रिपीट होणाऱ्या टास्क या Google Tasks आणि Google Calendar मध्ये व्यवस्थापित करणे

तुम्ही Google Tasks आणि Google Calendar मध्ये रिपीट होणाऱ्या टास्क तयार करू शकता, संपादित करू शकता व हटवू शकता.

महत्त्वाचे:

  • तुमच्या Calendar ग्रिडवर एका वेळी मर्यादित आगामी परत होणाऱ्या टास्क दिसतात. काळानुसार, नवीन टास्क आपोआप दिसतील.
  • शेअर केलेल्या टास्क आणि उपटास्क या रिपीट होण्यासाठी सेट करू शकत नाही.
  • परत होणाऱ्या टास्क या इतर टास्क सूचींवर हलवू शकत नाही.
  • तुम्ही टास्कची मालिका रिपीट होण्यापासून थांबवल्यास, तुम्ही ती पुन्हा रिपीट होण्यासाठी सेट करू शकत नाही. तुम्ही रिपीट होणाऱ्या टास्कची नवीन मालिका तयार करणे आवश्यक आहे.

टास्क रिपीट होण्यासाठी सेट करा 

Google Tasks मधील टास्क या रिपीट होण्यासाठी सेट करण्याकरिता:

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. उजवीकडे, Tasks Tasks logo वर क्लिक करा.
  3. अस्तित्वात असलेल्या टास्कवर क्लिक करा किंवा नवीन टास्क तयार करा.
  4. तारीख आणि वेळ जोडण्यासाठी, तारीख/वेळ वर क्लिक करा.
  5. “तारीख/वेळ” च्या बाजूला, रिपीट करा वर क्लिक करा.
  6. “दरवेळी रिपीट होते” अंतर्गत, दिवस, आठवडा, महिना किंवा वर्ष निवडा.
  7. “संपते” अंतर्गत, परत होणारी टास्क तयार करण्यासाठी पर्याय निवडा:
    • संपण्याची ठरावीक तारीख नसल्यास, कधीही नाही निवडा.
    • विशिष्ट संपण्याच्या तारखेसह, या रोजी निवडा, त्यानंतर तारीख निवडा.
    • घटनांच्या ठरावीक संख्येनंतर संपत असल्यास, या तारखेनंतर निवडा, त्यानंतर घटनांची संख्या निवडा.
  8. ओके वर क्लिक करा.

Google Calendar मधून टास्क या रिपीट होण्यासाठी सेट करण्याकरिता: 

  1. Google Calendar उघडा.
  2. कॅलेंडर ग्रिडवर, कोणत्याही रिकाम्या जागेवर क्लिक करा.
  3. शीर्षकाच्या खालती, टास्क निवडा.
  4. तारखेच्या खालती, रिपीट होत नाही वर क्लिक करा.
  5. पर्याय निवडा:
    • आधीच सेट केलेली वारंवारता निवडा, जसे की दररोज, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक. सेव्ह करा वर क्लिक करा.
    • कस्टम निवडा, त्यानंतर तुमची पुनरावृत्तीची प्राधान्यकृत वारंवारता किंवा संपण्याची तारीख सेट करा. पूर्ण झाले आणि त्यानंतर सेव्ह करा वर क्लिक करा.

परत होणारी टास्क संपादित करा किंवा पूर्ण करा

Google Tasks मधील परत होणारी टास्क संपादित किंवा पूर्ण करण्यासाठी: 

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. उजवीकडे, Tasks Tasks logo वर क्लिक करा.
  3. तुम्हाला बदलायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा.
    • मालिकेतील सर्व टास्कची तारीख आणि वेळ संपादित करण्यासाठी, टास्कच्या तळाशी, रिपीटशी संबंधित माहितीवर क्लिक करा.
    • मालिकेतील पुढील रिपीट होणाऱ्या टास्कची तारीख आणि वेळ बदलण्यासाठी, तारखेवर क्लिक करा.
    • टास्क रिपीट होण्यापासून थांबवण्यासाठी, रिपीटिशनशी संबंधित माहितीच्या बाजूला, रिपीट करणे थांबवा  आणि त्यानंतर रिपीट करणे थांबवा वर क्लिक करा.  
    • टास्क पूर्ण झाली म्हणून मार्क करण्यासाठी, टास्कच्या डावीकडे, पूर्ण झाली Mark complete वर क्लिक करा. पॅनलच्या तळाशी, “पूर्ण झाली” या अंतर्गत, तुम्ही तुमच्या पूर्ण झालेल्या टास्क पाहू शकता. तुमच्या रिपीट होणाऱ्या टास्कचा पुढील प्रसंग हा नमूद केलेल्या तारखेला तुमच्या टास्क सूचीमध्ये दिसतो.

Google Calendar मधील परत होणारी टास्क संपादित किंवा पूर्ण करण्यासाठी:

  1. Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला बदलायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा. 
  3. संपादित करण्यासाठी, संपादित करा संपादित करा वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा:
    • तारीख किंवा वेळ संपादित करण्यासाठी, तारीख/वेळ वर क्लिक करा.
    • एखादी टास्क किती वेळा रिपीट होते ते संपादित करण्यासाठी किंवा टास्क रिपीट होण्यापासून थांबवण्यासाठी, रिपीट करा वर क्लिक करा.
  5. सेव्ह करा वर क्लिक करा.
  6. बदल लागू करण्यासाठी “ही टास्क” किंवा “सर्व टास्क” यांपैकी एक निवडा. 
  7. ओके वर क्लिक करा.
  8. टास्क पूर्ण झाली म्हणून मार्क करण्यासाठी, पूर्ण झाली म्हणून मार्क करा वर क्लिक करा.

मालिकेतील टास्क हटवा  

Google Tasks मधील मालिकेतील सर्व टास्क हटवण्यासाठी:

  1. Gmail, Calendar, Chat, Drive किंवा Google Docs, Sheets, अथवा Slides मधील फाइलवर जा.
  2. उजवीकडे, Tasks Tasks logo वर क्लिक करा.
  3. तुम्हाला हटवायच्या असलेल्या टास्कच्या बाजूला, मेनू आणखी उघडा वर क्लिक करा.
  4. हटवा  आणि त्यानंतर सर्व हटवा वर क्लिक करा.

Google Calendar मधील मालिकेतील टास्क हटवण्यासाठी: 

  1. Google Calendar उघडा.
  2. तुम्हाला हटवायच्या असलेल्या टास्कवर क्लिक करा. 
  3. हटवा वर क्लिक करा.
  4. पर्याय निवडा: 
    • ही टास्क
    • ही आणि त्यानंतरच्या टास्क
    • सर्व टास्क
  5. ओके वर क्लिक करा.

महत्त्वाचे: रिपीट होणाऱ्या मालिकेमधून एक टास्क हटवण्यासाठी, तुम्ही Google Calendar वापरणे आवश्यक आहे.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
8097480494795901618
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false