नवीन कॅलेंडर तयार करणे

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या इव्‍हेंटचा माग ठेवण्यासाठी कॅलेंडर तयार करू शकता. उदाहरणार्थ, आगामी सराव आणि सामन्यांचा माग ठेवण्यासाठी तुम्ही "सॉकर" नावाचे कॅलेंडर तयार करू शकता.

नवीन कॅलेंडर सेट करणे

तुम्ही फक्त ब्राउझरमधून नवीन कॅलेंडर तयार करू शकता आणि Google Calendar अ‍ॅपवरून नाही. एकदा कॅलेंडर तयार केल्यानंतर, तुम्हाला ते तुमच्या ब्राउझर आणि अ‍ॅपमध्ये दिसेल.

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. डाव्या बाजूला, "इतर कॅलेंडर" च्या शेजारी, इतर कॅलेंडर जोडा Plusआणि त्यानंतर नवीन कॅलेंडर तयार करा वर क्लिक करा.
  3. तुमच्या कॅलेंडरसाठी नाव आणि वर्णन जोडा.
  4. कॅलेंडर तयार करा वर क्लिक करा.
  5. तुम्हाला तुमचे कॅलेंडर शेअर करायचे असल्यास, डावीकडील बारमध्ये त्यावर क्लिक करा, त्यानंतर विशिष्ट लोकांसोबत शेअर करा निवडा.
टीप: तुम्ही कॅलेंडर तयार आणि शेअर केल्यानंतर, तुम्ही त्या कॅलेंडरसाठी इव्‍हेंट शेड्युल करू शकता. शेअर केलेल्या कॅलेंडरमध्ये इव्‍हेंट कसा तयार करावा याबद्दल जाणून घ्या.

तुम्ही तयार केलेली कॅलेंडर शोधणे

  1. तुमच्या कॉंप्युटरवर, Google Calendar उघडा.
  2. पेजच्या डाव्या बाजूला, "माझी कॅलेंडर" अंतर्गत, तुम्ही तयार केलेल्या कॅलेंडरची सूची असते.
  3. त्या कॅलेंडरचे इव्‍हेंट दाखवण्यासाठी किंवा लपवण्यासाठी, कॅलेंडरच्या नावावर क्लिक करा.
  4. तुमच्या सूचीमधून एखादे कॅलेंडर काढून टाकण्यासाठी, कॅलेंडरच्या नावाच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर सूचीमधून लपवा वर क्लिक करा.

तुमच्या कॅलेंडरचे नाव संपादित करणे

  1. Google Calendar उघडा.
  2. पेजच्या डाव्या बाजूला, "माझी कॅलेंडर" अंतर्गत, तुमचे कॅलेंडर शोधा.
  3. तुमच्या कॅलेंडरच्या बाजूला, पर्याय आणखी आणि त्यानंतर सेटिंग्ज आणि शेअरिंग वर क्लिक करा.
  4. सर्वात वरती असलेल्या बॉक्समध्ये, नवीन नाव निवडा.

तुमच्या कॅलेंडरचा रंग बदलणे

  1. Google Calendar उघडा.
  2. पेजच्या डाव्या बाजूला, "माझी कॅलेंडर" अंतर्गत, तुमचे कॅलेंडर शोधा.
  3. तुमच्या कॅलेंडरच्या बाजूला, पर्याय आणखी वर क्लिक करा
  4. तुमच्या कॅलेंडरसाठी रंग निवडा किंवा कस्टम रंग जोडा Plus वर क्लिक करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
14964615237573608437
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false