Chrome मध्ये भाषा बदलणे आणि वेबपेजचे भाषांतर करणे

तुम्ही Chrome मध्ये तुमची प्राधान्य असलेली भाषा बदलू शकता. Chrome हे तुमच्यासाठी पेजचे भाषांतरदेखील करू शकते.

Chrome मध्ये वेबपेजचे भाषांतर करा

तुम्हाला समजत नसलेल्या भाषेमध्ये लिहिलेल्या पेजला तुम्ही भेट दिल्यास, तुम्ही पेजचे भाषांतर करण्यासाठी Chrome वापरू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. दुसर्‍या भाषेमध्ये लिहिलेल्या वेबपेजवर जा.
  3. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, भाषांतर करा वर क्लिक करा.
  4. प्राधान्य दिलेल्या भाषेवर क्लिक करा.
  5. Chrome तुमच्या सध्याच्या वेबपेजचे भाषांतर करेल.

काम करत नाही का? वेबपेज रिफ्रेश करण्याचा प्रयत्न करा. तरीही काम करत नसल्यास, पेजवर कुठेही राइट क्लिक करा. त्यानंतर, [भाषा] मध्ये भाषांतरित करा वर क्लिक करा.

निवडलेल्या मजकुराचे भाषांतर करणे

तपशील समजण्यास आणखी सोपे करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही पेजच्या एका विभागाचे भाषांतर करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. दुसर्‍या भाषेमध्ये लिहिलेल्या वेबपेजवर जा.
  3. मजकुरामधील विभाग हायलाइट करा.
  4. हायलाइट केलेल्या मजकुरावर राइट क्लिक करा.
  5. निवडीचे [भाषा] मध्ये भाषांतर करा वर क्लिक करा.
टीप: तुम्हाला भाषांतर करायची भाषा बदलायची असल्यास, आणखी संगतवार ठेवा आणि त्यानंतर दुसरी भाषा निवडा आणि त्यानंतर डाउन अ‍ॅरो Down arrow वर क्लिक करा.

तुमची डीफॉल्ट पेज भाषांतर सेटिंग्ज बदला

बाय डीफॉल्ट, Chrome तुम्हाला समजत नसलेल्या भाषेमध्ये लिहिलेल्या पेजचे भाषांतर करण्याची सुविधा देते.

Important: To turn translation suggestions on or off, learn how to manage languages on your Chromebook.

भाषांतर सुरू किंवा बंद करा

Chrome ने वेबपेजचे भाषांतर करण्यासाठी सुविधा द्यावी की नाही हे तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, भाषा वर क्लिक करा.
  4. "Google Translate" या अंतर्गत, Google Translate वापरा सुरू किंवा बंद करा.

तुमची डीफॉल्ट भाषा बदला

Chrome हे पेजचे भाषांतर करत असलेली भाषा तुम्ही निवडू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, भाषा वर क्लिक करा.
  4. “Google Translate” या अंतर्गत, या भाषेमध्ये भाषांतरित करा वर क्लिक करा.
  5. भाषेच्या सूचीमधून तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.

तुम्हाला माहीत असलेल्या सर्व भाषा जोडा

पेज एकाहून अधिक भाषांमध्ये असल्यास, ते सर्वप्रथम तुमची प्राधान्य दिलेली भाषा दाखवते.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, भाषा वर क्लिक करा.
  4. “प्राधान्य दिलेल्या भाषा” या अंतर्गत, भाषा जोडा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला जोडायच्या असलेल्या भाषा निवडा.
  6. जोडा वर क्लिक करा.
  7. तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या असल्यास:
    • भाषा पुन्हा क्रमाने लावणे: तुम्हाला हलवायच्या असलेल्या भाषेच्या बाजूला, आणखी आणखीआणि त्यानंतर खाली हलवा वर क्लिक करा.
    • भाषा काढून टाकणे: तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या भाषेच्या बाजूला, आणखी आणखीआणि त्यानंतर काढून टाका वर क्लिक करा.

नेहमी भाषांतरित केल्या जाणाऱ्या भाषांची सूची व्यवस्थापित करणे

Chrome हे कोणती भाषा आपोआप भाषांतरित करते ते तुम्ही नियंत्रित करू शकता.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, भाषा वर क्लिक करा.
  4. “Google Translate” या अंतर्गत, या भाषा आपोआप भाषांतरित करा वर क्लिक करा.
  5. भाषा जोडा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला जोडायच्या असलेल्या भाषा निवडा.
  7. जोडा वर क्लिक करा.
  8. एखादी भाषा काढून टाकण्यासाठी, तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या भाषेच्या बाजूला, काढून टाका वर क्लिक करा.

कधीही भाषांतरित केल्या न जाणाऱ्या भाषांची सूची व्यवस्थापित करणे

पेज एकाहून अधिक भाषांमध्ये असल्यास, ते सर्वप्रथम तुमची प्राधान्य दिलेली भाषा दाखवते.

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, भाषा वर क्लिक करा.
  4. “Google Translate” या अंतर्गत, या भाषांचे भाषांतर करणे ऑफर करू नका वर क्लिक करा.
  5. भाषा जोडा वर क्लिक करा.
  6. तुम्हाला जोडायच्या असलेल्या भाषा निवडा.
  7. जोडा वर क्लिक करा.
  8. एखादी भाषा काढून टाकण्यासाठी, तुम्हाला काढून टाकायच्या असलेल्या भाषेच्या बाजूला, काढून टाका वर क्लिक करा.

तुमच्या Chrome ब्राउझरची भाषा बदला (फक्त Windows आणि Chromebook)

Windows वर, तुम्हाला हव्या असलेल्या भाषेमध्ये सर्व सेटिंग्ज आणि मेनू दाखवण्यासाठी, तुम्ही Chrome सेट करू शकता. हा पर्याय फक्त Windows काँप्युटरवर उपलब्ध आहे.

Important: To add or remove web content languages on your Chromebook, learn how to manage languages.

Mac वर की Linux वर? Chrome तुमच्या कॉंप्युटरच्या डीफॉल्ट सिस्टम भाषांमध्ये आपोआप दाखवेल.

  1. तुमच्या Windows कॉंप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. डावीकडे, भाषा वर क्लिक करा.
  4. "प्राधान्य दिलेल्या भाषा" अंतर्गत, तुम्हाला वापरायच्या असलेल्या भाषेच्या बाजूला, आणखी आणखी वर क्लिक करा.
    • भाषा सूचीबद्ध नसल्यास, भाषा जोडा वर क्लिक करून ती जोडा.
  5. Google Chrome या भाषेत दाखवा वर क्लिक करा.
    • हा पर्याय फक्त Windows काँप्युटरवर उपलब्ध आहे.
  6. बदल लागू करण्यासाठी, Chrome रीस्टार्ट करा.

सपोर्ट नसलेल्या भाषेमध्ये लिहा

तुमचा कॉंप्युटर सपोर्ट करत नसलेली भाषा वापरून तुम्हाला लिहायचे असल्यास, Google Input Tools Chrome एक्स्टेंशन वापरा.

तुम्ही Windows वापरत असल्यास, तुम्हाला जटिल स्क्रिप्ट वापरणाऱ्या पूर्व आशियाई भाषा किंवा इतर भाषा जोडण्यासाठी तुमची Windows भाषा सेटिंग्ज कॉंफिगर करणे आवश्यक असू शकते.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15978345528419611480
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false