हॅक केले गेलेले किंवा धोक्यात असलेले Google खाते सुरक्षित करणे

तुम्हाला तुमचे Google खाते, Gmail किंवा इतर Google उत्पादनांवर अपरिचित अ‍ॅक्टिव्हिटी आढळल्यास, दुसरी एखादी व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय ते वापरत असू शकेल. तुमचे Google खाते किंवा Gmail हॅक केले गेले आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास, संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी शोधणे, तुमच्या खात्यामध्ये परत जाणे आणि ते आणखी सुरक्षित बनवणे यांमध्ये मदत होण्यासाठी खालील पायर्‍या फॉलो करा.

पहिली पायरी: तुमच्या Google खाते मध्ये साइन करा

तुम्ही साइन इन करू शकत नसल्यास

खाते रिकव्हरी पेज वर जा आणि प्रश्नांची तुम्हाला शक्य तितकी योग्य उत्तरे द्या. या टिपा मदत करू शकतात.

पुढील परिस्थितीमध्ये, खाते रिकव्हरी पेज वापरा:

  • कोणीतरी तुमचा पासवर्ड किंवा रिकव्हरी फोन नंबर यांसारखी तुमची खाते माहिती बदलल्यास.
  • कोणीतरी तुमचे खाते हटवल्यास.
  • तुम्ही दुसऱ्या कारणामुळे साइन इन करू शकत नसल्यास.

टीप: तुम्ही योग्य खात्यामध्ये साइन इन करण्याचा प्रयत्न करत असल्याची खात्री करण्यासाठी, तुमचे वापरकर्ता नाव रिकव्हर करण्याचा प्रयत्न करणे हे करा.

दुसरी पायरी: अ‍ॅक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करा आणि तुमचे हॅक झालेले Google खाते सुरक्षित करण्यात मदत करा

तुमच्या खाते अ‍ॅक्टिव्हिटीचे पुनरावलोकन करा
  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडील नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. अलीकडील सुरक्षा इव्हेंट या पॅनलवर, सुरक्षा इव्हेंटचे पुनरावलोकन करा निवडा.
  4. कोणतीही संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी शोधा:
    • तुम्ही न केलेली अ‍ॅक्टिव्हिटी तुम्हाला आढळल्यास, नाही, ती व्यक्ती मी नाही निवडा. त्यानंतर, तुमचे खाते सुरक्षित करण्यात मदत होण्यासाठी स्क्रीनवरील पायर्‍या फॉलो करा.
    • अ‍ॅक्टिव्हिटी तुम्ही केली असल्यास, होय निवडा. तरीही तुमचे खाते दुसरे कोणीतरी वापरत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचे खाते हॅक केले गेले आहे का ते जाणून घ्या.
कोणती खाती तुमचे डिव्हाइस वापरतात त्याचे पुनरावलोकन करा
  1. तुमच्या Google खाते वर जा.
  2. डावीकडील नेव्हिगेशन पॅनलवर, सुरक्षा निवडा.
  3. तुमची डिव्हाइस पॅनलवर, डिव्हाइस व्यवस्थापित करा निवडा.
  4. तुम्ही ओळखत नसलेली कोणतीही डिव्हाइस आहेत का ते तपासा.
    • तुम्हाला तुम्ही ओळखत नसलेले डिव्हाइस आढळल्यास, डिव्हाइस ओळखत नाही का? निवडा त्यानंतर, तुमचे खाते सुरक्षित करण्यात मदत होण्यासाठी स्क्रीनवरील पायर्‍या फॉलो करा.
    • तुम्ही सर्व डिव्हाइस ओळखत असल्यास, परंतु तरीही तुमचे खाते दुसरे कोणीतरी वापरत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचे खाते हॅक केले गेले आहे का ते जाणून घ्या.

तिसरी पायरी: सुरक्षेसाठी आणखी उपाय करा

२-टप्पी पडताळणी सुरू करा

२-टप्पी पडताळणी हॅकरना तुमच्या खात्याच्या बाहेर ठेवण्यात मदत करते. २-टप्पी पडताळणी वापरून तुम्ही पुढील गोष्टींसह साइन इन करता:

  • तुम्हाला माहीत असलेले काहीतरी (तुमचा पासवर्ड)
  • तुमच्याकडे असलेले काहीतरी (तुमचा फोन, सिक्युरिटी की किंवा प्रिंट केलेला कोड)

अशा प्रकारे, तुमचा पासवर्ड चोरला गेला तरीही, तुमचे खाते सुरक्षित राहते.

तुमची बँक किंवा स्थानिक अधिकार्‍यांशी संपर्क साधा

दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने तुमच्या बँकला किंवा शासनाला खाते उघडा अथवा पैसे ट्रान्सफर करा यांसारख्या सूचना दिल्या नसल्याची खात्री करा. पुढील बाबतींत, हे महत्त्वाचे आहे:

  • तुमच्या खात्यात Google Pay किंवा Chrome यांमध्ये सेव्ह केलेली क्रेडिट कार्ड यांसारखी बँकिंगसंबंधी माहिती सेव्ह केलेली असल्यास.
  • तुमच्या खात्यामध्ये कर किंवा पासपोर्ट यांसंबंधी माहिती सेव्ह केलेली असल्यास. उदाहरणार्थ, तुम्ही Google Photos, Google Drive किंवा Gmail यांमध्ये वैयक्तिक माहिती सेव्ह केलेली असू शकते.
  • कोणीतरी तुमची ओळख वापरत आहे किंवा तुमची तोतयेगिरी करत आहे असे तुम्हाला वाटत असल्यास.
हानिकारक सॉफ्टवेअर काढून टाका

तुमच्या खात्यावर संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्हाला हानिकारक सॉफ्टवअर काढून टाकणे हे करावे लागू शकते. तुमच्या खात्याच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी, विश्वसनीय अँटि-व्हायरस सॉफ्टवेअर इंस्टॉल आणि रन करा.

तुम्ही तुमचा काँप्युटर त्याच्या फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट करून ऑपरेटिंग सिस्टम पुन्हा इंस्टॉलदेखील करू शकता.

महत्त्वाचे: तुम्हाला गरज असलेल्या फाइलचा बॅकअप घेतल्याची खात्री करा. Google Drive मध्ये फाइल कशा अपलोड करायच्या ते जाणून घ्या.
आणखी सुरक्षित ब्राउझर इंस्टॉल करा
काही इंटरनेट ब्राउझरच्या सुरक्षेमध्ये कमकुवतपणा असतो. Google Chrome यासारखे आणखी सुरक्षित ब्राउझर वापरणे विचारात घ्या.
पासवर्ड अलर्ट वापरून पासवर्डची चोरी रोखण्यात मदत करा
तुम्ही एखाद्या Google च्या नसलेल्या साइटवर तुमचा पासवर्ड एंटर केल्यास, Google Chrome वरील पासवर्ड अलर्ट तुम्हाला सूचित करतो. अशा प्रकारे, तुमचा पासवर्ड चोरण्यासाठी एखादी साइट Google असल्याची बतावणी करत आहे का हे तुम्हाला कळेल.
तुमची अ‍ॅप्स आणि डिव्हाइस सुरक्षित करण्यात मदत करा
तुम्ही वापरत असलेली इतर Google उत्पादने सुरक्षित करण्यात मदत करा

तुमचे Google खाते हॅक केले गेले आहे का ते शोधा

तुम्हाला यांपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, दुसरी एखादी व्यक्ती तुमचे Google खाते वापरत असू शकेल.

महत्त्वाचे: तुमच्या Google खाते मध्ये दुसर्‍या एखाद्या व्यक्तीने साइन इन केले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुमचा पुढील गोष्टींचा पासवर्ड तात्काळ बदला:

  • तुम्ही ते आधीच बदलले नसल्यास, तुमचे Google खाते
  • अ‍ॅप्स आणि साइट:
    • ज्यांसाठी तुम्ही तुमच्या Google खाते साठी वापरला आहे तोच पासवर्ड वापरता
    • ज्या तुमच्या Google खाते ईमेल अ‍ॅड्रेसद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात
    • ज्यांमध्ये तुम्ही तुमचा Google खाते ईमेल अ‍ॅड्रेस वापरून साइन इन करता
    • जेथे तुम्ही तुमच्या Google खाते मधील सेव्ह केलेले पासवर्ड ठेवले आहेत

तुम्ही तुमच्या खात्यामध्ये साइन इन केलेली कोणतीही अपरिचित डिव्हाइस तपासणे आणि काढून टाकणे हे करू शकता.

संशयास्पद खाते अ‍ॅक्टिव्हिटी

अतिमहत्त्वाच्या सुरक्षा सेटिंग्जमधील अपरिचित बदल

तुम्हाला या सेटिंग्जमध्ये अपरिचित बदल दिसल्यास, सेटिंग तात्काळ दुरुस्त करा:

अनधिकृत आर्थिक अ‍ॅक्टिव्हिटी

पुढील बाबतींत तुमची आर्थिक अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

नेहमीपेक्षा वेगळ्या असलेल्या अ‍ॅक्टिव्हिटीसंबंधी सूचना

टीप: तुम्हाला संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सांगण्यासाठी, आम्ही तुमचा रिकव्हरी फोन नंबर आणि ईमेल अ‍ॅड्रेस वापरू.

पुढील गोष्टींद्वारे आम्ही तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीबाबत कळवू:

  • तुमच्या खात्यावरील नेहमीपेक्षा वेगळे साइन-इन किंवा नवीन डिव्हाइस यांबद्दल सूचना.
  • तुमचे वापरकर्ता नाव, पासवर्ड किंवा इतर सुरक्षा सेटिंग्ज यांमध्ये बदल झाला आहे आणि तो बदल तुम्ही केलेला नाही असे कळवणारी सूचना.
  • तुम्ही ओळखत नसलेल्या इतर एखाद्या अ‍ॅक्टिव्हिटीबद्दल सूचना.
  • तुमच्या स्क्रीनच्या सर्वात वर, "आम्हाला तुमच्या खात्यामध्ये संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी आढळली आहे" असे सूचित करणारा लाल रंगाचा बार.
  • तुमचे "डिव्हाइसची अ‍ॅक्टिव्हिटी आणि सुरक्षा इव्‍हेंट" पेज.

तुम्ही वापरत असलेल्या Google उत्पादनांमधील संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी

Gmail

Gmail सेटिंग्ज

तुम्हाला पुढील गोष्टींमध्ये अपरिचित बदल दिसल्यास, सेटिंग तात्काळ दुरुस्त करा:

Gmail अ‍ॅक्टिव्हिटी

पुढील बाबतींत, तुमची Gmail अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

  • तुम्हाला आता ईमेल मिळत नसल्यास.
  • तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्याकडून स्पॅम किंवा नेहमीपेक्षा वेगळे ईमेल मिळाल्याचे सांगत असल्यास.
  • तुमचे वापरकर्ता नाव बदलले गेले असल्यास.
  • तुमच्या इनबॉक्समधून तुमचे ईमेल हटवले गेले असल्यास आणि ते "ट्रॅश" मध्ये सापडत नसल्यास. तुम्ही गहाळ ईमेलबाबत तक्रार करणे आणि त्या संभवतः रिकव्हर करणे हे करू शकता.
  • तुम्हाला तुम्ही न लिहिलेले "पाठवलेले ईमेल" सापडल्यास.
YouTube

पुढील बाबतींत, तुमची YouTube अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

  • तुमचे YouTube चॅनल यामध्ये तुम्ही अपलोड न केलेले व्हिडिओ, तुम्ही न दिलेल्या टिप्पण्या किंवा तुमच्या पुढील गोष्टींमध्ये अपरिचित बदल असल्यास:
    • चॅनलचे नाव
    • प्रोफाइल फोटो
    • वर्णने
    • ईमेल सेटिंग्ज
    • पाठवलेले मेसेज
Google ड्राइव्ह

पुढील बाबतींत, तुमची Google Drive अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

Google Photos

पुढील बाबतींत, तुमची Google Photos अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

Blogger

पुढील बाबतींत तुमची Blogger अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

  • तुमच्या ब्लॉगवर तुम्ही प्रकाशित न केलेल्या पोस्ट दिसतात.
  • तुम्हाला तुम्ही प्रकाशित न केलेल्या पोस्टवर टिप्पण्या मिळतात.
  • तुमचा मेल-टू-ब्लॉगर अ‍ॅड्रेस बदलला आहे पण तो तुम्ही बदललेला नाही.
  • तुमचा ब्लॉग नाहीसा झाला किंवा ब्लॉक केला गेला.
Google Ads

तुम्हाला पुढील अपरिचित गोष्टी आढळल्यास, तुमची Google Ads अ‍ॅक्टिव्हिटी संशयास्पद असू शकते:

  • अज्ञात लिंक किंवा गंतव्यस्थानाकडे निर्देश करणार्‍या जाहिराती
  • तुमच्या जाहिरातीच्या खर्चामध्ये वाढ होणे
  • खात्याचे मालक, व्यवस्थापक किंवा वापरकर्ते यांमध्ये बदल होणे
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
मुख्य मेनू
15510683330923549988
true
मदत केंद्र शोधा
true
true
true
true
true
70975
false
false