Chrome मधील Gemini वापरणे

तुम्ही Chrome मधील Gemini वापरून, महत्त्वाचे टेकअवे सहजपणे मिळवण्यासाठी, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, उत्तरे शोधण्यासाठी आणि आणखी बऱ्याच गोष्टी करण्यासाठी तुमच्या ब्राउझरमध्ये AI साहाय्य मिळवू शकता. सर्वात सुसंबद्ध प्रतिसाद देण्यासाठी, Chrome मधील Gemini हे तुमच्या सद्य ब्राउझर टॅबमधील आशय वापरते. काँप्युटरवर, तुम्ही Gemini सोबत कमाल १० उघडे असलेले टॅबदेखील शेअर करू शकता.

तुम्हाला काय आवश्यक आहे

महत्त्वाचे: Chrome मधील Gemini हे या वेळी सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. आम्ही Chrome मधील Gemini हळूहळू रिलीझ करत आहोत, त्यामुळे ते कदाचित तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसेल.

तुमच्या काँप्युटरवर Chrome मधील Gemini वापरण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

तुम्ही ऑफिसच्या किंवा शाळेच्या Google खात्यासह Chrome मधील Gemini वापरत असल्यास, तुमच्या ॲडमिनिस्ट्रेटरने ॲक्सेस सुरू केलेला असणे आवश्यक आहे. ऑफिसच्या किंवा शाळेच्या Google खात्यासह Gemini ॲप्स वापरण्याविषयी अधिक जाणून घ्या.

Chrome मधील Gemini सोबत चॅट करा

  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती, Gemini ला विचारा  वर क्लिक करा.
    • तुम्ही Chrome मधील Gemini पहिल्यांदा वापराल, तेव्हा तुम्हाला त्याची निवड करावी लागेल. निवडण्यासाठी, स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
  3. टेक्स्ट बॉक्समध्ये, तुमचा प्रश्न किंवा विनंती एंटर करा.

टीप: तुम्ही Chrome मधील Gemini निवडल्यानंतर, ते तुमच्या Mac मेनू बारमध्ये किंवा Windows सिस्टीम ट्रेमध्ये जोडले जाते आणि तुम्ही कीबोर्ड शॉर्टकट वापरू शकता.

तुम्ही Chrome मधील Gemini वापरून काय करू शकता

तुम्ही साइड पॅनलमध्ये Chrome मधील Gemini निवडल्यानंतर, तुम्ही थेट Gemini सोबत चॅट करू शकता. उदाहरणार्थ, Chrome मधील Gemini ला पुढील गोष्टी करण्यास सांगून पहा:

  • लेखातील महत्त्वाच्या टेकअवेचा सारांश दे
  • गुंतागुंतीचा विषय वेगळ्या पद्धतीने समजावून सांग
  • तुम्ही शिकत असलेल्या नवीन विषयाच्या तुमच्या ज्ञानाची चाचणी करण्यात मदत कर
  • आहारासंबंधित आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी पाककृतीमध्ये फेरबदल कर
  • संपूर्ण पेजवरील माहितीची तुलना कर किंवा ती एकत्रित कर
  • तुमच्या प्राधान्यांच्या आधारे शिफारशी दे
  • तुमच्या वतीने एकाहून अधिक पायऱ्या असलेल्या कृती पूर्ण करून दे
  • Gmail वापरून इतरांना पाठवण्यासाठी मेसेजचा मसुदा तयार कर
  • तुमचे मागील फोटो आणि अल्बम शोध

Chrome मधील Gemini वापरून तुमचे चॅट व्यवस्थापित करा

Chrome मधील Gemini मध्ये, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • तुम्ही ब्राउझ करत असताना लाइव्ह जा आणि बोला: तळाशी, लाइव्ह जा वर क्लिक करा. Chrome मधील Gemini वापरून लाइव्ह जाण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • टॅब शेअर करा किंवा थांबवा: टेक्स्ट बॉक्समध्ये, टॅब अपडेट करा वर क्लिक करा. त्यानंतर, तुम्हाला जोडायचा किंवा काढून टाकायचा आहे तो टॅब निवडा. शेअर केलेल्या टॅबमध्ये बरोबरची खूण दिसते.
  • Chrome मधील Gemini पॉप-आउट करा किंवा डॉक करा: सर्वात वरती, चॅट पॉप-आउट करा किंवा मूळ टॅबवर डॉक करा वर क्लिक करा.
  • नवीन चॅट सुरू करा: सर्वात वरती, नवीन चॅट सुरू करा वर क्लिक करा. तो पर्याय दिसत नसल्यास, सर्वप्रथम आणखी पर्याय वर क्लिक करा.
  • Gemini मॉडेलदरम्यान स्विच करा: टेक्स्ट बॉक्समध्ये, मॉडेलच्या नावावर क्लिक करा, त्यानंतर मॉडेल निवडा.
  • तुमची अलीकडील Gemini चॅट शोधा: सर्वात वरती, आणखी पर्याय वर क्लिक करा.

Chrome मधील Gemini सोबत शेअर केलेले टॅब व्यवस्थापित करा

तुम्ही Chrome मधील Gemini उघडता, तेव्हा तुमच्या सद्य टॅबवरील पेज आशय बाय डीफॉल्ट शेअर केला जातो. Gemini हे प्रतिसाद देण्यासाठी पेजवरील आशय वापरते. तुम्ही तुमचा सद्य टॅब शेअर करणे कधीही थांबवू शकता. Chrome मधील Gemini तुमच्या डेटासोबत कसे काम करते हे जाणून घ्या.

टॅब शेअर करणे थांबवा
  1. Chrome मधील Gemini मध्ये, टेक्स्ट बॉक्सच्या वरती, शेअर केलेले टॅब दाखवा वर क्लिक करा.
  2. तुम्हाला शेअर करणे थांबवायचा आहे त्या टॅबच्या बाजूला, टॅब काढून टाका वर क्लिक करा.
    • टॅब शेअर केला जात नाही, तेव्हा टॅबवरील चमकणारी अंडरलाइन नाहीशी होते.

टीप: तुम्ही नवीन चॅट सुरू केल्यास, तुमचा सद्य टॅब बाय डीफॉल्ट Gemini सोबत शेअर केला जातो. हे बदलण्यासाठी, तुम्ही तुमच्या Chrome सेटिंग्जमध्ये बाय डीफॉल्ट सद्य टॅब शेअर करा बंद करू शकता. Chrome सेटिंग्जमध्ये ते कसे बंद करावे हे जाणून घ्या.

टॅब शेअर करा

तुमच्या सद्य टॅबव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या सर्व ब्राउझर विंडोवर तुमचे अलीकडे उघडलेले कमाल १० टॅब शेअर करू शकता. Chrome मधील Gemini तुमच्या डेटासोबत कसे काम करते हे जाणून घ्या.

  1. तुमच्या Chrome ब्राउझरच्या सर्वात वरती, Gemini ला विचारा  वर क्लिक करा.
  2. टेक्स्ट बॉक्समध्ये, टॅब जोडा वर क्लिक करा.
  3. तुम्हाला जोडायचे आहेत ते टॅब निवडा.
    • शेअर केलेल्या टॅबमध्ये बरोबरची खूण दिसते.
    • यामुळे तुम्ही शेअर केलेल्या टॅबवरील पेजचा आशय शेअर केला जातो आणि Gemini तो प्रतिसाद देण्यासाठी वापरते.
    • Gemini एखादे पेज वापरत असते, तेव्हा त्याच्या टॅबवर चमकणारी अंडरलाइन दिसते.

टीप: तुम्ही @ एंटर करून आणि टॅब निवडून उघडे असलेले टॅब शोधणे व जोडणे हेदेखील करू शकता.

तुम्ही Workspace वेबपेज शेअर करता, तेव्हा

तुम्ही Chrome मध्ये शेअर केलेल्या Workspace वेबपेजबद्दल (जसे की docs.google.com) तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी Gemini हे थेट तुमचे Workspace खाते अ‍ॅक्सेस करू शकते. यामुळे याची खात्री होते, की उदाहरणार्थ Gemini हे फक्त टॅबमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींऐवजी तुम्ही विचारलेल्या संपूर्ण Google दस्तऐवजाचा संदर्भ घेऊ शकते. Workspace मधील तुमचा आणखी वैयक्तिक आशय वापरण्यासाठी, Workspace अ‍ॅप कनेक्ट करा. Google Workspace अ‍ॅप्स आणि सेवा या Gemini अ‍ॅप्सशी कशा कनेक्ट कराव्यात हे जाणून घ्या.

Chrome मधील Gemini शी संबंधित सेटिंग्ज व्यवस्थापित करणे

ब्राउझरवर आणि डेस्कटॉपवर Gemini आयकन लपवा किंवा दाखवा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज मेनूमध्ये, AI प्रयोग आणि त्यानंतर Chrome मधील Gemini वर क्लिक करा.
    • मेनू लपवलेला असल्यास, सर्वप्रथम मेनू वर क्लिक करा.
  4. “प्राधान्ये” या अंतर्गत, पुढील सेटिंग्ज सुरू करा किंवा बंद करा:
    • Gemini ला ब्राउझरच्या सर्वात वरती दाखवा
    • Mac वर Mac मेनू बारमध्ये Gemini दाखवा आणि कीबोर्ड शॉर्टकट सुरू करा
    • Windows वर सिस्टीम ट्रेमध्ये Gemini दाखवा आणि कीबोर्ड शॉर्टकट सुरू करा

टीप: तुम्ही तुमच्या ब्राउझरच्या सर्वात वरती राइट-क्लिकदेखील करू शकता आणि Gemini अनपिन करा किंवा Gemini पिन करा वर क्लिक करू शकता.

Chrome मधील Gemini साठी परवानग्या व्यवस्थापित करा
  1. तुमच्या काँप्युटरवर, Chrome उघडा.
  2. सर्वात वरती, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. सेटिंग्ज मेनूमध्ये, AI प्रयोग आणि त्यानंतर Chrome मधील Gemini वर क्लिक करा.
    • मेनू लपवलेला असल्यास, सर्वप्रथम मेनू वर क्लिक करा.
  4. “परवानग्या” या अंतर्गत, तुम्ही पुढील परवानग्या सुरू किंवा बंद करू शकता:
    • अचूक स्थान
    • मायक्रोफोन
    • सद्य टॅब बाय डीफॉल्ट शेअर करणे
    • Gemini ला तुमच्यासाठी ब्राउझ करू देणे

टीप: अचूक स्थान सुरू असल्यास , Chrome मधील Gemini हे तुमचे अचूक स्थान अ‍ॅक्सेस करू शकते आणि वापरू शकते. ते बंद असल्यास , Chrome मधील Gemini हे तुमचे अचूक स्थान अ‍ॅक्सेस करू शकणार नाही आणि वापरू शकणार नाही, तसेच फक्त तुमच्या आयपी अ‍ॅड्रेसवरून अंदाजे स्थान मिळवू शकेल.

समस्येचे निराकरण करा किंवा तक्रार करा आणि त्याविषयी फीडबॅक द्या

तुम्हाला Chrome मधील Gemini सापडत नसेल किंवा वापरता येत नसेल

महत्त्वाचे: Chrome मधील Gemini कालानुरूप वापरकर्त्यांसाठी रोल आउट केले जात आहे, त्यामुळे ते अद्याप तुमचा देश किंवा प्रदेश यामध्ये उपलब्ध नसू शकते.

तुमच्या देशामध्ये किंवा प्रदेशामध्ये Chrome मधील Gemini उपलब्ध असल्यास, या पायऱ्या वापरून पहा:

  1. पात्र वापरकर्ता म्हणून Chrome मध्ये साइन इन करा.
  2. तुम्ही सपोर्ट असलेल्या देशामध्ये असल्याची खात्री करा
    • Chrome मधील Gemini निवडक प्रदेश यांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही सपोर्ट असलेल्या प्रदेशामध्ये असूनही, Chrome मधील Gemini वापरू शकत नसल्यास, पुढील पायऱ्या वापरून पहा:
      • तुमचा ब्राउझर रीस्टार्ट करा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्ही अलीकडे या देशांच्या बाहेर प्रवास केला असल्यास, तुमचे स्थान तुमच्या मागील स्थानावरून अपडेट झालेले नसू शकते.
      • तुमचे VPN बंद करणे. असे करण्यासाठी, तुम्हाला अनेकदा VPN ॲप उघडावे लागते आणि "डिस्कनेक्ट करा" निवडावे लागते किंवा स्विच "बंद करा" वर टॉगल करावा लागतो.
    • तुम्ही वरील सर्व गोष्टी करून पाहिल्यानंतरही समस्या कायम राहिल्यास, Chrome ची पुढील आवृत्ती उपलब्ध झाल्यावर ती अपडेट करा आणि समस्येचे निराकरण झाले आहे का हे तपासा.
  3. Chrome ब्राउझर योग्यरीत्या सेट केला असल्याची खात्री करा:
  4. वापरून पाहण्यासारख्या इतर गोष्टी
    तुम्हाला अजूनही Chrome मधील Gemini अ‍ॅक्सेस करण्यात समस्या येत असल्यास, पुढील पायऱ्या वापरून पहा:
    • Chrome मधील Gemini साइड पॅनल किंवा फ्लोटिंग चॅट बॉक्सवर राइट-क्लिक करा आणि रीलोड करा निवडा.
    • व्हर्चुअलाइझ केलेली सिस्टीम बंद करणे: तुम्ही व्हर्चुअल मशीनद्वारे Chrome अ‍ॅक्सेस करत असल्यास, ठरावीक वैशिष्ट्ये प्रतिबंधित केलेली असू शकतात.
    • तुमच्या सिस्टीम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधणे: तुमच्या संस्थेने Chrome मधील Gemini चा वापर बंद केलेला नसल्याची खात्री करा.
Chrome मधील Gemini बाबत समस्येची तक्रार करणे किंवा फीडबॅक पाठवणे
  1. Chrome मधील Gemini च्या सर्वात वरती, आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि मदत आणि त्यानंतर फीडबॅक पाठवा वर क्लिक करा.
  2. समस्येचे वर्णन किंवा तुमचा फीडबॅक एंटर करा.
  3. पर्याय म्हणून, आम्हाला समस्या आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत व्हावी, यासाठी स्क्रीनशॉट जोडा.
  4. पाठवा वर क्लिक करा.

Google तुमचा फीडबॅक कसा वापरते याविषयी अधिक जाणून घ्या.

Gemini च्या प्रतिसादाची तक्रार करा किंवा त्याविषयी फीडबॅक द्या

तुमचा फीडबॅक Gemini अ‍ॅप्सना आणखी उपयुक्त, अचूक आणि सुरक्षित बनवण्यात मदत करतो.

प्रतिसादावर फीडबॅक देण्यासाठी:

  1. Gemini च्या प्रतिसादाच्या खाली, चांगला प्रतिसाद किंवा वाईट प्रतिसाद वर क्लिक करा.
  2. पर्याय म्हणून, तुम्ही कारण निवडू शकता.
    • उदाहरणार्थ, तुम्हाला चुकीचा प्रतिसाद मिळाल्यास किंवा तो असुरक्षित असल्याचे वाटत असल्यास, तुम्ही अनुक्रमे तथ्यानुसार योग्य नाही किंवा आक्षेपार्ह / असुरक्षित निवडू शकता.

कायदेशीर समस्येची तक्रार करण्यासाठी, Gemini च्या प्रतिसादाखाली, कायदेशीर समस्येची तक्रार करा वर क्लिक करा.

Google तुमचा फीडबॅक कसा वापरते याविषयी अधिक जाणून घ्या.

तुमचे डिव्हाइस सपोर्ट असलेल्या भाषेवर सेट केले आहे का हे तपासा
Chrome मधील Gemini सर्व भाषांमध्ये उपलब्ध नाही. तुमचे डिव्हाइस पुढीलपैकी एका भाषेवर सेट केले असल्याची खात्री करा:
  • अफ्रिकान्स
  • अम्हारिक
  • बास्क
  • बंगाली
  • बल्गेरियन
  • कॅटालन
  • चिनी
  • क्रोएशियन
  • झेक
  • डॅनिश
  • डच
  • इंग्रजी
  • इस्टोनियन
  • फिलिपिनो
  • फिन्निश
  • फ्रेंच
  • गॅलिशियन
  • जर्मन
  • ग्रीक
  • गुजराती
  • हिंदी
  • हंगेरियन
  • आइसलँडिक
  • इंडोनेशियन
  • इटालियन
  • जपानी
  • कन्नड
  • कोरियन
  • ला‍ट्वियन
  • लिथुआनियन
  • मलय
  • मल्याळम
  • मराठी
  • नॉर्वेजियन
  • पोलिश
  • पोर्तुगीज
  • रोमानियन
  • रशियन
  • सर्बियन
  • स्लोव्हाक
  • स्लोव्हेनियन
  • स्पॅनिश
  • स्वाहिली
  • स्वीडिश
  • तमिळ
  • तेलुगु
  • थाई
  • तुर्की
  • युक्रेनियन
  • व्हिएतनामी
  • झुलू (फक्त Chrome OS)
तुमचे डिव्हाइस सपोर्ट असलेल्या प्रदेशावर सेट केले आहे का हे तपासा

Chrome मधील Gemini पुढील लोकॅलमध्ये उपलब्ध आहे:

अल्जीरिया

अमेरिकन समोआ

अंगोला

अंटार्क्टिका

अँटिग्वा आणि बार्बुडा

अर्जेंटिना

अर्मेनिया

ऑस्ट्रेलिया

अझरबैजान

बहारीन

बांग्लादेश

बार्बाडोस

बेलिझे

बेनिन

भूतान

बोलिव्हिया

बोस्निया आणि हर्जेगोव्हिना

बोट्सवाना

ब्राझील

ब्रुनेई

बुर्कीना फासो

बुरुंडी

काबो व्हेर्दे

कंबोडिया

कॅमेरून

कॅनडा

मध्य आफ्रिकन रिपब्लिक

चाड

चिली

ख्रिसमस आयलँड

कोकोस (कीलिंग) बेटे

कोलंबिया

कोमोरोज

कुक बेटे

कोस्टा रीका

आयव्हरी कोस्ट

डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो

जिबूती

डोमिनिका

डोमिनिकन रिपब्लिक

इक्वाडोर

ईजिप्त

एल साल्वाडोर

इक्वेटोरीयल गिनी

इरिट्रिया

एस्वाटिनी

इथिओपिया

फिजी

फ्रेंच पॉलिनेशिया

गॅबोन

जॉर्जिया

घाना

ग्रे‍नाडा 

गुआम

ग्वाटेमाला

गिनी

गिनी-बिसाउ

गयाना

हैती

हर्ड आणि मॅक्डोनल्ड बेटे

होंडुरस

हाँगकाँग

भारत

इंडोनेशिया

इराक

इस्त्राइल

जमैका

जपान

जॉर्डन

कझाकस्तान

केन्या

किरीबाती

कोसोव्हो

कुवेत

किरगिझस्तान

लाओस

लेबानन

लेसोथो

लायबेरिया

लिबिया

मकाऊ

मादागास्कर

मालावी

मलेशिया

मालदीव्ह्ज

माली

मार्शल बेटे

मॉरिटानिया

मॉरिशस

मेक्सिको

मायक्रोनेशिया

मोल्डोव्हा

मंगोलिया

मॉन्टेनेग्रो

मोरोक्को

मोझांबिक

म्यानमार

नामिबिया

नउरु

नेपाळ

न्यू कॅलेडोनिया

न्यूझीलँड

निकाराग्वा

नायजर

नायजेरिया

निउए

नॉरफोक आयलँड

नॉर्थ मॅसेडोनिया

उत्तर मारियाना बेटे

ओमान

पाकिस्तान

पलाऊ

पॅलेस्टाइन

पनामा

पापुआ न्यू गिनी

पराग्वे

पेरु

फिलीपीन्स

पिटकेर्न

पुएर्तो रिको

कतार

रिपब्लिक ऑफ काँगो

रवांडा

सेंट किट्स आणि नेव्हिस

सेंट ल्युसिया

सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स

समोआ

साओ तोमे आणि प्रिन्सिपे

सौदी अरेबिया

सेनेगल

सर्बिया

सेशेल्स

सिएरा लिओन

सिंगापूर

सोलोमन आयलँड्स

सोमालिया

दक्षिण अफ्रिका

दक्षिण कोरिया

दक्षिण सुदान

श्रीलंका

सुदान

सुरिनाम

तैवान

ताजिकिस्तान

टांझानिया

थायलंड

बहामास

गांबिया

तिमोर-लेस्टे

टोगो

टोकेलाऊ

टोंगा

त्रिनिदाद आणि टोबॅगो

ट्यूनिशिया

तुर्कमेनिस्तान

टुवालू

यू.एस. व्हर्जिन बेटे

युगांडा

युक्रेन

संयुक्त अरब अमिराती

युनायटेड स्टेट्स

युनायटेड स्टेट्स मायनर आउटलाइंग बेटे

उरुग्वे

उझबेकिस्तान

वानुआटू

व्हेनेझुएला

व्हिएतनाम

वालिस आणि फूटूना

पश्चिमी सहारा

येमेन

झांबिया

झिंबाब्वे

   

संबंधित स्रोत

अधिक मदत आवश्‍यक?

या पुढील पायर्‍या करून पाहा:

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
2198039158427750211
true
मदत केंद्र शोधा
false
true
true
true
true
true
237
false
false
false
false
false