Google Chrome डाउनलोड आणि इंस्टॉल करणे

Google Chrome हा कोणत्याही शुल्काशिवाय उपलब्ध असलेला एक जलद वेब ब्राउझर आहे. Chrome हे तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करते का आणि तुमच्याकडे सिस्टमसंबंधित इतर आवश्यक गोष्टी आहेत का हे तुम्ही डाउनलोड करण्यापूर्वी तपासू शकता.

Chrome कसे इंस्टॉल करायचे

Windows
  1. इंस्टॉलेशन फाइल डाउनलोड करणे.
  2. सुचवले गेल्यास, रन करा किंवा सेव्ह करा वर क्लिक करा.
    • तुम्ही सेव्ह करा निवडल्यास, इंस्टॉलेशन सुरू करण्यासाठी पुढीलपैकी एक कृती करा:
      • डाउनलोड करा वर डबल-क्लिक करा.
      • फाइल उघडा वर क्लिक करा.
  3. "तुम्हाला या अ‍ॅपला तुमच्या डिव्हाइसमध्ये बदल करण्याची अनुमती द्यायची आहे का" असे विचारले गेल्यास, होय वर क्लिक करा.
  4. Chrome सुरू करा:

तुम्ही Internet Explorer किंवा Safari यांसारखे वेगळे ब्राउझर वापरले असल्यास, तुम्ही तुमची सेटिंग्ज Chrome मध्ये इंपोर्ट करणे हे करू शकता.

Chrome ऑफलाइन इंस्टॉल करणे

तुमच्या Windows काँप्युटरवर Chrome डाउनलोड करणे याबाबत तुम्हाला समस्या येत असल्यास, वेगळ्या काँप्युटरवर Chrome डाउनलोड करण्यासाठी तुम्ही खालील पर्यायी लिंक वापरून पाहू शकता.

  1. इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या काँप्युटरवर, पर्यायी Chrome इंस्टॉलर डाउनलोड करा.
  2. तुम्हाला ज्या काँप्युटरवर Chrome इंस्टॉल करायचे आहे त्यावर फाइल हलवा.
  3. फाइल उघडा आणि इंस्टॉल करण्यासाठी स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.

तुम्ही नियमित डाउनलोड पेजवर पोहोचल्यास, ती सामान्य गोष्ट आहे. इंस्टॉलर सारखेच दिसत असले तरीही, त्यांपैकी तुमच्यासाठी सर्वोत्तम इंस्टॉलर कोणता हे एक विशेष टॅग आपल्याला सांगतो.

तुम्ही फाइल डाउनलोड केल्यावर, ती दुसर्‍या काँप्युटरवर पाठवू शकता.

Mac

Mac वर Chrome वापरण्यासाठी, तुमच्याकडे macOS Catalina 10.15 आणि त्यावरील आवृत्ती असणे आवश्यक आहे.

  1. इंस्टॉलेशन फाइल डाउनलोड करणे.
  2. "googlechrome.dmg" या नावाची फाइल उघडा.
  3. उघडणाऱ्या विंडोमध्‍ये, Chrome Chrome शोधा.
  4. Chrome अ‍ॅप्लिकेशन फोल्डरमध्ये ड्रॅग करा.
    • तुम्हाला अ‍ॅडमिन पासवर्ड एंटर करण्यास सांगितले जाऊ शकते.
    • तुम्हाला अ‍ॅडमिन पासवर्ड माहीत नसल्यास, तुमच्या काँप्युटरवर तुमच्या डेस्कटॉपसारख्या, तुम्हाला संपादने करता येतील अशा ठिकाणी Chrome ड्रॅग करा.
  5. Chrome उघडा.
  6. फाइंडर उघडा.
  7. साइडबारमध्ये, Google Chrome च्या उजवीकडे, बाहेर काढा Eject वर क्लिक करा.
Linux

तुमच्या काँप्युटरवर जे सॉफ्टवेअर प्रोग्राम इंस्टॉल करते, तेच Chrome इंस्टॉल करण्यासाठी वापरा. तुम्हाला अ‍ॅडमिनिस्ट्रेटर खात्याचा पासवर्ड एंटर करण्यास सांगितले जाईल.

  1. इंस्टॉलेशन फाइल डाउनलोड करणे.
  2. पॅकेज उघडण्यासाठी, ओके वर क्लिक करा.
  3. पॅकेज इंस्टॉल करा वर क्लिक करा.

Google Chrome हे तुमच्या सॉफ्टवेअर व्यवस्थापकावर जोडले जाईल, जेणेकरून ते अप टू डेट राहील.

Chromebook
सर्व नवीन Chromebook वर Chrome हे प्रीइंस्टॉल केलेले असते. तुमचे Chromebook कसे सेट करायचे ते जाणून घ्या.

Chrome वापरण्यासाठी सिस्टीम आवश्यकता

Windows
  • Intel प्रोसेसरसह Windows वर Chrome वापरण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता असेल:
    • Windows 10 आणि त्यावरील आवृत्ती
    • Intel Pentium 4 प्रोसेसर किंवा SSE3 सक्षम असलेली त्‍यानंतरची आवृत्ती
  • ARM प्रोसेसरसह Windows वर Chrome वापरण्यासाठी, तुम्हाला पुढील गोष्टींची आवश्यकता असेल:
    • Windows 11 आणि त्यावरील आवृत्ती
Mac

Mac वर Chrome वापरण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी लागतील:

  • macOS Catalina 10.15 आणि त्यावरील आवृत्ती
Linux

Linux वर Chrome वापरण्यासाठी, तुम्हाला खालील गोष्टींची आवश्यकता असेल:

  • 64-बिट Ubuntu 18.04+, Debian 10+, openSUSE 15.2+ किंवा Fedora Linux 32+
  • Intel Pentium 4 प्रोसेसर किंवा SSE3 सक्षम असलेली त्‍यानंतरची आवृत्ती

Chrome मधील समस्यांचे निराकरण करा

Wayland वर Chrome संबंधित समस्यांचे निराकरण करणे

Linux वरील Chrome हे आता X11 सह Wayland लादेखील सपोर्ट करते. Linux वर Chrome उघडते, तेव्हा यांपैकी एक डिस्प्ले सर्व्हर प्रोटोकॉल आपोआप निवडला जातो.

Chrome हे डिस्प्ले सर्व्हर प्रोटोकॉलसह कसे संवाद साधते
  • तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या कृती करता याव्यात म्हणून मदत करण्यासाठी Chrome हे डिस्प्ले सर्व्हर प्रोटोकॉलसोबत संवाद साधते. तुम्हाला Wayland मध्ये या प्रकारच्या कृती करताना समस्या येत असल्यास, तुम्ही पुन्हा X11 वर बदलू शकता:
    • ड्रॅग करून ड्रॉप करा
    • कॉपी करून पेस्ट करा
    • कीबोर्ड, माउस किंवा टच इनपुट
  • Wayland हे Chrome ची विशिष्ट कृती करण्याची क्षमता प्रतिबंधित करते, जसे की:
    • टॅब ड्रॅग करणे हे सुलभ केलेले पूर्वावलोकन थंबनेल वापरते.
    • विंडो स्क्रीनवर सेट केलेल्या स्थानावर ठेवल्या जाऊ शकत नाहीत.
Chrome ऑटोमॅटिक डिस्प्ले सर्व्हर प्रोटोकॉल निवड ओव्हरराइड कशी करायची

तुमच्या ब्राउझरवरून:

  1. chrome://flags वर नेव्हिगेट करा
  2. #ozone-platform-hint हे X11 किंवा Wayland वर सेट करा

कमांड लाइनवरून:

  1. कमांड लाइनवर नेव्हिगेट करा
  2. Chrome लाँच करा:
    • X11 साठी: --ozone-platform=x11
    • Wayland साठी: --ozone-platform=wayland

S मोडमुळे Chrome इंस्टॉल करू शकत नाही

तुमच्या Windows काँप्युटरवर तुम्ही Chrome इंस्टॉल करू शकत नसल्यास, तुमचा काँप्युटर S मोडमध्ये असू शकतो. तुम्हाला Chrome डाउनलोड आणि इंस्टॉल करायचे असल्यास, S मोडमधून बाहेर कसे पडायचे त्याबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही Chrome इंस्टॉल करताना येणार्‍या समस्यांचे निराकरण कसे करायचे ते जाणून घ्या हेदेखील करू शकता.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
4146931570595468695
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false