Android वर कॅलेंडर स्पॅम ब्लॉक करणे

वेगवेगळ्या प्रकारची कॅलेंडर स्पॅम थांबवण्यासाठी, तुम्ही तुमच्या कॅलेंडरमधून धोकादायक अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस काढून टाकणे आणि कोणते इव्‍हेंट दाखवायचे हे निवडणे या दोन्ही गोष्टी करू शकता. तुमचे Google Calendar आणि तुमचे Android डिव्हाइस आणखी सुरक्षित असल्याची खात्री करण्यात मदत करण्यासाठी खालील सर्व पायऱ्यांचे पुनरावलोकन करा.

कोणत्या अ‍ॅप्सना तुमच्या कॅलेंडरचा अ‍ॅक्सेस आहे याचे पुनरावलोकन करणे

ज्या अ‍ॅपने तुमच्या कॅलेंडरमध्ये बदल करू नये असे तुम्हाला वाटते अशा कोणत्याही अ‍ॅपसाठी तुम्ही परवानग्या काढून टाकू शकता.

महत्त्वाचे: तुमच्या फोनवर या पायर्‍या वेगळ्या असू शकतात. अधिक माहितीसाठी, तुमच्या डिव्हाइसचे मदत केंद्र येथे भेट द्या. तुमच्या Android फोनवर अ‍ॅप परवानग्या कशा बदलाव्यात ते जाणून घ्या.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, सेटिंग्ज उघडा.
  2. गोपनीयता आणि त्यानंतर परवानगी व्यवस्थापक आणि त्यानंतर Calendar वर टॅप करा.
  3. अ‍ॅपसाठी कॅलेंडरचा अ‍ॅक्सेस सुरू किंवा बंद करण्यासाठी, त्यावर टॅप करा.

टीप: तुम्ही एखाद्या अ‍ॅपची तुमचा कॅलेंडर डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी काढून टाकल्यास, त्यामुळे तुमच्या कॅलेंडरमध्ये आधीपासून असलेले इव्‍हेंट हटवले जात नाहीत. इव्हेंट कसा हटवावा याबद्दल जाणून घ्या.

कॅलेंडर लपवणे

यापुढे स्पॅम किंवा विशिष्ट कॅलेंडर न पाहण्यासाठी, तुम्ही ते कॅलेंडर लपवू शकता. नवीन स्पॅम कॅलेंडर तयार होण्यापासून रोखण्यासाठी, तुम्ही अ‍ॅपला तुमच्या कॅलेंडरचा असलेला अ‍ॅक्सेस काढून टाकणे आवश्यक आहे.

  1. तुमच्या Android डिव्हाइसवर, Calendar अ‍ॅप Calendar उघडा.
  2. सर्वात वरती डावीकडे, मेनू मेनू वर टॅप करा.
  3. तुमच्या कॅलेंडरच्या सूचीमध्ये, तुम्ही तयार न केलेल्या कोणत्याही कॅलेंडरच्या चौकटीतली खूण काढा.
    • तुमची सर्व कॅलेंडर पाहण्यासाठी, आणखी दाखवा वर टॅप करा.

कॅलेंडर कसे लपवावे किंवा पाहावे याबद्दल जाणून घ्या.

अज्ञात पाठवणाऱ्यांची आमंत्रणे व्यवस्थापित करणे

तुम्हाला पाठवणारा माहीत असेल फक्त तेव्हाच इव्हेंट दाखवण्यासाठी, तुमची इव्हेंट सेटिंग्ज तपासा. तुम्हाला मिळणारी आमंत्रणे आणि सूचना कशा व्यवस्थापित कराव्या याबद्दल जाणून घ्या.

तुमच्या तृतीय पक्ष सेवा पुरवठादारासोबत तपासणे

तुम्ही Calendly किंवा Asana यांसारखा इतर कॅलेंडर सेवा पुरवठादार वापरून Google Calendar अ‍ॅपमध्ये साइन इन केले असल्यास, स्पॅम कसे व्यवस्थापित करावे याबद्दल जाणून घेण्यासाठी तुमच्या पुरवठादाराचे मदत केंद्र येथे भेट द्या.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3409815679121792388
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false