फाइल डाउनलोड करणे

तुमच्या कॉंप्युटरवर किंवा डिव्हाइसवर फाइल किंवा इमेज सेव्ह करण्यासाठी, ती डाउनलोड करा. फाइल तुमच्या डीफॉल्ट डाउनलोड स्थानावर सेव्ह केली जाईल.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुम्हाला फाइल डाउनलोड करायची असलेल्या साइटवर जा.
  3. फाइल सेव्ह करा:
    • अनेक फाइल: डाउनलोड लिंकवर क्लिक करा. तुम्ही फाइलवर राइट-क्लिकदेखील करू शकता आणि अशी सेव्ह करा निवडू शकता.
    • इमेज: इमेजवर राइट-क्लिक करा आणि इमेज अशी सेव्ह करा निवडा.
    • व्हिडिओ: व्हिडिओ वर पॉइंट करा. डाउनलोड करा वर क्लिक करा. तुम्ही ही कृती करू शकत नसल्यास, या व्हिडिओच्या मालकाने किंवा होस्टिंग साइटने डाउनलोड प्रतिबंधित केले असावेत.
    • PDF: फाइलवर राइट-क्लिक करा आणि लिंक अशी सेव्ह करा निवडा.
    • वेब पेज: सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर आणखी टूल आणि त्यानंतर पेज असे सेव्ह करा वर क्लिक करा.
  4. विचारल्यास, तुम्हाला फाइल कुठे सेव्ह करायची आहे ते निवडा, त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.
    • एक्झिक्युटेबल फाइल (.exe, .dll, .bat): तुम्हाला फाइलवर विश्वास असल्यास, सेव्ह करा वर क्लिक करा. तुम्हाला डाउनलोडमधील आशयाबद्दल खात्री नसल्यास, काढून टाका वर क्लिक करा.
  5. तुम्ही डाउनलोड सुरू करता, तेव्हा अ‍ॅड्रेस बारच्या बाजूला सर्वात वरती उजवीकडे डाउनलोड प्रगतीपथावर आहे आयकन दिसेल. डाउनलोड पूर्ण झाल्यावर, डाउनलोड ट्रे उघडेल.
  6. तुमची फाइल उघडण्यासाठी, नवीन उघडा वर क्लिक करा.
    • तुम्ही फाइल उघडण्यासाठी तिच्यावर क्लिकदेखील करू शकता.
टिपा:
  • फोल्डरमध्ये दाखवा यासारख्या अतिरिक्त कृती दाखवण्यासाठी, फाइलच्या नावावर पॉइंट करा.
  • तुम्ही फाइल डाउनलोड केल्यास किंवा तुम्ही अलीकडे फाइल डाउनलोड केली असल्यास, डाउनलोड ट्रे दिसेल. अलीकडे डाउनलोड केलेल्या फाइल अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसतील.
  • अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे डाउनलोड ट्रे दिसत नसल्यास, सर्व डाउनलोड पाहण्यासाठी आणखी आणि त्यानंतर डाउनलोड वर क्लिक करा.
  • तुम्ही डाउनलोड केलेली फाइल दुसरा फोल्डर, प्रोग्राम किंवा वेबसाइटवर ड्रॅग करू शकता. डाउनलोड केलेली फाइल हलवण्यासाठी, डाउनलोड ट्रेमध्ये  , फाइलवर क्लिक करा आणि लक्ष्यित स्थानावर ड्रॅग करा.

फाइल डाउनलोडसंबंधित एररचे निराकरण कसे करावे याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या डीफॉल्ट डाउनलोड परवानग्या बदला
तुम्ही भेट दिलेल्या साइटना संबंधित फाइल एकत्र डाउनलोड करण्याची अनुमती देणे तुम्ही निवडू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. अतिरिक्त परवानग्या आणि त्यानंतर ऑटोमॅटिक डाउनलोड वर क्लिक करा.
  5. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.
डाउनलोड थांबवणे किंवा रद्द करणे
  1. सर्वात वरती उजवीकडे, थांबवण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी फाइल डाउनलोड पहा.
  2. फाइलच्या नावावर पॉइंट करा.
  3. थांबवा , पुन्‍हा सुरू करा किंवा रद्द करा वर क्लिक करा.
तुम्ही डाउनलोड केलेल्या फाइलची सूची शोधणे
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर डाउनलोड वर क्लिक करा.
    • फाइल उघडण्यासाठी, तिच्या नावावर क्लिक करा. फाइल प्रकारासाठी असलेल्या तुमच्या कॉंप्युटरच्या डीफॉल्ट अ‍ॅप्लिकेशनमध्ये ती उघडेल.
    • तुमच्या इतिहासामधून डाउनलोड काढून टाकण्यासाठी, फाइलच्या उजवीकडे, काढून टाका काढून टाका वर क्लिक करा. फाइल Chrome वरील तुमच्या डाउनलोड पेजमधून काढून टाकली जाईल, तुमच्या कॉंप्युटरमधून नाही.
डीफॉल्ट PDF डाउनलोड परवानग्या बदला
तुम्ही एखाद्या साइटवर गेल्यास, PDFs डाउनलोड व्हाव्यात की Chrome मध्ये उघडाव्यात हे तुम्ही निवडू शकता.
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. गोपनीयता आणि सुरक्षा आणि त्यानंतर साइट सेटिंग्ज वर क्लिक करा.
  4. अतिरिक्त आशय सेटिंग्ज आणि त्यानंतर PDF दस्तऐवज वर क्लिक करा.
  5. तुम्हाला तुमचे डीफॉल्ट सेटिंग म्हणून हवा असलेला पर्याय निवडा.
संपादित केलेली PDF डाउनलोड करणे

तुम्ही PDF ऑनलाइन संपादित करू शकता, त्यानंतर संपादित केलेली आवृत्ती तुमच्या कॉंप्युटरवर सेव्ह करू शकता.

  1. ऑनलाइन PDF फॉर्मवर जा.
  2. PDF फॉर्ममध्ये टाइप करा.
  3. डाउनलोड आणि त्यानंतर संपादित केलेले निवडा.

टीप: तुम्ही संपादित करून सेव्ह केलेली PDF उघडू शकता आणि संपादित करणे पुढे सुरू ठेवू शकता.

डाउनलोड स्थाने बदलणे

तुम्ही तुमच्या कॉंप्युटरवर डाउनलोड बाय डीफॉल्ट सेव्ह करण्याचे स्थान निवडू शकता किंवा प्रत्येक डाउनलोडसाठी विशिष्ट जागा निवडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर डाउनलोड वर क्लिक करा.
  3. तुमची डाउनलोड सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करा:
    • डीफॉल्ट डाउनलोड स्थान बदलण्यासाठी, बदला वर क्लिक करा आणि तुम्हाला फाइल कुठे सेव्ह करायच्या आहेत ते निवडा.
    • तुम्हाला प्रत्येक डाउनलोडसाठी विशिष्ट स्थान निवडायचे असल्यास, डाउनलोड करण्यापूर्वी प्रत्येक फाइल कुठे सेव्ह करावी ते विचारा सुरू करा.
डीफॉल्ट डाउनलोड स्थाने

तुम्ही तुमचे डीफॉल्ट डाउनलोड स्थान बदलले नसल्यास, Google Chrome पुढील स्थानांवर फाइल डाउनलोड करते:

  • Windows 10 आणि त्यावरील आवृत्ती: \Users\<username>\Downloads
  • Mac: /Users/<username>/Downloads
  • Linux: /home/<username>/Downloads

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4183563321347722033
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false