सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

पेमेंट सीमा

आम्ही नवीन बीटा आवृत्ती सादर करत आहोत, ज्यामुळे YouTube Studio मोबाइल अ‍ॅपच्या कमाई टॅबमध्ये पेमेंटचे तपशील मिळतात. या बीटा आवृत्तीमुळे, पात्र निर्माणकर्ते यांना त्यांच्या कमाईचे रूपांतर पेमेंटमध्ये कसे होते हे समजून घेण्याचा सोपा मार्ग देते. या बीटा आवृत्तीसह, तुम्ही पुढील गोष्टी पाहू शकता:
  • तुमच्या पुढील पेमेंटच्या दिशेने तुमची प्रगती
  • तारीख, पेमेंट केलेली रक्कम आणि पेमेंटचे ब्रेकडाउन यांच्या समावेशासह तुमचा गेल्या १२ महिन्यांचा पेमेंट इतिहास
आमची फोरम पोस्ट यामध्ये अधिक जाणून घ्या.

कमाईच्या काही मर्यादा आहेत ज्यांचा परिणाम तुम्ही AdSense वरील कमाईचे पैसे मिळवण्यासाठी पात्र आहात का यावर होऊ शकतो. या मर्यादा तुमच्या खात्यामध्ये वापरले जाणारे चलन यानुसार बदलू शकतात. मर्यादा गाठल्यानंतर कदाचित तुम्हाला यासंबंधित पुढील पावले उचलावी लागू शकतात. मर्यादांबद्दलच्या अधिक माहितीसाठी वर्णने वाचा आणि खालील सारणी पहा.

पाच पायऱ्या असलेल्या कमाईच्या मर्यादांची उदाहरणे.

१. कर माहितीसंबंधित मर्यादा

तुमच्या स्थानानुसार तुम्हाला करासंबंधित गोष्टींसाठी काही विशिष्ट माहिती द्यावी लागेल. तुम्ही कराबाबत माहिती सबमिट करणे आवश्यक असल्यास, तुम्ही ती आधी तुमच्या खात्यामध्ये साइन इन करून सबमिट करू शकाल. Google ला तुमची कर माहिती कशी सबमिट करावी याविषयी अधिक जाणून घ्या.

२. पडताळणी मर्यादा

तुमची कमाई पडताळणी मर्यादेवर पोहोचते, तेव्हा तुम्ही हे करणे आवश्यक आहे:

टीप: तुमच्याकडे AdSense आणि YouTube साठी स्वतंत्र पेमेंट खाती असल्यास, तुमच्या पेमेंट खात्यांपैकी एखादे पडताळणी मर्यादा गाठते, तेव्हा तुमच्या माहितीची तुम्ही पडताळणी करता. तुम्ही तुमच्या माहितीची फक्त एकदा पडताळणी करणे आवश्यक आहे.

३. पेमेंट पद्धत निवडण्यासंबंधित मर्यादा

आमच्या अटी आणि नियम यांनुसार, पेमेंटसाठी पात्र ठरण्याकरिता अ‍ॅक्टिव्ह खात्यांनी पेमेंट मर्यादा गाठणे आवश्यक आहे. आम्ही कधीही या मर्यादेहून कमी पेमेंट जारी करत नसल्यामुळे, प्रकाशकांची सध्याची शिल्लक ही पेमेंट पद्धतीसंबंधी मर्यादा गाठत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना पेमेंट पद्धत निवडण्याची अनुमती देत नाही. अधिक माहितीसाठी पेमेंट मार्गदर्शक पहा.

टीप: तुमच्याकडे AdSense आणि YouTube साठी स्वतंत्र पेमेंट खाती असल्यास, प्रत्येक पेमेंट खाते मर्यादा गाठते, तेव्हा तुम्ही त्या प्रत्येकासाठी पेमेंट पद्धत निवडता.

४. पेमेंट सीमा

तुमचे खाते रोखून ठेवले नसल्यास आणि तुम्ही आमची प्रोग्राम धोरणे यांचे पालन करत असल्यास, तुमची उर्वरित कमाई पेमेंट मर्यादा गाठेल, तेव्हा तुमचे पैसे दिले जातील. तुम्हाला पैसे कधी दिले जातील याबद्दल अधिक माहितीसाठी पेमेंट टाइमलाइन पहा.

टीप: तुमच्याकडे AdSense आणि YouTube साठी स्वतंत्र पेमेंट खाती असल्यास, पेमेंट दिले जाण्यासाठी प्रत्येक पेमेंट खात्याने पेमेंट मर्यादा गाठणे आवश्यक आहे.

५. रद्दीकरणसंबंधित मर्यादा

तुम्ही तुमचे AdSense खाते रद्द करणे असे ठरवल्यास आणि तुमच्या खात्यातील शिल्लक ही रद्दीकरण मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही पैसे मिळवण्यासाठीच्या आवश्यक पायऱ्या पूर्ण केल्यावर तुम्हाला तुमचे अंतिम पेमेंट सुमारे ९० दिवसांच्या आत महिन्याच्या शेवटी मिळेल.

प्रति चलन आणि प्रति पेमेंट खाते यांसंबंधित मर्यादा मूल्ये

तुमच्या AdSense खात्यामधील प्रत्येक पेमेंट खाते याची (उदा. YouTube पेमेंट खाते) स्वतःची मर्यादा असते. खालील मूल्यावरील मर्यादा तुमच्या प्रत्येक पेमेंट खात्यांवर स्वतंत्रपणे लागू होतात.

मर्यादा कर माहिती पडताळणी पेमेंट पद्धत पेमेंट रद्द करणे
यूएस डॉलर (USD) $० $१० $१० $१०० $१०
ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD) N/A $१० समतुल्य A$१५ A$१०० A$१५
कॅनेडियन डॉलर (CAD) C$० $१० समतुल्य C$१० C$१०० C$१०
चिलीयन पेसो (CLP) N/A $१० समतुल्य CLP$६००० CLP$६०००० CLP$६०००
चेक कोरुना (CZK) N/A $१० समतुल्य Kč२०० Kč२००० Kč२००
डॅनिश क्रोन (DKK) N/A $१० समतुल्य kr६० kr६०० kr६०
यूरो (EUR) N/A $१० समतुल्य €१० €७० €१०
ग्रेट ब्रिटिश पाऊंड (GBP) N/A $१० समतुल्य £१० £६० £१०
हाँगकाँग डॉलर (HKD) N/A $१० समतुल्य HK$१०० HK$८०० HK$१००
हंगेरियन फोरिंट (HUF) N/A $१० समतुल्य Ft२,००० Ft२०,००० Ft२,०००
इंडोनेशियन रुपियाह (IDR) N/A $१० समतुल्य Rp१३०००० Rp१३००००० Rp१३००००
इस्रायली शेकेल (ILS ₪) N/A $१० समतुल्य ₪४० ₪४०० ₪४०
जपानी येन (JPY) N/A $१० समतुल्य ¥१००० ¥८००० ¥१०००
जॉर्डनियन दिनार (JOD) N/A $१० समतुल्य دينار‎;७ دينار‎;७० دينار‎;७
मेक्सिकन पेसो (MXN) Mex$० $१० समतुल्य Mex$१२० Mex$१,२०० Mex$१२०
मोरोक्कन दिरहम (MAD) N/A $१० समतुल्य .د.م80 .د.م800 .د.م80
न्यूझीलँड डॉलर (NZD) N/A $१० समतुल्य $१५ $१३० $१५
नॉर्वेजियन क्रोन (NOK) N/A $१० समतुल्य kr६० kr६०० kr६०
पेरुव्हियन सोल (PEN) N/A $१० समतुल्य S/३० S/३०० S/३०
पोलिश झुवॉटी (PLN) N/A $१० समतुल्य zł३० zł३०० zł३०
सिंगापूर डॉलर (SGD) N/A $१० समतुल्य S$१५ s१५० S$१५
दक्षिण अफ्रिकन रँड (ZAR) N/A $१० समतुल्य R१०० R१००० R१००
स्वीडिश क्रोन (SEK) N/A $१० समतुल्य kr७० kr७०० kr७०
स्विस फ्रँक (CHF) N/A $१० समतुल्य Fr१० Fr१०० Fr१०
ट्यूनिशियन दीनार (TND) N/A $१० समतुल्य د.ت,20 د.ت,200 د.ت,20
तुर्की लीरा (TRY) N/A $१० समतुल्य ₺२० ₺२०० ₺२०
संयुक्त अरब अमिराती दिरहम (AED) N/A $१० समतुल्य د.إ35 د.إ350 د.إ35
उरुग्वेयन पेसो (UYU) N/A $१० समतुल्य $U२४० $U२४०० $U२४०

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
3376730529759488927
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false