तुमच्या कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइसवर Chrome इंस्टॉल करा.
- इतरांसोबत Chrome शेअर करा: एकाहून अधिक लोकांसोबत कॉंप्युटर शेअर करण्यासाठी प्रोफाइल तयार करा आणि ऑफिस आणि वैयक्तिक यांसारखी तुमची खाती वेगळी ठेवा.
- तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरा: Chrome वर वेगवेगळ्या साइटसाठी तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरा आणि त्यासंबंधित समस्येचे निराकरण करा.
- फाइल डाउनलोड करा: दस्तऐवज, PDF, इमेज आणि मीडिया यांसारख्या फाइल उघडा आणि सेव्ह करा.
- अॅक्सेसिबिलिटी एक्स्टेंशनसह Chrome वापरा: अॅक्सेसिबिलिटी एक्स्टेंशन इंस्टॉल करून Chrome वापरणे सोपे बनवा.
तुमच्या उत्पादनक्षमतेमध्ये सुधारणा करा
- Chrome मध्ये टॅब वापरणे: Chrome मध्ये तुमचे टॅब उघडा, पहा आणि व्यवस्थापित करा. तुम्ही कस्टम बॅकग्राउंड इमेज किंवा तुमच्या साइटचे शॉर्टकट वापरून तुमचे नवीन टॅब पेज कस्टमाइझदेखील करू शकता.
- Chrome कीबोर्ड शॉर्टकट वापरा: कार्ये अधिक जलद पूर्ण करण्यासाठी लोकप्रिय शॉर्टकट जाणून घ्या.
- गडद मोड किंवा गडद थीममध्ये Chrome ब्राउझ करा: तुमचे होम पेज, टूलबार, सेटिंग्ज आणि इतर पेज गडद करण्यासाठी गडद मोड किंवा गडद थीम सुरू करा.
- Chrome रिमोट डेस्कटॉप सह दुसरा कॉंप्युटर अॅक्सेस करा: Chrome रिमोट डेस्कटॉप सह इंटरनेटवरून दुसर्या कॉंप्युटरवरील फाइल आणि अॅप्लिकेशन अॅक्सेस करण्यासाठी कॉंप्युटर किंवा मोबाइल डिव्हाइस वापरा.
- Chrome च्या भाषा बदलणे आणि वेब पेजचे भाषांतर करणे: Chrome वापरत असलेली भाषा बदला आणि Chrome ला तुमच्यासाठी वेब पेजचे भाषांतर करू द्या.
- तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमचे बुकमार्क, पासवर्ड आणि आणखी बरेच काही मिळवणे: तुमच्या Google खाते मध्ये माहिती सेव्ह करून, ती तुमच्या सर्व डिव्हाइसवर वापरण्यासाठी Chrome मध्ये साइन इन करा.
सामान्य समस्यांसाठी मदत मिळवणे
- कनेक्शन एररचे निराकरण करा: तुम्ही वेबसाइटवर आल्यावर तुम्हाला एरर मेसेज आल्यास हे निराकरण उपाय करून पाहा.
- फाइल डाउनलोड करण्यासंबंधित एररचे निराकरण करा: तुम्ही अॅप्स, थीम, एक्स्टेंशन किंवा इतर फाइल डाउनलोड करण्याचा प्रयत्न करत असताना Chrome वर तुम्हाला एरर मेसेज आल्यास हे निराकरण उपाय करून पाहा.
- ‘अरेरे!’ पेज क्रॅश आणि पेज लोड होण्यासंबंधित इतर एररचे निराकरण करणे: तुम्हाला "अरेरे" ही एरर किंवा वेब पेजऐवजी दुसरा एरर कोड मिळाल्यास, ही निराकरणे वापरून पहा.
- साइटचे कनेक्शन सुरक्षित आहे का ते तपासा: वेबसाइटवर जाणे सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी सुरक्षा माहिती किंवा Chrome सूचना तपासा.