तुमच्या कारमध्ये बिल्ट-इन Google सह Chrome वापरणे

तुमच्या कारमध्ये Chrome वापरण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

Chrome मध्ये साइन इन आणि सिंक करणे

तुम्ही तुमचे Google खाते वापरून Chrome मध्ये साइन इन करता, तेव्हा तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमची माहिती मिळवू शकता आणि Chrome ची अतिरिक्त वैशिष्‍ट्ये वापरू शकता.

तुम्ही साइन इन करता, सिंक करणे सुरू करता किंवा ऑटोफिल वापरता, तेव्हा प्रोफाइल लॉक वापरणे आवश्यक आहे. प्रोफाइल लॉक वापरून, तुम्ही कारमधील तुमचा वैयक्तिक डेटा सुरक्षित करू शकता.

महत्त्वाचे:

  • तुमच्या बिल्ट-इन Google असलेल्या कारमधील Chrome हे प्रत्येक प्रोफाइलसाठी फक्त एका Google खात्याला अनुमती देते. खाती स्विच करण्यासाठी, तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर साइन आउट करू शकता आणि नंतर पुन्हा साइन इन करू शकता.
  • तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉक काढून टाकल्यास, तुमचा सिंक केलेला डेटा डिव्हाइसमधून काढून टाकला जाऊ शकतो.
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. ॲड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि त्यानंतर सिंक सुरू करा वर टॅप करा.
  3. तुम्हाला वापरायचे असलेले खाते निवडा.
  4. होय, मी तयार आहे वर टॅप करा.
  5. तुमचे प्रोफाइल लॉक सेट करण्यासाठी, कारचे प्रोफाइल लॉक तयार करा वर टॅप करा.
  6. तुमच्या वाहनाच्या उत्पादकाने दिलेल्या सूचना फॉलो करा. तुम्ही खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकता:
    • पॅटर्न कोड वापरा
    • पिन कोड वापरा
    • पासवर्ड वापरा

टीप: तुम्हाला तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये तुमचे प्रोफाइल लॉक दिसेल. काढून टाकण्यासाठी, तुमच्या वाहनाच्या उत्पादकाशी संपर्क साधा. तुमच्या Android डिव्हाइसवर लॉक कसे सेट करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

साइन आउट करणे आणि सिंक करणे बंद करणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. तुमच्या नावावर टॅप करा.
  4. साइन आउट करा आणि सिंक बंद करा वर टॅप करा.
    • तुम्ही सिंक बंद करता आणि साइन आउट करता, तेव्हा तुम्ही Gmail सारख्या इतर Google सेवांमधूनदेखील साइन आउट करता.
    • सिंक करणे सुरू न करता तुम्ही पुन्हा साइन इन करू शकता.

सिंक केलेली माहिती तुमच्या Google खाते मधून हटवण्यासाठी:

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. chrome.google.com/sync वर जा.
  3. डेटा साफ करा वर स्क्रोल करा आणि त्यावर टॅप करा.

पत्ते, पेमेंट किंवा पासवर्ड हे सेव्ह आणि ऑटोफिल करणे

तुम्ही Chrome ला तुमचे पत्ते किंवा पेमेंट माहिती यांसारखी सेव्ह केलेली माहिती वापरून फॉर्म आपोआप भरू देऊ शकता. याशिवाय, तुम्ही नवीन फॉर्ममध्ये माहिती ऑनलाइन एंटर करता, तेव्हा तुम्हाला ती तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह करायची आहे का, असे Chrome विचारू शकते. Chrome मध्ये आपोआप फॉर्म कसे भरावेत याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही Chrome मध्ये वेगवेगळ्या साइटसाठीचे तुमचे पासवर्ड सेव्हदेखील करू शकता. Chrome मध्ये तुमचे पासवर्ड कसे व्यवस्थापित करावेत हे जाणून घ्या.

महत्त्वाचे:

  • पत्ते, पेमेंट किंवा पासवर्ड सिंक करण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:
    • Google खाते वापरून लॉग इन करणे
    • प्रोफाइल लॉक तयार करणे
  • सेव्ह केलेले पत्ते, पेमेंट किंवा पासवर्ड परत मिळवण्यासाठी, तुम्ही सिंक सुरू करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही तुमचे प्रोफाइल लॉक काढून टाकल्यास, तुमचा सिंक केलेला डेटा डिव्हाइसमधून काढून टाकला जाऊ शकतो.
  • स्थानिकरीत्या पासवर्ड किंवा पेमेंट सेव्ह करण्यासाठी, तुम्ही प्रोफाइल लॉक सेट करणे आवश्यक आहे.
सेटिंग्जमध्ये सेव्ह केलेले पत्ते, पेमेंट किंवा पासवर्ड शोधणे
  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Chrome Chrome उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या सर्वात वरती उजवीकडे, आणखी आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज वर टॅप करा.
    • पुढीलपैकी निवडा:
      • Password Manager
      • पेमेंट पद्धती
      • पत्ते आणि बरेच काही

टीप: सेव्ह केलेली माहिती शोधण्यासाठी किंवा ऑटोफिल करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा ऑथेंटिकेट करण्याची किंवा तुमचे प्रोफाइल लॉक वापरण्याची विनंती केली जाऊ शकते.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
5316565411858175082
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
237
false
false