मजकूर, इमेज आणि व्हिडिओचा आकार बदलणे (झूम)

तुम्ही एका किंवा सर्व वेब पेजसाठी मजकूर, इमेज आणि व्हिडिओचा आकार बदलू शकता.

विशिष्ट साइटसाठी डीफॉल्ट पेज झूम सेट करणे

वेब पेजवर प्रत्येक गोष्ट मोठी किंवा लहान करण्यासाठी झूमचे पर्याय निवडा. 

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, अधिक आणखी वर क्लिक करा.
  3. "झूम" च्या बाजूला, तुम्हाला हवे असलेले झूम करण्याचे पर्याय निवडा:
    • प्रत्येक गोष्ट मोठी करण्यासाठी: झूम इन Zoom in वर क्लिक करा.
    • प्रत्येक गोष्ट लहान करण्यासाठी: झूम आउट Zoom out वर क्लिक करा.
    • फुल-स्क्रीन मोड वापरण्यासाठी: फुल स्क्रीन Full screen वर क्लिक करा.

तुम्ही झूम इन किंवा झूम आउट करण्यासाठीदेखील कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता:

  • प्रत्येक गोष्ट मोठी करण्यासाठी:
    • Windows आणि Linux: Ctrl आणि + दाबा.
    • Mac: ⌘ आणि + दाबा.
    • Chrome OS: Ctrl आणि + दाबा.
  • प्रत्येक गोष्ट लहान करा:
    • Windows आणि Linux: Ctrl आणि - दाबा.
    • Mac: ⌘ आणि - दाबा.
    • Chrome OS: Ctrl आणि - दाबा.
  • फुल-स्क्रीन मोड वापरा:
    • Windows आणि Linux: F11 दाबा.
    • Mac: ⌘ + Ctrl + f दाबा.
    • Chrome OS: तुमच्या कीबोर्डच्या सर्वात वरती, फुल स्क्रीन कीFull screen hides tabs and launchers. दाबा. या कीला F4 असेही म्हणतात.

विशिष्ट साइटसाठी झूम पातळ्या व्यवस्थापित करा

तुम्ही भेट दिलेल्या साइटच्या झूम पातळ्या तुम्ही बदलल्यानंतर, त्यांना एकाच ठिकाणावरून रीसेट करण्यासाठी:
  1. Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. अतिरिक्त आशय सेटिंग्ज आणि त्यानंतर झूम पातळ्या वर क्लिक करा.
  5. विशिष्ट साइटसाठी आकार बदलण्याची सेटिंग्ज काढून टाकण्यासाठी, X वर क्लिक करा.

सर्व वेबपेजसाठी पेज झूम किंवा फॉंटचा आकार सेट करा

तुम्ही मजकूर, इमेज आणि व्हिडिओंच्या समावेशासह तुम्ही भेट देत असलेल्या वेबपेजवरील प्रत्येक गोष्टीचा आकार बदलू शकता किंवा तुम्ही फक्त फॉंटचा आकार बदलू शकता.

महत्त्वाचे: काही वेबसाइट हे ब्राउझरना फक्त मजकुराचा आकार बदलू देत नाहीत. त्या साइटसाठी, Chrome ला फॉंटचा आकार अ‍ॅडजस्ट करता येणार नाही.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वर उजवीकडे, आणखी आणखीआणि त्यानंतरसेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. स्वरूप वर क्लिक करा.
  4. तुम्‍हाला हवे असलेले बदल करा:
    • सर्व बदलण्यासाठी: "पेज झूम" च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला झूम करण्याचा पर्याय निवडा.
    • फॉंटचा आकार बदलण्यासाठी: "फॉंट आकार" च्या बाजूला, डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला फॉंटचा आकार निवडा. तुम्ही फाँट कस्टमाइझ करा वर क्लिक करून फाँटचे आणखी पर्यायदेखील बदलू शकता.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3684175992851676552
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false