Voice Match सह व्हॉइस रेकग्निशन सुरू करणे

तुम्ही Voice Match सुरू करता, तेव्हा Google Assistant ला तुमचा आवाज ओळखायला शिकवू शकता, जेणेकरून ते तुम्हाला वैयक्तिक परिणाम देण्याआधी तुम्ही कोण आहात याची पडताळणी करू शकेल. तुम्ही होम किंवा स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले किंवा स्मार्ट क्लॉक यांसारख्या Assistant ने युक्त विशिष्ट डिव्हाइसवर Voice Match सुरू करू शकता. कमाल ६ लोक Google Home अ‍ॅपमध्ये एका होमसाठी Voice Match सुरू करू शकतात.

Voice Match आणि वैयक्तिक परिणाम याबद्दल अधिक जाणून घ्या.

महत्त्वाचे: तुम्ही वापरू शकता त्या भाषा डिव्हाइसवर अवलंबून असतात. तुमच्या डिव्हाइसवर कोणत्या भाषा काम करतात हे जाणून घ्या.

Voice Match सुरू करा

महत्त्वाचे: या पायऱ्या तुमच्या Google Workspace खात्यासोबत काम करणार नाहीत. डिव्हाइसवर Google Workspace खाते कसे वापरावे याबद्दल जाणून घ्या.
Voice Match वापरण्यासाठी, तुम्ही Google खाते Google Assistant ने युक्त डिव्हाइसशी लिंक करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे एकाहून अधिक Google खाती असल्यास, तुम्हाला वापरायचे असलेले खाते तुम्ही निवडू शकता.
  1. बऱ्याच Assistant ने युक्त डिव्हाइसवर, Google Home अ‍ॅप Google Home उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Assistant सेटिंग्ज वर टॅप करा.
  3. Ok Google आणि Voice Match आणि त्यानंतर इतर डिव्हाइस वर टॅप करा.
    • तुमच्याकडे एकाहून अधिक होम असल्यास, ज्या होमवर तुम्हाला Voice Match जोडायचे आहे त्यावर टॅप करा.
  4. सुरुवात करा वर टॅप करा.
  5. स्क्रीनवरील सूचना फॉलो करा.
    • तुम्ही त्याच होममध्ये नंतर जोडलेल्या स्पीकर, Assistant ने युक्त डिव्हाइस किंवा स्मार्ट क्लॉक यांसाठी Voice Match आपोआप सुरू करण्याकरिता, तुम्ही नंतर जोडलेली डिव्हाइस हे सुरू करा.

टीप: तुम्ही डिव्हाइस जोडत असताना तुम्हाला एरर येत असल्यास, डिव्हाइसशी लिंक केलेल्या घरामध्ये सामील होणे हे करून पहा.

तुमचा आवाज आणि Voice Match शी संबंधित सेटिंग्ज व्यवस्थापित करा

तुम्ही शेअर केलेल्या कोणत्या डिव्हाइससाठी Voice Match सुरू केले आहे ते शोधणे

स्पीकर, Assistant ने युक्त डिव्हाइस आणि स्मार्ट क्लॉक यांसारख्या शेअर केलेल्या डिव्हाइसची सूची शोधण्यासाठी:

  1. बऱ्याच Assistant ने युक्त डिव्हाइसवर, Google Home अ‍ॅप Google Home उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Assistant सेटिंग्ज आणि त्यानंतर Ok Google आणि Voice Match आणि त्यानंतर इतर डिव्हाइस वर टॅप करा.
    • तुमच्याकडे एकाहून अधिक होम असल्यास, तुम्हाला तपासायचे आहे त्या होमवर टॅप करा.
  3. तुम्ही ज्यांच्यासाठी Voice Match सुरू केले आहे, अशा शेअर केलेल्या डिव्हाइसची सूची मिळवण्यासाठी खाली स्क्रोल करा.
Google Assistant ला तुमच्या आवाजाचे पुन्हा प्रशिक्षण देणे
  1. बऱ्याच Assistant ने युक्त डिव्हाइसवर, Google Home अ‍ॅप Google Home उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Assistant सेटिंग्ज आणि त्यानंतर Ok Google आणि Voice Match आणि त्यानंतर इतर डिव्हाइस वर टॅप करा.
  3. Assistant ला तुमच्या आवाजाचे पुन्हा प्रशिक्षण द्याआणि त्यानंतर पुन्हा प्रशिक्षण द्या वर टॅप करा.
तुमच्या होमसाठी Voice Match बंद करणे

तुम्ही तुमच्या होमसाठी Voice Match बंद करता, तेव्हा पुन्हा वैयक्तिक परिणाम सेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या होममध्ये कोणत्याही डिव्हाइसवर वैयक्तिक परिणाम मिळणार नाहीत. तसेच, तुम्ही हे सेटिंग बंद करता, तेव्हा ते इतर Assistant ऑडिओ किंवा पर्सनलायझेशन सेटिंग्ज बंद करत नाही.

  1. बऱ्याच Assistant ने युक्त डिव्हाइसवर, Google Home अ‍ॅप Google Home उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Assistant सेटिंग्ज आणि त्यानंतर Ok Google आणि Voice Match आणि त्यानंतर इतर डिव्हाइस वर टॅप करा.
  3. तुम्हाला ज्या होममधून तुमचा आवाज काढून टाकायचा आहे त्यावरआणि त्यानंतर या होममधून Voice Match काढून टाका आणि त्यानंतर काढून टाका वर टॅप करा.
विशिष्ट डिव्हाइससाठी Voice Match बंद करणे

तुम्ही एखाद्या डिव्हाइससाठी Voice Match बंद करता, तेव्हा पुन्हा वैयक्तिक परिणाम सेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या डिव्हाइसवर वैयक्तिक परिणाम मिळणार नाहीत. तसेच, तुम्ही हे सेटिंग बंद करता, तेव्हा ते इतर Assistant ऑडिओ किंवा पर्सनलायझेशन सेटिंग्ज बंद करत नाही.

  1. बऱ्याच Assistant ने युक्त डिव्हाइसवर, Google Home अ‍ॅप Google Home उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Assistant सेटिंग्ज आणि त्यानंतर Ok Google आणि Voice Match आणि त्यानंतर इतर डिव्हाइस वर टॅप करा.
    • तुमच्याकडे एकाहून अधिक होम असल्यास, तुम्हाला Voice Match बंद करायचे आहे ते डिव्हाइस असलेल्या होमवर टॅप करा.
  3. तुम्हाला Voice Match बंद करायचे आहे अशा डिव्हाइसच्या शेजारील बॉक्समधील खूण काढून टाका.
  4. स्क्रीनवरील पायऱ्या फॉलो करा.
तुम्ही नंतर जोडलेल्या डिव्हाइससाठी Voice Match बंद करणे

तुम्ही नंतर जोडलेल्या डिव्हाइससाठी Voice Match बंद करता, तेव्हा Assistant तुमचा आवाज ओळखणार नाही आणि तुमच्या होममध्ये जोडलेल्या नवीन डिव्हाइसवर वैयक्तिक परिणाम देणार नाही.

  1. बऱ्याच Assistant ने युक्त डिव्हाइसवर, Google Home अ‍ॅप Google Home उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर Assistant सेटिंग्ज आणि त्यानंतर Ok Google आणि Voice Match आणि त्यानंतर इतर डिव्हाइस वर टॅप करा.
    • तुमच्याकडे एकाहून अधिक होम असल्यास, तुम्हाला Voice Match सेटिंग्ज अपडेट करायची असलेल्या होमवर टॅप करा.
  3. तुम्ही नंतर जोडलेली डिव्हाइस हे बंद करा.

टीप: तुम्ही सर्व डिव्हाइसवरूनदेखील Voice Match काढून टाकू शकता. Voice Match काढून टाकण्यासाठी, माझ्या सर्व डिव्हाइसवरून Voice Match काढून टाका वर टॅप करा.

तुमचा आवाज इतर सेटिंग्जसह कसे काम करतो ते समजून घ्या

Voice Match कसे काम करते
  • तुम्ही Google Assistant ला तुमचा आवाज ओळखण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर, युनिक व्हॉइस मॉडेल तयार केले जाते. हे व्हॉइस मॉडेल Google च्या सर्व्हरवर तयार केले जाते आणि त्यानंतर फक्त तुम्ही Voice Match सुरू केलेल्या डिव्हाइसवर स्टोअर केले जाते.
  • तुमच्या डिव्हाइसशी एखादी व्यक्ती बोलते, तेव्हा तुमचे डिव्हाइस क्वेरीवर प्रक्रिया करण्यासाठी व्हॉइस मॉडेल Google ला पाठवते आणि त्याची व्हॉइस मॉडेलशी तुलना करून हे तुम्हीच आहात का ते निर्धारित करते. Google व्हॉइस मॉडेल आणि तुलना केलेला डेटा प्रक्रिया केल्यानंतर त्वरित हटवते.
  • Google ला तुमची ओळख पटल्यास, तुमचे डिव्हाइस वैयक्तिक परिणाम देईल.
  • आवाज न जुळल्यास, डिव्हाइस त्या क्वेरीला अतिथी क्वेरी म्हणून हाताळेल आणि वैयक्तिक परिणाम देणार नाही.
Voice Match आणि वैयक्तिक परिणाम
  • Google Assistant डिव्हाइससाठी कोणीही Voice Match सुरू केले नसल्यास आणि डिव्हाइस सेट केलेल्या व्यक्तीने वैयक्तिक परिणाम यांना अनुमती दिली असल्यास, ते वैयक्तिक परिणाम कोणीही अ‍ॅक्सेस करू शकते.
  • तुम्ही Voice Match सुरू केल्यानंतर, Google Assistant ने एखादा आवाज तुमचा नाही असे ओळखल्यास, ते त्यास तुमच्या वैयक्तिक परिणामांसह प्रतिसाद देणार नाही.
Voice Match आणि मीडिया सेवा
Voice Match आणि सेव्ह केलेल्या व्हॉइस व ऑडिओ अ‍ॅक्टिव्हिटी

तुम्ही पुढील गोष्टी केल्यास, Google ची व्हॉइस तंत्रज्ञाने विकसित करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google हे Google सर्व्हरवर सेव्ह केलेल्या तुमच्या ऑडिओमधील तुमच्या आवाजाच्या मॉडेलवर तात्पुरती प्रक्रियादेखील करू शकते:

या सेटिंगमुळे Google ला त्याची ऑडिओ तंत्रज्ञाने आणि ती वापरणाऱ्या Google सेवा यांमध्ये सुधारणा करण्यात मदत होते.

संबंधित स्रोत

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
10721652234638037777
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1633398
false
false