Google Chat संमत वापर धोरण

महत्त्वाचे: Google Hangouts हे आता Google Chat आहे. तुम्ही यापुढे मोबाइल डिव्हाइस किंवा वेबवरून Hangouts अ‍ॅक्सेस करू शकत नाही. Google Hangouts वरून Google Chat वर स्विच करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

आमच्या वापरकर्त्यांसाठी सकारात्मक अनुभव कायम ठेवण्याकरिता, Google Chat ("Chat") वापरताना ही धोरणे फॉलो करा. ही धोरणे बदलू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी, Google च्या सेवा अटी वर जा.

स्पॅम आणि व्यावसायिक वापर

  • स्पॅम हे नको असलेले मेसेज आहेत ज्यामध्ये प्रचारात्मक किंवा व्यावसायिक आशय आणि मोठ्या प्रमाणात केलेल्या मागणीचा समावेश आहे.
  • स्पॅम, मोठ्या संख्येतील व्यावसायिक मेसेज किंवा ऑटोमेटेड मेसेज अथवा कॉल पाठवू नका (किंवा पाठवण्यात मदत करू नका).
  • नको असलेल्या मार्केटिंग कॉलना प्रतिबंधित करणाऱ्या कायद्यांचे उल्लंघन करतील असे कॉल करू नका (उदा. "कॉल करू नका" यासंबंधित कायदे).

Chat मध्ये वापरकर्त्यांना ब्लॉक करणे हे कसे करावे ते जाणून घ्या.

घोटाळा, फिशिंग, आणि इतर फसवणूक करणाऱ्या क्रिया

पुढील गोष्टींच्या समावेशासह, फिशिंगसाठी Chat वापरू नका:

  • पासवर्ड, आर्थिक तपशील आणि सोशल सिक्युरिटी नंबर यांच्या समावेशासह पण या यापुरतेच मर्यादित नसलेल्या संवेदनशील डेटाची मागणी करणे किंवा गोळा करणे
  • इतर वापरकर्त्यांना युक्ती वापरून, त्यांची दिशाभूल किंवा फसवणूक करून खोट्या हेतूने माहिती शेअर करायला लावण्यासाठी Chat वापरणे
  • दुसऱ्या व्यक्तीची तोतयेगिरी करणे किंवा दिशाभूल करण्यासाठी स्वतःला अथवा Chat मेसेज किंवा कॉलच्या स्रोतला चुकीच्या पद्धतीने दाखवणे

मालवेअर

आम्ही पुढील गोष्टी प्रसारित करण्याची अनुमती देत नाही:

  • मालवेअर
  • व्हायरस
  • ट्रोजन हॉर्स
  • करप्ट झालेल्या फाइल
  • नुकसान पोहोचवणारा कोड
  • Google किंवा इतरांची नेटवर्क, सर्व्हर अथवा इतर संरचनेच्या ऑपरेशनला हानी पोहोचवू शकणारे किंवा त्यामध्ये अडथळे आणू शकणारे काहीही

लहान मुलाची सुरक्षितता

पुढील गोष्टींच्या समावेशासह, लहान मुलांचे शोषण होईल अशा कोणत्याही प्रकारे Chat वापरू नका:

  • लहान मुलांना लैंगिक पद्धतीने सादर करणारी बाल लैंगिक अत्याचार इमेजरी किंवा आशय
  • लहान मुलाला दुष्प्रेरित करणे, ज्यामध्ये लैंगिक गैरवापर/गैरवर्तन, तस्करी किंवा इतर शोषण यांसाठी लहान मुलाच्या भावना दाबून टाकण्याचे प्रमाण कमी करण्याकरिता लहान मुलांसह संबंध निर्माण करण्याचा उद्देश असलेले सर्व समाविष्ट आहे

या आशयाबद्दल Google चे शून्य सहिष्णुता धोरण आहे. आम्हाला अशा आशयाबद्दल माहिती मिळाल्यास, आम्ही कायद्यानुसार नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅंड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रन कडे तक्रार करू. आम्ही शिस्तभंगाची कारवाईदेखील करू शकतो, ज्यामध्ये समावेश असलेली Google खाती समाप्त करणे समाविष्ट आहे.

लहान मुलाला धोका आहे किंवा ते मूल गैरवापर/गैरवर्तन, शोषण अथवा तस्करीच्या अधीन आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमच्या स्थानिक कायदा अंमलबजावणीशी त्वरित संपर्क साधा.

तुम्ही कायदा अंमलबजावणीकडे आधीच तक्रार केलेली असल्यास आणि तरीही मदत हवी असल्यास, किंवा Chat वर एखादे लहान मूल धोक्याच्या अधीन आहे अथवा होते अशी तुम्हाला काळजी वाटत असल्यास, तुम्ही Google कडे वागणुकीची तक्रार करू शकता.

Google उत्पादनांवर लहान मुलासाठी धोकादायक यासंबंधित तक्रार नोंदवणे.

तुम्ही कधीही कोणत्याही व्यक्तीला तुमच्याशी Chat वर संपर्क करण्यापासून रोखण्यासाठी ब्लॉक करू शकता.

छळ

  • इतरांचा छळ करण्यासाठी, त्यांना धमकावण्याकरिता किंवा घाबरवण्यासाठी Chat वापरू नका.
  • छळ करण्यासाठी इतरांना उत्तेजन देऊ नका.

वैयक्तिक आणि गोपनीय माहिती

क्रेडिट कार्डचे नंबर, सोशल सिक्युरिटी नंबर किंवा खात्याचे पासवर्ड यांसारखी इतर लोकांची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती त्यांच्या परवानगीशिवाय वितरित करू नका.

बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी

बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटीचा प्रचार करण्यासाठी, त्यांचे आयोजन करण्याकरिता किंवा त्यांमध्ये सहभागी होण्यासाठी Chat वापरू नका.

धोरणाची अंमलबजावणी

या धोरणांचे उल्लंघन करणारी खाती आढळल्यास, Google ती खाती बंद करू शकते. तुमचे खाते बंद केले गेले असल्यास आणि ते चुकून झाले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचे खाते रिस्टोअर करण्याबद्दल आम्हाला कसे विचारावे ते जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
6648381834698883555
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1026838
false
false