AdSense वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या साइटच्या HTML स्रोत कोडचा अॅक्सेस असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या पेजच्या <head>
टॅगमध्ये AdSense कोड ठेवता येणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मालकीच्या नसलेल्या साइटवरून साइन अप केल्यास (उदा. www.google.com), आम्हाला तुम्ही साइटचे मालक असल्याची पडताळणी करता येणार नाही आणि आम्ही तुमचे खाते अॅक्टिव्हेट करणार नाही.
तुम्ही आशय व्यवस्थापन सिस्टम (CMS) वापरल्यास
तुम्ही तुमची साइट CMS वापरून तयार केली असल्यास, CMS वरून किंवा प्लग-इन अथवा थीम वापरून तुम्हाला तुमच्या साइटचे HTML अॅक्सेस करता येत असल्याचे तपासण्याची आम्ही तुम्हाला शिफारस करतो. Blogger यांसारखे काही CMS, कोणताही कोड न ठेवता तुम्हाला AdSense साठी साइन अप करण्याची अनुमती देतात.
तुमचे YouTube चॅनल असल्यास
तुम्हाला तुमच्या YouTube व्हिडिओच्या आशयामधून कमाई करायची असल्यास, कृपया YouTube भागीदार उपक्रम यासाठी अर्ज करा. तुमचे YouTube चॅनल कमाई करण्यासाठी आधीपासून पात्र असल्यास, AdSense साठी साइन अप करण्याकरिता तुमच्या YouTube खात्यामधील सूचना फॉलो करा.
तुमची साइट नसल्यास
तुमच्या मालकीची साइट नसल्यास किंवा तुमची अस्तित्वात असलेली साइट JavaScript शी कंपॅटिबल नसल्यास, तुम्ही तुमची नवीन साइट तयार केल्यावर निःसंकोचपणे साइन अप करा. तुमच्या साइटची पेज AdSense साठी तयार असल्याची खात्री करणे हे कसे करावे ते जाणून घ्या.