Google Assistant तुमच्या डेटासह कसे काम करते

Google Assistant आणखी पर्सनलाइझ केलेले परिणाम देण्यासाठी तुमची माहिती वापरते. खालील विभागांमध्ये, Google Assistant तुमच्या डेटासह काय करते आणि कोणता डेटा वापरला जावा हे तुम्ही कसे नियंत्रित करू शकता याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.

Assistant तुमचे बोलणे कसे समजून घेते आणि कसे प्रतिसाद देते

Assistant हे तुमचे बोलणे समजून घेण्यासाठी आणि तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी, तुम्ही बोललेल्या गोष्टी व तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइस आणि सेवांवरील माहिती वापरते. Google सेवांमध्ये सुधारणा करणे, यांसारख्या Google चे गोपनीयता धोरण मध्ये नमूद केलेल्या इतर उद्देशांसाठीदेखील Assistant ही माहिती वापरते. तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइस आणि सेवांमध्ये समाविष्ट असलेल्या माहितीची उदाहरणे:

  • स्थान (अधिक जाणून घ्या)
  • डिव्हाइसची नावे
  • टास्क, इव्हेंट आणि अलार्म
  • इंस्टॉल केलेली अ‍ॅप्स, संपर्क आणि प्लेलिस्ट

तुमच्या डेटा आणि गोपनीयतेचे संरक्षण करू देणारी सेटिंग्ज व टूल अ‍ॅक्सेस करण्यासाठी माझे खाते आणि Assistant सेटिंग्जवर जा.

वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केलेली असल्यास, Assistant सोबतच्या तुमच्या संवादांचा मजकूर आणि तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइस व सेवांवरील संबंधित माहिती तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केली जाते. माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून तुम्ही Assistant सोबतच्या तुमच्या संवादांचे पुनरावलोकन करू शकता आणि ते हटवू शकता.

तुम्ही माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून तुमचा अ‍ॅक्टिव्हिटी डेटा ऑटो-डिलीट करू शकता. ३, १८ किंवा ३६ महिने अशी वेळ मर्यादा निवडा. निवडलेल्या कालावधीपेक्षा जुना असलेला डेटा माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधून आपोआप सतत हटवला जाईल.

गुणवत्तेच्या बाबतीत मदत करण्यासाठी आणि Assistant मध्ये सुधारणा करण्यासाठी, मानवी परीक्षणकर्ते हे तुम्ही Assistant ला विचारलेल्या क्वेरीचा मजकूर व संबंधित माहिती वाचतात, त्यावर भाष्य आणि प्रक्रिया करतात. या प्रक्रियेचा भाग म्हणून तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याकरिता आम्ही पावले उचलतो. यामध्ये परीक्षणकर्त्यांनी तुमच्या क्वेरी पाहण्यापूर्वी किंवा त्यांवर भाष्य करण्यापूर्वी त्या तुमच्या Google खाते पासून वेगळ्या करणे समाविष्ट आहे.

आम्ही आमच्या वापरकर्त्यांचा डेटा खाजगी, संरक्षित आणि सुरक्षित कसा ठेवतो हे आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी, आमची गोपनीयता व सुरक्षितता तत्त्वे वाचा.

तुमचा Google Assistant अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुमचा डेटा कसा वापरला जातो

Google Assistant वापरण्यास सोपी बिल्ट-इन नियंत्रणे देते जेणेकरून, तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली गोपनीयता सेटिंग्ज निवडू शकता. तुमच्या डिव्हाइस आणि खाते सेटिंग्जवर आधारित, Google Assistant आणखी पर्सनलाइझ केलेला व उपयुक्त अनुभव तयार करण्यासाठी तुमचा डेटा वापरू शकते. वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केलेली असल्यास, तुम्हाला आणखी पर्सनलाइझ केलेले प्रतिसाद देण्यासाठी, तुम्ही Assistant ला सांगितलेल्या गोष्टींचा मजकूर व तुमच्या लिंक केलेल्या डिव्हाइस आणि सेवांवरील माहिती वापरली जाते. Google Assistant तुमचा डेटा कसा वापरू शकते याबद्दल आम्हाला विचारलेले काही सामान्य प्रश्न खाली दिले आहेत.

तुम्ही विचारले: Google Assistant माझे ईमेल अ‍ॅक्सेस करत आहे का?

खाद्यपदार्थ पुन्हा ऑर्डर करणे यांसारखी कामे करून घेण्यात तुम्हाला मदत व्हावी, यासाठी Google Assistant तुम्हाला Gmail मधील माहिती दाखवू शकते. Gmail चा आशय जाहिरातींसाठी वापरला जात नाही. Gmail गोपनीयता आणि सुरक्षा वैशिष्ट्ये यांबद्दल अधिक जाणून घ्या.

तुम्ही विचारले: Google Assistant माझे फोटो अ‍ॅक्सेस करत आहे का?

तुमच्या सेटिंग्जवर आधारित, Google Photos हे तुमचा टीव्ही आणि Google Assistant स्मार्ट डिस्प्ले यांसारख्या डिव्हाइसवर दाखवले जाऊ शकते. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

तुम्ही विचारले: Google Assistant माझ्या Google खाते मधील माहिती कशी वापरत आहे?

तुम्ही मदतीची विनंती करता तेव्हा, तुमचा Google Assistant मधील डेटा यामधील सेटिंग्ज आणि वैयक्तिक परिणाम व Voice Match यांसारख्या Google Assistant च्या इतर सेटिंग्जवर आधारित, तुम्हाला आवश्यक ते मिळवून देण्यासाठी Google Assistant तुमच्या Google खाते मधील डेटाचा संदर्भ घेईल.

Google Assistant कोणता डेटा अ‍ॅक्सेस करू शकते हे कसे नियंत्रित करावे याबद्दल जाणून घ्या.

Google Assistant तुमचा कोणता डेटा रेकॉर्ड करते

तुम्ही विचारले: Google Assistant माझ्या Google खाते मधील माझा डेटा स्टोअर करत आहे का?

तुम्ही वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, तुमचा संभाषण इतिहास किंवा तुम्ही Google Assistant ला विचारलेले प्रश्न यांसारखी तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या खात्यामध्ये स्टोअर केली जाते व माझी अ‍ॅक्टिव्हिटी मध्ये दाखवली जाते. तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:

  • वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी कधीही बंद करणे.
  • तुमची अ‍ॅक्टिव्हिटी ३ किंवा १८ महिन्यांनंतर ऑटो-डिलीट करण्याचे निवडणे किंवा तुम्ही ती मॅन्युअली हटवेपर्यंत ठेवणे.
  • तुमची अ‍ॅक्टिव्हिटी मॅन्युअली कधीही हटवणे.
  • तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या खात्यामध्ये सेव्ह न करता किंवा ती तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी न वापरता Google Assistant वापरण्याकरिता अतिथी मोड सुरू करणे.

तुम्ही विचारले: Google Assistant माझी ऑडिओ रेकॉर्डिंग सेव्ह करते का?

तुमची ऑडिओ रेकॉर्डिंग कशी व्यवस्थापित करावी याबद्दल जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या खात्यामधील Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी कधीही पाहू किंवा हटवू शकता. तुमचा Google Assistant इतिहास कसा हटवावा याबद्दल जाणून घ्या.

Google Assistant सह काय शेअर करायचे ते निवडणे

लोकांना त्यांचा डेटा समजून घेण्यात आणि व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी Google नेहमी काम करत असते.

तुम्ही Google Assistant सह काय शेअर करता ते निवडणे

तुम्हाला Google Assistant वर आणखी पर्सनलाइझ केलेला अनुभव देण्यात मदत करण्यासाठी काही सेटिंग्ज आहेत. तुम्ही या सेटिंग्ज कधीही सुरू किंवा बंद करण्याचे निवडू शकता:

तुम्ही ही सेटिंग्ज बंद करता तेव्हा, तुम्ही ती Assistant आणि तुम्ही वापरत असलेल्या इतर Google सेवांसाठी बंद करता. ही सेटिंग्ज तुमचा Google Assistant अनुभव कसा पर्सनलाइझ करतात याबद्दल जाणून घ्या.

Google Assistant कोणता डेटा अ‍ॅक्सेस करू शकते हे नियंत्रित करणे

Google Assistant ने तुमच्या डिव्हाइसवर तुमच्याशी संबंधित परिणाम वाचू किंवा दाखवू नये असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्या डिव्हाइससाठी वैयक्तिक परिणाम बंद करू शकता. तुम्ही वैयक्तिक परिणाम बंद केल्यास, Assistant तुम्हाला इतर Google उत्पादने आणि Gmail किंवा Google Calendar यांसारख्या सेवांवरील परिणामांच्या समावेशासह पर्सनलाइझ केलेले परिणाम देणार नाही. तुमच्या Google Assistant ने युक्त डिव्हाइससाठी वैयक्तिक परिणाम कसे व्यवस्थापित करावेत याबद्दल जाणून घ्या.

Google Assistant ने वैयक्तिक परिणाम द्यावेत पण Google Photos वरील तुमचे फोटो तुमच्या स्मार्ट डिस्प्ले किंवा टीव्हीवर दाखवू नयेत असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही Google Photos चा अ‍ॅक्सेस बंद करू शकता:

  1. Google Assistant अ‍ॅप Assistant उघडा.
  2. सर्वात वरती उजवीकडे, तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आणि त्यानंतर व्हिडिओ आणि फोटो वर क्लिक करा.
    • तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो किंवा आद्याक्षरे आढळल्यास, सर्वात आधी वैयक्तिक अपडेट वर टॅप करा.
  3. Google Photos बंद करा.
जाहिरातींसाठी तुमचा Google डेटा कसा वापरला जातो हे नियंत्रित करणे

तुमच्यासाठी जाहिराती पर्सनलाइझ करण्याकरिता Google कोणता डेटा वापरते हे तुम्ही तुमची जाहिरात सेटिंग्ज येथे नियंत्रित करू शकता.

तुमच्या Google खाते मधून तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी हटवणे

तुम्ही वेब आणि ॲप ॲक्टिव्हिटी सुरू केली असल्यास, तुमचे व Google Assistant चे संवाद तुमच्या Google खाते मध्ये सेव्ह केले जातात आणि तुमच्या माझी अ‍ॅक्टिव्हिटी मधील Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी वर दाखवले जातात. तुम्ही तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी कधीही हटवू शकता किंवा तुमची ऑटो-डिलीट सेटिंग्ज बदलू शकता. तुमची Google Assistant अ‍ॅक्टिव्हिटी कशी हटवावी याबद्दल जाणून घ्या.

तुम्ही Google Assistant लादेखील तुमच्या खात्यामधून अ‍ॅक्टिव्हिटी हटवण्यास सांगू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही म्हणू शकता:

  • “Ok Google, माझे शेवटचे संभाषण हटवा”.
  • “Ok Google, आजची अ‍ॅक्टिव्हिटी हटवा”.

तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कशी हटवली जाते याबद्दल जाणून घ्या.

टीप: तुम्ही सर्व डिव्हाइसवरूनदेखील Voice Match काढून टाकू शकता. Voice Match काढून टाकण्यासाठी, माझ्या सर्व डिव्हाइसवरून Voice Match काढून टाका वर टॅप करा.

सर्व डिव्हाइसवरून Voice Match काढून टाका

तुम्ही तुमच्या सर्व डिव्हाइसवरून Voice Match काढून टाकल्यास, Google Assistant यापुढे तुमचा आवाज ओळखणार नाही. Google Assistant मुख्य वैशिष्ट्ये आणि क्षमता गमावेल, जसे की:

  • यामुळे तुम्हाला पुढील गोष्टींसारखे वैयक्तिक परिणाम मिळणार नाहीत:
    • स्पीकर आणि स्मार्ट डिस्प्ले यांसारख्या शेअर केलेल्या डिव्हाइसवर टास्क व कॅलेंडर इव्हेंट.
    • तुमच्या फोनवर वैयक्तिक परिणाम अजूनही उपलब्ध असू शकतात.
  • ते तुमच्या फोनवर "Ok Google" ला प्रतिसाद देत नाही, पण शेअर केलेल्या डिव्हाइसवर प्रतिसाद देते.
  • ते यापुढे तुमचा चेहरा ओळखणार नाही, कारण पात्र डिव्हाइसवरून Face Match देखील काढून टाकले आहे.

या सेवांमध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्ही घेतलेल्या ऑडिओ क्लिप आणि फोटो हटवले आहेत. हा बदल लागू होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. काही जुन्या डिव्‍हाइससाठी, तुम्‍हाला Voice Match काढून टाकण्याचा दुसरा मार्ग वापरावा लागेल.

संबंधित स्रोत

true
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
13477642589655116386
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
1633398
false
false