Google Calendar मधील अपॉइंटमेंट शेड्यूलबद्दल जाणून घ्या

तुमच्या कॅलेंडरवर कोणत्याही शुल्काशिवाय इतरांना अमर्यादित अपॉइंटमेंट शेड्यूल करू देण्यासाठी, तुम्ही एकच बुकिंग पेज तयार करू शकता. अपॉइंटमेंट शेड्यूल वापरून, तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • बुकिंग पेज तयार आणि शेअर करणे, जेणेकरून लोक तुमच्यासह वेळ बुक करू शकतील.
  • Google Calendar मधील तुमच्या शेड्यूलच्या बाजूला बुक केलेल्या अपॉइंटमेंट पाहणे.

अपॉइंटमेंट शेड्यूलसाठीच्या प्रीमियम वैशिष्ट्यांबद्दल जाणून घ्या

तुमच्याकडे पात्र Google Workspace किंवा Google One सदस्यत्व असल्यास, तुम्हाला अपॉइंटमेंट शेड्यूलच्या काही प्रीमियम वैशिष्ट्यांचा ॲक्सेस मिळतो, जसे की:

  • वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉइंटमेंटसोबत त्यांची स्वतःची शेड्यूल आणि बुकिंग पेज.
  • तुमच्यासोबत अपॉइंटमेंट बुक केलेल्या लोकांसाठी ऑटोमॅटिक ईमेल रिमाइंडर.
  • अपॉइंटमेंट शेड्यूलमध्ये कमाल २० को-होस्ट जोडणे.
  • दुय्यम कॅलेंडरवर अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करणे.
  • अपॉइंटमेंटसाठी पेमेंट आवश्यक करणे.
  • स्पॅम बुकिंग टाळण्यासाठी ईमेल पडताळणी करणे.

अपॉइंटमेंट शेड्यूलसाठीची प्रीमियम वैशिष्ट्ये यासोबत उपलब्ध आहेत:

महत्त्वाचे:

  • Google Workspace Individual साठी, अपॉइंटमेंट शेड्यूलची पुढील वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत:
    • कमाल २० को-होस्ट जोडणे
    • दुय्यम कॅलेंडरवर अपॉइंटमेंट शेड्यूल करणे
  • Google One प्रीमियम साठी, अपॉइंटमेंट शेड्यूलची पुढील वैशिष्ट्ये उपलब्ध नाहीत:
    • कमाल २० को-होस्ट जोडणे
    • दुय्यम कॅलेंडरवर अपॉइंटमेंट शेड्यूल करणे
    • अपॉइंटमेंट साठी ईमेल पडताळणी करणे
    • सशुल्क अपॉइंटमेंट
  • Workspace Business Starter साठी, तुम्ही तुमच्या सदस्यत्वासह एक बुकिंग पेज तयार करू शकता.
  • Workspace Frontline, Essentials किंवा यापुढे ऑफर नसलेल्या Google Workspace सदस्यत्वासाठी, तुम्ही अपॉइंटमेंट शेड्यूल तयार करू शकत नाही.

तुमचा प्लॅन निवडणे

  • तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुम्हाला ईमेल मार्केटिंगसारखी वैशिष्ट्ये वापरायची असल्यास, व्यवसाय आणि एंटरप्राइझसाठीचे Google Workspace Individual किंवा Google Workspace आवृत्तीचा वापर करा.
  • तुमच्याकडे वैयक्तिक Google खाते असेल आणि तुम्हाला Drive, Gmail आणि Photos साठी अधिक स्टोरेज हवे असल्यास, Google One प्रीमियम वापरा.

अपॉइंटमेंट शेड्यूल कसे काम करते हे जाणून घ्या

तुमचे स्वतःचे व्यावसायिक बुकिंग पेज वापरा

  • तुम्ही ऑफर करत असलेल्या विविध प्रकारच्या अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला एक व्यावसायिक बुकिंग पेज मिळेल.
  • ईमेल अ‍ॅड्रेस असलेले कोणीही अपॉइंटमेंट बुक करू शकेल.
  • तुमच्या कॅलेंडरवरील इतर इव्‍हेंटसोबत विवाद होणे टाळण्यासाठी, तुमचे बुकिंग पेज आपोआप अपडेट होते.

अपॉइंटमेंटच्या ईमेल सूचना मिळवा

  • तुम्हाला बुकिंग कंफर्मेशन आणि अपडेटसंबंधित ईमेल मिळतात.
  • तुमच्यासोबत अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या लोकांना, अपॉइंटमेंटपूर्वी आपोआप रिमाइंडर ईमेलदेखील मिळतील.

कसे भेटावे हे निवडा

  • तुम्ही तुमच्या ग्राहकांना कशाप्रकारे भेटता हे तुम्ही कस्टमाइझ करू शकता:
    • प्रत्यक्ष हजेरी.
    • फोनवर.
    • Google Meet व्हिडिओ कॉंफरन्सवर.
      • तुम्ही व्हिडिओ कॉंफरन्सवर भेटायचे निवडल्यास, Google Meet लिंक आपोआप तुमच्या अपॉइंटमेंटमध्ये जोडली जाते.

अपॉइंटमेंटसाठी पेमेंट आवश्यक करणे

  • पेमेंट आवश्यक करण्यासाठी, तुम्ही Stripe खाते Google Calendar शी कनेक्ट करणे आवश्यक आहे.
  • तुम्ही तुमचे अपॉइंटमेंट शेड्यूल तयार किंवा संपादित करता, तेव्हा तुम्ही अपॉइंटमेंटची किंमत सेट करता.
  • ग्राहक तुमच्या बुकिंग पेजवर वेळेचा स्लॉट निवडतात, तेव्हा ते अपॉइंटमेंट चेकआउट करतात आणि बुकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Stripe वापरून अपॉइंटमेंटसाठी पैसे देतात.

तुमच्या अपॉइंटमेंटची उपलब्धता कस्टमाइझ करा

  • अपॉइंटमेंट किती वेळासाठी बुक केली जाऊ शकते याची किमान आणि कमाल वेळ तुम्ही आधीच अ‍ॅडजस्ट करू शकता.
  • तुम्ही प्रति दिवस कमाल अपॉइंटमेंटची संख्या मर्यादित करू शकता.
  • तुम्ही अपॉइंटमेंटची वेळ कस्टमाइझ करू शकता.
  • तुम्ही अपॉइंटमेंटदरम्यान आपोआप कस्टम बफर वेळ जोडू शकता.
  • तुम्ही अपॉइंटमेंट बुकिंग फॉर्मद्वारे अपॉइंटमेंट बुक करणाऱ्या लोकांकडून अतिरिक्त माहिती गोळा करू शकता.

Stripe आणि Calendar दरम्यान शेअर केलेल्या माहितीबद्दल जाणून घ्या

तुम्ही Stripe हे Google Calendar शी कनेक्ट केल्यानंतर, काही माहिती पुढील गोष्टींच्या समावेशासह Stripe सह शेअर केली जाते:

  • किंमत
  • अपॉइंटमेंटचे शीर्षक
  • वेळेचा स्लॉट

Stripe वापरत असलेला डेटा व्यवस्थापित करण्यासाठी, तुमच्या Stripe डॅशबोर्ड वर जा. तुम्हाला यापुढे Stripe वापराचे नसल्यास, ते Google Calendar वरून डिस्कनेक्ट करा.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
18159198223506089892
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
88
false
false