सूचना

कृपया तुमचे AdSense पेज याला नक्की भेट द्या, ज्यामध्ये तुम्हाला AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी यासाठी तुमच्या खात्याबद्दल पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल.

पेमेंट

होमपेजचे अहवाल: तुमची कमाई समजून घेणे

तुमची अंदाजे कमाई, शेवटचे पेमेंट आणि सध्याची शिल्लक या गोष्टी पाहण्यासाठी तुमच्या AdSense होमपेजला भेट द्या. #estimatedearnings #finalizedearnings

तुमच्या AdSense खात्यामधील अहवाल हे तुमच्या खात्यातील सध्याच्या अ‍ॅक्टिव्हिटीचे निकटचे अंदाज तुम्हाला देण्यासाठी आहेत. मात्र, हे अहवाल तुमची अंतिम कमाई दाखवत नाहीत. तुम्हाला अंतिमतः दिलेल्या रकमेवर अनेक घटक परिणाम करू शकतात. तुमची कमाई ही अंतिम केली गेल्यानंतर, तुमच्या "व्यवहार" पेजवर पोस्ट केली जाते. जेथे योग्य आणि शक्य असेल तेथे, अवैध क्लिक किंवा इंप्रेशनवरून केली गेली आहे असे आढळलेली कोणतीही कमाई परिणाम झालेल्या जाहिरातदारांना परत केली जाते. तुमचे खाते हे चुकीच्या ॲक्टिव्हिटीमुळे बंद केले जाणे असे केले गेले असल्यास, तुम्हाला पेमेंट मिळवता येणार नाही आणि योग्य व शक्य असेल तिथे, परिणाम झालेल्या जाहिरातदारांच्या खात्यामध्ये आम्ही कमाईचा परतावा देऊ.

टीप: मार्च २०२२ पासून सुरू होऊन आणि पुढील काही महिन्यांत रोल आउट करून, YouTube वरून केलेल्या कमाईसाठी AdSense मध्ये वेगळे होमपेज व पेमेंट खाते असेल. YouTube चे होमपेज आणि पेमेंट खाते याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या होमपेजवरील कमाईशी संबंधित माहिती

तुमच्या खात्याच्या होमपेजवर, आम्ही पुढील माहिती दाखवतो:

  • अंदाजे कमाई: आजच्या, कालच्या, या महिन्यातील आतापर्यंतच्या आणि मागील महिन्यातील, अशा तुमच्या अलीकडील खाते ॲक्टिव्हिटीचे निकटचे अंदाज.
  • शिल्लक: हा विभाग कमाईच्या दोन पातळ्या दाखवतो:
    • तुमच्या कमाईची सध्याची शिल्लक, जिचे पेमेंट अद्याप केले गेलेले नाही. या शिलकीमध्ये तुम्हाला मिळालेल्या पेमेंटची एकूण रक्कम नसू शकते. Google हे रकमेमध्ये ॲडजस्टमेंट करू शकते, ज्यामध्ये विसंगती, कोणतीही अशी चुकीची ॲक्टिव्हिटी जी तुमच्या कमाईमधून ॲडजस्ट करणे आवश्यक आहे किंवा आवश्यकतेनुसार इतर महिना अखेरची क्रेडिट या गोष्टी राउंड अप करणे यांचा समावेश आहे.
    • तुमचे अगदी अलीकडील पेमेंट.

कमाईमधील अ‍ॅडजस्टमेंट

आम्ही चुकीच्या इंप्रेशन किंवा क्लिकसाठी तुमच्या खात्यामधील अंदाजे अथवा अंतिम कमाईमध्ये अ‍ॅडजस्टमेंट करू शकतो, याचा अर्थ असा, की तुम्हाला द्याव्‍या लागणार्‍या शिलकीमधून आम्ही कमाई काढून टाकू शकतो. ट्रॅफिक सोर्स किंवा जाहिरात अंमलबजावणीशी संबंधित समस्यांमुळे चुकीची अ‍ॅक्टिव्हिटी होऊ शकते. अधिक माहितीसाठी, तुम्ही AdSense धोरणे: नवशिक्याचा मार्गदर्शक आणि चुकीच्या अ‍ॅक्टिव्हिटी प्रतिबंधित करण्यासाठी टिपा यांचे पुनरावलोकन करावे, अशी आम्ही शिफारस करतो.

प्रकाशकाच्या साइटवर जाहिरात दाखवलेल्या जाहिरातदाराने पेमेंट न केल्यास, अशा परिस्थितीमध्ये प्रकाशकाची कमाई अ‍ॅडजस्ट करण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो.

चुकीच्या ॲक्टिव्हिटी डिटेक्ट करणाऱ्या आमच्या सिस्टीमची अखंडता कायम राखण्यासाठी आणि वापरकर्त्यांना सिस्टीम टाळण्यापासून रोखण्यासाठी, प्रति दिन किंवा प्रति चॅनल किती कमाई ॲडजस्ट केली याचे तपशील आम्ही देऊ शकत नाही. कृपया हे ध्यानात घ्या, की जाहिरातदार, प्रकाशक आणि वापरकर्त्यांसाठी आमच्या AdSense साइटच्या नेटवर्कमध्ये सुरक्षित व उपयुक्त वातावरण राखण्याकरिता, आम्ही चुकीची ॲक्टिव्हिटी टाळण्यासाठीची संरक्षणे लागू केली आहेत.

हे उपयुक्त होते का?

आम्ही यास कसे सुधारित करू शकतो?
true
तुमचे AdSense पेज

AdSense पेज सादर आहे: एक नवीन स्त्रोत ज्यामध्ये तुम्हाला पर्सनलाइझ केलेली माहिती मिळेल आणि AdSense वापरून यशस्वी होण्यात मदत व्हावी म्हणून तुमच्या खात्यामध्ये नवीन संधी मिळतील.

शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
1565433775723729059
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
157
false
false