Google Chat मध्ये मेसेजला उत्तर देणे

Google Chat मध्ये मेसेजला उत्तर देण्याचे विविध मार्ग आहेत. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • संभाषणामध्ये उत्तर देणे.
  • स्पेसमधील मेसेजला इनलाइन उत्तर देणे.
  • तुमच्या उत्तरामध्ये मेसेज कोट करणे.
  • उत्तराशी संबंधित सूचना वापरणे.

मेसेजला उत्तर देणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Chat किंवा Gmail उघडा.
    • Gmail मध्ये: डावीकडे, Chat वर क्लिक करा.
  1. संभाषण उघडा.
  2. उत्तर द्या भागामध्ये, तुमचा मेसेज एंटर करा.
  3. पाठवा वर क्लिक करा.

थ्रेडमध्ये उत्तर देणे

महत्त्वाचे: तुम्ही इनलाइन थ्रेडिंग वापरून स्पेसमधील थ्रेडमध्ये उत्तर देऊ शकता. इनलाइन थ्रेडिंगसह स्पेसबद्दल जाणून घ्या.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Chat किंवा Gmail उघडा.
    • Gmail मध्ये: डावीकडे, Chat वर क्लिक करा.
  1. स्पेस निवडा.
  2. उत्तर देण्याचा पर्याय यामधून निवडा:
    • थ्रेड आयकन:
      1. मेसेजवर कर्सर फिरवा.
      2. थ्रेडमध्ये उत्तर द्या वर क्लिक करा.
    • उत्तराचे बटण: स्पेस मेसेजच्या तळाशी, उत्तर द्या वर क्लिक करा.
      • टीप: थ्रेडमध्ये उत्तरे असल्यास, मुख्य मेसेज अंतर्गत, उत्तरांची संख्या दाखवणाऱ्या इंडिकेटरवर क्लिक करा.
  3. थ्रेड पॅनलमध्ये, तुमचा मेसेज एंटर करा.
  4. पाठवा वर क्लिक करा.

टीप: स्पेसमधील सर्व थ्रेड शोधण्यासाठी, स्पेसमध्ये सर्वात वरती उजवीकडे, थ्रेड  वर क्लिक करा.

तुमच्या उत्तरामध्ये मेसेज कोट करणे

महत्त्वाचे: तुम्ही मेसेज कोट करता, तेव्हा कोट केलेला आशय हा मूळ मेसेज दाखवतो. मूळ मेसेज हटवला किंवा संपादित केला असल्यास, कोट केलेला आशय हा तुमच्या उत्तरामध्ये अपडेट केला जात नाही.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Chat किंवा Gmail उघडा.
    • Gmail मध्ये: डावीकडे, Chat वर क्लिक करा.
  1. संभाषण उघडा.
  2. मेसेजवर पॉइंट करा.
  3. उपलब्ध मेसेज कृतींमधून, उत्तरामध्ये कोट करा वर क्लिक करा.
  4. तुमचा मेसेज एंटर करा.
  5. पाठवा वर क्लिक करा.

झटपट उत्तरांसाठी सूचना मिळवणे

मेसेजना झटपट प्रतिसाद देण्यासाठी, स्मार्ट उत्तर सुरू करा. स्मार्ट उत्तर सुरू असते, तेव्हा तुम्हाला Chat मधील उत्तर द्या भागाच्या वरती सूचना दिसू शकतात.

Chat मध्ये स्मार्ट उत्तर सुरू करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Chat उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज वर क्लिक करा.
  3. “स्मार्ट उत्तर” या अंतर्गत, बॉक्सवर क्लिक करा.

Gmail मध्ये स्मार्ट उत्तर सुरू करणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर Gmail उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, सेटिंग्ज आणि त्यानंतर सर्व सेटिंग्ज पहा वर क्लिक करा.
  3. सर्वात वरती, Chat आणि Meetआणि त्यानंतर चॅट संबंधित सेटिंग्ज व्‍यवस्‍थापित करा वर क्लिक करा.
  4. “स्मार्ट उत्तर” या अंतर्गत, बॉक्सवर क्लिक करा.

टिपा:

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10331494514979330408
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1026838
false
false