तुमचे Gmail वरील इव्हेंट व्यवस्थापित करणे

तुम्ही पुढील गोष्टींसाठी Gmail वरील इव्हेंट Google Calendar मध्ये पाहू शकता:

  • फ्लाइट, ट्रेन आणि बस आरक्षणे
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील आरक्षणे
  • चित्रपट आणि कॉन्सर्ट यांसारखे तिकीट असलेले इव्हेंट

Gmail ने तयार केलेला इव्हेंट यापुढे Calendar मध्ये न दिसण्यासाठी किंवा त्याची डीफॉल्ट दृश्यमानता बदलण्यासाठी, तुम्ही तुमची Calendar सेटिंग्ज बदलू शकता अथवा एक इव्‍हेंट हटवू शकता.

Gmail ने Calendar मध्ये तयार केलेले सर्व इव्हेंट थांबवण्यासाठी, Gmail सेटिंग्जमध्ये, स्मार्ट वैशिष्ट्ये आणि पर्सनलायझेशन सेटिंग्ज बंद करा.

स्मार्ट वैशिष्ट्ये आणि पर्सनलायझेशन नियंत्रणे यांविषयी अधिक जाणून घ्या.

महत्त्वाचे: पुढील गोष्टींसाठी Gmail वरील इव्हेंट उपलब्ध नाहीत:

  • सरकारी खाती
  • डेटा स्थानाशी संबंधित निर्बंध असलेली Google खाती
  • Gmail नसलेली Google खाती

इव्हेंट पहा आणि अपडेट करा

इव्हेंटचे तपशील पाहणे

तुम्ही तुमचा इव्हेंट हा ब्राउझरवर Google Calendar मध्ये किंवा Google Calendar ॲपमध्ये उघडता, तेव्हा तुम्हाला तुमच्या इव्हेंटचे स्थान अथवा तुमच्या फ्लाइटचा कन्फर्मेशन नंबर यांसारखी माहिती दिसेल. तुम्हाला ज्या ईमेलवरून इव्‍हेंट तयार केला गेला आहे त्याची लिंकदेखील दिसेल.

तुम्ही Google Calendar व्यतिरिक्त ॲप किंवा कॉंप्युटर प्रोग्रामशी तुमचे इव्हेंट सिंक केले तरीही तुम्ही तुमचे Gmail वरील इव्हेंट पाहू शकाल पण तुम्ही काही इव्हेंटचे तपशील पाहू शकणार नाही.

तुमच्या इव्हेंटमधील अपडेट

तुमचा इव्हेंट तुमच्या कॅलेंडरमध्ये जोडला गेल्यावर त्यामध्ये नवीन माहिती अपडेट होत राहील. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या रात्रीच्या जेवणासाठी केलेल्या आरक्षणाची वेळ बदलली असल्याचा कन्फर्मेशन ईमेल तुम्हाला मिळाल्यास, कॅलेंडर इव्हेंटमधील वेळदेखील बदलली जाईल.

टीप: तुम्ही इव्हेंटचे तपशील स्वतः संपादित करू शकत नाही.

सूचना

तुमच्या डीफॉल्ट सूचना सेटिंग्जवर आधारित तुम्हाला Gmail वरील इव्हेंटच्या सूचना मिळतील. स्वतंत्र इव्हेंटसाठी तुम्ही सूचना सेटिंग्ज बदलू शकता किंवा तुमची डीफॉल्ट सेटिंग्ज बदला. सूचना याबद्दल अधिक जाणून घ्या.

फ्लाइटच्या सूचना

तुम्ही तुमच्या Assistant ने युक्त डिव्हाइससाठी वैयक्तिक परिणाम सुरू केले असल्यास, तुम्हाला "निघण्याची वेळ झाली" ही सूचना मिळू शकते. ही सूचना तुम्हाला विमानतळावर वेळेवर पोहोचण्यासाठी कधी निघाले पाहिजे ते सांगते. Assistant ने युक्त डिव्हाइससाठी वैयक्तिक परिणाम सेटिंग्ज यांबद्दल अधिक जाणून घ्या.

Gmail वरील इव्हेंट काढून टाकणे

तुम्ही तुमच्या कॅलेंडरमधून एक इव्हेंट हटवू शकता किंवा Gmail वरील इव्हेंट आपोआप जोडण्यासाठी सेटिंग बंद करू शकता.

एक इव्हेंट हटवणे
  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. तुम्हाला हटवायचा असलेला इव्हेंट उघडा.
  3. सर्वात वरती उजवीकडे, मेनू अधिक मेनूआणि त्यानंतरहटवा वर टॅप करा.
  4. इव्हेंट हटवा वर टॅप करा.
Gmail मध्ये तयार केलेले इव्‍हेंट दाखवू नका

तुम्ही Gmail वरील इव्हेंट दाखवण्यासाठी सेटिंग बंद करता तेव्हा, Gmail ने तयार केलेले सर्व इव्हेंट तुमच्या कॅलेंडरवरून लपवले जातात. तुम्ही हे सेटिंग पुन्हा सुरू केल्यास, Gmail ने तयार केलेले सर्व इव्‍हेंट पुन्हा दाखवले जातात.

  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू Menuआणि त्यानंतरसेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  3. Gmail मधील इव्हेंट वर टॅप करा.
  4. Gmail वरील इव्हेंट जोडा बंद करा.

टीप: Gmail ला इव्हेंट तयार करण्यापासून थांबवण्यासाठी, तुमच्या Gmail सेटिंग्जमध्ये, स्मार्ट वैशिष्ट्ये आणि पर्सनलायझेशन बंद करा.

तुमचे इव्हेंट कोण पाहू शकतात

बाय डीफॉल्ट, तुम्ही इतरांसोबत तुमचे कॅलेंडर शेअर केलेले असले तरीही Gmail वरून जोडलेले इव्हेंट फक्त तुम्ही पाहू शकता. यामध्ये तुमच्या कॅलेंडरमधील "बदल करा आणि शेअरिंग व्यवस्थापित करा" याचा ॲक्सेस असणारे प्रतिनिधी व तुमचे इव्हेंट सर्वसाधारणपणे पाहू शकणारे सहकर्मी किंवा समविचारी लोक समाविष्ट आहेत. तुम्ही तुमचे कॅलेंडर शेअर केल्यास, तुमचे Gmail वरील इव्हेंट बाय डीफॉल्ट किंवा स्वतंत्र इव्हेंट कोण पाहू शकते यामध्ये बदल करण्याचे पर्यायदेखील तुम्हाला दिसतील.

टीप: तुमच्या Google खाते वरून लॉग इन केलेले डिव्हाइस असलेले कोणीही तुमचे कॅलेंडर इव्हेंट, तसेच Gmail वरील इव्हेंट पाहू शकेल.

डीफॉल्ट दृश्यमानता बदला

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे कॅलेंडर किमान आणखी एका व्यक्तीसोबत शेअर केले असेल तरच तुम्हाला हा पर्याय मिळेल.

  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू Menuआणि त्यानंतरसेटिंग्ज Settings वर टॅप करा.
  3. Gmail वरील इव्हेंट आणि त्यानंतरदृश्यमानता वर टॅप करा.
  4. वेगळा दृश्यमानता पर्याय निवडा. नवीन दृश्यमानता सेटिंग फक्त नवीन इव्हेंटवर लागू करायचे आहे की अस्तित्वात असलेल्या आणि नवीन अशा दोन्ही इव्हेंटवर लागू करायचे आहे याबद्दल तुम्हाला विचारले जाईल.
एका इव्हेंटची दृश्यमानता बदलणे

महत्त्वाचे: तुम्ही तुमचे कॅलेंडर किमान आणखी एका व्यक्तीसोबत शेअर केले असेल तरच तुम्हाला हा पर्याय मिळेल.

  1. Google Calendar ॲप Calendar उघडा.
  2. इव्‍हेंट उघडा.
  3. संपादित करा संपादित करा वर टॅप करा.
  4. लॉक करा Lock वर टॅप करा.
  5. वेगळा दृश्यमानता पर्याय निवडा.
  6. सेव्ह करा वर टॅप करा.
दृश्यमानतेचे पर्याय
  • खाजगी – फक्त तुमच्या कॅलेंडरमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही ॲक्सेस दिलेल्या व्यक्ती तुमच्या इव्हेंटचे तपशील पाहू शकतात. तुमचे कॅलेंडर पाहू शकणार्‍या पण त्यामध्ये बदल न करू शकणार्‍या इतर कोणत्याही व्यक्तीला इव्हेंट "व्यस्त" म्हणून दिसेल.
  • Calendar डीफॉल्ट – तुमच्या डीफॉल्ट कॅलेंडरवरील इव्हेंटचे तपशील पाहण्याचा ॲक्सेस असलेली कोणतीही व्यक्ती Gmail वरील तुमच्या इव्हेंटचे नाव आणि वेळ पाहू शकेल. फक्त तुमच्या इव्हेंटमध्ये बदल करू शकणारे लोक तुमच्या ईमेलमधील कन्फर्मेशन नंबर, फ्लाइटची स्थिती किंवा फोन नंबर यांसारखे इतर तपशील पाहू शकतात.
    महत्त्वाचे: तुम्ही तुमचे कॅलेंडर सार्वजनिक केल्यास, हा पर्याय निवडल्याने तुमचा Gmail वरील इव्हेंट सार्वजनिकरीत्या दृश्यमान होईल.
  • सार्वजनिक – तुम्ही सार्वजनिकरीत्या तुमचे कॅलेंडर शेअर केल्यास, तुमचे कॅलेंडर पाहणाऱ्या प्रत्येकाला तुमचा इव्हेंट दृश्यमान असेल. हा पर्याय फक्त स्वतंत्र इव्हेंटसाठी उपलब्ध आहे, डीफॉल्ट सेटिंग म्हणून नाही.

तुमचे कॅलेंडर कसे शेअर केले जाते याची तुम्हाला खात्री नसल्यास, दृश्यमानता सेटिंग्ज याबद्दल अधिक जाणून घ्या.

ट्रबलशूटिंग

Gmail वरील इव्हेंट Calendar मध्ये दिसत नाहीत

Gmail वरील इव्हेंट Calendar मध्ये का दिसत नाहीत याची काही कारणे आहेत.

थेट तुम्हाला ईमेल मिळाला नाही

ईमेल असा असल्यास, इव्हेंट दिसणार नाहीत:

  • मेलिंग सूचीला पाठवला असल्यास
  • cc ने तुम्हाला पाठवला असल्यास
  • दुसऱ्या ईमेल खात्यावरून रीडिरेक्ट केला असल्यास

कन्फर्मेशन ईमेल विशिष्ट प्रकारच्या व्यवसायाने पाठवला नव्हता

फक्त व्यवसायांनी पाठवलेल्या पुढील विषयांशी संबंधित कन्फर्मेशन ईमेलमध्ये इव्हेंटचा समावेश असल्यास, ते जोडले जातील:

  • फ्लाइट, ट्रेन आणि बस आरक्षणे
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील आरक्षणे
  • चित्रपट आणि कॉन्सर्ट यांसारखे तिकीट असलेले इव्हेंट

तुम्ही Gmail मध्ये स्मार्ट वैशिष्ट्ये आणि पर्सनलायझेशन बंद केले आहे

Gmail वरील इव्हेंट मिळवण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:

समस्येची तक्रार नोंदवणे

फीडबॅक केव्हा पाठवायचा

  • Gmail वरून इव्हेंट जोडलेला नाही. समस्येची तक्रार नोंदवण्याआधी खात्री करून घ्या की, तुम्हाला व्यवसायाकडून मिळालेला ईमेल फ्लाइट, हॉटेल किंवा रेस्टॉरंट आरक्षण अथवा तिकीट काढलेल्या इव्हेंट विषयी आहे.
  • इव्हेंटमध्ये चुकीची किंवा गहाळ माहिती होती.
  • इव्हेंट तुमच्याशी संबंधित नाही. इव्हेंट कोणत्या ईमेलमधून आला आहे हे जाणून घेण्यासाठी इव्हेंट उघडा आणि ईमेल स्रोत पाहा (Google Calendar ॲप) किंवा URL उघडा (कॉंप्युटर) निवडा.

फीडबॅक कसा पाठवावा

तुम्हाला येत असलेल्या समस्यांबद्दल आम्हाला आणखी माहिती देण्यासाठी Gmail वरील इव्हेंटशी संबंधित समस्येची तक्रार कशी नोंदवावी ते जाणून घ्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18227231124774490261
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false