Google Play सेवा याबद्दल जाणून घ्या

Google Play सेवा हे कोअर सिस्टीम सॉफ्टवेअर आहे, जे प्रत्येक प्रमाणित Android डिव्हाइसवर प्रमुख कार्यक्षमता सुरू करते. Google Play सेवा पुरवत असलेल्या कोअर डिव्हाइस वैशिष्ट्यांचे तीन प्रकार आहेत:

सुरक्षा आणि विश्वसनीयता

Android डिव्हाइसची सुरक्षा आणि विश्वसनीयता यांची खात्री करण्यात आणि नवीनतम सुरक्षा वैशिष्ट्ये यांसह डिव्हाइस अपडेट केलेले ठेवण्यात Google Play सेवा मदत करते. यामध्ये या गोष्टींचा समावेश आहे:

डेव्हलपर APIs

Google Play सेवा डेव्हलपरना त्यांच्या अ‍ॅप्समध्ये उच्च दर्जाचा अनुभव पुरवता येण्यासाठी, सातत्याने अपडेट केले जाणारे हजारो APIs पुरवते, जसे की:

कोअर डिव्हाइस सेवा

Google Play सेवा Android डिव्हाइसवर कोअर सेवा सुरू करते. उदाहरणार्थ:

  • वापरकर्त्याने सपोर्ट असलेल्या आणीबाणी नंबरवर आणीबाणी कॉल केल्यावर, डिव्हाइसचे स्थान थेट मिळवण्यात Google हे स्थानिक आणीबाणी सेवांना मदत करते.
  • Google च्या ऑटोफिल सेवा वेळ वाचवण्यात आणि टायपिंगच्या चुका कमी करण्यात वापरकर्त्यांना मदत करतात.
  • Nearby सह शेअरिंग वापरकर्त्यांना त्यांच्या संपर्कांसोबत किंवा निनावीपणे फाइल पाठवू आणि मिळवू देते.
  • Find My Device हे हरवलेले डिव्हाइस शोधणे, लॉक करणे किंवा पुसून टाकणे सोपे करते.
  • जलद पेअरिंग तुमचे Google खाते वापरून ब्लूटूथ ॲक्सेसरी कनेक्ट करणे सोपे करते.

त्यासोबतच, वापरकर्त्याने त्यांच्या डिव्हाइसवर त्यांच्या Google खात्यामध्ये साइन इन केल्यावर, त्यांना त्यांची Google सेटिंग्ज अपडेट करणे, त्यांच्या खात्याची सुरक्षा व्यवस्थापित करणे आणि त्यांचे Google Contacts यासारखा महत्त्वाचा डेटा सर्व डिव्हाइसवर सिंक करणे हे करता येते.

Google Play सेवा डेटा का गोळा करते 

कोअर डिव्हाइस वैशिष्ट्यांना सपोर्ट करण्यासाठी, Google Play सेवा प्रमाणित Android डिव्हाइसवर डेटा गोळा करते. आयपी अ‍ॅड्रेससारखी मर्यादित प्राथमिक माहिती गोळा करणे हे डिव्हाइस, अ‍ॅप किंवा ब्राउझरवर आशय डिलिव्हर करण्यासाठी आवश्यक असते. या वैशिष्ट्यांना सपोर्ट करण्यासाठी, डिव्हाइस निर्मातेदेखील Google Play सेवा ला डिव्हाइसवरील स्थान आणि संपर्क यांसारखा ठरावीक डेटा अ‍ॅक्सेस करण्याची परवानगी देते.

वापरकर्त्याने काँफिगर केलेली डिव्हाइस सेटिंग्ज, डिव्हाइसवर इंस्टॉल केलेली किंवा वापरली जाणारी अ‍ॅप्स आणि सेवा, डिव्हाइस निर्माता व वापरकर्त्याची खाते सेटिंग्ज यांनुसार प्रत्यक्ष डेटा संग्रह बदलतो. अनेक प्रसंगी, Google Play सेवा डिव्हाइसमधून डेटा गोळा न करता, डिव्हाइसवर डेटा स्थानिकरीत्या अ‍ॅक्सेस करेल.

वर वर्णन केलेल्या प्रत्येक फंक्शनला सपोर्ट करण्याकरिता, Google Play सेवा पुढील कारणांसाठी माहिती गोळा करू शकते:

सुरक्षा आणि फसवणूक प्रतिबंध

वापरकर्ते, Google सेवा आणि तृतीय पक्ष डेव्हलपरची अ‍ॅप्स व सेवा यांचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यात मदत करण्यासाठी, Google हे Google Play सेवा मार्फत डेटा गोळा करते. यामध्ये या गोष्टींचा समावेश आहे:

  • एखादी विनंती खर्‍या वापरकर्त्याकडून येत आहे याची पडताळणी करण्यासाठी माहिती आणि मालवेअर स्कॅनच्या परिणामांसह, इंस्टॉल केलेल्या अ‍ॅप्सबद्दलची माहिती.
  • वापरकर्त्याने एखाद्या डिव्हाइसवर साइन इन केलेले असल्यास किंवा नवीन डिव्हाइसवर त्यांचा डेटा हलवणे हे केल्यास, Google खाते आणि लॉग इन माहिती.
  • खाते रिकव्हरी सेवा पुरवण्यासाठी आणि वापरकर्त्यांना फोन नंबरवर आधारित सेवांमध्ये (जसे की Google Meet) लॉग इन करण्यासाठी, Google डिव्हाइसचा फोन नंबर गोळा करू शकते.
  • नवीनतम सुरक्षा पॅचसह डिव्हाइस अपडेट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारची डिव्हाइस सेवेमध्ये किती काळ राहतात यांसारख्या Android व्यवस्थेवरील ट्रेंडचे पुनरावलोकन करण्यासाठी, IMEI, MAC अ‍ॅड्रेस यांसारखे हार्डवेअर आयडेंटिफायर आणि सिरीअल नंबर. डिव्हाइस अप-टू-डेट आहेत आणि शक्य तितक्या उत्तम प्रकारे काम करत आहेत याची खात्री करण्यासाठी, डेटा गोळा करणारी Google ची डिव्हाइस कॉंफिगरेशन सेवा ही Google Play सेवांचा भाग आहे.

Android व्यवस्थेला सपोर्ट करा आणि त्यामध्ये सुधारणा करा

वर वर्णन केल्याप्रमाणे, Google Play सेवा अनेक APIs आणि कोअर डिव्हाइस सेवा पुरवते, ज्या Android ला वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला, कनेक्ट केलेला प्लॅटफॉर्म बनवतात. या सेवा आणि APIs पुरवण्यासाठी, त्यांची देखभाल करण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी Google त्यांच्याबद्दलचा डेटा गोळा करू शकते. डिव्हाइस सेटिंग्जनुसार, Google हे डिव्हाइसबद्दलची अतिरिक्त माहिती गोळा करू शकते. उदाहरणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:

  • हे APIs कसे वापरले जातात ते समजून घेण्यासाठी आणि ते योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री करण्यासाठी, Google डेटा गोळा करते.
  • Google स्थान अचूकता सुरू केल्यास, डिव्हाइसवर आणखी अचूक स्थान पुरवण्यासोबतच, स्थानावर आधारित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी, स्थान माहिती निनावी पद्धतीने वापरली जाऊ शकते.
  • डिव्हाइसचे वापर आणि निदान नियंत्रण सुरू केल्यास, Google अ‍ॅप्स आणि Android डिव्हाइस यांसारखी उत्पादने आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google हे डिव्हाइसचा वापर आणि डिव्हाइस किती चांगल्या प्रकारे काम करत आहे याबद्दलची माहिती गोळा करते.

Google सेवा पुरवणे

वापरकर्ता Android वर Google अ‍ॅप्स आणि सेवा वापरत असल्यास, ती अ‍ॅप्स आणि सेवा पुरवण्यासाठी आणि त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी, Google हे Google Play सेवा मार्फत डेटा गोळा करते. उदाहरणार्थ:

  • वापरकर्त्याच्या सेटिंग्जनुसार, सर्व डिव्हाइसवर आणि क्लाउडवर सिंक करण्यासाठी, Google हे संपर्क आणि बुकमार्क यांसारखा डेटा गोळा करते.
  • Google Play सेवा वापरकर्त्याची Google खाते सेटिंग्ज सर्व डिव्हाइसवर सिंक करते आणि त्यांच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी माहिती गोळा करते.
  • Google Maps सारखी एम्बेड केलेली अ‍ॅपची कार्यक्षमता सुरू करण्यासाठी, Google Play सेवा डेटा गोळा करू शकते.
  • Google Play सेवा वापरकर्त्यांना संवाद साधण्यात आणि व्यवसाय यांना थेट मेसेज पाठवणे यासाठी मदत करतात.
  • Google Pay वापरत असताना, Google Play सेवा वापरकर्त्यांना त्यांची पेमेंट माहिती व्यवस्थापित करण्यात, संपर्करहित पेमेंट करण्यात किंवा सुरक्षितपणे डिजिटल कार की वापरण्यात मदत करतात.
  • तुम्ही Play Games प्रोफाइल किंवा सेवा वापरता, तेव्हा Google डेटा गोळा करते.
  • ज्या वापरकर्त्यांनी त्यांच्या डिव्हाइसवरील वेब आणि अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी या अंतर्गत “या डिव्हाइसवरील अ‍ॅप्समधील तुमची अ‍ॅक्टिव्हिटी सेव्ह करते” हे सेटिंग सुरू केले आहे त्यांच्यासाठी, Google त्यांच्या डिव्हाइसवरील अ‍ॅप्समधील अ‍ॅक्टिव्हिटी डेटा त्यांच्या Google खाते मध्ये सेव्ह करू शकते, जेणेकरून तो Google अ‍ॅप्स आणि सेवा पर्सनलाइझ करण्यासाठी वापरला जाऊ शकेल.
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
7800791473378816841
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
false
false